vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २४ मे, २०१९

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत का झाली याचा घेतलेला आढावा ! आतातरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आत्मपरिक्षण करेल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  महाराष्ट्रात पराभूत का झाली याची काही कारणे मतदारात जावून शोधली तर पुढील गोष्टी लक्षात येतात. !
केवळ मोदी फॅक्टर मुळे नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या चुका दुरुस्त न केल्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी  लोकसभा २०१९ ला पराभव स्वीकारावा लागला आहे . .
त्याची कारणे . . .
काँग्रेस व राष्ट्रवादीत  नव नेतृत्वाचा अभाव. . .
प्रत्येक पदे ,प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपल्याच घरात ठेवण्याचा केलेला वारंवार प्रयत्न, यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते यांची भावना आपल्याला काँग्रेस व राष्ट्रवादीत    राहून काय भवितव्य म्हणून भाजपा सेनेकडे आकर्षित होताना दिसतात.
प्रचार व प्रसार व जाहिरात   यातील  प्रभावी मुद्यांचा अभाव व  कमजोरी!
आपल्या पेक्षा कोणी वरचढ नको म्हणून   अशोक चव्हाण  व अजितदादा  पवार यांची आपआपल्या पक्षातील नेत्यांनाच संपवण्याची  आखलेली  रणनिती !
पक्ष वाढवण्या ऐवजी एकोपा साधण्या ऐवजी  या लोकांनी आपल्याच पक्षात एकमेकांची जिरवण्यासाठी गटबाजीला दिलेले बळ व ही गटबाजीच त्यांना घातक ठरलेली आज दिसत आहे .
विविध सत्तास्थाने हातात  असतानाही पवार साहेब व सुप्रिया ताई सोडल्या तर बाकीचे पदाधिकारी  , लोकांचे प्रश्न तातडीने न सोडवता , केवळ पदाला चिकटून राहिलेले दिसले! प्रत्येक मतदारसंघात कामा ऐवजी
जात व धर्म बघून उमेदवारी लादने !
पक्षात कसलेही योगदान नसणार्या नवख्या उमेदवारांना केवळ घराणेशाहीच्या माध्यमातून लादने ,
पुण्याची जागा व नगरची जागा सामंजस्य दाखवून  आदलाबदल न करणे  !
केवळ आम्हाला इतक्या सीट हव्यात हा अट्टाहास धरून बसने, औरंगाबाद व पुणे  राष्ट्रवादीला सोडणे अपेक्षित होते .
गेल्या पाच वर्षात नारायण राणे , छत्रपती संभाजी राजे, मोहिते पाटील व विखे पाटील यांचे काँग्रेस व राष्ट्रवादीतूनच   पक्षातूनच खच्चीकरण करणे ,
माढ्यात केवळ मोहिते पाटील यांना त्रास देण्यासाठी म्हणून,
संजय शिंदे व त्यांचे बंधू यांनी पक्ष विरोधी भूमिका घेऊनही त्यांना अभय देणे , ज्या संजय शिंदे व दिपक साळुंखे मुळे पक्षाची वाट लागली त्यांनाच झुकते माप देणे . .
जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांना संपवण्यासाठी पक्षातूनच मोहीम राबवणे !
बर्याच ठिकाणी युती असूनही छुप्या पद्धतीने पाडापाडीचे राजकारण करने ,
पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सारख्यानेही आघाडी धर्म न पाळणे !
मान व खटाव चे आमदार गोरे  व रणजितसिंह निंबाळकर  हे पृथ्वीराज बाबांचे खास जवळचे होते , त्यांनाही भाजपात जावू देणे !
मुंबईत विविध गटातील वादविवाद. . . व
समन्वयाचा अभाव! कित्येक वर्ष
सत्तेवर असताना ओबीसी दुखावतील या अनाठायी भितीमुळे  मराठा समाजासाठी,  आरक्षणासाठी  घटनात्मक आयोगाची निर्मिती न करणे  व आयोगाकडून हातात असतानाही पॉझिटिव्ह अहवाल तयार न करणे ,   दिंडोरी , हिंगोली , बीड, रावेर या ठिकाणी
ऐनवेळी उमेदवार बदलने,
नाशिक मध्ये योग्य उमेदवार न देता ज्यांची भ्रष्टाचारी म्हणून प्रतिमा सगळीकडे झाली  आहे त्यांनाच उमेदवारी देणे व प्रचारासाठी संपुर्ण महाराष्ट्रात फिरवणे,
भंडारा गोंदियातून नाना पटोले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली असती तरी चालले असते पण  तेवढे काँग्रेस व राष्ट्रवादीत सामंजस्य नसने ,
मोठ्या शहरात व गावपातळीवर संघटन कमकुवत असने !
बुथ कमिट्या नसने ,
पारंपारिक, दलित मुस्लीम व काही प्रमाणात मराठा वोट बँकेला  गृहीत धरणे व त्यावर   विसंबून राहणे, नव मतदारावर प्रभाव पाडेल असे नेतृत्व नसणे व ते तयार  होऊ न देणे !
मुस्लीम, माळी , धनगर, वंजारी  ,  दलित यांना सोबत घेण्यात आलेले अपयश,
हक्काचे , दलित, मुस्लीम व धनगर मतदार दुरावणे,
धनगरांना एकाही मतदारसंघात  उमेदवारी न देने,
पक्ष संघटनेत नवीन कार्यकर्ते यावेत यासाठी  व्यापक कार्यक्रम  नसने !
ओबीसी , दलित, यांचा भाजपाने खुबीने राजकारणात वापर केला त्या समाजातून काही चेहरे पुढे करून बरोबर इप्सित साधले !
भाजपा व शिवसेना यांनी जे सोशल इंजिनिअरींग केले ते अघाडीच्या   नेत्यांनी न केल्यामुळे  पराभवाचा सामना करावा लागला . असे मला वाटते . .

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९