vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

आता फक्त युद्ध करूया !

चालू घडामोडींचे विश्लेषण
संपुर्ण ब्लॉग वाचा व मगच प्रतिक्रिया द्या ! 

प्रत्येकाचे रक्त सळसळतंय,होय!  पाकिस्तानचा बदला घ्यायला हात शीवशीव करतात, मनात रागाचा कडेलोट होतोय, सगळे चॅनलवाले, पत्रकार व संपुर्ण देशप्रेमी हेच सांगत आहेत, 
युद्ध करावं माजलेल्या  पाकिस्तानला धडा शिकवावा , पाकव्याप्त  काश्मीर पासून सुरूवात करावी ते थेट , लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, अशी शहरं , एकामागून एक,  एका दिवसात बेचिराख करावीत, लाखो सैनिक घुसवून एका एका सैनिकाच्या बदल्यात किमान  हजार तरी मारावेत, 
रक्तपात करावा , 
सगळं पाकिस्तान जाळून टाकावं , बेचिराख करावं , नेस्तनाबूत करावं , जगाच्या नकाशावरून त्याचं निशाण  कायमचं मिटवावं ! 
हेच प्रत्येक भारतीयाला वाटतंय! पाकिस्तानचा रागच तितका आलाय,  
 वाटणं सहाजिकच आहे . पण हे करताना , कितीजण सैनिकांबरोबर जायला तयार आहेत, कितीजण कुटूंब घरदार, बायका -मुलं आई वडील सोडून युद्धभुमिवर जायला तयार आहेत, भारतमातेची सेवा करायला व जीवाची बाजी लावून जीवनाची आहुती द्यायला कोण कोण येणार आहे,  कितीजण, आजच्या पेक्षा दुप्पट टॅक्स भरायला तयार आहेत, कितीजण, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांची जबाबदारी घेणार आहेत, कितीजण, त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण, व पत्नीला आधार देणार आहेत! 
कितीजण, त्यांचे अश्रू पुसणार आहेत?  कितीजण आपल्या उत्पन्नातील किमान चवथा हिस्सा शहिदांच्या वारसांना द्यायला तयार आहेत, दहा रूपये  दान करताना ज्यांची फाटते ते नुसते फेसबुक व वॉटसपवर मोकळी अक्कल पाजळतात  , मला माहीत आहे बहुसंख्य भारतीय त्याग करतीलही पण, सगळेच  करतील का ?  याचे उत्तर इतिहासाची पाने चाळताना  पहावे लागेल  !  
पाकिस्तान बेचिराख करताना , तो नुसते शेपूट घालून पळून जाईल का ? 
त्यांचे १० मारताना आपलेही २ ते ३ जण शहीद होतील की नाही ?  याचा तरी कधी विचार केलाय का ? 
युध्दज्वर चढविणे व अंगात संचारणे  सहज शक्य होते पण युद्ध करणे हे विनाशाकडे घेऊन जाते, हे कधीतरी शहीद कुटुंबाचे वारसांना भेटा मग कळते , फुकटचे सल्ले देणारे,  प्रत्यक्षात सगळे नाही पण बरेच भेकड सुद्धा असतात, लेखनीला तरबेज असतात व वेळ आलीच तर  कडी लाऊन आत बसून अक्कल पाजळतात, कारण त्यांच्या घरचा कुणीच सीमेवर लढत नसतो, पाकिस्तानचे  युद्धात  समजा ४०लाख मारले तर किमान आपलेही १० लाख तरी शहीद होतील याचातरी विचार केलाय का ?  पानिपतची तेंव्हा लढाई झाली होती तर कित्येकजण युद्ध कैदी होऊन आजही पाकव्याप्त बलुचिस्तान मध्ये जगताना दिसतात, पहिल्या व दुसर्‍या महा यु़द्धाच्या कथा जरी इतिहासात वाचल्यातरी जगाचा विनाष युद्धामुळे होऊ शकतो, संपुर्ण मानवजात संपुष्टात येवू शकते कारण आता मोठे युद्ध कदाचित अणुबॉम्बचेही होऊ शकते , नालायक पाकिस्तान बरोबर युद्ध करत  असताना , त्यांच्या बाजूने चीन उतरला व आपल्या बाजूनेही , ब्रिटन  , अमेरिका , रशिया , उतरले व आपल्या पक्षाची सरसी होऊ लागली व त्यांनी पराभवाच्या भितीमुळे का होईना प्रथम  अणुबॉम्बचा  हल्ला केला तर व  आपली , दिल्ली , मुंबई, बेंगळुरू , कलकत्ता , अशी शहरं त्यांनी लक्ष केली तर कितीजणांना जीव गमवावा लागेल, किती कुटुंबे बेचिराख होतील हे नुसते मनात विचार करून बघा , किंकाळ्या , आरोळ्या  , विव्हळत पडलीली , जणावरे , माणसे , मुलं बाळं रक्त मासाचे सेडच्या सडे, पडलेली प्रेत तरी उचलायला माणसे राहतील का ? 
कारण आताचे युद्ध मुळात तलवारीचे राहिलेले नाही , टँक बारूद, अणुबॉम्ब व कितीतरी नरसंहारक घातक शस्त्रांचा वापर युद्धात होऊ शकतो , 
जैविक व रासायनिक हल्ले वेगळेच! 
समजा असा विचार करा की,  आपल्याच घरावर बाँब टागला गेला व आपलीच  लहान लहान मुलं , आईवडील व आपण त्याचे शिकार झालो तर काय होईल! हडा मासांच्या चिंध्या चिंंध्या झाल्यातर सोसेल का ? 
 व समजा आपणही अणुबॉम्ब टाकायला सुरूवात केली तर त्याचे जागतिक  काय परिणाम होतील, याचा तरी विचार केलाय का ? 
अणुबॉम्ब मुळे तसेही कुठलेच राष्ट्र दुबळे राहिले नाही . 
हो अतिरेकी संपवायलाच पाहिजेत पण त्यासाठी योग्य मार्ग निवडवा लागेल, मुसद्दी पणाने छुपे लढावे लागेल, हो त्यासाठी आपल्या यंत्रणा बळकट कराव्या लागतील, 
दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे . . .
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र यायची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून शिक्षण दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसताव लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्याच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच   वार्तांकन करता आले नाही पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाणे , बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायला पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. 
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

दहशतवाद संपवणे शक्य आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण

दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे ! 
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र येण्याची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून राष्ट्रीय शिक्षण  दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसता, लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्यांच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच वार्तांकन करता आले  पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाने व बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायलाच पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. काही