vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

माझी पोस्ट कुणाच्याही विरूद्ध नाही , कुणावर राग नाही फक्त पहावत नाही म्हणून लिहावे लागते !
पटले तर बघा नाहीतर सोडून द्या !
राग आला तर माफ करा पण वाचा . . . .
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

मराठा समाज आतातरी जागृत होणार आहे का ?

विविध पक्षांच्या पालख्या खांद्यावर घेऊन नाचल्यामुळे , आज मराठा सगळीकडे विखुरला गेला आहे .  एकगठ्ठा मतदान होत नसल्याने कोणताही राजकीय पक्ष मराठ्यांना सध्या गांभीर्याने घेत नाही असेच म्हणावे लागते , त्यामुळेच  मराठ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले जात नाहीत, सगळे प्रश्न व समस्या जैसे थे  आहेत , शेती बरीच निसर्गावर, समजा निसर्गाने साथ दिली थोडंफार पिकलंच  तर मुद्दाम बाजाभाव पाडण्याचे सरकारी   षडयंत्र  ,  शिक्षणातील मागालेपण, महागडे शिक्षण घेण्याची संपलेली ऐपत व विविध षडयंत्र रचून मराठा युवकांना कुणी हिंदुत्वाच्या , कुणी बहुजन वादाच्या तर कुणी  राजकारणासाठी विविध व्यसनांच्या नादी लावून माती भडकवून विविध ठिकाणी वापर करून घेत आहेत, हाताला काम नसलेले काही युवक सहाजिकच कोणतीतरी संघडना जॉईन करतो मग, कधी मुस्लिम तर कधी दलित तर कधी ओबीसींना नावे ठेवत बसतो पण ज्यांना आपण नावे ठेवतोय त्यांनी नोकरी , शिक्षण, शेती, उद्योगधंदा यात केलेली प्रगती मात्र पहात नाही ,   सर्वच मोठ्या  राजकीय पक्षांनी मराठा समाजातील प्रस्थापित  नेत्यांना बरोबर काहीतरी पदे  देवून पोटापाण्याची सोय केली आहे व त्या बहुतेक  नेत्यांनी काही मोजकेच कार्यकर्ते सांभाळून आपआपल्या बुरूजांची डागडुजी केली आहे ,
महाराष्ट्रात ३२ ते ३६  %पेक्षा जास्त असलेला समाज प्रमुख चार पक्षांत कमीजास्त ८ ते, ९ टक्केवारीने विभागला आहे ! बाकीच्या शेकडो संघटनांची पताका खांद्यावर आहेच! त्यामुळे निवडणुकीत राजकीय पक्ष उमेदवारी मराठा समाजाला देतात पण बॉस होऊ देत नाहीत, ताटाखालचे मांजर बनवतात व तेही काहीतरी  पदरात पडते यावर समाधान मानतात!

आता राहिलेला जो इतर समाज ज्या पक्षांच्या   पाठिमागे उभे  राहतात  त्यांचेच उमेदवार विजयी होतात  !
हे गणित सर्वच  पक्षांनी बरोबर ओळखले आहे त्यामुृळे , मराठा समाजाचे मोर्चे प्रचंड मोठे होतात मात्र, मोर्च्याला एकत्र आलेला समाज मतदान करताना मात्र, आपल्या सोयीनुसार व आपल्या नात्यागुत्या नुसार, आपल्या संबंधा नुसार   आपआपल्या नेत्यांना मतदान  करत आसतो,  त्याचा परिणाम असा होतो की, मराठा वोट बँक विखूरली जाते व सहाजिकच अपेक्षीत परिणाम किंवा मराठा समाजाकडून राजकीय पक्षांना धोका पोहचत नाही व काही प्रमाणात जो धोका पोहचतो तो आर्थिक गोष्टींची बेगमी करून भरून काढला जातो , त्यामुळे  मराठा समाजाचे प्रश्न कोणही सोडवू शकत नाही . . हीच वस्तुस्थिती आहे . .
त्यामुळे सत्तेवर कुणीही आले तरी मराठा  समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत,  किमान यापुढे तरी  जो पक्ष ठाम भूमिका घेवून मराठा समाजाची भक्कम बाजू मांडत नाही तोपर्यंत मराठा समाजाने प्रस्थापित पक्षांना जवळ करूच नये  असेच वाटते , जोपर्यंत मराठा समाजाची संघटीत ताकद निवडणुकीत एकसंघ दिसत नाही तोपर्यंत कितीही मोठी आंदोलन झाली तरी सरकार नमणार नाही , मग सरकार कोणतीही असो ! आज छोटेमोठे समाज  संघटीत व ठामपणे एकाच कोणत्यातरी पक्षांना मतदान करतात तेंव्हा त्या पक्षांना त्या घटकांपुढे झुकावेच लागते !
जो पर्यंत मराठा समाज  एकत्रितपणे ठरवून मतदान करत नाही तोपर्यंत मराठा समाजाचा कोणताही  प्रश्न सुटेल असे वाटत नाही !
आजच्या प्रत्येक पक्षांला वाटतेय की , आपण मराठा समाजाची बाजू  लावून धरली तर कदाचित  आपली इतर वोट बँक नाराज होईल किंवा दुर जाईल!
म्हणून कुणीही छुपी किंवा उघड भुमिका मराठा समाज्या साठी घेत नाही !
आज आपण पाहतो प्रत्येक जातीसाठी ठामपणे भांडणारा त्या त्या जातीत नेता आहे , ओबीसींना चुचकारून मुंडे साहेबांनी माधव समिकरण तयार केले , मुंडे साहेबांनी जाणीवपुर्वक मराठा नेत्यांना टार्गेट केले शरीर जरी मुंडे साहेबांचे होते तरी ब्रेन मात्र नागपूरकरांचा होता !
मराठा समाजात नेते बरेच झाले मात्र बहुसंख्य नेत्यांना , आमदारकी,खासदारकी , फारतर जिल्हापरीषद व  मंत्रीपद, महामंडळ, असे काहीतरी दिले की तो नेता समाज विसरून जातो व समाजाचे प्रश्न तसेच अनुउत्तरीत राहतात!
प्रत्येक समाजाचा हमखास पक्ष आहे पण मराठ्यांना कोणताही एक  पक्ष नाही ! कारण मराठा विविध पक्षात विखूरला गेला ,
राजकीय आर्थिक लाभ  मिळेल तिकडे समाजातील नेते जातात व समाज नेत्यांचे मागे जातो . . . हेच पिढ्यान पिढ्या चालू आहे ,
आज ब्राह्मण समाजाचा विचार केला तर जवळपास ९५%ब्राह्मण समाज संघ परिवार व भाजपासी ठामपणे जोडलेला आहे व जो ५% राहतो तो इतर पक्षांत फक्त लाभार्थी असतो त्याचे मत सुद्धा कमळालाच असते पण यातुन कोणताही मराठा बोध घेत नाही !
मराठाच काय इतर कोणताही समाज एकाच पक्षांच्या मागे ठामपणे उभा रहात नाही !
अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांना शिक्षण, रोजगार, नोकरी  नाही मिळाले तरीही वाली कोणही नाही ,
मराठा शेतकर्यांनी कितीही आत्महत्या केल्या तरी सरकार जागे होणार नाही ,
जातीपुरता विचार करणारा मराठा कधीच नव्हता , नसावे सुद्धा याच मताचा मिही आहे ,
पण मराठा समाजाच्या समस्या जर कुणी गांभीर्याणे कोण सोडवणार नसेल  तर मराठा समाजातील नव तरूणांनी आता विचार करायची वेळ आली आहे !
कुठेतरी ठाम राजकीय भुमिका घेऊन जो आपले प्रश्न सोडवेल त्याला तरी जवळ करावे किंवा आपल्या समाजातील तरूणांनी एकत्र येऊन एखादा पक्ष तरी काढावा !
नसेल तर आंदोलन बंद करून आहे तसेच जगत रहावे !
बांधवांनो इतक्या दिवस मराठा शेतकरी आत्महत्या करत होते आता मराठा तरूण आत्महत्या करत आहेत,
तरीही सध्याचे राजकीय पक्ष जर लक्ष देत नसतील तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
काही चुकले असल्यास माफ करावे !