vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

ओळख आदरणीय, माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. खासदार विजयसिंह मोहिते- पाटील तथा दादासाहेबांच्या कार्याची !

ओळख आदरणीय खासदार  विजयसिंह मोहिते पाटील तथा  विजयदादांच्या कार्याची. आदरणीय
दादासाहेबांनी
अकलूज ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला, अकलूजचे सरपंचपदाचा यशस्वी कारभार पाहिल्या नंतर दादासाहेब हे सोलापूर  जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि नेमका  त्यावेळीच  दुष्काळ पडला दादासाहेबांच्या  नेतृत्वाचा  कसोटीचा काळ चालू झाला ,  लोकांच्या  हाताला काम नव्हते , प्यायला पाणी नव्हते, जणावरांना चारा नव्हता अशा परिस्थितीत दादासाहेबांनी  आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर संपुर्ण जिल्हा जिल्हा परिषद मार्फत नाला बंडीग, पाणंद रस्त्यांची कामे , छोटेमोठे तलावातील गाळ काढणे अशी कामे सुरू केली, मजुरांना हाताला काम दिले गोरगरीबांच्या चुली पेटवण्याची व दुष्काळात लोकांना  जगवण्याचे काम दादासाहेबांनी केले , राज्य सरकार मध्ये मोहिते पाटील घराण्याचा दबदबा असल्याने तेंव्हाच्या सरकारने दुष्काळासाठी मुबलक निधी केवळ दादासाहेबांमुळेच  जिल्हा परिषदला उपलब्ध करून दिला, "नव्हे निधी खेचून आणला " गावोगावी वाड्या वस्त्यावर  पिण्याच्या पाण्याचे टँकर, जणावरांना चारा छावण्या उभारून दादासाहेबांनी दुष्काळावर यशस्वी मात केली छोटेमोठे पाझर तलाव, मातीचे बंधारे याचीही मोठ्या प्रमाणात कामे केली . नंतरच्या काळात
आदरणीय दादासाहेब जेंव्हा प्रथमच विधानसभेला उभे राहिले व राज्यात त्यावेळी सर्वाधिक मताधिक्याने शिडी या चिन्हावर निवडून आले, कारण तेंव्हा तांत्रिक अडचणी मुळे दादासाहेबांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही . दादासाहेब विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर दादासाहेबांची ख्याती संपुर्ण देशभरात पसरली गेली , पश्चिम महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी , राजीवजी गांधी आले तेंव्हा तेंव्हा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दादासाहेबांना मानाचे स्थान मिळाले बर्याचदा दादासाहेबांनी व इंदिराजी आणि राजीवजी यांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यामुळे दादासाहेबांच्या शब्दाला दिल्लीत सुद्धा मान होता व आहे  आणि त्याचा फायदा सातत्याने सोलापुर सह पुणे, सातारा , सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी झालेला आहे . दादासाहेबांचा राजकिय आलेख सातत्याने उंच उंच होत गेला विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करताना दादासाहेबांनी निरा देवघर प्रकल्प मार्गी लावला , जिल्ह्यात सहकर्यांच्या माध्यमातून  साखर कारखाने निर्माण केले , विशेषतः बांधकाम खाते सांभाळत असताना संपुर्ण ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले , विविध ठिकाणी पुल बांधले ,  पाटबंधारे मंत्री असताना भाटगर, वीर, व उजनी सह संपुर्ण राज्यातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले एकदा तर निरा खोर्यातील धरणे पन्नास टक्के सुद्धा भरली नसताना विजयदादांच्या अचूक नियोजनातून उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची दोन आवर्तने लोकांना मिळाली व कमांड एरियात  पाणी टंचाई जाणवली नाही , ग्रामविकास मंत्री असताना , सरपंचांचे मानधन वाढवले , अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवले आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ग्रामपंतायती मधील कर्मचार्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला व हजारो कर्मचारी यांना न्याय मिळाला , ग्रामविकास मंत्री असतानाच दादासाहेबांनी , भूमिगत गटार योजनेची ग्रामीण भागात  सुरूवात केली व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते सिमेंटचे करायचा निर्णय केला . राजकीय कारकीर्द चालू असताना दादासाहेबांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्याही संधीचे सोने दादासाहेबांनी केले , सातारा , सांगली , सोलापूर पुणे आणि संपूर्ण मराठवाड्याची तहान भागेल असा कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर केला व संपुर्ण राज्याला पतदर्शी ठरेल असा हा प्रकल्प होता कारण, या प्रकल्पात शेतकर्यांना पाणी तर मिळणार होतेच मात्र त्यासाठी एक इंचही जमीन भूसंपादन करायची गरज नव्हती, कुणीही विस्थापित होणार नव्हते ,  कारण हा संपुर्ण प्रकल्प भूमीगत बोगदा खोदून होणार होता . माळशिरस विधिसभा मतदारसंघ राखीव झाल्याने दादासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातून काही काळ अलिप्त रहावे लागले त्यामुळे काही लोकांनी या प्रकल्पाला खीळ घालण्याचे काम केले कारण हा प्रकल्प झालाच तर त्याचे श्रेय दादासाहेबांना मिळेल हा कोता विचार काहींनी केला.
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात. म्हणून दादासाहेबांना जनतेचे प्रेम लाभते व  मान मिळतो आहे.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य  लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्या सह सोलापूर, पुणे , सातारा , सांगली या ठिकाणची बहुतांश  जनता  दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते,
माळशिरस तालुक्यातील जनतेने तर सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम  केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली, ग्रामीण भागात  शिक्षण उपलब्ध करून दिले ,  रस्ते,  विज, पाणी ,आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले विशेषतः ग्रामीण रूग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रांची गावोगावी निर्मिती दादासाहेबांनी केली . आपुर्या विद्युत प्रवाहाने मोठ्या  प्रमाणावर शेतकर्यांच्या मोटारी जळत होत्या , पुर्ण दाबाने विज पुरवठा होत नव्हता तेंव्हा दादासाहेबांनी खास बाब म्हणून विज उपकेंद्रांची निर्मिती केली .जनतेसाठी  तळमळीने काम करणारा असा नेता कुठेही दिसणार नाही .संत तुकाराम महाराज  व संत ज्ञानेश्वर महाराज  पालखी महामार्ग,महाराष्ट्रात एका जिल्ह्यात स्वतंत्र  विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठ आणण्याचे  कामे केले . उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना सर्वप्रथम दादासाहेबांनीच मांडलेली आपणांस  दिसून येते.  सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव दादासाहेबांच्या मार्गदर्शना खाली झाला , विजदादांनी सोलापूर विमानसेवेसाठी बरेच प्रयत्न केले व काहीकाळ विमानसेवा सुरू देखील केली होती,  असे जिल्ह्यातील असंख्य  प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वेचा प्रश्न सातत्याने लावून धरून तो  रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला,  बंद पडलेल्या  कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉपसाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणण्याचे काम दादासाहेबांनी केले .
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे राष्ट्रीय  सहापदरी व राज्य महामार्गाच्या अंतर्गत येणारे  चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. पालखीतळ, खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी संबधित शेतकर्यांना मिळवून दिल्या. माळशिरस कोर्टासाठी भव्य  इमारत, पंचायत समिती व तहसील कार्यालयाची भव्य इमारत दादासाहेबांमुळेच उभी राहिली .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी दिला, नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी केली ,  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी अशी विविध  कामे मार्गी लावलेली आहेत . माळशिरस येथील लोकांना सोलापूर व पंढरपूर लांब पडत होते म्हणून खास बाब म्हणून जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटीओ ऑफीस माळशिरस तालुक्यात आणले याचाही लाभ माळशिरस सह आसपासच्या तालुक्यातील जनतेला  होताना दिसतोय,
 पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम असेल तेही दादासाहेबांनीच केले आहे ,
 केळी, डाळींब, भाजीपाला व भुसार मार्केट चालू करून शेतकर्यांच्या मालाला स्थानिक ठिकाणीच बाजारपेठ उपलब्ध करून दिली व त्या माध्यमातून हजारो, व्यापारी , मजूर आणि कामगार यांच्या हाताला काम सुद्धा दिलेले आहे .
संपुर्ण महाराष्ट्रातील मोठा घोडेबाजार, शेळी मेंढी व जणावरांचा बाजार सुद्धा याठिकाणी भरतो, अशा बारीकसारीक  विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या आहेत  !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी उपलब्ध करून दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली ,वादळी वार्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून देणे असो ,  जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे दादासाहेबांनी  केली .दलित मुस्लीम यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या व सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुद्धा  उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .अकलूज माळशिरस येथे वेळोवेळी  कृषी प्रदर्शन भरवून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान देण्याचे काम केले .
त्यामुळेच  विजयदादांना माळशिरस तालुक्या सह  सोलापूर सातारा जिल्ह्यातील  जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे , हजारो लाखो कामे अज्ञात आहेत,
माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, माजी आमदार  व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.   आता  जे  गावोगावी सत्कार होत आहेत, अमृत मोहोत्सव साजरा होत आहे ते पाहता दादासाहेबांचे सार्वजनिक जीवन कृतार्थ झाल्याचे दिसून येते .
दादासाहेबांवरील  निस्सीम प्रेमातून सुचलेल्या  चार ओळी लिहण्याचा माझा प्रयत्न तुम्हा सर्वांना  नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा
दादासाहेब व मोहिते पाटील कुटूंबावर प्रेम करणारा एक सामान्य
 कार्यकर्ता म्हणून हा लेखन प्रपंच!
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते.
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
हा लेख दादासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून जास्तीत जास्त शेअर करा .
व आम्हालाही प्रतिक्रिया कळवा ही विनंती