जीवन म्हणजे म्हटलं तर आहे एक परीक्षा !
इथला प्रत्येक प्रश्न सोडवावाच लागतो तरच कुणीतरी करते आपली समीक्षा !
प्रश्नच नीट समजले नाहीत आणि उत्तरेही आली नाहीत तर मात्र , सगळे सोडून देतात आपल्याकडून अपेक्षा !
या भयंकर सिमेंटच्या जंगलात, भलेही वाघ सिंह रहात नाहीत, तरीदेखील वाटते जगण्याची भिती , आपलीच आपल्याला करावी लागते रक्षा !
तुमचा संघर्ष, तुमचे यश , तुमचा प्रभाव यावरच तुमची ठरते दिशा !
तुमच्याकडे असेल, गाडी , बंगला आणि पैसा तर तुमच्याशी बोलताना लोकांची असते गोड गोड भाषा !
जीवन म्हणजे म्हटलं तर आहे ना परिक्षा !
सुखी रहायचे असेल तर ठेवावी लागते काय आशा !
ध्येय प्राप्तीची उंच शिखरे गाठण्यासाठी प्रगतीची बाळगावी लागते मनिषा !
कितीही संकटे आली तरी पुढे चालावे लागते , करुन चालत नाही नशा !
दिवसभर कष्ट असतील प्रामाणिक तर गोड गोड वाटेल निशा !
जीवन म्हटलं तर एक आहे परिक्षा !
©®
कवी . . विजय पिसाळ नातेपुते. . ९४२३६१३४४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा