vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २२ मार्च, २०१९

माजी उपमुख्यमंत्री , आदरणीय खासदार मा. श्री. विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांच्या कार्याची ओळख, १

चालू घडामोडींचे विश्लेषण

सोलापुर जिल्ह्यातील स्वाभिमानी जागृत व
प्रिय  बांधवांनो आणि  भगिनींनो मि,
 श्री. विजय(काका)पिसाळ नातेपुते तुम्हाला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व आदरणीय  माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांनी केलेल्या विविध विकासकामांची माहिती सविस्तरपणे देणार आहे  ..आपणाला माहितच आहे की दादासाहेबांनी,  सार्वजनिक व राजकीय जीवनात विविध पदावर काम करत असताना त्या त्या पदांना न्याय देण्याचा मनापासून तळमळीने  प्रयत्न केला आहे . . .
२०१४ ला दादासाहेब नुकतेच  खासदार म्हणून निवडून गेले होते व त्यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री म्हणून श्री शशीकांतजी शिंदे साहेब काम पहात होते . . जून महिना होता व  सोलापुरात पाण्याची भीषण टंचाई होती ,
सोलापूर जिल्ह्यातील
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व सोलापूर शहर या ठिकाणच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी एखरूख उपसासिंचन व देगांव जोड कालवा , हिप्परगा एखरूख तलावाची उंची वाढवणे व दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४६ गावांपैकी १४ गावांना एखरूख हिप्परगा उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणे बाबत संबधित गावांचे नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी आदरणीय दादासाहेबांनी
बुधवार दिनांक २५/६/२०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता तत्कालीन जलसंपदा मंत्री शशीकांतजी शिंदे साहेब यांच्या कडे  बैठक  लावली व आणि मंत्रमहोदय यांच्याशी  सविस्तरपणे चर्चा करून नागरीकांच्या अडीअडचणी समजून सांगितल्या . . . .
आदरणीय दादासाहेब हे तेंव्हा खासदार म्हणून नुकतेच निवडून आले होते , त्यातही तो परिसर त्यांच्या मतदारसंघा बाहेरील होता . .
पण त्या भागातील   लोकांनी समस्या मांडताच आदरणीय दादासाहेब संबधित खात्याच्या मंत्रिमहोदयांना तात्काळ अवगत केले व तसे पत्र देऊन  तातडीने मिटींग साठी वेळ घेऊन पुढील कार्यवाहीच्या सुचना केल्या व तो प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. हे केवळ मनापासून तळमळ असल्यामुळेच,
आदरणीय दादासाहेबांनी ,,आमदार,  मंत्री ते उपमुख्यमंत्री व  खासदार असताना कधीही केवळ स्वतःच्या मतसंघाचा व फक्त  स्वतःच्या कार्यकर्त्यांचाच विचार न करता काम घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे . . .
म्हणून संपुर्ण महाराष्ट्रात त्यांना विकासरत्न संबोधले जाते.
त्यांचे काम हीच त्यांची ओळख असून, त्यातूनच जनता त्यांचेवर प्रेम करते .
सत्ता आली तरी उत्मात केला नाही !
सत्ता नसली तरी कधीच जनतेशी असलेली  नाळ तोडली नाही . .
म्हणून मोहिते पाटील हे विकासाचे  ब्रँड होते व यापुढेही  राहतील हे नक्की . . ..म्हणून

#जागृत करूया  स्वाभिमान_
रणजितपर्व_ म्हणजे_ आपला _ अभिमान!
 #परंपरा नेतृत्वाची_सुरूवात_ रणजितपर्वाची !
लेखन -श्री  विजय(काका)पिसाळ नातेपुते ९६६५९३६९४९