आमच्या शालेय जिवनातील असंख्य मित्रांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे आणि त्यापैकीच एक यशस्वी व्यावसायिक. .
आमचे मित्र मा . श्री रविराज रामराव गायकवाड यांची जायंटस् ग्रुप ऑफ सातारा च्या सन २०२२ / २०२३ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे . *रविराज तुमचे खूप खूप अभिनंदन*
रविराज गायकवाड हे आमचे इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे शालेय मित्र, रविराज यांनी अगदी शुन्यातून कष्ट करत शिक्षण घेतले , इंजिनिअरींग नंतर काही दिवस जॉबही केला पण मुळात काहीतरी करण्याची जिद्द व चिकाटी असल्यामुळे त्यांनी सातारा या ठिकाणी विविध कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीचे होलसेल आणि रिटेलचे दुकान सुरु केले . प्रामाणिक काम करण्याची सवय आणि लोकांना सेवा देण्याची धडपड व अंगात उपजत कष्टाची तयारी यामुळे अल्पावधीतच रविराज यांना मोठ्या बँका , पतसंस्था , बिल्डर, मोठे काॅन्ट्रॅक्टर यांच्या ऑर्डर मिळाल्या व व्यवसायात भरारी घेतली . सातारा सारख्या शहरात व्यवसायिक बस्तान तर बसवलेच पण सामाजिक कार्याची आवड, नेतृत्व करण्याची क्षमता यामुळे ते जायंटस् ग्रुप ऑफ साताराशी जोडले गेले , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील खूप मोठा मित्र परिवार त्यांनी निर्माण केला , सातारा जायंटने लोकांसाठी आरोग्य शिबीरे , वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, पुरग्रस्तांना मदत, आपघात ग्रस्तांना मदत, विविध व्याख्याने असे विविध उपक्रम राबवले आणि सर्वसामान्य लोकांना खूप मदत केली . जायंटस् ग्रुप ऑफ सातारा हा प्रतिष्ठित लोकांचा सामाजिक काम करणारा ग्रुप आहे. तसेतर आम्ही जीवलग मित्र आहोत पण आमचे दोघांचे वैचारिक व राजकीय मतभेद आहेत मात्र मित्र म्हणून आम्ही खूप जवळचे आहोत आणि वैचारिक आणि राजकीय मतभेद असतानाही आमच्यात कधीही कटुता आली नाही . आम्ही आपआपल्या मतावर ठाम राहतो , टोकाचा विरोध करतो पण मैत्रीत कधीच कटुता येऊ देत नाही कारण आम्ही विचारांनी परिपक्व आहोत.
रविराज यांची जायंटस् ग्रुप ऑफ साताराचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे कळताच मनाला खूप आनंद झाला आणि आपल्या मित्राला नवीन जबाबदारी मिळाली व मित्राच्या सामाजिक कामाचे सार्थक झाले ही भावना ह्रदयात निर्माण झाली . रविराज यांना पुढील काळात अजून खूप काम करण्याची संधी मिळावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना !
विजय पिसाळ नातेपुते.