vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८

आत्महत्या हे महापाप

**आत्महत्या नका करू तरूण बांधवांनो वृद्ध माता पित्यांनो, शेतकरी बांधवांनो ! !*
**कळकळीची विनंती*
 *मनापासून आवाहन*
*विजय पिसाळ नातेपुते*
९४२३६१३४४९

तर वाचाच. . .

आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकणे म्हणजे ,
ज्या आई वडीलांनी रात्रंदिवस कष्ट करून वाढवले , अंगाखांद्यावर खेळवले, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन, उपाशी राहुन तुम्हाला खायला घातले , शिक्षण दिले , सर्व लाड पुरवले , तुमच्या जन्मा बरोबर पेढे वाटले, गावातील आयाबाया बोलवून नामकरण केले ,
ऐपती प्रमाणे कपडा लत्ता दिला , का ? तर तुम्ही मोठेपणी त्यांना  व्यवस्थित सांभाळून त्यांचे नाव उज्ज्वल कराल या माफक अपेक्षेने , काय चुकले त्यांचे  तुम्हाला वाढवताना  किती वेदना सहन केल्या , तुमच्या पायाला काटा टोचला तरीही आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले , तुम्हाला कोणी रागावले नावे ठेवली तरी तुमची बाजू त्याच माता पित्यांनी घेतली !  मात्र तुम्ही कुणाच्या तरी भडकावू भाषणाने प्रभावीत होऊन  कारण नसताना स्वतःच्या जीवा बरोबर संपुर्ण कुटुंबातील लोकांना मनस्ताप व भयंकर वेदना देवून, वार्यावर सोडून आत्महत्या करता , अरे आत्महत्या  करणे हे नुसते पाप नाही तर महापाप आहे .
मुल गेल्यानंतर किती वेदना होतात ते आई वडील होवून अनुभवा !

जमेल ते काम करा , कष्ट करा , पैसा बचत करा , गावात काम नसेल, शेती पिकत नसेल, बाजारभाव भेटत नसेल तर  बांधवांनो  शहरात जाऊन छोटीमोठी नोकरी करा नाही जमले तर लाज न बाळगता कोणताही छोटा मोठा व्यवसाय करा त्यात मर्दपना आहे , स्वाभिमान आहे , मोठेपणा आहे ,
जीवनात गरीबी कधीच रहात नसते , टेंशन कधीच, नैराश्य संपत असते , एका दिवसात कुणी, टाटा, बिर्ला,आंबानी होत नाही , त्यासाठी ट्रगल हाच मार्ग आहे गरीबी कधीच कायमस्वरूपीव रहात नसते , फक्त हाताला मिळेल ते काम वेळ न लावता व  लागेल ते काम व कष्ट करणे हाच एकमेव मार्ग असतो ,
**आपल्या रक्तात शिवरायांच्या रक्ताचा अंश आहे**
शिवरायांचे धाडसाची शिकवण आहे , बांधवांनो
शिवराय असे घाबरले असते , त्यांनी अर्ध्यावर कार्य सोडले असते , संकटाचा सामना केला नसता तर कदाचित हे स्वराज्य उभेच राहिले नसते ! पण आपण लगेच खचून जातो !
सरकारे चालवणारे सगळे राजकारणी आता संवेदनाहीन होत आहेत, तुमच्या जीव जाण्यामुळे त्यांना पाजर फुटेल असे ही नाही . . .
आठवा जरा . . .
शिवरायांनी
नैराश्याने खचून न जाता तहात निम्मे राज्य जावून सुद्धा महाराज डगमगून गेले नाहीत!
बांधवांनो
"शीर सलामत, तो पगडी पचास "
अरे जीव असेल तर सर्व काही मिळेल. .
सरकार आज आहे उद्या नाही
ज्यांनी ज्यांनी आपल्याला  फसवले आहे
त्यांना त्यांना धडा शिकवण्यासाठी तुमची समाजाला गरज आहे ,
कोणताही सत्ताधारी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला येत नसतो ,
याच देशातील जनतेने , मोगलशाही, निजामशाही, अदिलशाही, कुतुबशाही, यांच्या राजवटी पाहील्या  , क्रुरता पाहिली, इंग्रज, फेंच, पोर्तुगीज, डच हाकलून दिले , तेंव्हा तर या देशात  लोकशाही नव्हती ,
अनियंत्रित सत्ता होत्या  , जुलमी कारभार होते . .
तेंव्हा सुद्धा आपले पुर्वज आत्महत्या करत नव्हते !
अशा महाभंयकर सत्ता या मातीतील शुर वीरांनी उलथवून लावल्या याचा विचार करा . .
जे न्याय हक्क आपल्याला देणार नाहीत त्यांना आपण नक्कीच लोकशाही मार्गाने हाकलून लावू शकतो !
ति ताकद आपल्या लोकशाहीत आहे , जेंव्हा जेंव्हा सत्ताधारी माजले तेंव्हा तेंव्हा इथल्या जनतेने त्यांना घरी बसवले !
या देशातील जनतेने इंदिरा गांधींना सुद्धा आणीबाणी नंतर धडा शिकवला मग हे तर आत्ताचे  राजकारणी  नुसते बोलबच्चन पोपट आहेत, तेवढा दम नाही यांच्यात पण तुम्ही जगले पाहिजे .
या देशाचे कायदे , घटना हे जनतेसाठी आहेत हे बाबासाहेबांनी घटनेत सांगितले आहे , लोकांना न्याय देण्यासाठी त्यात वेळोवेळी दुरुस्ती करण्याची मुभा दिलेली आहे पण आताची सरकारे बहिरी , मुकी , व आंधळी झालेली आहेत,
त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही !
काही मंडळी कोर्टाची ढाल करून, काहीना काही अडचणी आणून तुम्हाला जरूर त्रास देत आहेत पण डगमगून जावू नका !
जरा वाट पहा योग्य वेळी दनका द्या पण आत्महत्या हा मार्ग नाही . . .
त्यामुळे सबुरीने घ्या , जीव असेल तर वाट्टेल ते करू
पण जीव देवून रणांगण सोडून पळणारे आपण नाही आहोत याचा तरी विचार करा !
आत्महत्या करणे म्हणजे
जातीला व आपल्या इतिहासाला कलंक लावणे होय!
ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाने कित्येकांना पोसले   , कित्येकांचे संरक्षण केले , कित्येकाचे प्राण वाचवले , छातीची ढाल केली, परकीय आक्रमकांचा बंदोबस्त केला,  कित्येकांना आधार दिला ,
हा इतिहास विसरू नका !
आजही गावागावात सर्व जातीपातीची  जनता आपल्या बरोबर असते , एकमेकांच्या ताटात आपण जेवतो, एकमेकांची विचारपूस करतो , घासातील घास खातो  हेही विसरू नका !
प्रत्येक समाजात १ ,  २%नासके असतात ते आपल्यात सुद्धा आहेत म्हणून इतर जाती धर्मातील,  बांधवांना नावे ठेवू नका , खालच्या पातळीवर जावून टीका सुद्धा करू नका ,
आपला संघर्ष हा राजकीय नेते , सत्ताधारी पक्ष  यांचे बरोबर आहे ,
मग सत्तेवर कोणताही पक्ष असो त्या पक्षांकडून न्याय नाही मिळाला तर लढत राहू ! 
आपला संघर्ष हा न्याय हक्कासाठी आहे हे ध्यानात ठेवा !
आपले , ब्राह्मण, दलित,ओबीसी ,  मुस्लिम, आदिवासी हे  शत्रू नाहीत तेही आपले बांधवच  आहेत, कदाचित तुम्हाला हे पटणार नाही पण मराठा व आठरापगड जाती बारा बलुतेदार यांचे नाते शिवकाळापासून आहे किंबहुना त्याचाच आपणही एक भाग आहोत,
स्वतःला कुणीही उच्चकुलीन समजू नये व कुणालाही दुय्यम हलके समजू नये !
गावातील, किरकोळ वाद, किरकोळ तंटे गावात सोडवायची परंपरा जपा, एखादा दुसरा नालायक वागला म्हणून समाजातील सर्वांनाच धडा शिकवायची भाषा बरोबर नाही , तुम्ही कधी आक्रमक तर कधी संयमाने परिस्थिती हाताळली तर  नक्कीच तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही .
काही नालायक राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांनी  राजकारणासाठी दुसऱ्या जाती धर्माची टिंगलटवाळी करणे चालू करून तुमची माती भडकवून स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करणे चालू केले आहे !
मराठा समाजाविषयी , ओबीसी , दलित, मुस्लिम, आदिवासी बांधवांच्या मनात संभ्रम निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा डाव टाकला आहे तो डाव
सक्सेस होवू देवू नका, तो डाव उधळून लावा  ,
आपल्यातील काहींना फोडून दोन समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो हाणून पाडा !
माझ्या धारधार  लिखाणामुळे मलाही त्रास होतो पण मि कुणाला घाबरत नाही कारण लढणे हाच पिंड आपला आहे,
वाट्टेल त्या प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवून
लेखनीच्या माध्यमातून काहीतरी प्रबोधन करायचे, सेवा करायची हाच मि विढा उचललेला आहे . .
काहीही केले तरी कुणी  चांगले म्हणते , कुणी वाईट म्हणते पण
आपले काम आपण करत रहायचे , प्रत्येकास
कामाच्या व्यापातून वेळ देता येतो असेही नाही
मात्र,
दिवसभराची कामे संपल्यावर किमान तुमच्या माझ्या भल्यासाठी लिहतो कदाचित माझ्या लेखणीतून काही चुका होत असतील, त्रुटी रहात असतील पण
हा प्रबोधनाचा वसा घेतलेला आहे ,
बांधवांनो काहीही होवूद्या पण आत्महत्या करू नका !
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय हिंद जय महाराष्ट्र!