vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, ३१ मार्च, २०२२

जीवन म्हणजे म्हटलं तर एक परिक्षा !

चालू घडामोडींचे विश्लेषण





जीवन म्हणजे म्हटलं तर आहे एक  परीक्षा ! 
इथला प्रत्येक प्रश्न सोडवावाच लागतो तरच  कुणीतरी करते आपली समीक्षा ! 
प्रश्नच  नीट समजले नाहीत आणि उत्तरेही आली नाहीत तर मात्र ,  सगळे सोडून देतात आपल्याकडून अपेक्षा ! 
या भयंकर सिमेंटच्या जंगलात, भलेही  वाघ सिंह रहात नाहीत, तरीदेखील वाटते जगण्याची भिती ,  आपलीच  आपल्याला करावी लागते रक्षा ! 
तुमचा संघर्ष, तुमचे यश  ,  तुमचा प्रभाव  यावरच तुमची ठरते दिशा ! 
तुमच्याकडे असेल, गाडी , बंगला आणि पैसा तर तुमच्याशी बोलताना लोकांची असते गोड गोड भाषा ! 
जीवन म्हणजे म्हटलं तर आहे ना परिक्षा ! 
सुखी रहायचे असेल तर ठेवावी  लागते काय आशा ! 
ध्येय प्राप्तीची उंच शिखरे गाठण्यासाठी  प्रगतीची  बाळगावी लागते मनिषा ! 
कितीही संकटे आली तरी  पुढे चालावे लागते ,  करुन चालत नाही नशा ! 
दिवसभर कष्ट असतील प्रामाणिक  तर  गोड गोड वाटेल निशा ! 
जीवन म्हटलं तर एक आहे परिक्षा ! 
©®
कवी . . विजय पिसाळ नातेपुते. . ९४२३६१३४४९

शनिवार, २६ मार्च, २०२२

कळ्यांचे आनंदी जग

. . . . . . . . . . . . 

   का कोण जाणे खूप आनंद झाला  मला बागेत  जाताना ! 
 फिरता   फिरता बागेत  दिसल्या मला दोन कळ्या एकमेकींशी बोलताना ! 
हितगुज  ऐकत होतो मी त्यांचे , बोलत होत्या  एकमेकींशी ,  आनंद आहे  छोटे आयुष्य जगताना ! 
वेदना होत नाहीत  कसल्याही  तुम्ही आम्हाला  तोडताना ! 
कारण आमचे आयुष्य सुंदर असते इतरांना सुगंध देताना ! 
खूप सुखात पाहिलं मी कळ्यांना  वार्या बरोबर हळूवारपणे डोलताना ! 
जणू हसतमुख वाटत होत्या दवबिंदूंचे टपोरे थेंब झेलताना ! 
प्रसन्न झाल्या होत्या कोवळी सुर्यकिरणे अंगावर घेताना ! 
हळूच पहात होत्या सभोवताली फिरणाऱ्या फुलपाखरांना ! 
ऐकत होत्या उंच भरारी घेऊन  मंजुळ गाणी गाणार्या निसर्गातील लेकरांना   ! 
हळूच मला पहात होत्या इकडे तिकडे मी निसर्गाचा आनंद घेताना  ! 
मी मनाशी म्हणालो कळ्यांसारखे छोटे आयुष्य जगावे पण आनंदी रहायला पाहिजे इतरांना सुखी राहताना  ! 
मलाही इतरांसाठी सुख मागायचे आहे ,  विविधतेने नटलेले आयुष्य  जगताना   ! 

रचना . . . विजय पिसाळ नातेपुते. . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

गुरुवार, २४ मार्च, २०२२

स्वातंत्र्य तुला जगण्याचे !

      शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

      युक्रेन -रशिया युद्धातून आम्ही काय बोध घेणार?


      चालू घडामोडींचे विश्लेषण
      . . . . . . . . . . . . . . . . . . . 

      रशिया युक्रेन युद्ध ! ! ! 

      रशिया युक्रेन युद्धातून आम्ही काय बोध घेणार? 

      पुर्व युरोप व रशिया यांना लागून असलेला देश म्हणजे युक्रेन.  बहुसंख्य लोकांचा धर्म ख्रिश्चन आहे.  पुर्वी हा देश सोव्हिएत युनियनचा भाग होता मात्र  नव्वदच्या दशकात  सोव्हिएत युनियनचे पंधरा तुकडे झाले  त्यापैकीच हा एक देश युक्रेन. 
      युरोपशी व रशियाशी नजिक  असल्यामुळे इथे इंग्रजी , रशियन भाषा  व संस्कृती दिसून येते .
       इथे गुन्हेगारीचे प्रमाण जवळपास नाही म्हटले तरीदेखील चालेल.  
      युक्रेन छोटासा पण  अतिशय सुंदर देश आहे . 
       इथे कमी खर्चात  अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळते  म्हणूनच खूप भारतीय इथे मेडिकलचे शिक्षण घेत आहेत.
      या देशात   मोठ मोठी सुविधा युक्त  विद्यापीठे आहेत. 
      सगळीकडे  रस्ते  चकाचक आहेत. सुंदर इमारती आहेत.  सर्व सुखसोयी आहेत. 
       रेल्वे सेवा , विमानसेवा ,  एकदम उच्च दर्जाची आहे . 
       लोकांचे राहणीमान एकदम उच्च दर्जाचे आहे . 
       नैसर्गिक साधनसंपत्ती ,  मुबलक खनिज संपत्ती लाभलेला हा  देश आहे .  आर्थिक सुबत्ता आहे.  सुंदर निसर्ग  लाभलेला आहे. 
        युक्रेनची लोकसंख्या जवळपास  साडेचार कोटींच्या आसपास आहे . 
      असे असूनही युक्रेन हा रशियाचा एक दिवस सुद्धा प्रतिकार करु शकला नाही .  
      कारण काय असेल ?  
      तर तिथल्या लोकांकडे राष्ट्रासाठी  लढण्याची  वृत्ती नाही . युक्रेनकडे  पुरेशी  युद्ध सामुग्री नाही .   विशेषतः आपल्या सारखा त्यांना वारसाही नाही. 
      छत्रपती  शिवरायांसारखे लढण्याची प्रेरणा देणारे पुरुष त्या भूमीत जन्माला आले नाहीत. अन्याय अत्याचार या विरुद्ध व  आपल्या भूमीच्या रक्षणासाठी  जीवावर उधार होणारे व परिणामांचा विचार न करता हाती शस्त्र घेणारे  , सुखदेव, राजगुरू , भगतसिंग सारखे स्फूर्तीनायक तिथे  जन्माला आले  नाहीत.  त्यांच्याकडे , मराठा (महाराष्ट्रीयन), जाट, रजपूत, शिख, गुज्जर,   असे जीवावर उदार होऊन लढणारे लोक नाहीत.  राष्ट्रप्रेमाणे प्रेरित होऊन जीवाची बाजी लावणारे वीर तिथे जन्माला आलेच नाहीत.  अन्यायाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक वृत्ती त्यांच्या अंगातच नाही.
      म्हणून त्यांना आजच्या परिस्थितीत आपल्या  मुलांबाळांना  घेऊन बंकरमध्ये उपाशी झोपायची वेळ आली आहे .  
      पैसा , संपत्ती या गोष्टी त्यांच्यासाठी आजच्या घडीला  जवळपास गौण झाल्या आहेत.  
      ते फक्त जगाकडे आम्हाला वाचवा अशी याचना करत आहेत. प्राणाची भीक  मागत आहेत  पण जगातील कोणताही देश त्यांची मदत करायला तयार नाही . 
       म्हणून आज युक्रेनचे अस्तित्व जवळपास -असूनही नसल्या सारखे गलितगात्र  झाले आहे . 
      यातून आम्ही काय बोध घेणार आहोत ?  
      आम्ही आमच्या  देशात   एकसंघ भावना निर्माण करून  राष्ट्रप्रेम जागृत  करणार आहोत की नाही ? 
      पाकिस्तान, चीन, बांग्लादेश सारख्या शेजारी  युद्धखोर देशांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत  सैनिकी शिक्षण कंपल्सरी करणार आहोत की नाही ? 
      शस्त्रसाठा वाढवून, शस्त्रसज्ज राष्ट्र निर्माण करण्यासाठी पावले टाकणार आहोत की नाही ?  
      अंतर्गत जात, धर्म, वर्ग कलह वाढणार नाहीत याची काळजी घेणार आहोत की नाही ?  
      की अंतर्गत कलहातच आपली शक्ती वाया घालवणार आहोत?  
      छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांचा प्रेरणादाई इतिहास क्रमिक पुस्तकातून  विस्ताराने शिकवणार आहोत की , अजूनही  पोती पुराण सांगत  बसणार आहोत? 
      गुप्तचर यंत्रणा ,  आधुनिक तंत्रज्ञान विकसित करुन भारतात  शस्त्र निर्मितीचे मोठ मोठे  कारखाने प्रचंड वाढवणार आहोत की नाही .  की नुसते  मंदिर मशिद करत बसणार आहोत? 
      व्यसनाधीनीतेमुळे तरुण कमजोर होतात, त्यामुळे दारु , शिगारेट, गुटखा , मावा , तंबाखू  यावर कठोर निर्बंध आणले आणणार आहोत की नाही ?  
      कुस्ती ,  रनिंग,  थाळीफेक, भालाफेक,  नेमबाजी अशा 
      देशी खेळांचे प्रशिक्षण शालेय स्तरावरच देणार आहोत की अजून क्रिकेट, क्रिकेट करत बसणार आहोत? 
        शारीरिक शिक्षण हा विषय  १०० मार्कांचा करणार आहोत की नाही ?  
      यापुढे   सदृढ युवकच देशाला वाचवू शकतात.  केवळ मिलिटरी लढेल व आपण वाचू हा भ्रम सर्वांनी डोक्यातुन काढून टाकला पाहिजे .  सैनिकांच्या मदतीला जेंव्हा राष्ट्रातील प्रत्येक माणूस जाईल तेंव्हाच राष्ट्राचा निभाव लागेल. 
      थोडक्यात बलिशाली राष्ट्र तेंव्हाच सुरक्षित राहिल जेंव्हा तुमची सैनिकी ताकद जगाला टक्कर देण्याच्या क्षमतेची असेल. 
      ©® विजय पिसाळ नातेपुते. . 
      ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

      शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

      मराठा समाजाची दिशा काय असावी ?

      चालू घडामोडींचे विश्लेषण


      सन्माननीय मराठा बंधू भगिनींनो , मी श्री   विजय पिसाळ नातेपुते . . आपणाला मनःपूर्वक नमस्कार. .  
       आपण समाजासाठी रात्रंदिवस काम करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे . आपण  समाजासाठी आजवर केलेले काम व विचारमंथन खूप मोठे आहे . . 
      मराठा समाजासाठी काय योजना असाव्यात,   माझ्या मनात काय आहे हे कळावे म्हणून  संपुर्ण मराठा समाजाला उद्देशून हा छोटासा लेख लिहिला आहे . 
      आपणा सर्वांचे ध्येय आणि विचार हाच आहे की , आपल्याला मराठ्यांचा विकास करायचा आहे .  स्वाभिमानी मराठा परत एकदा उभा करायचा आहे .  लाचारी आमच्या रक्तात नाही हे जगाला दाखवून द्यायचे आहे . . आम्ही आजवर नेतृत्व केले व इथून पुढेही आम्हीच नेतृत्व करू हे दाखवायचे आहे . . आरक्षण गरजेचे आहेच पण 
      आरक्षण या एकाच गोष्टीवर फोकस न करता चौफेर काम वाढवावे लागेल. .  आरक्षणामुळे बोटावर मोजण्या इतक्याच लोकांना रोजगार मिळेल  लाखात एकदोन नोकरीला लागतील,  पण बाकीच्या लाखो बेरोजगारांसाठीही  आपल्याला योजना आखाव्या लागतील,  निश्चित दिशा निर्माण करावी लागेल,  दिशाभूल करणारे लोकांपासून सावध रहावे लागेल. .   
      मराठा ही केवळ जात नसून मराठा हा देशाचा इतिहास आहे . मराठा हा विचार आहे . म्हणून  आम्ही कधीही कमजोर नव्हतो व नाही . . दाखवून द्यावे लागेल  आम्हाला फक्त भविष्याचा वेध घेऊन काही योजना तयार कराव्या लागतील,  व्यवसाय निवडावे लागतील. . . एकेकाळी 
      राज्यकर्ते  कोण असावेत  हे ठरवणारे आम्ही ,  
      अन्याया विरुद्ध  लढणारे आम्ही ,  संघर्ष करणारे आम्ही ,  कष्टकरी आम्ही , ताकदवान आम्ही , आमच्या  मनगटाच्या जोरावर पाहिजे ते  मिळवणारे  आम्ही  आज बर्याचदा हतबल आहोत हे चित्र निर्माण केले जात  आहे . 
      शुर आम्ही , वीर आम्ही . .  ज्ञानी आम्ही ,  पराक्रमी आम्ही 
      हे सर्व आमच्या गाठीशी व  पाठिशी असताना . . . हाच आमचा वास्तव इतिहास असताना 
      बर्याच नालायकांनी सिनेमातून आपल्या पाटलांना म्हणजेच मराठ्यांना  बलात्कारी दाखवले , व्यसनी दाखवले , स्त्रिलंपट दाखवले व आपला जगातील आदर्श समाज किती खराब आहे हे दाखवून कमीपणा देण्याचे काम केले गेले . पण हे आमच्या लक्षात आले नाही . 
      हे सुधारण्याची  वेळ आली आहे .  म्हणून कोणताही  लघूपट,  फिल्म बनवताना आपला पराक्रम, शौर्य, धाडस  , हे दाखवले पाहिजे जेणेकरून  आमची पुढची पिढी बोध घेईल व संघर्षातून पुढे जाईल  हे माझे मत आहे  . . . 
      मराठा कोणत्याही  ठिकाणी मजबूत दाखवला पाहिजे , 
      मराठा हतबल  नाही   . . . मराठा  कमजोर  नाही. .  मराठा . . व्यसनी  नाही . . मराठा आत्महत्या  करणारा  नाही  . 
      तर मराठा आजही  लाथ मारेल तिथे पाणी काढेल हे मनावर बिंबवले गेले पाहिजे . . .  मराठ्यांच्या पोरांनी संपर्षातून निर्माण केलेले कित्येक उद्योग व व्यवसाय आहेत ते दाखवले पाहिजेत  , मराठ्यांच्या पोरांनी  पाच पाच किलोमीटर पाईपलाईन टाकून  शेती फुलवली आहे हे दाखवले पाहिजे  , डाळिंब, ऊस, केळी ,  यांचे घेतलेले विक्रमी उत्पादन दाखवले  ,  मराठ्यांच्या पोरांनी ,  खेळात  प्राविण्य मिळवले आहे हे दाखवले पाहिजे . कित्येक मराठा हे जबरदस्त काम करणारे , डॉक्टर, वकिल, इंजिनिअर, शिक्षक, शास्त्रज्ञ,  संशोधक,  उद्योजक, उद्योगपती ,  शुन्यातून विश्व  निर्माण करणारे आहेत हे दाखवले पाहिजे . 
      मराठा संघटीत होऊ शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
      मराठा उद्योग होऊ शकतो , मराठा व्यापार करू शकतो . .  मराठा ,   आधुनिक शेती करू शकतो . . मराठा . . मराठा जसे  शुन्यातून विश्व निर्माण करू शकतो , तसेच  मराठाच क्रांती करू शकतो हे दाखवले पाहिजे  . . 
      मराठा  , सर्व प्रश्न सोडवू शकतो , मराठा  आधुनिक शिक्षण घेऊ शकतो,  मराठा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकतो .  मराठा एकत्र येऊन शाळा काढू शकतो , कॉलेज काढू शकतो , होस्टेल काढू शकतो,  बँका काढू शकतो , पतसंस्था काढू शकतो , मराठा एकत्र येऊन उद्योग धंदे निर्माण करु शकतो , रोजगार निर्माण करायची ताकद आमच्या मनगटात आहे . हे दाखवले पाहिजे  ,    हे सर्व एकसंघ मराठा करू शकतो हे  मनावर ठसवले पाहिजे  . .  
      व हेच आपण केले पाहिजे . . 
      आरक्षणाची लढाई लढायची आहे पण  त्या सोबत  खूप कामे करावी लागतील व करायची  आहेत. . 

      जय जिजाऊ!  जय शिवराय! 

      तुमचा . . एक मराठा बांधव. . 
      विजय पिसाळ नातेपुते . .
      ९४२३६१३४४९

      शुक्रवार, ७ जानेवारी, २०२२

      नातेपुते गावातील चौका चौकात रंगतेय निवडणूकीची चर्चा !

      चालू घडामोडींचे विश्लेषण




      गेले दोन महिने झाले नातेपुते नगरपंचायत निवडणूक सुरू आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे  प्रभाग, ७ , ८, ९, १० अशा  चार प्रभागांची राहिलेली  निवडणूक  प्रक्रिया सध्या  चालू आहे . प्रभाग १ , २, ३ , ४, ५ , ६ व प्रभाग ११ , १२, १३, १४, १५ , १६, १७ अशा   तेरा प्रभागांची प्रक्रिया  पुर्ण झालेली आहे.  एकंदर  या निवडणुकीत, साम, दाम, दंड भेद याचा सर्सास वापर झालेला दिसून आला .  नवीन प्रभाग रचना आणि राजकीय पार्श्वभुमी नसलेले पण स्वतःची ओळख निर्माण केलेल्या काही  नव्या दमाच्या  तरुणांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत भरली.  पारंपरिक गटतट व युत्या आघाड्या या सातत्याने बनतात, बिघडतात,  प्रत्येक निवडणुकीची समीकरणेही वेगळी असतात.  पण यावेळी मात्र राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या   तरुणांचा उत्साह जबरदस्त पहायला मिळाला .  आम्हाला कधी संधी मिळणार की नाही?  असे  वारंवार ते म्हणत होते.   तेच ते चेहरे , त्याच त्या घरातील उमेदवार, त्याच त्या वाड्या , वस्त्या व वाडे यांच्या भोवती फिरणारे राजकारण यात आम्हाला संधी मिळत नाही  असाही सुर कित्येक उमेदवारांच्या  बोलण्यातून येत होता .   गावातील बहुसंख्य लोकांना काही उमेदवार पसंत नसतात पण केवळ पॅनल प्रमुखांवर प्रेम असते , पॅनल प्रमुखांशी जिव्हाळा असतो , पॅनल प्रमुखांशी नातेसंबंध असतात व आपल्या जवळच्या पॅनल प्रमुखांना  ताकद मिळावी म्हणून काही उमेदवारांना नाईलाजाने लोक मतदान करतात.  हेही या निवडणुकीत दिसून आले .  खाजगीत बोलताना लोक लादलेल्या उमेदवारीमुळेही पॅनल प्रमुखांवर थोडेफार नाराज दिसून आले.  कित्येक वर्ष, काही समाज बांधवांना प्रतिनिधित्व मिळाले नाही , नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग रचनेत,  त्यांना संधी मिळेल ही अपेक्षा होती पण याही वेळी पॅनल प्रमुखांनी काही जागा सेफ करण्यासाठी काही जागांवर  तडजोडी केल्या व कधीही संधी न मिळालेले समाज आजही वंचित राहिले हे एकंदर दिसून येते आहे. 
      ९०% निकाल अपेक्षित लागतील  मात्र काही वार्डातील निकाल अनअपेक्षित लागण्याची  आशा उमेदवार  बाळगून असल्याचे  दिसून येत आहे . 
      एकमात्र नक्की यापुढे  , निवडणूका बिगर पैशाच्या होतील असे वाटत नाही .

      रविवार, १ ऑगस्ट, २०२१

      मालकाच्या तुकड्यावर भुंकणारा कडक कुत्रा !


      चालू घडामोडींचे विश्लेषण. . . . 

      एका मालकाने आपल्या  शेतात  एक कुत्रा  पाळला  होता  व मालक रहायला गावात होता.  मालक रोज त्या कुत्र्याला  न चुकता  भरपुर खायला नेवून देत होता .  त्यामुळे कुत्रा  एकदम गुटगुटीत झाला  होता  . मालकाच्या शेताची राखण तो एकदम प्रामाणिकपणे  करत होता  .  
      एक दिवस असा आला की , मालकाला एक महिन्यासाठी परगावी जायला लागणार होते ,  कुत्रा शेताची राखण चांगली करत असल्यामुळे  मालकाला कुत्र्याची  खूप चिंता होती  पण त्याचे शेत लांब असल्यामुळे त्या कुत्र्याला  खायला टाकायला कुणी जाईल अशी परिस्थिती नव्हती  , आणि कुत्राही  कडक असल्यामुळे त्याला  कुणाकडे ठेवणेही शक्य नव्हते . तो फारच कडक असल्यामुळे  तिकडे त्याला खायला भाकरी व पाणी  कोणीतरी जावून टाकेल  अशीही परिस्थिती नव्हती ,   कुत्रा फक्त मालकाचेच ऐकणारा होता , मालकाने छो म्हटले की तो लगेच कुणावरही कशाचाही मागचा पुढचा विचार न करता तुटून पडायचा ,  त्यामुळे त्या कुत्र्याला सगळे घाबरून असायचे व कुत्र्याचा मालक तर फारड कडक होता .  अशी सर्व परिस्थिती असल्यामुळे  मालकाने मग नाईलाजाने कुत्र्याला  शेतावर मोकळे सोडून गावाला जायचा निर्णय घेतला . शेवटी करणार तरी काय?   आणि मालक काळजावर दगड ठेवून कामासाठी बाहेरगावी एक महिन्यासाठी निघून गेला .  पहिला  दिवस गेला कुत्र्याला  खूप भुक लागली , तो मालक खायला घेऊन येईल याची वाट पाहू लागला  .  पण मालक काही आला नाही .  असे दोनतीन दिवस  गेले, 
       कुत्रा  मालकाची वाट पहात बसायचा ,  एकदम भुकेने व्याकूळ  होऊन त्याचा जीव कासावीस व्हायचा पण  सवय वाईट असते ना ? आयते  तुकडे खायची !   शेवटी त्यालाही  कळून चुकले मालक काय येत नाही . आपण  उपाशीपोटी मरण्यापेक्षा काहीतरी धडपड केलेली बरी . 
      तो इकडे तिकडे फिरु लागला ,   फिरता फिरता त्याला  धडपडत, धडपडत,  शिकार मिळू लागली , सुरवातीला त्याला  एखादी दुसरीच शिकार मिळायची कसेबसे अर्धवट  पोट भरायचे  पण आठ पंधरा  दिवसांत तो  शिकार करण्यात हळूहळू पण  जवळपास पारंगत झाला आणि नियमितपणे शिकार करून जगू लागला . .  जवळपास आत्मनिर्भर झाला असेच क्षणभर म्हणूया   ! आता त्याला  मालकाचीही गरज उरली नव्हती आणि त्याच्या आश्रयाचीही गरज उरली नव्हती . . . 
      वरील स्टोरीवरुन  एक लक्षात येते की जोपर्यंत तुम्ही कुणाच्यातरी तुकड्यावर जगता तोपर्यंत तुम्हाला  दुसर्‍याच्या तुकड्यावर जगायची सवय होते आणि तुम्ही स्वतः कष्ट करायचे विसरुन जाता किंबहुना तुम्ही तुकड्यासाठी लाचार होऊन मालकापुढे गोंडा घोळता . मालकाने छो म्हटले की धावू लागता , प्रसंगी  दुसऱ्यावर भुंकू लागता पण तुम्हाला हेही माहिती नसते की , वेळ आली तर मालक आपल्याला सोडून  देणार आहे .  मालक परत आपल्याला तुकडाही टाकणे बंद करणार आहे . 
      मित्रांनो म्हणून आपल्या आयुष्यात कितीही कष्ट पडले तरीदेखील  कुणाच्याही तुकड्यावर जगू नका . .  स्वाभिमानाने कष्ट करा आणि  आयुष्यात स्वावलंबी बना . .  त्या कुत्र्या सारखे 
      फार कडक वागू नका ,  गोड व नम्र वागा !  आपोआप तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल. . 
      जे साध्या मुक्या कुत्र्याला कळते  की आपण शिकार केली नाही तर आपण जगणार नाही  उपाशीपोटी राहून  मरुन जावू ते आपल्यातल्या दुसर्‍याच्या  तुकड्यावर जगणारांना  कसे कळत नाही .  
      परमेश्वराने आपल्याला दोन हात, दोन पाय, मजबूत शरीर आणि बोलण्यासाठी गोड तोंड दिले आहे , बुद्धी दिली आहे .   तरीदेखील आपण  कुणीतरी आपल्याला तुकडा टाकेल व मगच आपले पोट भरेल  याच विचारात कसे जगतो व कुणाच्यातरी मागे पळतो .  
      कुणीतरी आपले भले करेल या भ्रामक कल्पनेतून पहिल्यांदा बाहेर पडा .  कोणताही कामधंदा करून प्रगती करा पण कुत्र्यासारखे तुकडा मिळेल या आशेने कुणाच्यातरी  मागे फिरु नका . .   अर्थात सर्वांशी आपुलकीने वागा , प्रेमाणे रहा व कुणीही सांगितले म्हणून कधीही कुणावर भुंकत बसू नका , नाहीतर मालकाने वार्यावर सोडले तर  कुणीही तुम्हाला तुकडाही टाकत नसते . . 

      ही काल्पनिक  स्टोरी कशी वाटली हे मला  नक्की कळवा. . . 
      स्टोरी आवडली असेल तर लेखकाच्या  नावासह नक्की शेअर करा . प्रबोधनासाठी थोडे कठोर लिहावे लागते तरच स्वाभिमान गहाण ठेवलेली पिढी जागृत होईल ना ? 
      ©® लेखन प्रपंच. . विजय पिसाळ नातेपुते. . . ९४२३६१३४४९
      लेखक, कवी ,  व्याखाता . . ब्लॉगर. . .

      शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

      पद्मविभूषण मा . श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिसा निमित्त!


      चालू घडामोडींचे विश्लेषण


      पद्मविभूषण   मा .  श्री शरदचंद्रजी पवार साहेब.  तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! ! 

      साहेब. . . . . .  
      शेकडो आरोप झेलत, कोणत्याही आरोपांना कवडीचीही किंमत न देता कामावर लक्ष केंद्रित करत,  मार्केटींग व  प्रसिद्धीचा विचार न करता काम करत रहाणे !
      म्हणजे साहेब. 
       महाराष्ट्र 
      राज्याचे उपमंत्री , राज्य   मंत्री , कॅबिनेट मंत्री  ते थेट चार वेळा मुख्यमंत्री फक्त साहेब. 
       भारत देशाचे संरक्षण मंत्री , 
      लोकसभेचे विरोधी पक्ष नेता . 
      नंतर कृषी , अन्न व नागरी पुरवठा मंत्री  अशी जबाबदारी फक्त साहेब 
       सलग ४७ वर्ष, विधानसभा , विधान परिषद,  लोकसभा व राज्यसभा अशी कारकीर्द. .  फक्त साहेब 

      विरोधीपक्षात असतानाही वाजपेयींच्या   डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे प्रमुख  फक्त साहेब. . 
      कला , क्रीडा , नाट्य, 
      संगीत, वाचन, याची आवड फक्त साहेब. . . 
      मि शेतकरी , मि तुमचा लाभार्थी , 
      हो साहेब  तुमच्या  दुरदृष्टीतील 
      १००% अनुदानित फळबागा योजना  आम्हाला वरदान ठरली! 

      आवाढव्य आकारमानाची मोठमोठी शेततळी ५० ते ७५% अनुदानित योजना दुष्काळी पट्ट्यातील लाखो शेतकर्यांना  करोडपती करून गेली ! 

      ३५ ते ७५ % अनुदानित ठिबक सिंचन योजना आम्हाला पीकांना  पाणी देण्यासाठी व उत्पादन वाढीसाठी  मैलाचा दगड ठरली ,  
      होय तुम्हीच शेकडो कांदाचाळी दिल्या ! 

      नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन अर्थात Nhm मधुन कित्येक शेतकर्यांना जमिन डेव्हलपमेंट करून दिली . 
      हो साहेब तुम्हीच  १२ % व्याज दराने मिळणारे पीक कर्ज  ४ % व पर्यंत आमच्या साठी उपलब्ध केले . 
      आमच्या पाचवीला पुजलेला  दुष्काळ आला , रोगराई आली , गारपीट झाली ,  तेलकट रोगाने आम्ही बेजार झालो , तेंव्हा तुम्हीच आमचे बांधावर येऊन अश्रू पुसले , आधारवड बनून  मदत केली ,
      जो देश तुम्ही केंद्रिय कृषी मंत्री होण्या अगोदर, गहू , तांदूळ आयात करत करत होता . 
       तुमच्या कुशल  धोरणामुळे   तोच माझा देश स्वतःची गरज भागवून निर्यातदार झाला . 
       तुम्हीच आमचा   कांदा , द्राक्ष, डाळिंब, पोपई, बोरे , केळी जगाच्या बाजारपेठेत पाठवली , आम्हाला पैसा मिळाला व देशाला बहुमोल असे परकीय चलन मिळाले . 
      हो साहेब तुमच्यामुळेच,  
      हिंजवडीत आयटी पार्क उभे  झाले हजारो इंजिनिअर कामाला लागले , तळेगाव एमआयडीसीत तुम्हीच  फ्लोरिकल्चर पार्क तयार केले व जगातील बाजारपेठेत  इथली  फुले जावू लागली . 
      तुम्हीच नाला बंडिंग व  शेकडो धरणे बांधून या राज्यातील शेतीची व शहरांची तहान भागवली ,   देशात सर्वाधिक औद्योगिक वसाहती महाराष्ट्रात  तुम्हीच निर्माण केल्या ,  पिंपरी चिंचवड पासून, बारामती पर्यंत नजर टाकली तर लाखो लोक त्या ठिकाणी काम करताना दिसतात. 
      राज्यातील साखर उद्योग,   आणि इथेनॉल व वाईन उद्योग याला चालना दिली ,   दुधाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या नंबरला आणला .  गावोगावी वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथालये दिली , त्यांना अनुदान दिले .  
      शेतकर्यांना ,  कडबाकुट्टी , पेरणी  यंत्रे ,  मशागतीसाठी छोटे ट्रॅक्टर तुम्ही देऊन  आमचे कष्ट कमी केले , 
      ऊस संशोधन केंद्र , डाळिंब संशोधन केंद्र, आंबा संशोधन केंद्र,  महाग्रेप या संस्था तुम्हीच निर्माण केल्या , 
      कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान विकसित करून दिले . 
      भीमथडी जत्रेच्या माध्यमातून  लाखो महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला . 
       बारामती , पुणे  या ठिकाणी  शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले ,  शिक्षण क्षेत्रात तुम्ही  , आर्ट, सायन्स,  कॉमर्स, लॉ कॉलेज, डीएड, बीएड कॉले , तर काढलीच पण इंजिनिअरिंग व फार्मसी कॉलेज ते  मेडिकल कॉलेज पर्यंत तुम्ही सोयी निर्माण केल्या !
       कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निर्माण केलेली रयत  शिक्षण संस्था तुम्ही त्याच तळमळीने वाढवली आणि टिकवली . 
      तुम्ही क्रिकेट मध्ये आयपीएलची  २० -२० स्पर्धा सुरू करून भारताचे नाव जगात सर्वात पुढे केले ,  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना वानखेडे स्टेडियमचा चेहरामोहरा बदलला , बीसीसीआयचे अध्यक्ष असताना धोनी सारख्या कप्तानाला संधी देऊन  भारतीय क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित केले ,  साहेब तुम्ही  आयसीसी चे अध्यक्ष असताना क्रिकेटमध्ये काही चांगले बदल घडवले .  
      तुम्ही कुस्तीलाही न्याय दिला , तुम्ही कबड्डीलाही नावारूपाला आणले . 
      पण साहेब तुमचे दुर्दैव  या कपाळकरंट्या मातीत तुम्ही जन्माला आला . . 
      तुम्ही जर गुजरात, युपी , बिहार,  आंध्र अशा राज्यात जन्माला आला असता तर तुम्हाला त्या जनतेने डोक्यावर घेतले असते पण या मातीला छत्रपती शिवरायांचे पासून  फुटीचा , व परक्यांची चाकरी करण्याचा शाप आहे व तो पुसणे कठिण आहे .  तुम्ही निर्माण केलेल्या संस्थामध्ये शिक्षण घेतील, तुम्ही निर्माण केलेल्या कारखान्यात,  आयटी पार्कमध्ये नोकरी करतील पण मराठी लोक परकीयांचे गोडवे गातील हा गुण या मातीचा आहे . 
      देशातील कित्येक नेते असे असतील, त्यांनी साधी पीठाची गिरणी काढली नाही कि एकाही माणसाला रोजगार मिळवून दिला नाही ,  उलट लोकांनी निर्माण केलेले विकण्याचा सपाटा लावला तरीदेखील ते केवळ भाषणबाजी व संघटनेचे पाठबळावर खूप मोठे नेते असल्याचे भासवले जाते पण तुमच्या कर्तृत्वाला नावे ठेवून, बदनाम करून  , स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते पण इतिहासात तुमचे नाव सुवर्ण आक्षरांनी नोंदले जाईल हे मात्र नक्की ! 
      लेखन. . विजय पिसाळ नातेपुते.  ९४२३६१३४४९

      शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

      मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार व खासदार ठोस भूमिका का घेत नाहीत!

      चालू घडामोडींचे विश्लेषण

      मराठा आमदार व खासदार मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस व खरी भुमिका का घेत नाहीत!  
      मुळात  बहुसंख्य मराठा समाज खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात व वाड्या वस्तीवर आणि दुर्गम भागात राहतो .  शेती हेच मुख्य उपजीविकेचे साधन असल्यामुळे , शिक्षण, व्यापार, नोकर्या , आणि उद्योगधंदे यात मराठा समाज अत्यल्प आहे .  मराठा समाजात भयंकर अंधश्रद्धा व रुढी परंपरा पाळल्या जातात.  खेड्या पाड्यातील मराठा समाज हा ब्राह्मण समाजाचे जास्त ऐकतो ,  त्या नुसारच आचरण करतो .  त्यामुळे मराठा समाजात देवभोळे पणा ,  करणी , शांती ,  या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो .  अशा परिस्थितीत जगणारा मराठा  समाज  बिलकुल जागृत नसतो .  कारण  त्याचे विश्व हे मर्यादित आहे .  म्हणून बाहेरील जग सातत्याने मराठा समाजाचे शोषण करत आले आहे .  यात सावकार, बँका , व्यापारी , यांनी तर मराठा समाजाला लुटले आहे .  जो मराठा जास्त देवभोळा आहे .  त्यालाही , नारायण नागबळी , ग्रहशांती , पुजा , अभिषेक यात अक्षरशः लुटले जाते .  कारण बहुसंख्य मराठा याची  कारण मिमांसा करत नाही .  त्यामुळे  संख्येने प्रचंड असूनसुद्धा काहीही साध्य न झालेला व आर्थिक मागास राहिलेला मराठा जागोजागी दिसून येतो . 
      महाराष्ट्रातील जवळपास १८० ते २०० मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे .  सहाजिकच त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष मराठा उमेदवारांना उमेदवारी देतात. काही मराठा शिलेदार अपक्षही उभे राहतात.  त्यामुळे त्या मतदारसंघात चार पाच उमेदवार हे मराठा असतात, त्याठिकाणी ४० % पर्यंत जरी मराठा मतदार असले तरीदेखील मराठा मतदार, नातीगोती , सगेसोयरे , आर्थिक हितसंबंध,  राजकीय वाटणी यात विभागले जातात, म्हणून  कोणत्याही मतदारसंघात मराठा मतदान हे एकसंघ रहात नाही . समजा मराठा समाजाचे  ४०% मतदान असेल व मराठा समाजाचेच पाच उमेदवार असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला मराठ्यांची मते फक्त ८ ते ९% इतकीच येतात.  गावागावात मराठ्यांचे गटतट असतात, एक गट अ उमेदवाराकडे असेल तर दुसरा गट  ब उमेदवाराकडे आपोआपच जातो ,  खालची गल्ली  विरुद्ध वरची गल्ली  अशीही वाटणी असतेच.  गावागावात,  बांधावरून,  शेतीच्या वाटणीवरुन, गणपती मंडळावरुन, भावभावकीवरून वाद चालू असतातच, त्यामुळे  एक गट एकिकडे गेला की , दुसरा गट दुसरीकडे जाणार हे पुढार्यांना माहिती असतेच. आणि काही जणांना , दारू , मटण व पैसा दिला की काम फत्ते होतेच. ही मराठा मतदारांची परिस्थिती सर्व राजकीय पक्ष  व उमेदवार जाणून असतात. या तुलनेत  बाकीचे समाज घटक छोटे छोटे असले तरीदेखील ते राजकीय दृष्ट्या  फार जागृत असतात.  मुस्लिम, मागासवर्गीय, आणि ओबीसी हे ठरवून  एकगठ्ठा मतदान करत असतात. जो उमेदवार त्यांची कामे करेल त्यालाच ते पाठिंबा देतात,  या समाजातही  फाटाफूट असते पण  , त्याचे प्रमाण फार नगण्य असते .  यामुळे  या लोकांचा ज्या उमेदवारांना पाठिंबा मिळतो ते उमेदवार आपोआपच विजयी होतात.  त्यामुळे  मराठा समाजातील आमदार, खासदार  हे कदापिही इतर समाजाला दुखावू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे . कोणताही राजकीय पक्ष व नेता  राजकीय धोका पत्करू शकत नाही.  त्यामुळेच  आजवर मराठा समाजाचे प्रश्न कुणीही गांभीर्याने घेतले नाहीत,  लाखोंचे मोर्च हे रस्त्यावर एकसंघ जरी दिसले तरीदेखील त्याचे एकसंघपणे  मतात परिवर्तन होत नाही .  त्यातही मराठा समाजाचे शेकडो नेते  वरवरचे मराठा समाजाचे तारणहार वाटतात.  काही अपवाद सोडले तर प्रत्येक मराठा  नेता कोणतरी  राजकीय पक्षांची तळी छुपेपणाने उचलून धरतो आहेच.  कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या प्रमुखांचे व त्यांचे हितसंबंध असतात पण आतील गोष्टी भोळ्या , भाबड्या मराठा    समाजाला माहित नसते म्हणूनच आजवर मराठा समाजाला  आरक्षण मिळाले नाही व पुढेही हे मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी काम करतील अशी परिस्थिती नाही . 
      त्यामुळे मराठा समाजातील  , डॉक्टर, वकील, उद्योगपती , सधन शेतकरी , नोकरदार बांधव, व्यापारी बांधव, या सर्वांनी राजकीय पक्ष व राजकीय पुढारी यांच्या नादी न लागता , एकत्र येऊन मराठा समाजाच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी , वेगवेगळी कॉलेज, होस्टेल, नीट व जेईई चे क्लासेस, मेडिकल कॉलेज  , आयुर्वेद कॉलेज, स्पर्धा परिक्षा केंद्र, अभ्यासिका व व्यावसाय आणि करिअर मार्गदर्शन केंद्र काढली पाहिजेत. एकत्र येत आयात, निर्यात, परदेशातील नोकरी आणि व्यापाराच्या संधी शोधल्या पाहिजेत.  बाहेरच्या देशातील, शिक्षणाच्या संधीही माहिती करून घेतली पाहिजे . सहकारी  उद्योगधंदे ,   पतसंस्था , बँका  व नवीन उद्योग निर्माण करून  मराठा मुला  व्यावसायिक झाले पाहिजे.  मराठा मुला , मुलींना माफक फिमध्ये शिक्षण व जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .  मराठा समाजातील लोकप्रतिधी हे  पुर्णपणे व्यावसायिक राजकारणी असतात.  तेच समाजाची पद्धतशीर दिशाभूल करतात. राजकीय पोळी भाजण्यासाठी मि कसा समाजाचे काम करतोय, माझाच पक्ष कसा मराठ्यांना न्याय देऊ शकतो हे वारंवार खोटेनाटे सांगून मनावर बिंबवत असतात.  विधिमंडळात, कायदेशीर बाबी न तपासता चुकीच्या कायद्यांनाही डोळेझाक करून पाठिंबा देतात , खरेतर मराठा समाजात शेकडो प्रतिभावान विधिज्ञ व माजी आणि विद्यमान न्यायाधीश असताना , टिकणारे आरक्षण कसे देता येईल  याची मराठा आमदार व खासदार यांनी एकत्रित चर्चा करून  सत्य परिस्थिती समजून घेऊन  प्रसंगी  पक्षाची भुमिका बाजूला ठेवून, टिकणार्या आरक्षणाचा ड्राप्ट आपआपल्या राजकीय पक्षांना द्यायला पाहिजे होता . अपवाद सोडले तर  मराठा समाजाचे कुणालाही घेणेदेणे नाही . म्हणून आजवर मराठा आरक्षण लटकलेले आहे .  मराठा समाजाच्या  पिढ्या बरबाद करायचे काम सध्या सुरू आहे .  
      कारण ओपनमध्ये असल्यामुळे महागडी शैक्षणिक फि व शहरातील होस्टेल, मेस व इतर खर्च परवडत नाहीत.  भांडवल नसल्यामुळे धंदा करता येत नाही .  आणि शेतीतर पुर्णपणे तोट्यात आहे . तरीदेखील मराठा समाजाकडे कुणीही बघायला तयार नाही . ©®
      विजय पिसाळ नातेपुते. 
      ९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

      बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२०

      मराठा आरक्षण मुख्य अडचण कोणती ?


      मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्ट कचेरीत अडकून झारीतील शुक्राचार्य मजा लुटत आहेत, मराठा व इतर  विविध समाजाची पद्धशीर विभागणी करून आपली राजकीय  पोळी कशी भाजता येईल हे काम ते अचूकपणे करत आहेत.  कोर्टाच्या ५०% घालून दिलेल्या अटीची वारंवार आठवण करून देऊन,  जणू कोर्ट हेच अंतीम सत्य आहे असा अभास तयार करत आहेत. घटनेत  दुरूस्तीचा अधिकार संसदेला असतानाही सर्व राजकीय पक्ष मुग गिळून गप्प आहेत.  इतर समाज घटकांना  तर मराठा समाजाचा वापर करायचा  आहेच  पण  मराठा समाजातील राजकीय नेत्यांना सुद्धा मराठा जातीचे सोयरसुतक नाही . प्रत्येक  नेता व मराठा संघटना प्रमुख स्वतःच्या सोईची व परस्पर विरोधी  भुमिका घेत आहे . त्यामुळे मराठा विखूरलाा जातोय, सत्य भुमिका घेऊन  कुणी बोलायला तयार नाही .   संबंध  देशात  एससी व एसटींना  त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत १००% आरक्षण घटनेनुसार दिले आहे व ओबीसी प्रवर्गाला ओबीसींच्या लोकसंख्येच्या ५०% आरक्षण देण्याची तरतूद व शिफारस मंडल आयोगाने केली  आहे . ओबीसी जातीत कुणाचा समावेश करायचा या साठी मागासवर्ग आयोग काम करतो  व तशी शिफारस ते करतात. आजवर जेवढ्या जाती ओबीसीत समाविष्ट झाल्या त्यांची  देशपातळीवर  लोकसंख्या कदाचीत ५२% असू शकते व त्या आधारे देशपातळीवर २७% आरक्षण दिले गेले  असेलही पण महाराष्ट्रातील आजवरच्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी विविध समाजांना ओबीसीत समाविष्ट करताना त्यांची वास्तविक राज्यातील  लोकसंख्या किती हे तपासले नाही .  आरक्षणाची  वाटताना , महाराष्ट्रात ओबीसींचा समावेश करताना बर्याच जातींचा समावेश हा त्यांचे मागासलेपण न तपासता केला गेला आहे व तेच मराठा समाजाला ओबीसीत समावेश करायला विरोध करत आहेत.  मुळात कुणाचा समावेश ओबीसीत करावा व करू नये याचे काम मागासवर्ग आयोगाचे आहे व आयोगाने मराठा समाजाचे  मागासलेपण तपासले नंतर यांनी विरोध करायचे कारण काय?  वास्तविक  पाठिमाच्या काळात त्यांचा ओबीसीत समावेश करताना त्यांचीी   लोकसंख्या किती हे तपासले नाही व  त्यांना  आरक्षण जवळपास ३२ % पर्यंत दिले गेले ,  सांख्यिकी विभागाने २०१५ साली  जी आकडेवारी काढलेली आहे , त्यामध्ये ओबीसी ३३. ८% ( व्हीजेएनटी सह )व 
      मराठा २९. ५० असल्याचे  नमुद केले आहे  . 
      याचाच अर्थ ओबीसींना आरक्षण हे १६. ९ % पाहिजे होते  पण  राज्यकर्त्या लोकांनी याला हरताळ फासला आहे.  आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत १००% आरक्षण दिले आहे .  यामुळे  २९. ५० % मराठा समाजाला १४. ७५% आरक्षण मिळाले पाहिजे  पण ते  मिळत नाही .  मराठा समाजाचे सामाजिक व आर्थिक मागासलेपण सिद्ध होऊनही ओबीसींचा विरोध होतोय, हे केवळ राजकीय नेत्यांच्या मराठा विरोधी मानसिकतेमुळे .   कोणत्याही समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करताना , त्याचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपण व शासकीय नोकर्यातील लोकसंख्येच्या पटीत असणारे प्रमाण हे सर्व समाजाच्या लोकसंख्येच्या पटीत असायला हवे .  मराठा समाजाचे शासकीय नोकरीतील प्रमाण हे फक्त  १४ % आहे . याचा अर्थ मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण हे इतर समाजाला राजकीय नेत्यांनी वाटून मोकळे झाले आहेत. 
      मुळात आरक्षणाची तरतूद सर्व समाजाला लोकसंख्येच्या पटीत योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी करण्यात आली पण राजकीय मंडळींनी  ओबीसी जातींची संख्या गृहित धरली , छोट्या छोट्या भरपूर जाती ओबीसींच्या आहेत  पण त्यांची महाराष्ट्रातील लोकसंख्या किती हे तपासले नाही आणि त्याचा परिणाम मराठा आरक्षणावर झालेचे दिसून येते .   ओबींसीचे म्हणणे आहे की आमची लोकसंख्या ही ५४% आहे व मराठा समाजाचे म्हणणे आहे की आमची लोकसंख्या ही ३२ % आहे पण दोघांचेही दावे तपासण्यासाठी वरिल चार्ट पुरेसा आहेच पण तरीदेखील दोघांचेही दावे जातनिहाय जनगणना करून तपासावेत व  लोकसंख्येच्या ५० % आरक्षण  ओबीसी  व मराठा समाजाला अ व ब विभाग करून द्यावे  म्हणजे सध्याच्या ओबीसींना जी मराठा समाजाची भिती वाटते ति सुद्धा दुर होईल.   मराठा समाजाची लोकसंख्या जर ३०% निघाली तर त्यांना ओबीसी मध्ये १५ % पेक्षा जास्त वाटा मिळणार नाही ही तरतूद केली व स्थानिक स्वराज्य संस्थात जे सध्या ओबीसींना राजकीय  आरक्षण मिळते ते मराठा समाजाला मिळणार नाही किंवा त्यातही अ व ब केले तर महाराष्ट्रात मराठा व ओबीसी गुण्या गोविंदाने नांदतील.  मराठा समाजानेही जातनिहाय जनगणना करूनच आपली मागणी केली पाहिजे .  जेवढी आपली संख्या असेल त्याच्या ५०% च न्याय वाटा मागितला पाहिजे . आपणही आपल्या संख्येच्या ५०% मागितले पाहिजे . अगदी मग ति संख्या कितीही कमी असली तरीदेखील त्याच्या ५०% वाटाच मागितला पाहिजे .  जातनिहाय जनगणना झाल्या शिवाय दुध का दुध व पाणी का पाणी होणार नाही .  बाकीच्या जनरल जागेत  सर्वजण येतातच.
       खरेतर आजच्या घडीला  सर्वच जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे ही मागणी ओबीसी व मराठा समाजाने मिळून केली पाहिजे . म्हणजे ५४ % ओबीसी असतील तर ५४% वाटा मिळावा व ३२ % मराठा असेल तर ३२% वाटा मिळावा पण असे न करता केवळ मराठा समाजालाा विरोध करून ओबीसीतील काहीजण विरोध करत आहेत.  न्याय किंवा लोकसंख्येच्या ५०% तरी वाटा दोघांनाही मिळाला पाहिजे .  ओबीसींची सध्याची संख्या जास्त असेल तर त्यांना जास्त वाटा मिळाला पाहिजे आणि मराठा व इतरांनाही  हक्काचा वाटा मिळाला पाहिजे . 
      ज्याची जेवढी संख्या  , त्याला तेवढे प्रतिनिधीत्व हा नैसर्गिक हक्क आहे व तो डावलताही येणार नाही . वरील  विषय डोक्यात घेतला तरच 
        मराठा  आरक्षणाचा विषय मिटू शकतो . 
      विजय पिसाळ नातेपुते .

      मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

      मराठा आरक्षणाचा सन २०१३ ते सन २०२० प्रवास!

      मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करतंय कोण?  
      मराठा आरक्षणा बाबतीत खरेच राजकीय पक्ष गंभीर आहेत का ? 

      मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फार जुनी होती पण त्याला व्यापक स्वरुप नव्हते दि.  ४ एप्रिल २०१३ रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रथमच विशाल मोर्चा मराठा महासंघाने मुंबईत काढून मराठा आरक्षणाची गरज व त्यातून मराठा समाजाची आतील  दाहकता आणि मागणी खर्या अर्थाने सर्वांसमोर आणली पण तरीदेखील पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस आघाडीचे सरकार फार गंभीर नव्हते , मराठा  समाजाचा आक्रोश त्यांच्या लक्षात आलाच नाही , २०१३ पासून ते  २०१४ साल उजाडे पर्यंत   भाजपाने मोदींचे जोरदार मार्केटींग चालू केले . अण्णा हजारेंचे आंदोलन व निर्भया केसने राष्ट्रवादी व  काँग्रेस पुर्णपणे बॅकफूटवर गेली , जनमत विरोधात जातेय हे लक्षात घेऊन  आणि पुढील संकटाची चाहूल ओळखून पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात समिती गठीत केली , समिती म्हणजे मागासवर्ग आयोग नव्हे , परंतु समितीने , मराठा समाजाचा , सर्वंकष अभ्यास करुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही शिफारस केली व खर्या अर्थाने पहिल्यांदाच मराठा समाजाचे बाबतीत एक पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार झाला .  पण ११/फेब्रुवारी  २०१३ राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना होऊन सुद्धा मराठा समाजाचा प्रश्न तत्कालीन सरकारने आयोगाकडे का पाठवला नाही ?  याचेही आश्चर्य वाटते ..व उत्तर पण मिळत नाही .  त्यातही , या अयोगातील डॉ. सर्जेराव निमसे , राजाभाऊ करपे, चंद्रशेखर देशपांडे , भूषण कर्डिले , दत्तात्रय बाळसराफ, सुवर्ण रावळ यांचा कार्यकाल ३०/१२/२०१४ साली संपला . पण यापुर्वी हे काम ते करू शकले असते पण तेंव्हाच्या सरकारने हे काम राणे समितीकडे दिले . राणे समितीने २६/२/२०१४ ला अहवाल सादर केला .  पण लोकसभा निवडणूक लागली त्यामुळे आघाडी सरकारला आचारसंहिता लागू झाल्यामुळे आरक्षणाची घोषणा करता आली नाही . मे २०१४ च्या लोकसभा  निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आणि राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते खडबडून जागे झाले आणि त्यांनी राणे समितीच्या शिफारसी स्वीकारुन २५ जुन २०१४ ला मराठा आरक्षणाची घोषणा केली , आणि जुलै २०१४ ला १६% आरक्षणाचा अध्यादेश काढला . पण वेळ निघून गेली होती , केंद्रात १० वर्ष व राज्यात १५ वर्ष सत्तेवर राहून अखेरीस घाईघाईने निर्णय घेतला  आणि  दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका  लागल्या आणि मोदींच्या तयार केलेल्या लोकप्रियतेत व  लाटेत काँग्रेस व राष्ट्रवादीची लोकसभे प्रमाणेच वाताहत झाली आणि भाजपाने स्वबळावर विधानसभेच्या  १२३ जागा जिंकल्या स्वतंत्र लढून सुद्धा १२३ जागा जिंकल्यामुळे भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि पवार साहेबांनी भाजपाला न मागता पाठिंबा जाहीर केला ,  आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी  मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली , सरकारला विधानसभेत स्पष्ट बहुमत नसताना आणि शिवसेना विरोधात बसूनही भाजपाने अवाजी   मताने  बहुमत सिद्ध केले तेंव्हा राष्ट्रवादीने सभागृहातून वॉक आऊट करत अप्रत्यक्ष भाजपाला मदतच केली ,  तेंव्हा जर विरोधात मतदान केले असते तर देवेंद्र सरकार लगेच पडले असते .  शिवसेना तात्पुरती विरोधात बसली खरी पण  शिवसेनेचा विरोध पक्ष फुटीच्या भितीमुळे मावळला आणि  सेना फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाली  आणि दरम्यानच्या काळात माहिती अधिकार कार्यकर्ते व वकिल केतन तिरोडकर हे कोर्टात गेले आणि   आरक्षणाचे व्हायचे तेच झाले  आणि  उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबर २०१४ रोजी स्थगिती दिली  कसेबसे हे आरक्षण ५ महिने टिकले .  आरक्षणावरील स्थगिती उठवावी म्हणून  मराठा वकिल श्री विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाने  विनोद पाटील यांचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाला या केसचा अभ्यास करून लवकरात लवकर निकाल द्यावा असे आदेश दिले . 
      आणि उच्च न्यायालयात आरक्षणाची केस कशी लांबवता येईल हे सुरू झाले ,  फडणवीस सरकारने कोर्टात कधी वकिल देण्यासाठी , तर कधी म्हणणे  (शपथपत्र ) सादर करण्यासाठी सातत्याने तारखा मागून घेतल्या .   हा खटला जाणीवपुर्व कसा लांबला जाईल हे पाहिले गेले . पण १३ जुलै २०१६ साली कोपर्डीत दुर्दैवी घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली ,   मराठा समाज वनव्या सारखा पेटून उठला पण शिवरायांचे विचार व संस्कार मानणारा मराठा समाज असल्यामुळे समाजाने  संपुर्ण महाराष्ट्रात शांततेत ५८ मुक मोर्चे काढले ,  हे मोर्चे ९ ऑगस्ट पर्यंत चालूच होते , लाखोंचा समुदाय रस्त्यावर येऊन सुद्धा कुणालाही त्रास होणार नाही इतकी शिस्त पाळून हे मोर्चे निघाले , दुर्दैवाने या कालावधीत जवळपास ४२ तरूणांनी आपले आरक्षणासाठी बलिदान दिले . शांततेत निघालेल्या मुक मोर्चाची संभावना दैनिक सामनामधून मुका मोर्चा घाणेरड्या व्यंगचित्रातून केली गेली पण नंतर उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली .  या मोर्चांचा परिणाम होऊन भाजपाला भिती वाटू लागली आणि  त्यांनी हलचाली सुरु केल्या .  ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने शपथपत्र सादर करायला तब्बल ५ डिसेंबर २०१६ पर्यंतचा , दोन वर्षापेक्षा जास्त  कालावधी  कालावधी घेतला .  आणि तब्बल पाच हजार पानांचे शपथपत्र कोर्टात सादर केले ,   मग शपथपत्राचा अभ्यास करण्यासाठी कोर्टाने तारीख पे तारीख चालू ठेवले आणि  निर्णय दिला कि राज्य मागासवर्ग आयोगाकडे हे प्रकरण सोपवून, राज्यमागासवर्ग आयोगाने कोर्टात अहवाल सादर करावा .  पण मराठा समाजाचा दबाव आणि वातावरण विरोधात जातेय हे पाहून फडणवीस यांनी मराठा समाजाला चुचकारण्यासाठी काही लोकप्रिय निर्णयांची घोषणा केली ,  त्यात, वसतिगृहे , स्कॉलरशिप, सार्थी संस्था  आणि  अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी यांचा समावेश होता . कोर्टाच्या आदेशानुसार व कालमर्यादेच्या अटीमुळे  मराठा आरक्षण हे प्रकरण  ४ मे २०१७ रोजी राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवले  गेले पण अयोगाचे अध्यक्ष म्हसे साहेब यांचे निधन झाले .  परत अध्यक्ष व इतर रिक्त  सदस्य  कर्मचारी स्टाफ यांची  नियुक्ती करायला काही वेळ गेला कि लावला ?  आणि राज्य मागासवर्ग आयोगाने १५ नोव्हेंबर २०१९ राज्य सरकार कडे अहवाल सादर केला .  २०१९ च्या  लोकसभा निवडणूकीला सहा ते सात महिने अवकाश असताना म्हणजेच ३० नोव्हेंबर २०१८ साली फडणवीस सरकारने आयोगाच्या शिफारसी स्वीकारून तो कायदा विधिमंडळात मांडून सर्व  पक्षाचे एकमताने १६% आरक्षण एस ई बी सी म्हणून   मंजूर केले  .  त्याही कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले गेले . पण उच्च न्यायालयाने खटल्याचा निकाल लावण्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासू डे टू डे सुनावणी सुरू केली मार्च मध्ये सुनावणी पुर्ण झाली  व उच्च न्यायालयाने गायकवाड अयोगाच्या शिफारसी ग्राह्य धरुन  २७ जुन २०१९ रोजी   मराठा समाजाला  नोकरीत १३ % व शिक्षणात १२ % असे फोड करून आरक्षण  कायम केले . उच्च न्यायालयाने    १४ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र सरकारने केलेली घटना दुरूस्ती सुद्धा आड येत नाही असे मत नोंदवले , मुळात केंद्र सरकारने १४  ऑगस्टला २०१८  घटना दुरूस्ती करून  राज्य सरकारला आरक्षणाचा कोणताही कायदा विधिमंडळात पारीत करता येणार नाही अशी ति घटना दुरूस्ती होती परंतु फडणवीस सरकारने या मुद्याचा विचार न करता विधिमंडळात मराठा आरक्षण कसे मंजूर केले हे कोणही सांगत नाही .  या घटना दुरूस्तीमुळे केवळ केंद्र सरकारच आरक्षणा संबधित कायदे करू शकते असा त्याचा अर्थ आहे व राज्याने केवळ शिफारस करायची आहे .   केंद्राने दोन्ही सभागृहात कायदा करायचा असतो व तो राष्ट्रपतींनी सही करून कायम करायचा असतो .  पण याकडे  सर्व संघटनांनी सुद्धा  दुर्लक्ष केल्याचे दिसून येते कारण आतल्या गोष्टी समाजापुढे येत नसतात व समाज मात्र  फरफटत जातो !  मराठा आरक्षण    याच मुद्यावर भाजपाने लोकसभा निवडणूकीत प्रचार केला आणि महाराष्ट्रात भरघोस यश मिळवले ! 
      वरिल सर्व घटनाक्रम थोडक्यात लिहिला आहे .   यात थोड्याफार त्रुटी राहिल्या आहेत पण यावरून हेच दिसते की मराठा आरक्षण या विषयात कोणताही राजकीय पक्ष मराठा समाजाचे हित पाहणारा नाही .  फक्त वापर करा आणि वेळ मारुन पुढे चला हिच भुमिका सर्व राजकीय पक्षांची आहे .  सर्व राजकीय पक्षांना जर मराठा समाजाला काहीतरी द्यायचे असेल तर सर्वजण एकत्र येत मार्ग का काढत नाहीत. यांना फक्त राजकारण करायचे आहे . हे तरूणांनी लक्षात घ्यावे . . 
      विजय पिसाळ नातेपुते . 
      ९४२३६१३४४९

      शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

      आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा आम्हाला मान्य आहे का ?

      चालू घडामोडींचे विश्लेषण
      आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा  आम्हाला मान्य आहे का ? 
      भारत देश स्वतंत्र झाला आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी आली , बाबासाहेब सारख्या विद्वान व्यक्तीने इथल्या , सामाजिक, भोगोलिक,  सर्व प्रश्नांचा अभ्यास बारकाईने  केला , जगातील विविध घटनांचाही अभ्यास केला आणि विविध जाती धर्म पंत भाषा यांना एका चौकटीत आणून न्याय देण्याचा  प्रयत्न केला ,  कायदे व घटनेतही  काळानुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला , विविध कलमे , विविध विषय घटनेत समाविष्ट करून  सर्वांचाच समावेश घटनेत केला , त्याच प्रमाणे बाबासाहेबांनी , मुळ प्रवाहा पासून कोसो दुर लोकांसाठी प्रवाहात येण्यासाठी , प्रस्थापित लोकांपेक्षा , सामाजिक व आर्थिक  मागास राहिलेल्या लोकांसाठी , शिक्षण, नोकरी व राजकीय जागा यात आरक्षण दिले .  प्रामुख्याने हे आरक्षण एससी व एसटी समुदायातील लोकांसाठी होते , तेंव्हाची त्यांची लोकसंख्या ही ७ % व १३ इतकी होती व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत १००% आरक्षण दिले  पण  त्या मुळ एससी व एसटी मध्येही नंतर असंख्य जातींचा वेळोवेळी समावेश करण्यात आला त्यात राजकीय भाग होता व खरे सुद्धा लोक त्या निकषात बसणारेही होते , त्यामुळे   तो त्यांचा नैसर्गिक अधिकार होता कारण ते मुख्य प्रवाहापासून कोसो दुर होते .  आणि  बाबासाहेबांनी आरक्षणाची वेळोवेळी समिक्षा करण्याचे तेंव्हा घटनेत स्पष्ट केले होते .   तेव्हा इतर मागासवर्ग हा विषय अजेंड्यावर नव्हता , पण  संविधानात सर्व धर्मातील  मागासलेल्या जातींसाठी कलम ३४० मध्ये त्यांचे मागासलेपण दुर करण्यासाठी तरतूद केली होती आणि त्याच आधारे मंडल आयोगाची निर्मिती झाली होती .  मंडल आयोगाची निर्मिती १ जानेवारी १९७९ ला झाली तेंव्हाच्या मोरारजी देसाई सरकारने केली  पण तिच्या अंमलबजावणीला १९९२ साल उजाडले व त्या साठी व्ही पी सिंग यांनी पुढाकार घेतला आणि कांशीराम यांनी आवाज उठवला , खूप मोठी आंदोलने झाली  व व्ही पी सिंग यांना त्याची राजकीय किंमत सुद्धा चुकवावी लागली ,  १९८० सालापर्यंत  जनता पक्ष  व हा एक पक्ष होता व तेंव्हा जनता पक्ष फुटून  जनसंघ तयार झाला , म्हणजेच आत्ताचा भाजपा  ,  नंतर जनता पक्ष असंख्य वेळा फुटला , जनता दलाचे असंख्य पक्ष तयार झाले , तो विषय राजकीय वेगळा पाहता येईल,  पण 
       मंडल आयोगाने देशातील ३७४२ जातींना इतर  मागसवर्गीय ठरवून  त्यांची लोकसंख्या ५२%  तेंव्हाच्या लोकसंख्ये प्रमाणे गृहित धरून २७% आरक्षण दिले गेले व त्याची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली .  नंतरच्या काळात राजकीय सोईनुसार काही समाजांना विविध राज्यातील केवळ राज्य सरकारांनी  केंद्राकडे  शिफारसी  करून ओबीसीत समाविष्ट केले गेले , त्यांचे मागासलेपण ठरवण्यासाठी कोणत्याही आयोगाची शिफारस घेतली  नव्हती .  किंवा आयोगाने मागासलेपण   तपासले नव्हते .  आपल्या देशात 
      गंमतीचा भाग असा  आहे की ,  एससी १३% , एसटी  ७% , ओबीसी , ५४ % मुस्लिम ११% ब्राह्मण ३% जैन २%  इतके सांगितले जातात?  हे होतात ९०%  मग मराठा , जाट, गुज्जर, रजपूत,  पटेल, (पाटीदार ) सी के पी , सारस्वत, वैश्य, मारवाडी , खत्री , बनिया ,  हे  सर्व मिळून फक्त १०% आहेत का ?  तर याचे उत्तर कुणाकडेही नाही मुळात  सध्याचे ओपनमधील जाती जवळपास   २० ते २५ % च्या आसपास    असतील.  
      पण याचा  खर्या अर्थाने परफेक्ट डाटाच कुणाकडेही  नाही.  त्यामुळे कुणाचा वाटा कोण गिळंकृत करतंय तेच कळत नाही  आणि कुणाला काहीही   मिळतच नाही बरीच भानगड आहे , म्हणून प्रत्येक प्रवर्गात अ ब क ड, ई फ हे लोकसंख्येच्या प्रमाणात फोडून दिले पाहिजे म्हणजे प्रवर्गातील  कोणतीही  एकच जात  त्या त्या प्रवर्गातील संपुर्ण  आरक्षण गिळंकृत करणार नाही  आणि परफेक्ट डेटा नाही आणि  आरक्षणाचे वाद हे सुरू आहेत. मंडल आयोगाने सुद्धा  २० वर्षांनी आरक्षणाची समिक्षा करण्याची शिफारस केली आहे व घटनेतही तशी तरतूद आहे पण कोणतेही सरकार यावर काम करत नाही .  घटनेतील तरतूदीनुसार जर आरक्षणाची समिक्षा झाली  फेर आढावा घेतला  तर निश्चितपणे वादविवाद थांबले असते पण तसे घडत नाही .   घटनाकारांना जे समाज आरक्षणाचा फायदा घेतील त्यांनी मुख्य प्रवाहात यावे व जे मागास राहतील त्यांना ते मिळावे यासाठी तरतूद केली आहे .  पण हल्ली एकदा का  एखादा समाज त्यात समाविष्ट झाला की बाहेर पडायला विरोध होतोय,  व तो प्रवर्ग म्हणजे केवळ आम्हीच हे स्वतःच ठरवले जातेय  ,  कोर्टाने तर ५०% मर्यादा घातलीय मग यातून मार्ग कसा निघणार कि देश असाच घुमसत राहणार? 
      खरेतर आरक्षणाचा फेरआढावा घ्यावा आणि  प्रत्येक समाजाला  लोकसंख्येच्या ५०% आरक्षण शिक्षण आणि नोकरीत द्यावे ,   व खूला गट सर्वांसाठीच   ५०% खुला असावा किंवा लोकसंख्येच्या पटीत सर्वांनाच १००% जागा वाटून आरक्षण द्यावे असेच वाटते . केंद्र,  राज्य सरकारला आरक्षणाचे  अधिकार असूच नयेत,  तर त्या साठी घटनेनुसार  स्वतंत्र  केंद्रीय अयोय असावा व त्यात सर्व जाती धर्मातील व सर्व राज्यातील गैर राजकीय  प्रतिनिधींचा समावेश असावा .  व  केवळ विशिष्ट  निकष लावून  प्रत्येकाची दर २० वर्षांनी समिक्षा व्हावी व फेरआढावा घ्यावा !  सर्व समुदायातील लोकांना लोकसंख्येच्या पटीत आणि क्रिमिलेअरची अट लावून आरक्षण लागू करावे .  व त्यातील मेरीटनुसारच जागा भराव्यात  नाहीतर आपला देश यादवीत कमजोर होईल. 
      विजय पिसाळ नातेपुते 
      ९४२३६१३४४९



      बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

      नवा पक्षीय विचार

      चालू घडामोडींचे विश्लेषण


      नवा पक्षीय विचार

      आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल! 
      इथल्या मातीवर,                            प्रेम  करणार्‍या  सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून सुशिक्षित  समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं तरुण शेतकरी , व्यावसायिक, कामगार यांचा विचार करणारा  पक्ष पाहिजे . . ..
      श्री  विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो  हि केवळ एक जात, एक समुह किंवा एक व्यक्ती परिवर्तन करू शकत  नाही .  तर त्या साठी  सर्वांनी  सामुहिक पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे .  हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व याच मातीतले . . यातील  काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या  आणि काही जणांना हाल  आपेष्ठांचे जीने नशीबी आले आणि काहींचे जीवन स्थिरस्थावर झाले   . . पण आजची परिस्थिती भयंकर आहे मोजके १० ते  २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .  प्रस्थापित व्यवस्था व राजकीय पक्ष हे सत्ता व त्यातून पैसा यातच गुंतले असून ठरावीक लोकांचे लांगूलचालन करत आहेत.  ८० ते ९० % जनतेवर नाहक विविध कर लादून लुटत आहेत, त्यांना दाबत आहेत. तात्पुरता  महाराष्ट्रातील माणसांचा  विचार केला तर, नोकरदार सुखी नाही , कामगार, शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसायिक सुद्धा सुखी नाहीत मग हे राज्य व देश कुणासाठी चालवले जाते हा प्रश्न आहे .  लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे पण  हे सत्य नाही पचत . . यावर पर्याय काय का ?  हे फक्त सहन करायचे ?  भविष्यासाठी काय योजना करायची का ठरावीक लोकांची गुलामगिरी स्वीकारून गुलामगिरीत जगायचे !  विचार करण्याची वेळ आली आहे ना ? 
       यासाठी  वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही आपण एकसंघ रहात नाही , कारण आपल्याला दाणे टाकून  जाती जातीत झुंजवले जातेय,    उच्चनिचता मनावर खोल रुजवून आपआपसात दुहिची बीजे पेरण्यात  आली व  इथेच सत्यानाश झाला . . 
       शिवकाळा अगोदर पासून   सर्वजण  गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील सर्व  घटक थोड्याफार  फरकाने  त्याकाळी सुखी  होते  कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात सर्व  समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात तर काहीजण  आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून मोर्चे  व  प्रतिमोर्चे  काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या  विरूद्ध कोर्टात  जावून एकमेकांच्या विरूद्ध लढत असतात  . . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून!  आम्ही फक्त संकुचित विचार करतो .  आजच्या घडीला   कोणत्याही  समूहातील  लोकांना इतरांची भिती का वाटते , तर एकमेकांची मने दुभंगण्याचे काम या ठिकाणी पद्धशीर झाले  . . खरेतर . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून  प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . ..तर  . परत एकदा  समाज मनातील कटूता जाईल व राजकारण वेगळ्या उंचीवर जाईल  . . .  कधीकाळी  गुण्या गोविंदाने नांदलेला समाज एकत्र येईल, कुणी मोठा व कुणी छोटा न राहता  सर्वांचा  बांधव होईल  . .  आणि   व्यापारी , कर्जदार, शेतकरी , व्यावसायिक,  कामगार  या सर्वांनाच संरक्षण मिळेल.  ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ताटातूट थोडेफार काढून  भले  त्यांच्या कडून कर्ज रुपाने  घेऊन, सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्न करता येतील!  
       सामान्य, कष्टकरी यांचे साठी कायदे आहेत त्याचा नीट वापर  करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा करता येईल  . . . . पण आज किती जण मनापासून  नवीन राजकीय विचार यावर बोलतील, प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून नवीन व्यवस्था स्वीकारतील  ?  यावरच सर्व भवितव्य ठरणार आहे .  बांधवांनो श्रींमत  २  ते ५ % लोक सर्वांना पिळत   आहेत. राजकीय पक्षांचे राजकारण त्यांचे साठीच आहे , याला पायबंद घालायची ताकद निर्माण झाली तरच सर्वांना भवितव्य आहे  . . किती जणांना वाटते , सर्वांना समान संधी व समान  सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते सर्वांचेच   प्रश्न सुटले पाहिजेत, सर्वांनाच मोफत  शिक्षण मिळाले पाहिजे . . . . सर्वांनाच  नोकर्यात लोकसंख्येच्या हिशेबाने  संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना हे व्हावे वाटते .  पण बहुसंख्य लोकांच्या मनात पक्षीय गुलामगिरी व नेत्यांची भलावण करून मिळेल तर पदरात पाडून जगायची सवय सहजासहजी बदलणार नाही , त्यासाठी ठाम रहावे लागेल, जो एकमेकां बद्दल   पुर्वग्रह आहे तोच घालवावा लागेल  , सर्वांना  न्याय देईल असा विचार करावा लागेल  . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित  पुढारपण करणार्‍या जातींना  त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्‍या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्‍या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्‍या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्‍या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९



      बुधवार, १० जून, २०२०

      संगत

      चालू घडामोडींचे विश्लेषण




      संगत. . . ! 
      मनुष्य हा अनादी काळापासून आजपर्यंत  समुहाने राहणारा , संघटीत काम करणारा, सहजीवन जगणारा  प्राणी आहे .  सहाजिकच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या गरिब, श्रीमंत, सुशिक्षित किंवा अडाणी अशा कोणत्याही  व्यक्तीला कोणाची ना कोणाची संगत असल्या शिवाय जीवन जगताच येत नाही .  किंबहुना संगत नसेल तर त्याला मनुष्य जन्मात फारसी किंमत नसते . नव्हे त्याला जगणेच कठिण असते , खरेतर  ज्याच्या संगतीला कुणीच नसते त्याला या समाजातील  लोक, एकलकोंडा , वेडा , मनोरुग्ण अशी शेलकी विशेषणे लावतात. 
      तसेही कुणी व्यक्त होतो तर कुणी अव्यक्त होतो पण तरीदेखील संगत सर्वांना हवीच असते व असायलाही पाहिजे . जीवनातील सुख दुःख शेअर करण्यासाठी , आनंद व्यक्त करण्यासाठी , कामातील ताणतणाव दुर करण्यासाठी , मन मोकळे करण्यासाठी ,  कठीण प्रसंगात धीर मिळण्यासाठी संगत आवश्यक ठरतेच, त्या शिवाय मनुष्याला जीवन जगताही येत नाही . 
      संगत कुणाची करावी हे प्रत्येकाच्या स्वभाव गुणावर अवलंबून असते .  दोन टोकाची मते असणारे लोक फारकाळ एकत्र राहतीलच असेही नाही . खरेतर   प्रथम दर्शनी   शक्यतो बहुतेक लोक संगत करताना , जात धर्म, लिंग, भाषा  काही पहात नाहीत , जिथे आपले कुणी ऐकून घेते तिथेच संगत केली जाते किंवा ति आपोआप होते हे खरे  व हे अगदी नैसर्गिक होत असते .  जसे शाळेत  मुलांना घातले की , खोडकर मुलांचा एक ग्रुप बनतो, हुशार मुलांचा वेगळाच ग्रुप बनतो , खेळाडूंचा , कलाकारांचा , असे वेगवेगळे ग्रुप होतात व संगतीचा प्रवास चालू होतो . तसेच मोठेपणीही डॉक्टरांचा एक ग्रुप, वकिलांचा , शिक्षकांचा , व्यापार्यांचा , शेतर्यांचा असे ग्रुप बनतात, नाती गोती काहीच नसताना समान उद्देशानेही लोक एकत्र येतात व संगत घडते , 
      तसेतर  लहाणपणी मनुष्याचे  मन हे कोरीपाटी असते त्यामुळे कोणताही भेदभाव न करता संगत घडते , कोवळ्या  मनात  द्वेषाची भावना कधीच येत नाही .  पण  वय वाढेल तसे शाळेतील संगतीचे रुपांतर जेंव्हा चांगल्या संगतीत होते तेंव्हा मनुष्य घडतो मग तो  व्यवसाय, नोकरी , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो . खरेतर संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते सुद्धा ,  ज्यांना चांगली संगत लाभली  ते घडतात व प्रगती करतात, मात्र ज्यांना संगत चांगली लाभलेली नसते ते चैन करतात, मग कधी तंबाखू , गुटखा , सिगारेट पिता पिता दारूच्याही आहारी जातात.  त्यामुळे त्यांचे विचार, राहणीमान जशी संगत आहे तसेच असते . मोठ मोठ्या घरचीही मुले वाया जातात,  जगात अशी खूप उदाहरणे आहेत, कि एक दारूडा कित्येक लोकांना त्रास देतो . तो कुणाचा तरी संगतीमुळेच दारू प्यायला लागलेला असतो ना ? 
       त्याने दारू सोडावी म्हणून देव पाण्यात घातले तरीदेखील दारू तो सोडू शकत नाही .  पण तोच मनुष्य एखाद्या चांगल्या सद्गूनी  व्यक्तीच्या संपर्कात आला तर क्षणातही त्याची दारू सुटू शकते .  तसेच जर पाच दहा दारूडे असतील तर निर्व्यसनी  सुद्धा संगतीचा परिणाम होऊन व्यसनी बनतो . दारू पिऊन बरबाद होऊ शकतो . 
        म्हणून वाटते प्रत्येकाच्या  जीवनाचा पाया हा बर्याच अंशी संगतीवर अवलंबून असतो . कित्येक हुशार लोक सुद्धा  वाईट  संगतीमुळे वाया जातात व चांगली संगत लाभली तर एखाद्या झोपडपट्टीतही व्यसनी दारीद्रिय असलेल्या घरातही  हिरे जन्माला येतात.  
      संगतीमुळे मनुष्याचा स्वभाव बदलतो, भाषा बदलते , राहणीमान बदलते ,  संगतीमुळे मनुष्याचे वागणे बदलते , संगतीमुळे मनुष्य गैरमार्गालाही लागू शकतो ,  संगतीमुळे मनुष्य चांगलाही प्रपंच करू  लागतो व संगतीमुळे मनुष्य फार प्रगती सुद्धा करतो . हिर्यांची किंमत कितीही असली तरीदेखील त्याला घडवल्या शिवाय मुल्य प्राप्त होत नाही . व त्याचा दागिना बनवायचा असेल तर दुसऱ्या धातूची मदत घ्यावीच लागते व तो धातू सुद्धा मौल्यवान असावा लागतो .  तरच तो हिरा उठून दिसतो .  नुसता हिरा मौल्यवान असून चालत नाही . 
      तात्पर्य काय?  
      तुम्हाला घडायचे असेल तर तुम्ही कोणाच्या संगतीत राहता , वाढता , उठता , बसता , यावरच तुमची भविष्यातील वाटचाल अवलंबून असते . 
      संगत चांगली करा , तुम्हाला चांगल्या संधी नक्कीच मिळतील! 
      विजय पिसाळ नातेपुते !



      शनिवार, २५ एप्रिल, २०२०

      गावगाडा कसा चालणार?

      चालू घडामोडींचे विश्लेषण
      *कसा चालणार रुतलेला गावगाडा !*
      वारंवारची संकटे झेलून झेलून शेतकरी मेटाकुटीला आलाय, कधी बाजारभावाचा प्रश्न, कधी जास्त उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते , कधी वादळी वारे पीक भुईसपाट करतात  , कधी गारपीटीने होत्याचे नव्हते होते , कधी महापूरात सर्वस्व संपून जाते , कधी ओल्या  दुष्काळात पीक सडून जाते , तर कधी कोरड्या  दुष्काळात पीकांची होरपळ होते   तर कधी परदेशातून आयात केलेल्या मालामुळे दर पाडले जातात,  पाडलेले   गेलेले बाजारभाव अशी  नैसर्गिक व सरकार निर्मित  शेतकरी संकटे झेलून झेलून तो थकलाय,   त्याची लुट करून करून सगळे मजेत आहेत, लुट करणारांना , त्याचे शोषण करणारांना ,  त्याला आत्महत्या करायला भाग पाडणारांना कोणीही शाप देत नाही , त्याच्या टाळूवरील लोणी खाणारांना कोणताही देव शिक्षा देत नाही .  त्याची सर्रासपणे लुट केली तरीदेखील आजवर ना कोणत्या सरकारला , ना कोणत्या सावकाराला ना फुकट खाणारांना पाप लागले आहे . त्याला षडयंत्र रचून रचून घायला आणायचे काम करायचे , सगळ्यांना पोसण्यासाठी पिळवणूक करायची . आणि त्याचाच नावाने राजकारण करून मगरीचे आसू ढाळायचे .   आतातर  त्याच्यातील काहींना ६००० हजारांचा नको असलेला उतारा टाकलाय?  जणू भीक टाकावी व त्याने पोट भरावे तसे !  या कोरोनाच्या संकटात तो पुरता संपलाय. .  त्यासाठी राजकारण म्हणून सुद्धा कुणी पुढे आले नाही . 
       पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या , फळबागा , भाजीपाला , शेतात सडून गेला , जागेवर माल पीकून खराब झाला !  कित्येक माझ्या बांधवांना तो  विकताच आला नाही . खूप महत प्रयासाने  विकायची परवानगी भेटली तर वाहतूकीची साधने नाहीत. शेतमालाची ने आण करायला परवानगी , डिझेल टाकायला पास  , 
      शेतातील तयार झालेली फळे पिकवण्याची त्याच्याकडे यंत्रणाच नाही ?  आणि तो माल   पिकवला तर माल विकत बसायचे की, शेतात कधी  राबायचे ?  शेती कधी  करायची ?   बाहेर माल विकायला जावे म्हटलं तर शेतातील गुरे , जनावरे बघायची कोणी ?  त्यातूनही सवड काढली तर  बाहेरगावी जाता येत नाही .   व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतात व अशाही संकटात  लोकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विकतात.  नुसती ग्राहक व शेतकर्यांची लुट चालू आहे .  यावर सत्ताधारी व विरोधक मुग गिळून गप्प आहेत .  लाखो रूपये शेतकर्यांनी फळ बागांसाठी,  भाजीपाल्यासाठी घातले . आता त्यातील १० ते २०% तरी वसूल होतील का नाही शंका आहे  ? सरकारी मलपट्टी होईल, मदतीचे आकडे जाहीर होतील पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार घंटा ?  फॉर्म भरणारे , फॉर्म जमा करून घेणारे , याद्या तयार करणारे मात्र मालामाल होणार? 
       मदत मिळेत ति पण ठरावीक लोकांनाच मात्र जाहिरातींची पाने भरभरून छापून येतील हे मात्र नक्की . या महामारीत 
        प्रचंड नुकसानीमुळे   कित्येक शेतकऱ्यांचे  कर्ज थकणार, यात जवळपास ८० % शेतकऱ्यांचे सीबील खराब होणार, त्यामुळे थकीत गेलेल्या शेतकर्यांना  बँका पुढील हंगामात  पतपुरवठा करतील का नाही . ही शंका आहेच  . खाजगी सावकार लुटणार हेही नक्की आहे . सामान्य शेतकऱ्यांनीच नव्हे तर मोठ मोठ्या शेतकऱ्यांनीही  मशागत, मजूर,  खते , बियाणे, डिझेल, पेट्रोल  यासाठी पैसा कसा व कुठून उपलब्ध करायचा हा गंभीर प्रश्न आहे .  शेतकर्यांना  या लॉकडाऊनमध्ये ना पोलिसांनी समजून घेतले , ना महसूल विभागाने समजून घेतले . शेतकऱ्यांचा  किरकोळ माल विकतानाही नाकीनऊ आणले . तेल मिठ सुद्धा बंद पाडले , शेतकरी  लोकांना डिझेल, पेट्रोल यासाठी वनवन करावी लागली , गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना काठीचा प्रसाद खावा लागला . सातत्याने अडवणूक झाली .  त्यामुळे  शेतातील असंख्य कामे पेंडींग राहिली आहेत. मजूरांना शेतात जाताना येताना  भयंकर त्रास सहन करावा लागला , कसा हा तोटा भरून काढायचा  , उपसलेल्या बँका कशा भरायच्या ? 
       पुढच्या काळात   शेती जर पिकली नाही तर हे लोक काय खाणार आहेत कुणास ठावूक. .  प्रशासनाने शिस्त लावायची असते नियम घालून द्यायचे असतात,  पुढाकार घ्यायचा असतो . उपाय योजना करताना गोरगरीबांचे  कमीतकमी नुकसान कसे होईल हे पहायचे असते ?   पण इथे मात्र लोकांना हुसकावून लावणे , मारहाण करणे अपमानास्पद बोलणे सर्रासपणे चालूच होते. किराणा दुकाने बँकात सोशल डिस्टन्सिंगचे किती काटेकोरपणे पालन झाले ?  पण मोटार सायकलवरून फिरून भाजी विकणारांना मात्र हुसकावून लावले गेले , भाजी विकायला चालला तरीदेखील, लायसन्स मागीतले गेले !   ज्या हाताने माणसे पोटभर खातात ते तर शेतातून आलेले असते व त्याच शेतकऱ्यांना   मारहाण केली जाते ?  किती दुर्दैवी आहे .  सगळ्या जगात  जागोजागी मि पोलिस मित्र पाहतोय , प्राणीमित्र, पक्षीमित्र, पाहतोय, पण एकही शेतकरी मित्र पाहिला नाही , जो शेतमाल विकायला मदत करेल!  जो तो फुकट लुटायला , फुकट मिळवायला बसलेला मि पाहिला ! 
       ज्यांना काहीतरी आमचे दुःख समजेल? असे दिसलेच नाहीत! 
      या मानवतेच्या ढोंगीपणात  शेतकर्यांच्या व्यथा मांडायला यंत्रणा मुकी झालीय,  शेतकर्यांच्या व्यथा एेकायला यंत्रणा बहिरी झालीय.  शेतकर्यांचा माल फेकून देत असताना सगळी यंत्रणा आंधळी झालीय.   सगळे  ड्रामेबाज कार्यक्रम व त्याचे काय ते कौतुक?   मेडिकल, बँका , किराणा दुकाने या ठिकाणी  किती सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ?  मुळात भाजीपाला फळे जेवढे नियम पाळून विकली तेवढे बाकी काहीच विकले गेले नाही . कितीजण हँडवॉश व सॅनेटा़ईझरचा वापर करतात?  पण शेतमाल विकताना मात्र यांना नियम दिसतात. नियम पाहिजेत पण सर्वांसाठी सारखेच असावेत ना ? 
        बळीराजाच्या मृत्यू नंतर   शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिला नाही . 
      येणारा काळ भयंकर असेल हे मात्र नक्की !  
      विजय पिसाळ नातेपुते.

      शनिवार, १८ एप्रिल, २०२०

      सोशल मिडिया शाप की , वरदान?

      चालू घडामोडींचे विश्लेषण


      *सोशल मिडिया शाप की वरदान. .* 
      काहीजण चोवीस तास सोशल मिडिया वापरतील, मनसोक्त करमणूक करून घेतील,  करमणूक करतील, एकमेकांशी संवाद साधतील,  हजारो , लाखो लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचतील, सोशल मिडीयाचाच  वापर करून सोशल मिडिया किती बेकार आहे हे पण सांगतील असो ! हेही खरे आहे  ,  हातात काम असताना सोशल मिडियाचा अती वापर करणं हे चुकच आहे .  पण सोशल मिडिया हा नुसता टाईमपास आहे का ?  सोशल मिडिया नुसती करमणूक आहे का ? हे जर आपण हो म्हणत असू  तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय!  
      याच सोशल मिडियामुळे गावागातील समस्या वरिष्ठा पर्यंत पोहचू लागल्या हे विसरता येईल का ? फेसबुक व व्हॉट्सपच्या व सर्वच सोशल मिडियाच्या  माध्यमातून सर्व प्रकारचा व्यापार होऊ लागला आहे  .  जगातील ज्ञान, विज्ञान, कला , क्रिडा यांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे  .  नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा , वस्तूंचे बाजारभाव हे सुद्धा क्षणात आम्हाला मिळू लागले . रोडवरील  अपघात असो कि  घरातील छानसा कार्यक्रम असो त्याचे व्हीडिओ, अॅडिओ, फोटो लगेच मिळतात, त्यामुळे अपघातात मदत होतेच ना ?  इतरांच्या आनंदात सहभागी होता येतेच ना ?  रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबीरे  यांचे आवाहन हजारो लोकांना करता येते.  विधायक कामासाठी लोकांना आवाहन करता येते , लोकांचा सहभाग वाढवता येतो  हे केवळ सोशल मिडियामुळेच शक्य झाले की नाही .  कोणत्या शहरात, कोणत्या भागात काय समस्या आहेत हे पण समजू लागले .  शाळा , कॉलेज, ट्यूशन, यांच्या डेली अपडेट्स याच प्लॅटफॉर्मवर मिळू लागल्या . वर्ग बंद ठेवले तरीदेखील याच माध्यमातून शिक्षण उपलब्ध होत आहे . स्पर्धा परिक्षांची तयारी , विविध अभ्यासक्रम याच माध्यमातून चालू आहेत.  आपला पाल्य शाळेत येतो का , त्याची तयारी कशी आहे . तो सर्व तासांना असतो का ?  याची माहिती घरबसल्या पालकांना  मिळू लागली आहे  .  जगाच्या कानाकोपर्यातील सर्व माहिती क्षणात प्राप्त होऊ लागली आहे.  परदेशात,  परगावात, शहरात   नोकरी व शिक्षण या निमित्ताने असलेली  मुले, नातवंडे , सुना यांच्याशी घरातील वडिलधारी मंडळी व्हीडिओ कॉलवरून बोलू लागली .  शासकीय आदेश क्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होऊ लागले आहेत  .  किराणा  दुकानदार, भाजीवाले  ,  या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू लागले आहेत  .  शेतकऱ्यांना जागेवरून माल विकता येतोय, त्याची जाहिरात करता येतेय,  विविध वाचणीय पुस्तके घरबसल्या वाचता येऊ लागली आहेत . मनोरंजनाचे साधन जरूर  आहे सोशल मिडिया , पण आपुलकीच्या  संवादाचे माध्यम सुद्धा  आहे सोशल मिडिया , मदतीला धावणारा आहे सोशल मिडिया . गोरगरीबांच्या अडचणींचे निराकरण करण्यास मदत आहे सोशल मिडिया .  धावपळीच्या जीवनात एकमेकांना जोडणारा आहे सोशल मिडिया . शाळा कॉलेज संपल्या नंतर  दुरावलेले मित्र मैत्रिणी  एकत्र करणारा आहे सोशल मिडिया . सर्व वस्तुंच्या किंमती , खरेदी व विक्री करणाऱ्या कंपन्या यांची माहिती मिळण्याचे ठिकाण आहे सोशल मिडिया . उत्पादक ते ग्राहक जोडणारा आहे हाच सोशल मिडिया .  गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आहे सोशल मिडिया . .  किरकोळ तोटे जरी असले तरीदेखील फार महत्वाचा आहे सोशल मिडिया . .  फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच त्याचे फायदे समजतील नाहीतर फक्त  , त्याचाच वापर करून सोशल मिडिया खराब आहे असे म्हणणेही  योग्य नाही .  
      मला तर सोशल मिडिया हा मानवाला वरदान आहे असेच वाटते . 
      विजय पिसाळ नातेपुते . 
      ९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

      गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

      ३ मे नंतर सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल!

      चालू घडामोडींचे विश्लेषण

      3 मे रोजी कदाचित  लॉकडाऊन संपेल, सरकार अर्थव्यवस्था व गोरगरीबांच्या जीवनमरणाचा विचार करून लॉकडाऊन वाढवणार नाही .  पण याचा अर्थ आपल्या देशातून ३ मे पर्यंत संपुर्ण कोरोनाचे उच्चाटन होईल असा बिलकुल नाही .
       ३ मे नंतर सरकारची जबाबदारी कमी व स्वतःची जबाबदारी जास्त वाढणार आहे . लोकांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील, मॉल, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, बस स्थानके , बाजारपेठा , विविध दुकाने  या ठिकाणी लोक प्रचंड संख्येने जातील व येतील. यामुळे कोरोनाची खरी लढाई ३ मे नंतर चालू होणार आहे .  आपल्याकडचे लोक  लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत,  सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत, गुपचूप एकत्र येतात, पार्ट्या करतात,  त्यामुळे ही चैन ब्रेक झाली नाही .  आणि म्हणूनच ३ मे नंतर सुद्धा चैन ब्रेक होणार नाही असेच वाटते . 
        ३ मे नंतर जे जे लोक  स्वतःच स्वतःची काळजी घेतील,  सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक समारंभ, सार्वजनिक रित्या होणारे  धार्मिक कार्यक्रम  व मोठ मोठे होणारे लग्न विधी टाळतील, घरात बाहेरच्या लोकांना कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत  काहीकाळ येऊ देणार नाहीत.  आपल्या वाहनांचाच वापर करतील, भाडोत्री गाड्या सांगणार नाहीत. 
       तेच लोक यातून सहीसलामत राहतील.   खरेतर मोठ मोठ्या शहरातील भाजीपाला व फळे व्यापार हा डायरेक्ट घरोघरी जावून संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांनी करायला पाहिजे .  मोठ्या शहरातील मार्केट कमिट्यात सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा होत आहेत.  त्यापेक्षा व्यापार्यांनी शेतमाल बांधावर खरेदी करावा व घरोघरी जावून तो ग्राहकांना  विकावा तरच यातून आपण वाचू शकतो.  
      सरकारने  , शाळा , कॉलेज, परिक्षा , या किमान ऑगस्ट पर्यंत तरी घेण्याचा विचार करू नये .
       शाळेतील मुलं संपुर्ण गावातील किंवा शहरातील वेगवेगळ्या भागातील असतात त्यामुळे धोका वाढू शकतो.  कोरोनाचे संपुर्ण उच्चाटन होईपर्यंत होणारे लग्न समारंभ हे छोटेखानी व घरगुती किंवा रजिस्टर पद्धतीने व्हायला हवेत.  आपल्या देशाची लोकसंख्या आणि सामाजिक सौहार्द यामुळे लग्न समारंभ मोठ मोठे करण्यासाठी संपुर्ण परिसरातील लोकांना निमंत्रित करण्याची प्रथा व परंपरा आहेत पण यापुढे हे कोरोना संपेपर्यंत थांबवावे लागेल  . 
      सरकारने परदेशी पर्यटनाला, प्रवासाला  किमान १ वर्ष तरी बंदी ठेवली पाहिजे .  व ज्यांना   केवळ नोकरीसाठी व शिक्षणासाठी  परदेशात  जायचे किंवा यायचे आहे .  त्यांना कंपल्सरी विमानतळावरून थेट १४ दिवस आयसोलेटेड केले पाहिजे .
      सध्याची परिस्थिती लगेच सुधारणार नाही त्यामुळे सार्वजनिक प्रवाशी  वाहतूक काही काळ बंद ठेवली तरच संसर्ग थांबवता येईल.  छोटी छोटी वाहने  पुर्णपणे आतून बाहेरून फवारणी करूनच वापरली पाहिजेत.  कोरोनाचे संकट ३ मे नंतर लगेच संपेल व रस्त्यावर येऊन आम्ही दिवाळी करू हा जर विचार करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर होळी जशी गल्लोगल्ली पेटवतात तसे प्रेतांना अग्नि संस्कार करावे लागतील. 
      भारतातील शेवटचा कोरोना पेशंट संपेल तेंव्हाच हे संकट संपणार आहे .  त्यामुळे ३ मे नंतर जो काळजी घेईल तोच वाचणार आहे. 
      विजय पिसाळ नातेपुते . . 
      ९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

      शनिवार, ११ एप्रिल, २०२०

      शेतकरी ते थेड ग्राहक विक्रीला परवानगी दिल्या शिवाय पर्याय नाही !

      चालू घडामोडींचे विश्लेषण





      शेतकरी ते ग्राहक साखळी तयार केल्या शिवाय पर्याय नाही . . 
      विजय पिसाळ नातेपुते . . 
      कोरोना सारखे साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम वारंवार होत असल्यामुळे प्रशासनाला वारंवार भाजीपाला व फळे मार्केट बंद करावे लागते आहे .  कारण काही ठिकाणी  किरकोळ व्यापारी , ग्राहक, हमाल  नियमांना तिलांजली देतात. त्यामुळे कोरोना सारख्या रोगाचा फैलाव रोखणे कठिण जाते,  यासाठी यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने सहकार्य करून डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही चैन तयार करावी लागणार आहे .  त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या मुलांना छोटी  कुलिंग वाहने व  , शेतावरच फळे पिकवण्यासाठी  रायपनिंग चेंबर या साठी प्रोत्साहन पर अनुदान दिले पाहिजे , तसेच त्यांना बँका मार्फत कमी व्याजदराने किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून, त्याला शासनाने थकहमी दिली पाहिजे  .  फळे व  भाजीपाला हा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शहरातील वेगवेगळ्या भागात घरपोच दिला पाहिजे व तसेच ग्राहक ते शेतकरी साखळी तयार झाली पाहिजे .  संबधित शहरातील मोठ मोठ मोठ्या सोसायट्या व वेगवेगळे ग्राहक यांनी शेतकऱ्यांना जर व्हॉट्सपवरून दैनंदिन लागणार्‍या मालाची ऑर्डर्स दिल्या व तेवढा माल शेतकऱ्यांनी रास्त दराने ग्राहकांना पुरवला तर ग्राहकांना योग्य दराने भाजीपाला व फळे मिळतील व शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळेल व वाहतूक कोंडी  न होता  सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊन  शहरात भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळेल. भाजीपाला वारंवार हाताळल्या मुळे होणारी नासाडी सुद्धा टळेल. .  
      यापुढील काळात असे केले तरच कोरोना सारख्या आजारावर मात करता येईल व ग्राहक आणि शेतकरी यांचेही नुकसान टाळता येईल.
      विजय पिसाळ नातेपुते 
      ९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९

      शुक्रवार, २७ मार्च, २०२०

      आर्थिक आणीबाणीच्या दिशेने ?

      चालू घडामोडींचे विश्लेषण


      नागरीक बांधवांनो . .   देशाचा भार आता आपल्यालाच वाहवा लागेल! 
      ©® श्री विजय पिसाळ नातेपुते . . . 

      मित्रांनो, बांधवांनो कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या कंपन्यांची उत्पादने  बंद आहेत, वाहतूक बंद आहे ,  पेट्रोल  पंप, हायवे , बंद आहेत, रिअल इस्टेट क्षेत्र बंद आहे .  जवळपास देशातील  सर्व कारभार  ठप्प  आहे .  जवळपास देशातील ८० %  व्यवहार  ठप्प आहेत. 
      याचाच सरळसरळ अर्थ आपल्या देशाच्या  कर संकलनात पुढील काही महिन्यांत   प्रचंड घट होणार हे ओघाने आले .  त्यामुळे  सरकारने कितीही प्रयत्न केले तरीदेखील बराच कारभार ठप्प होणारच आहे . कारण कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो . सरकारला  पगाराचा खर्च  व आरोग्यासाठीच्या योजनांचा खर्च, दैनंदिन कामकाज व गरजेचे खर्च  भागवणे अतिशय जिकीरीचे होणार आहे .  कोरोणाचे संकट जावून रुटीन लागायला कित्येक महिने लागतील. देशाची चक्र फिरणे इतके सोपे नाही कित्येक दिवसानंतरच कर संकलन हळूहळू पुर्वपदावर येईल.
      कंपन्यांचा तोटा वाढत जाणार असून त्यामुळेही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.  
        हजारो लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे सरकारला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंकडे लक्ष द्यावे लागेल.  
      यामुळे बाकीच्या योजनांना कात्री लागेल यामुळे जवळपास  सर्वांचीच गैरसोय होईल,  भविष्यात  काही गोष्टींचा नक्कीच  तुटवडा जाणवेल. कारण जवळपास सर्वच वस्तुंच्या  उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे . ठप्प आहे.  भविष्यात अन्नधान्य महागाईचा आलेख सुद्धा वाढणार आहे . अन्नधान्या बरोबरच इतर वस्तु व सेवा सुद्धा महाग होऊ शकतात. 
       कोरोनाच्या फटक्यामुळे  शेतकरीवर्गही  मेटाकुटीला येऊन त्याचेही प्रचंड नुकसान होऊन  क्रयशक्ती घटणार आहे .  सरकारला बाहेरून आरोग्य विषय गोष्टींची साधणे व औषधे हे  जास्तीचे पैसे खर्च करून आवक करावी लागणार आहे . सरकार कोणतेही असले तरीदेखील कर संकलना शिवाय  काही करू शकत नाही . याचाच अर्थ सर्वच देश बांधवांना महागाईची झळ बसणारच आहे . पायाभूत सुविधा , मिळणारी अनुदाने , लोकप्रिय योजना चालवताना सरकारला कसरत करावी लागेल. . प्रसंगी लोकप्रिय योजना गुंडाळाव्या लागतील. यापुर्वीच  पैसा उभा करण्यासाठी सरकारने सार्वजनिक कंपन्यातील आपली भागिदारी विकली आहे .  काही कंपण्यामधील आपली गुंतवणूक काढून घेण्याची घोषणा केली होती . पण उद्योगपती व बँकाच तोट्यात जातील व निर्गुंतवणूक सुद्धा सहजासहजी होईल असे वाटत नाही . 
      निर्गुंतवणूकीचा  पुढील टप्पा सुरू होईल.  पण प्रतिसाद मिळेलच असे नाही . 
       सध्याचा कारभार ठप्प झाल्यामुळे सर्वच उद्योगपती व व्यावसायिकांचा तोटा वाढून त्यांना बँकांचे हाप्ते भरणे कठीण होणार आहे .  सहाजिकच बँकांचा एनपीए वाढणार आहे .  त्यामुळे सामान्य जनतेला व लघु उद्योगाला कर्ज मिळणे कठीण होणार आहे . ठेवीवरील व्याज कमी होईल असे दिसते.  शेतीला तातडीने  पतपुरवठा मिळण्याची शक्यता मावळणार  आहे ..मुळात  देशाचा जीडीपी घसरणार  आहे . निर्यात घटून  परकीय चलनसाठा  सुद्धा घटणार  आहे . 
      भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत घसरू शकतो .  शेअर बाजारात मंदिचा माहोल तयार होऊन शेअर विक्रीचा मारा जास्त होईल असेच दिसते .  त्यामुळे परकीय गुंतवणूक कमी होऊ शकते . .  महामंदीच्या लाटेत आर्थिक आणीबाणी येऊ शकते ?  
      त्यामुळे जनतेने सरकारच्या भरोशा पेक्षा स्वतःच रोजगार निर्मितीचे मार्ग शोधले पाहिजेत.  स्वतः बचत केलेला पैसा जपून वापरला पाहिजे . चैनीच्या गोष्टींना बगल दिली पाहिजे . 
      नजीकच्या काळात सरकार, चैनीच्या वस्तू , टीव्ही , फ्रिज, दारू , सिनेमा , टिव्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, सोने चांदी , दारू , टोल, रोडटॅक्स, पानमसाला , हिर्याचे दागिने , परदेशी गाड्या यावर अतिरिक्त शुल्क आकारू शकते . 
      पायाभूत सुविधांना निधी कमी  पडणार असून नवीन डेव्हलपमेंट थांबणाची शक्यता आहे . महाकाय प्रकल्प रखडले जावू शकतात. . 
      गाडी पुर्वपदावर येण्यासाठी कमी माणसांत जास्त काम करून घ्यावे लागेल, सरकारी बाबूंचे लाड थांबवावे लागतील. .  भ्रष्टाचार व दप्तर दिरंगाई याला चाफ लावावा लागेल.  
      एकुणच काय तर जनतेला सरकारवर जास्त अवलंबून न राहता .  स्वतःच भारताला बलशाली करण्यासाठी पुढे यावे लागेल तरच देश वाचणार आहे . 
      ©®विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९