vijaypisal49. blogspot. com

सोमवार, १ एप्रिल, २०१९

संयमाने कोणत्याही गोष्टीवर मात करता येते! तोच यशाचा प्रभावी मार्ग असतो !

चालू घडामोडींचे विश्लेषण

*राजकारणातील रोज घडणार्‍या किरकोळ -,  क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नये* फक्त प्रामाणिक काम करत रहावे . .
विजयकाका पिसाळ. . . नातेपुते . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
मनापासून सर्वजण हा छोटासा लेख पुर्णपणे  वाचाल ही अपेक्षा !

*राजकारणात काल काय झाले याला बिलकुल महत्व नसते , त्यातून फक्त बोध जरूर  घ्यावा व भविष्यात  सावध पावले टाकावीत. .*
*आपल्या नेत्यावर निष्ठा व प्रेम असावेच यात कुणाचेही दुमत असायचे कारण नाही . .*
*राजकारण म्हटलं की , विरोध हा  होणार, टीका टिप्पणी होणार, आरोप -प्रत्यारोप होणार. .*
नेत्यांची फोडाफोडी. . कार्यकर्त्यांची पळवापळवी होत राहणार. .
*काहीजणांना  आपल्या नेतृत्वावर विश्वास व प्रेम असते . . तर काही जणांचा जीव छोट्या मोठ्या  पदात गुंतलेला असतो. .*

*काहीजण क्षणिक फायदा किंवा स्वार्थ पहात असतात तर काहीजण हे दीर्घकालीन फायद्याचा व स्वतःच्या राजकीय भवितव्याचा आणि आपल्या पाठिशी असणार्‍या जनतेच्या पाठींब्याचाही विचार करत असतात. .*
*लोकशाहीत आजच्या घडीला विविध प्रलोभने , राजकीय दबाव, जनतेचा रेटा व आपल्याला असलेले भविष्य याचा विचार करून जो तो व्यक्ती आपला नेता व पक्ष निवडत असतो . . .*
*कधीकधी तर मानवी मनाची द्विधा मनस्थिती होत असते . .काय निर्णय करावा हेच बर्याच लोकांना समजत नाही . .*
*काहीजणांच्या बाबतीत तर नातीगोती , पै-पाहुणे , व घरगुती संबध हे सर्व पाहून  राजकारणातील गॉड फादरची निवड करायची असते !*
*कदाचित आपलाच एखादा  निष्ठावंत कार्यकर्ता,  दबावतंत्रामुळे, मजबूरीमुळे , किंवा विविध कारणांनी इतर गटात किंवा इतर पक्षात  गेला तरीदेखील त्याचे खरे कारण शोधायचा प्रयत्न जरूर केला गेला पाहिजे .*
*असे मला वाटते . .त्याला लगेच टार्गेट करून, त्याच्यावर  टीका टिप्पणी करून  परेशान करून ,,हुज्जत घालून  भविष्यातील  आपला कट्टर विरोधक करू नका *
*जरा संयम बाळगावा,  सामंजस्य ठेवा , त्याची समजूत घाला , गोड बोलत रहा कदाचित परत तो आपले काम करू शकतो . .*
मात्र त्याला सतत डिवचत राहून कायमचा विरोधक करू नये!
माणसे जास्त जोडण्या बरोबर ति टिकवणे व त्यांना हाताळणे !
 हेच राजकीय यशाचे गमक असते . .
या बाबतीत. .
*आदरणीय आपले नेते मा श्री विजयसिंहदादांचा आदर्श आपण घेतला पाहिजे!*
दादांनी आजवर कुणालाही कधीच दुःखावले नाही म्हणून
दादासाहेबांना , सर्व पक्षात, सर्व जाती धर्मातील लोकांत, व जनतेमध्ये प्रेम मिळते व दादासाहेबांच्या समोर विरोधक सुद्धा नतमस्तक होतात. .
म्हणूनच आदरणीय दादासाहेब मोदी लाट असतानाही २०१४ ला भरघोस मतांनी विजयी झाले व संपुर्ण देशात दादासाहेबांचे नाव गाजले . .
त्यामुळे कुणालाही काहीही बोलू नका. . लगेच रिअॅक्ट होवू नका . .
जास्त प्रती उत्तर देत बसू नका . . .
दादासाहेबांची व रणजितसिंहदादांची कामे सांगून सर्वांनाच घायाळ करा नक्कीच यश आपले आहे . . . विकासाचे मुद्दे मांडून तोंडे बंद करा . .
यश आपलेच आहे . . ?
असे माझे वैयक्तिक मत आहे . .
श्री विजयकाका पिसाळ नातेपुते . . .