विविध क्षेत्रातील चालू घडामोडींचे विश्लेषण ! ब्लॉगर, लेखक, संपादक श्री विजय शंकरराव पिसाळ, नातेपुते. एम. ए. राज्यशास्र
vijaypisal49. blogspot. com
सोमवार, २८ जानेवारी, २०१९
शेतकरी टॅक्स भरतो का ?

मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील
विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास हे समीकरण गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रातील जनता पाहते आहे . . . . .
त्यामुळेच दादासाहेबांची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे व त्यातूनच लाखो कार्यकर्ते दादासाहेबांवर जीवापाड प्रेम करतात. . . .
त्यामुळेच दादासाहेबांना "विकासरत्न " ही उपाधी जनतेने बहाल केली . . .
लोकशाहीत कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना असंख्य स्पर्धक हे असतातच त्यात गैर काही नाही, काही स्पर्धक नव्याने राजकारणात आलेले असतात व ते सक्रिय असल्याचा अभास करत असतात, पण त्यांच्या कामाचे मुल्यमापण झालेले नसते मात्र कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला जनतेची नस माहित असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील नेतृत्वाची पारख असते , आणि हो ज्या व्यक्तीमत्वाला जनतेत मान असतो व जे व्यक्तिमत्व जनतेसाठी अहोरात्र झटत असते, अशाच व्यक्तीमत्वाचा विचार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करावा लागतो . . . .
त्यामुळे दादासाहेबांना , ना उमेदवारी चिंता करायची गरज आहे , ना निवडणूक जिंकायची चिंता आहे , दादासाहेब निवडणूक लढवतील व विक्रमी लाखोंच्या मतांनी जिंकतील हे सुद्धा निश्चित आहे .
त्यामुळे येणार्या कोणत्याही निवडणूकीत आदरणीय दादासाहेबांची भूमिका निर्णायक तर राहिलच पण राज्याच्या राजकारणावर सुद्धा त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच होतील. . . .
लेखन:-विजय शंकरराव पिसाळ नातेपुते


याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)