vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

आर्थिक मंदीचे दुष्परिणाम!

चालू घडामोडींचे विश्लेषण
आर्थिक मंदीचा छोटासा आढावा . . . . !
आर्थिक मंदी . . . ! 
आज संबंध देशातील प्रत्येक उद्योगधंद्यामधून रोज आर्थिक मंदीची  बातमी येत आहे ....मंदीमुळे इतके कामगार काढले , अमुक तमूक उद्योगपतीचे दिवाळे निघाले . . या कंपनीचे शेअर गडगडले , त्या कंपनीला टाळे लागले. 
पण हे घडतय का ? नेमका प्रॉब्लेम काय? 
इतके तज्ज्ञ असताना , भारताची अर्थव्यवस्था मजबूत असताना हे का घडतंय? 
या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा माझा छोटासा  प्रयत्न, उत्पादीत मालाला उठाव नसणे व बाजारपेठेत मागणी घटने म्हणजे मंदीची सुरूवात होणे पण मागणी अचानक घटत नाही . . .  *लोकांची खरेदी  क्षमता हळूहळू  कमी होत जाते  किंवा याचाच दुसरा अर्थ लोकांचे उत्पन्न नैसर्गिक आपत्ती , सरकारी धोरणे , देशातील  परकीय गुंतवणूक काढून घेतली जाणे , लोकांच्या हाताला काम नसने , नवीन रोजगाराची संधी कमी होत जाणे ,  परदेशात आपल्या मालाची निर्यात कमी होणे , जागतिक स्पर्धेत आपला निभाव न लागणे , वाढती लोकसंख्या  , स्पर्धेत टिकू न शकल्याने  लघू व कुटीर  उद्योगधंदे बंद पडणे  व  शेतातील तोट्यामुळे  ग्रामीण भागात पैसा नसणे ,   याचा परिणाम म्हणून,  ऐकून लोकसंख्ये पैकी ८० लोकांचे विविध कारणांनी उत्पन्न व क्रयशक्ती   घटली  की  , लोक (जनता) मार्केट (बाजारपेठत) मध्ये कमीतकमी खर्च करायला सुरूवात करतात, नवीन गाड्या , नवीन कार व लोकांकडून  छोटीमोठी वहाणे खरेदी बंद केली जाते ,  नवीन घर बांधनी, नवीन गुंतवणूक, लोक नवीन खरेदी  हे प्लॅन पुढे ढकलतात, कारण त्यांना भविष्यात  खिशात पैसा येईल कि नाही याची काळजी व चिंता लागून राहिलेली असते , त्यामुळे सहाजिकच   लोकांच्या खिशात भांडवल कमी होत गेले तर त्याचा फटका  व्यापार औद्योगिक क्षेत्र  आणि बांधकाम क्षेत्राला प्रथमता बसत असतो .
बसणारा फटका कधीकधी पतधोरण, जागतिक उत्पन्न व जागतिक डिमांड यावरही अवलंबून असतो . . 
व्यवसायातील मंदी हटायची असेल तर देशातील शेतीसह सर्वच उत्पादीत मालाची निर्यात होणे व रोजगार निर्माण होणेही  तितकेच गरजेचे असते . . 
त्यासाठी सरकारला उचित पावले उचलून  शेती व उद्योगधंदे यांना काही सवलती व अनुदानेही देऊन हातभार लावावा लागतो . . त्यातून संबंधित वर्गाची शक्ति वाढली की रोजगार निर्मिती होते , रोजगार निर्मिती झाली की, लोकांच्या हातात पैसा खेळतो व तोच पैसा परत मार्केटमध्ये उपलब्ध होऊन, उद्योगधंदे व व्यापार पूर्ववत सुरू होतात. . . 
पण त्यासाठी आपली निर्यात वाढून,  आपल्याकडे परकीय गंगाजळी वाढली पाहिजे . . 
मंदी हाटवत असताना थोडीफार महागाई वाढण्याचीही शक्यता असते . . . 
मंदी हटवण्याचा आपल्या देशासाठी तरी  सर्वात चांगला उपाय म्हणजे जास्तीत जास्त शेतात गुंतवणूक वाढून,  शेतातून रोजगार निर्माण करणे ,  लघू व कुटीर उद्योगातून युवक व युवतींच्या  हाताला काम देणे व सामान्य लोकांच्या हातात पैसा कसा जाईल याचा विचार करणे होय! 
तरच मंदी हटू शकते 
विजय पिसाळ नातेपुते . .

सोमवार, २९ जुलै, २०१९

नव नेतृत्वाचा उदय !

चालू घडामोडींचे विश्लेषण
पुर्णपणे लेख वाचा , पटला तर शेअर करा . . चालू घडामोडींचे विश्लेषण केले आहे . . कोणत्याही एका पक्षावर टिका नाही . . . पण भारतीय लोकशाहीतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे . . . . 
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९

नव नेतृत्वाचा उदय. . . व सत्ता 
परिवर्तन हा तर  निसर्गाचा नियम. . . . . . . . 
काळ बदलतो तशीच सत्तेवरील माणसेही बदलत असतात. . . 
जगातील प्रत्येक देशात बदल सहजासहजी  स्वीकारले जातात व देशाच्या नेतृत्वाची सुत्रे कुणाच्या तोंडातही नसलेल्या नावाच्या व्यक्तींच्या हाती आनंदाने सोपवली जाते .  
आपल्याकडे बदल तातडीने स्वीकायची लोकांची मानसिकताच नसते . . 
नुसती व्यक्तीपुजा करत बसल्याने व नव नेतृत्वावर सहजासहजी विश्वासच  बसत नसल्याने आपले लोक ५०, ६०  ते ७० वर्ष एका एका व्यक्तीच्या , एका एका घराच्या  प्रेमात पडतात यातील दोन पाच टक्के लोक प्रतिनिधी व घराणी  ही  सक्षम व कर्तृत्ववान असतात ते निवडून आले तर दुःख वाटत नाही पण काही लोक प्रतिनिधी जेंव्हा , जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, सत्तेचा , पदाचा व भ्रष्टाचारातुन मिळवलेल्या पैशाचा बेसुमार वापर करून परत परत सत्तेवर येतात आणि राज्य करतात तेंव्हा मात्र भारतीय लोकांची  मानसिकता आणि लोकांचं अशा लोकांना मिळणारं समर्थन पाहून वाईट वाटतं . . . 
अमेरीकेत कित्येक चांगले कर्तबगार  राष्ट्राध्यक्ष होऊन गेले तरी त्यांची नावे  वारंवार तिथले  लोक घेताना दिसत नाहीत आणि आमच्याकडे मात्र वर्षानुवर्ष काही ठराविक लोकांच्या भवती राजकारण फिरताना दिसते . . . . . 
जुन्यांनी जरूर  चांगला कारभार केला असेल काही चांगले निर्णय घेतले असतील काही आदर्श घालूनही दिले असतील पण याचा अर्थ असा होत नाही की नवीन येणारे सगळे अकार्यक्षम असतील. कदाचित जुन्या लोकांपेक्षाही चांगले काम करू शकतील . . . संधी मिळाली तर असंख्य नवे तरूण सुद्धा जोमाने व नेटाने काम करु शकतात. 
संधी ही नेतृत्वगुण व कार्यक्षमता पाहून मिळायला हवी,  अगदी एखादी व्यक्ती मोठ्या घरातील आहे व तिच्यात जर क्षमता असेल तर त्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळायलाच हवी पण इथल्या लोकांची मानसिकताच इतकी विचित्र आहे की , आजोबा , वडील, नातु , पंतू , अजून, शी सुद्धा धुवायला न येणारी पोरं,  अशांना इथले लोक डोक्यावर घेतात. . आणि मग चालू होते , बॅनरबाजी व पोस्टरबाजीकरून, एखाद्या  इव्हेंट कंपनीच्या मार्फत  उमलते नेतृत्व, भावी नेतृत्व, सक्षम नेतृत्व, भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री  अशा उपाध्या देऊन गुणगान गाऊन लोकांवर ही मंडळी लादली जातात व लोकही यांना स्वीकारतात. . . किरकोळ पैसा व तुकड्या साठी पाया पडायला   मोकळेच असतात लोक. . . 
आणि मग 
मिसरूड फुटायच्या आत, रेव्ह पार्ट्या करणारे , पबमध्ये विदेशी ब्रँड रिचवणारे , ललनांसोबत नाचणारे मोठ मोठ्या निवडणूकीला उभे केले जातात, अजोबाच्या व वडीलांच्या पुण्याईवर काही पेंग्गवीन मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहतात व सत्तेसाठी काही दळभद्री लोक त्याच समर्थन करतांना दिसतात. . . 
काही निर्लज्ज तिकिटासाठी चप्पल उचलतात तर काही पाया पडतात. . आणि वरूण स्वाभिमानी नेतृत्व असी बिरूद मिरवतात. . .
नेतृत्व चुकत असेल तरीदेखील ब्र शब्द काढलाच जात नाही काही लोकप्रतीनिधी कडून, केवळ तिकिटासाठी व सत्तेसाठी लाचारी पत्करली जाते इथे ,  पण इथली  जनता 
सत्तेचा माज आणि सत्तेची गणिते  झटपट बदलत असते  जनतेला चिरकाल गृहीत धरून जर कोणी हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करत नाही . . . 
सत्ता ही कधीच एका ठिकाणी चिरकाल राहात नाही . . . 60 वर्ष काँग्रेस सत्तेवर होती , पण काँग्रेसने स्वतःला बदलले नाही , तेच ते चेहरे तिच ति निष्क्रिय   घराणेशाही, जरूर यातील  काही घराणी निश्चितपणे चांगली होती, जनसेवक होती पण कित्येक घराणी ही सत्ता आणि पक्षाची लोकप्रियता व पैसा यावरच पोसली गेली होती , त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवच राहिलेली नव्हती त्यामुळेच तिथल्या स्थानिक  लोकांनी परिवर्तन करून  नव नेतृत्वाच्या हातात सत्तेची चावी  सोपवली, पण काँग्रेसने त्या ठिकाणी त्यावेळी नेतृत्व बदलले नाही . . व ही वेळ आली . . 
आज भाजपाचा उत्कर्षाचा  काळ आहे . . भाजपा सुद्धा काँग्रेसच्या मार्गानेच जाताना दिसतोय. . .  कित्येक घरात असंख्य पदे व नेत्यांच्या मुलांनाच वारसा हक्काने तिकिटे वाटत सुटलाय! 
ठरावीक चांगल्या लोकांना पक्ष  प्रवेश दिले तर ठिक आहे पण  इथे तर सगळ्यांनाच पवित्र करून घेतले जात आहे . . . जणू गंगेत डुबकी मारावी व पवित्र व्हावे तसे !  कशासाठी तर विरोधक संपवण्यासाठी आणि सत्ता चिरकाल राहण्यासाठी ? पण जनतेला थोडेच हे पसंत पडेल! 
आतातर सरकार चालवतानाही . . . 
फुकटच्या सवयी लोकांना लावल्या जात आहेत. . यात, उद्योगपतींनाही खिरापती दिल्या जात आहेत. . . 
अनुदाने खिरापती प्रमाणे वाटली जात आहेत. . . 
जनतेला फुकटचे काहीच नको असते . . . 
फक्त पायाभूत सुविधा आणि साधनांची उपलब्धता  हवी असते . . 
उद्योजकांना , जशी जागा, रस्ते ,  पाणी , बाजारपेठ,व  सुरक्षितता हवी तसेच, युवकांना रोजगार, शेतकर्यांना   शेततळी , योग्य  बाजारभाव व बाजापेठा, व काही पिकांसाठी  हमीभाव आणि  पुर्ण दाबाने विजेचे गरज असते . . ..क्वचित प्रसंगी दुष्काळ, नापिकी , यात विमा आणि सरकारी मदत आवश्यक असते . . . कोरडवाहू शेतकर्यांना मदत केली तर वाईट वाटायचे कारन नाही पण इथे तर करोडोंची कमाई करणार्‍यांनाही अनुदान स्वरूपात  पैसे दिले जात आहेत! 
मजूरांनाही हाताला काम व त्याचा योग्य मोबदला पाहिजे असतो . . . 
शिक्षणासाठी भरघोस तरतूद हवी असते . 
इथे मात्र काँग्रेस सारखेच  विविध अनुदाने , खात्यात पैसे टाकने चालू आहे  ही गोष्ट टॅक्स भरणार्या  सामान्य लोकांना  न पटणारी आहे . . . कारण सामान्य जनताच टॅक्स भरत असते म्हणून देश चालतो . . 
आज भाजपातही घराणेशाहीचा सुळसुळाट आहे . . . कित्येक अशी उदाहरणे आहेत की , वारसा हक्काने पदांचे वाटप चालू आहे . . . 
जनता कोणत्याही नेत्याला व पक्षाला फार काळ सहन करत नसते . . . 
दिल्ली हे त्याचं बोलकं उदाहरण आहे . . लोकांनी दोघांनाही नाकारून तिसरा पर्याय दिला . . . 
आंध्रातही लोकांनी जुन्या पक्षांचे हाल केले . ..व तिसरा पर्याय दिला व जुन्यांना  त्यांनी  बेदखल केले . . . 
आज काँग्रेस विचारसरणीचे लोकांना वाईट वाटत असेल पण काँग्रेसनेही एका घरासाठी , त्या घराला आव्हान देणारे एक एक जनाधार असलेले  नेते  बाजूला केले व आपोआपच  काँग्रेसची अवस्था वाईट झाली , भाजपातही तेच चालू आहे , मोदी शहां व फडणवीस यांचेसाठी जोशी , अडवाणी , सिन्हा , राजनाथ, सुषमाजी  , खडसे, तावडे, मुनगंटीवार,  यातील कुणाला दुय्यम स्थान दिले तर कुणाला  बाजूला केले गेले . . जेंव्हा सत्ता जाते तेंव्हाच कळते  आपण काय चुक केली ति ! 
सत्तेत असतांना  सत्तेचा वापर करून आपल्याच सहकार्यांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न केला तर, सत्ता जाताच सगळे  पत्ते उलटे पडतात व सगळ्या  हिशेबाची परतफेड केली जाते , नुसती परतफेडकेली जाते असे नव्हे तर ति सव्याज केली जाते . . . 
त्याचाच अनुभव अजितदादा आज  घेत असावेत. . . 
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . . हा सर्वांनाच लागू होतो . . . 
त्यामुळे सत्तेच्या नसेत कुणीच वावरून उपयोग नसतो . . . 
अजून पाच दहा वर्षात पुढे काय होईल हे छातीठोकपणे कुणीच सांगू शकत नाही . . . 
फक्त बदलांना सामोरे जाण्याची व चांगल्या लोकांच्या मागे उभे रहायची तयारी ठेवायला हवी . . . 
तरूणांनी नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे पुढे आले पाहिजे . . . राहुल गांधी राजीनामा देण्यासाठी सहजासहजी तयार झाले नाहीत तर लोकांनीच तसा मेसेज दिलाय. .  तुम्ही सुधरा नाहीतर तुम्हाला संधी नाही ! 
तसीच परिस्थिती येणाऱ्या काळात सर्वच पक्षांची असणार आहे . . . 
विजय पिसाळ नातेपुते ! ९४२३६१३४९

रविवार, ३० जून, २०१९

कवीता . . स्वप्न. . .





स्वप्न हे स्वप्न असते !
फक्त गोड गोड झोपेतच पडत असते !
वार्‍याची झुळुक यावी तशी भेट झाली तुझी क्षणभर!
परत हळुहळू कमेकांची गोड मैत्री  झाली फोनवर!
खूप छान  मैत्रीचे नाते झाले  आपले  खरोखर!
एकमेकांचे स्वभाव, एकमेकांना आवडू लागले , मैत्री रुजली खोलवर !
 अशात एक  स्वप्न पडले रात्री , दचकलो ग मि क्षणभर!
तु सहज बोलली जायचं का फिरायला दुरवर!
नकार देऊच शकत नव्हतो , तुझा भरोसा आणि विश्वास फक्त  माझ्यावर!
आनंदाच्या भरात,दिसू लागले नयनरम्य जग समोर!
हवेत झेपाऊ लागले विमान उंच उंच  वरवर!
तसे माझे आणि तुझे पाय कापू लागले थरथर!
आकाश आणि पृथ्वी यांच्या मध्ये फक्त होता  हवेचाच थर!
साक्षात निर्वार्त पोकळीतून प्रवास किती किती छान आणि  सहज सुंदर!
बघता बघता पोहचलो   आपण मलेशिया,  सिंगापूर इतक्या दुरवर !
आनंदाने नाचत होतो , केवळ झोपेतील पहाटेच्या स्वप्नावर !
मस्तपैकी टॅक्सीने गेलो  हॉटेलवर!
हॉटेल अगदी मस्तपैकी होते बीचवर!
पाहतो तर काय छानपैकी निळा निळा  समुद्राचा किनारा !
हॉटेलच्या परिसरात हिरवा हिरवा   बागबगीच्या सारा !
किती सुंदर होती बाग, त्यातून चालत होतो दोघेच भरभर!
हिरवळ सगळीकडे पसरलेली ,पण लक्ष फक्त गोड गुलाबाच्या  कळीवर!
स्वर्ग अजून काय असतो , वाटायचं इथेच रहावं जन्मभर!
मस्तपैकी खेळावं हिरव्यागार गालिच्यावर!
ताव मारावा छानपैकी गरमागरम जेवणावर!
नाचावं थोडंसं रिमिक्स गाण्याच्या तालावर!
सिनेमाला जावं , रोमँटिक व्हावं,  सगळं कसं आपल्याच मनावर!
अचानक जागी आली , एकटाच डोळे चोळत बसलो होतो बेडवर!
पण मनापासून वाटलं
 असचं  फिराव आणि आनंदी रहावं इतके स्वप्न माझे सुंदर!
स्वप्न इतकं गोड आणि  सुंदर होतं , विसरु गेलतो मि मलाच मि क्षणभर!
कवी . . . विजय पिसाळ नातेपुते . .

रविवार, १६ जून, २०१९

बाळासाहेबांच्या नंतर, मा श्री राजसाहेब संपुर्ण हिंदू धर्माला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे . संपुर्ण हिंदू एकत्रित करायची ताकद फक्त तुमच्याकडेच आहे.

चालू घडामोडींचे विश्लेषण


प्रती . . . 
आदरणीय, मा. श्री . राजसाहेब ठाकरे . . . . . 

विषय. .
प्रखर राष्ट्रवाद व हिंदुत्वाची कणखर भूमिका घेणे बाबत. . . . 

महोदय. . . . . . 

कारणे विनंती पत्रास कारण की ,  
आपण राजकारणातील अभ्यासू व व्हीजन असलेले नेतृत्व आहात. तुमच्या कडे आम्ही आदरणीय बाळासाहेब यांच्या नजरेतूनच  पाहतो. तुमचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि लोकांप्रति तुमची असलेली  बांधिलकी क्षणोक्षणी जाणवते .   विकासाठी  असणारी तुमची  तळमळ  सातत्याने दिसून येते  . . . 
तुमचे सर्व पक्षात चांगले मित्र आहेत व  संबंध आहेत या बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. . . 
पण 
मुळातच तुमची संपुर्ण जडणघडण ही बाळासाहेबांच्या छत्रछायेखाली व हिंदुत्ववादी विचारसरणीत झाली आहे . . तुमचा संपुर्ण चाहतावर्ग व मतदारही हिंदुत्वाला मानणारा आहे. 
पण सध्या  तुम्ही हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विचारसरणी कडे झुकू लागल्याने तुमचा चाहता वर्ग अस्वस्थ होत असून तो हळुहळू  घटत आहे . खरेतर  तुमच्यावर आजही लाखो हिंदू व  मराठी जनता व जुने शिवसैनिक मनापासून प्रेम करतात. पण तुम्ही राष्ट्रवादी व काँग्रेसला पुरक भूमिका घेतल्याने तुमचे हक्काचे  असंख्य लोक  तुमच्यापासून दुर जात आहेत. . . 
मुळातच तुमचा पिंड कडवट हिंदुत्ववादी व सच्चा राष्ट्रप्रेमी असाच आहे ..प्रथम तुम्ही हिंदुत्वादी असल्याने , भाषावाद , प्रांतवाद  हे प्रादेशिक व हिंदू -हिंदू मध्ये एकमेकात फुट  पाडणारे  मुद्दे सोडून, प्रखर राष्ट्रवाद आणि कट्टर हिंदुत्ववादी विचार  घेऊनच  मैदानात उभे ठाकले पाहिजे . . . 
समान नागरी कायदा . .
यासाठी तुम्ही कठोर भूमिका घेतली पाहिजे . 
देशद्रोही व पाकिस्तान धार्जिण्या  विरूद्ध तुमचा आवाज घुमला पाहिजे  व सर्व  हिंदू  एक व्हावेत यासाठी तुमचे योगदान असायला पाहिजे ही तमाम भारत देशातील लोकांची इच्छा आहे . कारण भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी व बेगडी आहे . . 
त्यासाठीच  आदरणीय राज ठाकरे साहेब येणार्‍या निवडणूका तुम्ही  राष्ट्रवाद व हिंदुत्व याच मुद्यावर लढवल्या पाहिजेत. . 
महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण देशाला व हिंदू समाजाला   तुमची गरज आहे . 
शिवसेनेच्या विरुद्ध जास्त उमेदवार उभे न करता , भाजपारुपी ढोंगी हिंदुत्व धारण करून सत्ता गिळंकृत करणार्‍या  अजगराच्या व काँग्रेस राष्ट्रवादीच्या  विरूद्धच तुम्ही लढले पाहिजे . . . म्हणजे शिवसैनिक सुद्धा जिथे शिवसेनाचा उमेदवार नाही तिथे तुम्हाला साथ देईल. . 
मुळातच तुम्हाला संपुर्ण हिंदूचा पाठिंबा आहे व यापुढेही  राहिल फक्त काँग्रेसच्या सुरात सुर मिळवला तर मात्र तुमचा मतदार हा भाजपाकडे जाणार तसेच  तुम्हाला काँग्रेस व राष्ट्रवादीचा मतदारही कधीच मतदान करणार नाही . . . 
परिणामी निवडणूकीत यश कमी मिळेल. . . 
आंध्र प्रदेशात ज्या पद्धतीने वाय एस आर काँग्रेस स्वतःच्या ताकदीने पुढे आली त्या प्रमाणेच मनसे पुढे येऊ शकते . . . 
फक्त हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवाद आणि समान नागरी कायदा या जोरावर. . 
मुळात तुमचा करिश्मा जबरदस्त आहे व तो  कधीच कमी होणार नाही , 
तुम्हाला जर परत एकदा तुमचा जुना करिश्मा दाखवून द्यायचा असेल, सत्तेवर यायचे असेल तर कट्टर  हिंदुत्वा शिवाय तरणोपाय नाही , भाषा वाद व प्रांतवाद शक्यतो करू नका सगळ्या देशातील, प्रत्येक राज्यातील हिंदू साठी काम करा  असे  जनतेचे मत आहे . . 
देशद्रोही , गद्दारांना तुम्हीच धडा शिकवू शकता . . . 
पवार साहेब, असोत कि, राहूल गांधी असोत यांच्या बद्दल आदर असला तरीदेखील त्यांची सेक्युलर विचारसरणी इथल्या जनतेला विशेषतः तरूणांना   मान्य नाही . . 
ते त्यांच्या जागी कसे का असेनात पण  तुम्ही बाळासाहेबांचे खरे वारसदार आहात व तुम्हाला संपुर्ण हिंदू समाज मानतो म्हणून तुम्ही हिंदुत्व घेऊन लढाई लढली पाहिजे . . . 
शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार शक्यतो  जर कमी दिले व भाजपा विरूद्ध जास्तीत जास्त उमेदवार उभे केले तर सहाजिकच सगळे शिवसैनिक तुमचा छुपा प्रचार करतील व भाजपाच्या उमेदवारवाराला मतदान करण्या ऐवजी तुमच्या मागे येतील कारण तुम्हाला जनता बाळासाहेब म्हणून पहाते. . 
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नादी लागू नका संपुर्ण महाराष्ट्रात तुम्ही जिंकाल अशा कट्टर  हिंदुत्ववादी विचारसरणी असणार्‍या मतदारसंघात ताकदीने  उतरा व कडवट हिंदुत्व जपा हीच मनोमन इच्छा ! 
हिंदुत्वावाला विकासाची जोड द्या . . विकासाच्या बाबतीत तुम्ही जिथे जिथे काम केले तिथे तिथे विकास दिसून आला आहे . 
महाराष्ट्रात शिवसेना कमी होऊन आपल्याला स्पेस मिळणार नाही तर भाजपा कमी होऊन आपल्याला स्पेस मिळेल असे मला वाटते . . . 
एक राज्य शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला जे वाटते ते तुम्हाला कळवावे वाटले ते  कळवले तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी अपेक्षा . . . . 

विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

शनिवार, १५ जून, २०१९

सपोनि. मा श्री राजकुमार भुजबळ साहेबांच्या नातेपुतेहुन बदली निमित्ताने . .

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते पोलिस स्टेशचे . . लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आणि सर्वच नातेपुतेकरांच्या आठवणीत सदैव राहतील असे  *सपोनि. मा . श्री राजकुमार भुजबळ साहेब. .*
जवळपास  दोन वर्ष नातेपुते  गावात पोलिस स्टेशनला भुजबळ साहेब  कार्यरत होते . .
सर्वांशी मिळून मिसळून वागणे, सर्व तक्रारींचे निराकरण करणे , सर्व आंदोलने व्यवस्थित हाताळने व तसेच  आपली जबाबदारीही कठोरपणे  पार पाडणे यामुळे ते जनतेत लोकप्रिय झालेच तसेच,  गुन्हेगारी प्रवृत्तीना त्यांनी लगामही घातला . .
नातेपुते गावातील एक नागरीक म्हणून जेंव्हा जेंव्हा साहेबांचा संबध आला तेंव्हा तेंव्हा साहेबांनी मनमोकळेपणे चर्चा केली आदरपूर्वक बोलणे झाले ,   तसेच चहापान सुद्धा केले . व्यक्तिगत जिव्हाळा कसा जपावा व नोकरीत, कर्तव्यात कठोर कसे असावे याचे उदाहरण म्हणजे भुजबळ साहेब.
 एक आदर्श अधिकारी कसा असावा तर तो भुजबळ साहेबां सारखा असावा हेच मनापासून वाटते . . .
लोक वर्गणीतून
गावात सीसीटीव्ही लावण्याचा व त्यातून  गावाला एकप्रकारे शिस्त लावण्याचा जो महत्वाचा निर्णय असेल तो संबध महाराष्ट्राला नक्कीच पथदर्शी ठरणार आहे , साहेबांनी नेहमीच  शांतता व सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन याला प्राधान्य दिले . . गणेशोत्सव, पैगंबर जयंती , शिवजयंती , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती  यामध्ये चोख बंदोबस्त लावून गाव तणावमुक्त ठेवायचे काम साहेबांनी केले ,  सामाजिक सलोखा राहण्यासाठी  व राजकीय संघर्ष होणार नाहीत यासाठी  लोकजागृती असेल हे अगदी  मनापासून साहेबांनी केले , गावातील, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार, व्यापारी यांनाही सदैव  मान दिला . .   अनावश्यक फ्लेक्स लागणार नाहीत याची काळजी घेतली  व  गुन्हेगारांचाही व्यवस्थित बंदोबस्त केला . यामुळे व्यापारी , छोटे व्यवसायिक यांनाही मनापासून समाधान वाटत होते . .
सीसीटीव्हीमुळे छोट्यामोठ्या चोर्या थांबल्या , गाड्यातील पेट्रोल चोरी व्हायचे बंद झाले . .
गावातील, टपरीधारक, पानपट्टी धारक, छोटे छोटे व्यवसायिक यांचे नुकसान होऊ नये म्हणून साहेबांचा सदैव  प्रयत्न होता . .  गाव सुरळीतपणे चालावे यासाठी तळमळ त्यांचे बोलण्यातून जाणवायची ,जवळपास भुजबळ साहेबांचे  सर्व कामकाज   कौतुकास्पद  होते ,
साहेब कुठेही नोकरी निमित्ताने गेला तरी आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर राहतीलच व त्याचबरोबर तुम्ही आमच्या कायम  स्मरणात रहाल. . .
साहेब तुम्हाला  पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
विजय पिसाळ नातेपुते !
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

बुधवार, १२ जून, २०१९

मा. उपमुख्यमंत्री मा. श्री . विजयसिंह मोहिते -पाटील तथा दादासाहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! कवितेतून. . . विजय पिसाळ नातेपुते

चालू घडामोडींचे विश्लेषण


विजयसिंहदादा म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तीमत्व,  सदैव  बहारदार! 
जनकल्याणासाठी आयुष्य वेचले लोकनेते विजयसिंहदादा आमचे दिलदार! 
तहानलेल्या जनतेसाठी संघर्ष केला , सहकार महर्षीं प्रमाणेच मानली नाही कधी हार! 
किती जवळ आले -किती दुर गेले,  लढाई केली रणांगणात असंख्य पैलवानांना चितपट केले बारबार! 
कृष्णा भिमा स्थिरीकरण झाले पाहिजे म्हणून सत्तेवर पाणी सोडणारे दादासाहेब एकमेव होते खासदार! 
विजयसिंहदादांचे मनामनात रुजले आमच्या विचार! 
विजयसिंहदादांनी राजकारणात नेत्यांनी कसे वागावे याचे सर्वांनाच दिले संस्कार! 
माळशिरसच्या माळरानावर फुलवली शेती आणि सहकार! 
जनतेसाठीच राबली सत्ता आणि लोकांना दिला तुम्ही आधार! 
लोकांच्या हितासाठी प्रसंगी सत्तेचाही नाही केला कधीच विचार! 
जनसामान्यांच्या सुख दुःखात मिसळून हलका केला भार! 
धावपळीच्या जीवनात तब्येत सांभाळली , दिसता आजही तितकेच रुबाबदार! 
कारखाने, दुध संघ, मार्केट कमिटी ,शिक्षण संस्था  यातून फुलवले लाखो लोकांचे संसार!
विजयसिंहदादा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 

शुभेच्छुक. . विजय पिसाळ नातेपुते

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! आदरणीय मा . श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब

चालू घडामोडींचे विश्लेषण


कविता . . . वादळ. . . . . 

मा श्री विजयसिंह मोहिते- पाटील तथा  (दादासाहेब ). . . . . . . 

कवी. . विजय पिसाळ नातेपुते . . 

राजकारणात असतील कित्येक नेते , यापुढेही  येतील कित्येक नेते ,  पण  दादासाहेब म्हणजे  शांत संयमी वादळ! 

आजवर दादासाहेब तुम्ही जपली जनता , केला विकास जनतेचा , कार्यकर्त्यांना  दिले सदैव पाठबळ! 

प्रवास प्रदीर्घ राजकारणाचा , जनतेसाठीच वापर केला सत्तेचा  आणि  ध्यास फक्त विकासाचा , मंत्र जपला समाजकारणाचा , हजारो , लाखो लोकांना दिला  रोजगार आणि जगण्याचे  बळ! 

राजकारणात आले चांगले आणि वाईट प्रसंग, स्तब्धपणे उभे राहून जनतेची तुटू दिली नाही नाळ! 
जनसागराच्या आपुलकीने परतवून लावला तुम्हीच मधला कटू काळ! 

जिंकून कधी मातला नाही , हरला एकदा म्हणून खचला नाही , 
घेतला गुलाल आणि विजयाची माळ! 

जनतेसाठी सदैव दिला तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ! 

जनतेनेही  प्रेमरुपी दिले तुम्हाला लढण्याचे बळ! 


जाणले दुःख जनतेचे , अश्रू पुसले गोरगरीबांचे, सत्ता असो किंवा नसो दादासाहेब तुम्ही रमला  जनतेत पुर्णवेळ! 

गल्ली पासून दिल्ली पर्यंत जपली हजारो माणसे आणि निर्माण केली मनामनात आपुलकी,  आपोआप कार्यकर्त्यांचे तयार झाले मोहोळ!

दिले वचन कधी मोडले नाही , वार्यावर लोकांना कधी सोडले नाही ,  सत्तेवर असताना कुणालाच नडले नाहीत , म्हणून दादासाहेबांच्या शब्दात आहे बळ!

देशाच्या राजकारणात मोजक्‍या लोकांच्या  आदर्श पंक्तीत  दादासाहेब तुमचे नाव! 

जनतेच्या ह्रदयातील तर  तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा समतो आपलेपणाचा भाव! 

दादासाहेब प्रदीर्घ काळ  नेतृत्व तुमचे लाभले आम्हाला ! 

 आई तुळजाभवानी  प्रार्थना तुझ्या चरणाला,   एकच मागणं  शतकापार आयुष्य लाभो आमच्या  लाडक्या दादासाहेबांच्या दिलदार नेतृत्वाला  ! 

दादासाहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! 

श्री विजय पिसाळ नातेपुते
9665936949
9423613449

मंगळवार, ४ जून, २०१९

लोकशाही साठी हे करायलाच पाहिजे, असे एक भारतीय नागरिक म्हणून माझे मत! यामुळे निवडणूक आयोग व लोकशाहीवरील विश्वास दृढ होईल व कुणालाही आरोप करायची संधीच मिळणार नाही !

चालू घडामोडींचे विश्लेषण
©®विजय पिसाळ नातेपुते . . . .
९४२३६१३४४९. . .
*यावर निवडणूक आयोगाने व न्यायालयाने व राजकीय पक्ष आणि लोकशाही साठी झटणाऱ्या लोकांनी जरूर विचार करावा . ..*

*मतदानासाठी अशी एक आधुनिक  प्रिंटिंग  मशिन  तयार करावी की, ति मशिन फक्त आणि फक्त  डिजिटल प्रिंटिंग मशिन हवी , त्या मशिनवर  सर्व उमेदवारांची चिन्ह व नावे  असावीत व त्या चिन्हा समोरील बटन दाबताच. . .*
*ज्याला मतदाराने मतदान केले आहे,त्या उमेदवाराचे नाव व चिन्ह प्रिंटिंग होईल व प्रिंटिंग झालेली स्लिप बॉक्स मध्ये पडेल व ज्याला मत दिले आहे त्यालाच मत गेले आहे हे स्लिप बॉक्स मध्ये पडायच्या अगोदर संबधित मतदाराला  प्रिंटिंग झालेले मत व्यवस्थित दिसेल*
  व
*मतमोजणी वेळी अशा स्लिपा  झटपट व  कितीही वेळा मोजण्यासाठी जसे नोटा मोजायला मशिन असते तसे मशिन विकसित करून स्लिपा मोजून संबधित निकाल जाहीर करावा . . .*
*म्हणजे जुन्या बॅलेट पेपर ऐवजी डिजिटल प्रिंटरच्या साह्याने मतदान व आधुनिक मशीन विकसित करून मतमोजणी*
 *ज्या प्रमाणे  करोडो रुपये झटपट मोजले जातात तसे वोटींग मोजायला मशिन तयार केले तर बिघडले कुठे?*
 *आणि हो  वोटींगच्या  स्लिपा मोजणारे  एखादे मशिन बिघडले किंवा खराब झाले  तरीदेखील दुसरे मशिन उपलब्ध करता येईलच की व  कितीतरी वेळा मशिन  बिघडले तरीदेखील मशिन बदलून नोटा मोजता येतात,  तशाच पद्धतीने मतदान केलेल्या  स्लिपा मोजल्या तर निकाल झटपट लागेल व ईव्हीएम वरून चाललेली बोंबाबोंब बंद होईल!*
*यालाच आपण आधुनिक बॅलेट पेपरही म्हणू शकतो . . .*
*फक्त शिक्का मारायच्या ऐवजी दिलेले मत हे प्रिंटर च्या साह्याने प्रिंटिंग करणे व ति स्लिप बॉक्स मध्ये टाकणे इतकेच काम मशीनचे असावे . . .*
*ज्यांने मतदान केले त्याने बटन दाबताच त्याच उमेदवाराचे नाव व चिन्ह प्रिंट झालेले मतदाराला दिसले व ति स्लिप बॉक्स मध्ये पडली तर हा सगळा घोळ मिटील्या शिवाय राहणार नाही . . .*
*विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

मंगळवार, २८ मे, २०१९

मोदी तरी बहुमत मिळाल्याने ३७० कलम रद्द करतील का ? मोदीजी लोकांनी तुम्हाला दुसर्‍यांदा जबरदस्त बहुमत दिल्यामुळे काश्मीरचा प्रश्न निकाली निघेल का ? काश्मीर पुर्णपणे शांत होऊन तिथल्या लोकांना सुखाची झोप मिळेल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
काश्मीरचे गोड सौंदर्य वाचले पाहिजे व काश्मीर भारताच्या इतर राज्या प्रमाणेच एक राज्य असायला हवे ! म्हणून हा लेख. . . . 


*कलम ३७०*
रद्द करण्यासाठी मोदी सरकार पावले उचलेल का ? 

१९४७ साली ब्रिटिशांनी भारत सोडताना अखंड हिंदुस्थानचे तुकडे तुकडे केले , हिंदुस्थानची फाळणी होऊन तेंव्हा   भारत व  पाकिस्तान असे  मोठे देश निर्माण करतानाच ब्रिटीशांनी , काही ठिकाणी संस्थानिकांनाही स्वतंत्र राज्य व भूभाग दिले व त्यांनी कुठे सामील व्हावे किंवा स्वतंत्र रहावे हा निर्णय त्यांचेवर सोपवला उदा. हैद्राबाद, जम्मू काश्मीर, गोवा वगैरे . . . फाळणीच्या वेळी जम्मू काश्मीरच्या राजाने व संस्थानिकाने स्वतंत्र राहायचा म्हणजे भारत किंवा पाकिस्तान यांच्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, तिथला राजा जरी हिंदू होता तरी बहुसंख्य प्रजा ही मुस्लीम होती . . 
याचाच फायदा घेऊन जम्मू  काश्मीरवर पाकिस्तानने व पिश्तुन टोळ्यांनी  आक्रमण केले (तेंव्हा भारत व जम्मू काश्मीरला जोडणारा महामार्ग अस्तित्वात नव्हता हे बर्याच लोकांना माहिती नाही , नंतर तो नेहरूंनी बनवला !) डोंगरी रस्ते व पाऊलवाटा यानेच त्या खोर्यात खेचरावरून प्रवास करावा लागे . 
तिथला राजा हरिसिंग  पाकिस्तानी बंडखोरांचा व पाकिस्तान बंडखोरांच्या वेशातील  सैन्याचा प्रतिकार करू शकत नव्हता त्यांनी जम्मू काश्मीरवर अक्रमनाचा सपाटा लावला होता   व राजा हरिसिंगाचा जवळजवळ पराभव झालाच असता म्हणून त्याने पाकिस्तानी अतिक्रमण रोखण्यासाठी भारताकडे म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याकडे मदत मागितली तेंव्हा जम्मू काश्मीर हा स्वायत्त प्रदेश असल्याने व आपलाही डायरेक्ट अधिकार नसल्याने तिथल्या राजाला आपण डायरेक्ट मदत करू शकत नव्हतो . मात्र नेहरूंनी सरदार पटेल यांचे मार्फत  राजा हरीसिंह यांच्या पुढे भारतात जम्मू काश्मीर सामील करण्याची व त्या बदल्यात पाकिस्तानी आक्रमण परतवून लावण्याची अट ठेवली . . पण शेख अब्दुला व तेथील जनतेने व 
राजा हरिसिंगाने भारतात सामील होण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवल्या . . 
त्यात जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा, संरक्षणाची हमी , स्वतंत्र ध्वज व दुहेरी नागरिकत्व, व काही विशेष मौलिक अधिकार की ज्या अधिकारामुळे इतर राज्यातील  भारतीय नागरिक त्या ठिकाणी जमिन खरेदी करू शकत नाहीत, निवडणूक लढवू शकत नाहीत व राज्यसेवा मध्ये नौकरी करू शकत नाहीत.  त्याठिकाणच्या मुलाशी भारताच्या इतर भागातील मुलीने जरी लग्न केले तरीदेखील डायरेक्ट तिला अधिकार नसतो , जम्मू काश्मीरचा नागरीक संपुर्ण देशात प्रॉपर्टी घेऊ शकतो मात्र तिथल्या मुलींने भारताच्या कोणत्याही भागातील मुलांशी विवाह केला तरीदेखील तिच्या माहेरच्या प्रॉपर्टीत तिचा लग्ना नंतर हक्क राहात नाही  व मुलालाही हक्क मिळत नाही. ( पण २०११ ला कोर्टाने हा निर्णय बदलला आहे ) यांचा समावेश होता . व या सर्व अटी भारतीय राज्यघटना कलम ३७० मध्ये समाविष्ट करूनच त्याने भारतात सामील होण्याचे कबुल केले . . 
त्यावेळी भारत नुकताच स्वतंत्र झाला होता ताकद मर्यादित होती , आंतरराष्ट्रीय परिस्तिथी भारताला पाहिजे तेवढी अनुकूल नव्हती , ब्रिटन, फ्रान्स, अमेरीका अशी बलाढ्य राष्ट्र भारताच्या जवळ जवळ विरोधात होती म्हणून कोणत्याही परिस्थितीत जम्मू काश्मीर पाकिस्तानच्या घषात जाऊ नये म्हणून नेहरूंनी राजा हरिसिंग यांच्या अटी मान्य करून सामीलीकरणाच्या करारावर सरदार पटेल यांचे मार्फत  सह्या केल्या आणि ३७० कलम अस्तित्वात आले . . 
राजा आपल्या आश्रयाला येताच भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी आक्रमण परतवून  लावण्यासाठी प्रतिअक्रमण केले व भारत पाकिस्तानचे पहिले युद्ध सुरू झाले . त्यावेळी पाकिस्तानवर आपण विजय जरूर मिळवला , मात्र आपण युनोत गेलो व मध्यस्थिची मागणी केली मात्र  पाकिस्तानने युनोत तेथील जनतेचे सार्वमत घ्यावे व मगच  भारताचा जम्मू काश्मीर वरील हक्क मान्य करावा . आंतरराष्ट्रीय दबावामुळे आपण पाकिस्तानाचा  संपुर्ण पराभव करून सुद्धा ३३% काश्मीरचा भूभाग सोडवून घेता आला नाही . . कारण तेंव्हा युनोत भारताचा मुद्दा कोणीही ऐकून घेऊ शकत नव्हते . . कारण पाकिस्तान तेथील जनतेचे सार्वमत घ्या म्हणत होता व तेथील प्रजा मुस्लीम असल्याने भारताला सार्वमत घेऊन तेथील जनता भारतात सामील होईल याची खात्री नव्हती , म्हणून भारताने राजा हरिसिंग बरोबर झालेला करार समोर करून पाकिस्तानची जनतेच्या सार्वमताची मागणी फेटाळून किंवा सार्वमत घेण्यासाठी तेथील परिस्तिथी अनुकूल नाही असे सांगून सातत्याने टाळाटाळ केली . व ति मागणी सातत्याने फेटाळून  लावली . . पण त्यावेळी आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानच्या ताब्यात तो ३३़%भूभाग तसाच राहिला . . आणि त्याचे खापर मात्र विरोधकांनी कायमस्वरुपी नेहरूवर फोडायचे काम केले . . त्या त्या परिस्तिथीत नेहरूंना तेच करण्या शिवाय पर्याय नव्हता . . 
पण १९७१ नंतर हळुहळू  आता भारत मजबूत होत गेलाय परिस्तिथी पालटली आहे  याचा विचार करता . व आपल्याला ३७० रद्द केले तरीदेखील कुणीच काही करू शकत नाही अशी परिस्थिती असल्याने . . . हे शक्य आहे कारण, 
* देश आपला , राज्य    राज्य, सत्ता आपली , तिथे कब्जा  आपला  , मिलिटरी  आपली  , हे सर्व असताना कुणाला घाबरायची गरज नाही व तेंव्हाची आंतरराष्ट्रीय  परिस्तिथी बदलली असल्याने व भाजपाचे केंद्रात  मजबूत बहुमत असलेले सरकार सत्तेवर आल्यामुळे व महत्वाचे म्हणजे भाजपाचा तोच अजेंडा असल्याने  कलम  ३७० रद्द व्हावे व कायमचा हा प्रश्न निकालात निघावा ही जन भावना आहे . . 
अमेरीका जा प्रमाणे त्यांच्या देशाला जे आवश्यक वाटेल त्या प्रमाणे आंतरराष्ट्रीय दबावाला , आंतरराष्ट्रीय, न्यायालयाला भिक न घालता पाहिजे ते कठोर निर्णय घेते तसाच आता  ३७० कलम आपल्या देशाचा आंतर्गत प्रश्न आहे व त्यात कुणाचाही हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही हे जगाला ठणकावून सांगायची वेळ आली आहे व तेवढी नक्कीच ताकद भारताची आहे व त्यासाठी कणखर बहुमत सरकार जवळ आहे . व संसदेतही निर्णायक बहुमत असल्याने हा प्रश्न निकालात निघाला पाहिजे . . . 
काश्मीर ते कन्याकुमारी संपुर्ण देशातील राज्यांना एकच ध्वज, एकच अधिकार, एकच घटना , इतर राज्यात व जम्मू काश्मीर मध्ये सर्व कायदे समसमान व्हायला पाहिजेत! 
म्हणून आता ३७० कलम रद्द झालेच पाहिजे ही देशवासीयांची प्रखर इच्छा आहे . . 
त्यासाठी संपुर्ण देश मोदींच्या पाठिशी ठामपणे उभा राहिल! 

विजय पिसाळ नातेपुते

शुक्रवार, २४ मे, २०१९

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत का झाली याचा घेतलेला आढावा ! आतातरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आत्मपरिक्षण करेल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण



काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  महाराष्ट्रात पराभूत का झाली याची काही कारणे मतदारात जावून शोधली तर पुढील गोष्टी लक्षात येतात. !
केवळ मोदी फॅक्टर मुळे नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीने आपल्या चुका दुरुस्त न केल्यामुळे किमान महाराष्ट्रात तरी  लोकसभा २०१९ ला पराभव स्वीकारावा लागला आहे . .
त्याची कारणे . . .
काँग्रेस व राष्ट्रवादीत  नव नेतृत्वाचा अभाव. . .
प्रत्येक पदे ,प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपल्याच घरात ठेवण्याचा केलेला वारंवार प्रयत्न, यामुळे नव्या दमाचे कार्यकर्ते यांची भावना आपल्याला काँग्रेस व राष्ट्रवादीत    राहून काय भवितव्य म्हणून भाजपा सेनेकडे आकर्षित होताना दिसतात.
प्रचार व प्रसार व जाहिरात   यातील  प्रभावी मुद्यांचा अभाव व  कमजोरी!
आपल्या पेक्षा कोणी वरचढ नको म्हणून   अशोक चव्हाण  व अजितदादा  पवार यांची आपआपल्या पक्षातील नेत्यांनाच संपवण्याची  आखलेली  रणनिती !
पक्ष वाढवण्या ऐवजी एकोपा साधण्या ऐवजी  या लोकांनी आपल्याच पक्षात एकमेकांची जिरवण्यासाठी गटबाजीला दिलेले बळ व ही गटबाजीच त्यांना घातक ठरलेली आज दिसत आहे .
विविध सत्तास्थाने हातात  असतानाही पवार साहेब व सुप्रिया ताई सोडल्या तर बाकीचे पदाधिकारी  , लोकांचे प्रश्न तातडीने न सोडवता , केवळ पदाला चिकटून राहिलेले दिसले! प्रत्येक मतदारसंघात कामा ऐवजी
जात व धर्म बघून उमेदवारी लादने !
पक्षात कसलेही योगदान नसणार्या नवख्या उमेदवारांना केवळ घराणेशाहीच्या माध्यमातून लादने ,
पुण्याची जागा व नगरची जागा सामंजस्य दाखवून  आदलाबदल न करणे  !
केवळ आम्हाला इतक्या सीट हव्यात हा अट्टाहास धरून बसने, औरंगाबाद व पुणे  राष्ट्रवादीला सोडणे अपेक्षित होते .
गेल्या पाच वर्षात नारायण राणे , छत्रपती संभाजी राजे, मोहिते पाटील व विखे पाटील यांचे काँग्रेस व राष्ट्रवादीतूनच   पक्षातूनच खच्चीकरण करणे ,
माढ्यात केवळ मोहिते पाटील यांना त्रास देण्यासाठी म्हणून,
संजय शिंदे व त्यांचे बंधू यांनी पक्ष विरोधी भूमिका घेऊनही त्यांना अभय देणे , ज्या संजय शिंदे व दिपक साळुंखे मुळे पक्षाची वाट लागली त्यांनाच झुकते माप देणे . .
जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांना संपवण्यासाठी पक्षातूनच मोहीम राबवणे !
बर्याच ठिकाणी युती असूनही छुप्या पद्धतीने पाडापाडीचे राजकारण करने ,
पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या सारख्यानेही आघाडी धर्म न पाळणे !
मान व खटाव चे आमदार गोरे  व रणजितसिंह निंबाळकर  हे पृथ्वीराज बाबांचे खास जवळचे होते , त्यांनाही भाजपात जावू देणे !
मुंबईत विविध गटातील वादविवाद. . . व
समन्वयाचा अभाव! कित्येक वर्ष
सत्तेवर असताना ओबीसी दुखावतील या अनाठायी भितीमुळे  मराठा समाजासाठी,  आरक्षणासाठी  घटनात्मक आयोगाची निर्मिती न करणे  व आयोगाकडून हातात असतानाही पॉझिटिव्ह अहवाल तयार न करणे ,   दिंडोरी , हिंगोली , बीड, रावेर या ठिकाणी
ऐनवेळी उमेदवार बदलने,
नाशिक मध्ये योग्य उमेदवार न देता ज्यांची भ्रष्टाचारी म्हणून प्रतिमा सगळीकडे झाली  आहे त्यांनाच उमेदवारी देणे व प्रचारासाठी संपुर्ण महाराष्ट्रात फिरवणे,
भंडारा गोंदियातून नाना पटोले यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली असती तरी चालले असते पण  तेवढे काँग्रेस व राष्ट्रवादीत सामंजस्य नसने ,
मोठ्या शहरात व गावपातळीवर संघटन कमकुवत असने !
बुथ कमिट्या नसने ,
पारंपारिक, दलित मुस्लीम व काही प्रमाणात मराठा वोट बँकेला  गृहीत धरणे व त्यावर   विसंबून राहणे, नव मतदारावर प्रभाव पाडेल असे नेतृत्व नसणे व ते तयार  होऊ न देणे !
मुस्लीम, माळी , धनगर, वंजारी  ,  दलित यांना सोबत घेण्यात आलेले अपयश,
हक्काचे , दलित, मुस्लीम व धनगर मतदार दुरावणे,
धनगरांना एकाही मतदारसंघात  उमेदवारी न देने,
पक्ष संघटनेत नवीन कार्यकर्ते यावेत यासाठी  व्यापक कार्यक्रम  नसने !
ओबीसी , दलित, यांचा भाजपाने खुबीने राजकारणात वापर केला त्या समाजातून काही चेहरे पुढे करून बरोबर इप्सित साधले !
भाजपा व शिवसेना यांनी जे सोशल इंजिनिअरींग केले ते अघाडीच्या   नेत्यांनी न केल्यामुळे  पराभवाचा सामना करावा लागला . असे मला वाटते . .

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

बुधवार, २२ मे, २०१९

ईव्हीएम वरून चालू असलेला गोंधळ याला जबाबदार कोण? संशय दुर करायचे काम निवडणूक आयोगाने व न्यायालयाने करायला नको का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*निवडणूक पारदर्शक होण्यासाठी . . . .*
*जनतेचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होण्यासाठी . . .*
*संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी आता उपाययोजना करायची वेळ आली आहे . . .*

*ईव्हीएम मध्ये सॉफ्टवेअर मारलेली चिफ असते व तिचा डाटा चेंज करता येऊ शकतो कारण ते सॉफ्टवेअर असते हा विरोधकांचा दावा खरा किंवा खोटा याला फारसे महत्व नाही पण, किंचित सुद्धा संशय नको  म्हणून त्याला   पर्याय दिलाच पाहिजे व  निवडणूक पारदर्शक झालीच पाहिजे !
 ही केवळ  विरोधकांची मागणी म्हणून नव्हे तर भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, निवडणूक आयोगाने व न्यायालयाने विरोधक म्हणतात म्हणून नव्हे तर जनतेच्या मनातील संभ्रम दुर व्हावा म्हणून लोकांच्या मतांचा विचार केलाच पाहिजे !
त्यासाठी आधुनिक मतदान यंत्राच्या साह्यानेच बटन दाबून  मतदान घ्यावे , बटन ज्या चिन्हा समोरील दाबले ते चिन्ह प्रिंट होऊन  ते प्रिंटिंग ज्या मतदाराने मतदान केले त्याला दिसावे व मगच ते संबधित पेटीत पडावे आता ज्या प्रमाणे व्हीव्हीपॅट करते तसेच!  ( त्यातून व्हीव्ही पॅट सारखी चिठ्ठी ज्याला मतदान केले आहे ति बाहेर पडावी व थोडी जाड आणि मोठी असावी)
व अश्या स्लिप किंवा चिठ्ठ्या या एटीएम मशिन सारखे मशिन विकसित करून मोजल्या जाव्यात त्यामुळे मोजायची कटकट मिटेल व त्या चिठ्ठ्या कितीही वेळा मोजता येतील  व निकालही वेळेवर लागतील  व त्या कितीही वेळा मोजता येण्याचे कारण शंकेला वाव नको .   जोपर्यंत सर्व वाद मिटत नाहीत तोपर्यंत त्या चिठ्ठ्या सुरक्षित जपून ठेवाव्यात!
 म्हणजेच  त्या चिठ्ठ्या सुद्धा पैसे मोजणारे मशिन सारखे,  व्हीव्ही पॅट चे कौंटींग करणारे मशिन विकसित करून करावे . .
म्हणजे मशिन हॅक झाली ही बोंब कोणीही ठोकायला नको किंवा हा आरोप सातत्याने व्हायला नको  ! व हा गोंधळ कायमचा मिटायला हवा . . .   . .
विजय पिसाळ नातेपुते

मंगळवार, २१ मे, २०१९

पारदर्शक निवडणूकीसाठी , निवडणूक आयोग व न्यायालयानेही वारंवार होणारी चर्चा थांबण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत! एक सामान्य मतदार व नागरीक यांची अपेक्षा ! पाच वर्षासाठी प्रतिनिधी निवडताना , एक महिना मतदान प्रक्रिया चालत असताना निकालासाठी /मतमोजणीसाठी दोन दिवस गेले तर बिघडले कुठे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी  व राजकीय विश्लेषक म्हणून हे माझे मत आहे . . पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझे हे मत नाही . . .*

*जनतेला स्वतःच्या बहुमोल मताची ताकद जेंव्हा पुर्णपणे कळेल व प्रत्येक भारतीय जनता १००% मतदान करेल व निवडणूका १००%  निःपक्ष पणे  होतील तेंव्हाच लोकशाही खर्या अर्थाने  बळकट होईल!*
*तो पर्यंत या देशात फोडा, झोडा आणि राज्य करा हाच फॉर्म्युला सगळे लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणारे मात्र प्रत्यक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत  घराणेशाही व हुकूमशाही चालवणारे पक्ष चालू ठेवतील हे माझे आजच्या राजकीय परिस्थितीचे स्पष्ट व परखड मत आहे* . 
*मतमोजणीला एक तिथे दोन दिवस लागले तरीदेखील चालतील  पण सिस्टीमवरचा विश्वास वाढला पाहिजे व १००%  सर्वांचाच विश्वास दृढ झाला पाहिजे ! मग ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट १००% मोजले तरी कुणाला काही प्रॉब्लेम असता कामा नये अगदी निवडणूक आयोग व न्यायालय यांना सुद्धा* ! विरोधक म्हणत आहेत म्हणून नव्हे तर सर्वच भारतीयांना विश्वास देण्यासाठी हे आवश्यक आहे . 
*जसे तुम्ही पैसे मोजायला बँकेत मशिन वापरता तसे व्हीव्हीपॅट मोजायला मशिनचा वापर का करू शकत नाहीत. .*

*जर लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट वापरले व त्या पेट्या शिलबंद करून मशिनच्या साह्याने व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठ्या  मोजल्या तर निकाल लवकर लागतील व ज्याला मतदान केले ते आपल्या समोर चिन्ह येईल व वादविवाद बंद होतील*
दुध का दुध पाणी का पाणी . . .*

विजय पिसाळ नातेपुते !

शनिवार, १८ मे, २०१९

नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार मा. श्री शंकर नाना जानकर हे नुकतेच भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले , त्यांच्या यशस्वी कारकीर्दचा घेतलेला हा आढावा .











चालू घडामोडींचे विश्लेषण


नुकतेच नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार *मा श्री शंकर नाना जानकर*  हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ  सैन्यदलातील यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . . .
 त्यांच्या सैन्यदलातील व शालेय जीवनातील खडतर  कारकीर्दीचा आढावा घेतलाय लेखक, कवी, सामाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक आणि  वक्ते  श्री विजयकाका  पिसाळ नातेपुते  यांनी . . . . . . .

नातेपुते गावच्या पश्चिमेस कॅनॉल लगत जानकर वस्ती आहे. या वस्तीवर  नाना मारूती जानकर व त्यांच्या पत्नी हौसाबाई नाना जानकर रहाण्यास होते ते दोघे मिळून  आपला पारंपारिक मेंढपाळाचा (मेंढी पालनचा ) व्यवसाय करत होते. घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची होती . मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने मेंढ्यांना चारा उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्यांना मेंढ्यांना घेऊन चारणी (चारण्या) साठी वेगवेगळ्या भागात जावे लागत असे,  सोबतीला लहान  लहान मुलं एक दोन घोडी, त्यावर जीवनावश्यक सर्व पसारा, वाघरी , घोंगडी ,  लहान लहान कोकरी , करडं , टाकायची व  शेळ्या, मेंढ्या ,  कोंबड्या , सोबतीला घेऊन,  राखण करायला इमानदार दोन ते चार श्वान  बरोबर घेऊन गावोगावी फिरायचे व मुलांचे संगोपन करायचे,  संसाराचा गाडा हाकायचा, शेळ्या व मेंढ्या यांना चारा व पाणी  मिळावे  म्हणून त्यांना भटकंती करावी  लागत असे,  बहुतांश वेळा चार ते पाच महिने नातेपुते गावात व ७ ते ८महिने त्यांना  बाहेरगावीच रहावे लागत असे , प्रामुख्याने ते वाई, सातारा या भागात दिवाळी संपली की,  नातेपुते परिसरातील चारा संपल्या नंतर  उन्हाळ्यात व पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत तिकडेच गावोगावी रहात असत. . .  नाना व हौसाबाई यां दाम्पत्याला ,
 कै दशरथ नाना जानकर
श्री दाजी नाना जानकर
श्री मोहन नाना जानकर
श्री बाळू नाना जानकर
श्री शिवाजी नाना जानकर
श्री शंकर नाना जानकर
श्री सुखदेव नाना जानकर
श्री बापुराव नाना जानकर
ही मुले झाली . . .
या पैकी  श्री दाजी नाना जानकर, श्री शिवाजी नाना जानकर व श्री शंकर नाना जानकर हे तिघेजण भारतीय लष्करात विविध हुद्यावर सेवा करून यशस्वी सेवानिवृत्त झाले . . . . . . . . सहाजिकच या कुटूंबात शिस्तिचे व देशप्रेमाचे वातावरण त्याकाळी  तयार झाले होते व आजही पुढच्या पिढीत आहे,
या अगोदरच लष्करी सेवेतून  दोघे म्हणजे दाजी नाना जानकर व शिवाजी नाना जानकर सेवानिवृत्त झाले असून,   सुभेदार *श्री शंकर नाना जानकर* यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने  सैन्यदलातील दैदिप्यमान कारकीर्दचा या लेखात आढावा घेतला  आहे . . .
 *श्री शंकर नाना जानकर*  यांचा जन्म १ जून १९६९ साली गरीब हिंदू  धनगर कुटूंबातील मेंढपाळाच्या घरी झाला त्यांचे वडील नाना व आई हौसाबाई व जेष्ठ बंधू  यांनी कठीण परिस्थितीत  त्यांचे संगोपन व शिक्षण यासाठी पोत्साहन दिले.  शंकर जानकर यांचे  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण हे दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले . .
घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची व  बेताचीच असल्याने त्यांना सैन्यदलात जाण्या अगोदर विविध ठिकाणी रोजंदारीवर कामाला जावे लागत असे,  कुटूंब मोठे असल्याने केवळ आई वडील व मोठ्या भावांच्या कष्टावर  घर चालणे तसे कठिण होते.  त्यामुळे त्यांना शिक्षणाचा व  वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी शनिवार, रविवार व दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुट्टीत कामाला जाणे व कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता . . . घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व घरातच आई वडीलांकडून देशसेवेचे धडे मिळाल्या मुळे श्री   शंकर नाना जानकर यांनाही सैन्यदला बद्दल विशेष आकर्षण होते व त्यांचे शरीर कष्टाचे आणि चपळ असल्या कारणाने त्यांनीही सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला .
मुळातच घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व संपुर्ण कुटूंबातील लोकांनाही देशाबद्दल विशेष प्रेम असल्याने त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा जो निर्णय घेतला त्याला घरातील सर्वांनीच मनापासून पाठिंबा दिला व साथही दिली . इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण होताच ते  ९/४/१९८९ ला सैन्यदलात भरती झाले . जरी ते इयत्ता १२ वि नंतर भरती झाले तरीदेखील त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले ,  जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर  स्वकर्तृत्वाने ते  एक एक टप्पा पुर्ण  करत पदोन्नती मिळवत गेले  . . .
सन १९८९ला ते  सैनिक म्हणून भरती झाले ,  परंतू अभ्यासू वृत्ती व  कर्तृत्व याच्या बळावर ते
१५/८/१९९७ला लान्स नायक झाले  नंतर
१/४/२०००साली नायक म्हणून त्यांना  बढती मिळाली . त्यांच्या  उत्कृष्ट सेवेमुळे
१७/८/२००५ ला हवालदार म्हणून परत बढती मिळाली .
त्याच प्रमाणे १/३/२०१३ साली नायब सुभेदार या पदावर पोहचले आणि १/३/२०१५ ला मा श्री  शंकर नाना जानकर हे सुभेदार झाले . . . हा त्यांचा लष्करातील प्रवास साधासुधा नव्हता तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना खडतर आव्हानांचा सामना करावा लागला,  या प्रवासात त्यांनी स्वतःचे मनोबल वाढवले आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून  प्रवास केला   . . लष्करातील सेवेच्या काळात त्यांना विविध पदावर काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली  व विविध आव्हानांचा सामना करण्याचे सुद्धा प्रसंग आले . त्यांनी आपल्या सेवेच्या काळात, आसाम (तेजपुर ), उत्तर प्रदेश (इलाहाबाद ), जम्मू काश्मीर (श्रीनगर ), पंजाब (जालंधर ),  महाराष्ट्र (पुणे) , परत जम्मू काश्मीर (कारगिल ), परत महाराष्ट्र मुंबई, परत उत्तर प्रदेश (मेरठ )जम्मू काश्मीर (महू), नागालँड, आंध्र प्रदेश, सिक्कीम, परत पंजाब(भटींडा), परत महाराष्ट्र (पुणे),
इतक्या ठिकाणी काम केले व विविध ठिकाणी प्रवास करावा लागला व लष्करी सेवेचे आव्हानात्मक काम  करावे लागले . जम्मू काश्मीर मध्ये १९९९ ला देशसेवा बजावत असतानाच पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी कारगिल मध्ये घुसखोरी केल्याचे निदर्शनात येताच भारतीय लष्कराने त्यांना पिटाळून लावण्यासाठी , युद्ध सुरू केले यात सहभागी होऊन शेकडो अतिरेकी व पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावण्याची मोलाची  कामगिरी भारतीय सैनिकांनी  केली यात नातेपुते  गावचे सुपुत्र म्हणून सुभेदार शंकर नाना जानकर यांनी मोठे काम केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . ऑफरेशन विजय मध्ये सुद्धा त्यांनी  महत्वपुर्ण भुमिका निभावली . .
लष्करातील सेवा करत असतानाच   वर्षा सिताराम गावडे  एकशीव  यांचे बरोबर दिनांक  २७ /९/१९९२ रोजी त्यांचे  लग्न झाले व आपल्या सुखी संसाराची सुरवात केली वर्षा यांचे बरोबर केली , कु.  वर्षा  गावडे  शंकर नाना जानकर यांचे बरोबर विवाह बंधनात आडकल्या नंतर सासरी नातेपुतेला सौ . वर्षा शंकर जानकर झाल्या व  त्यांनी आपल्या पतीला पुर्णपणे साथ दिली,  घरातील संपुर्ण जबाबदारी  व मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले , आज या सुखी दाम्पत्याची दोन्हीही मुले उच्च शिक्षित असून  कु अंकिता या डॉक्टर झाल्या आहेत  व अमरजित यांनी डी फार्मसी केलेले आहे .
अशा नातेपुते गावच्या सुपुत्राचा सेवा निवृत्ती निमित्ताने यथोचित गौरव होतोय. . . व पुढील आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा . . .
प्रेस नोट. . . . . .
*दिनांक १६/५/२०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता  नातेपुते गावचे सुपुत्र  सुभेदार श्री शंकर नाना जानकर हे तिस वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले . . . .*

*या  निमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ माजी सैनिक संघटना , ग्रामपंचायत नातेपुते व गावातील जानकर कुटूंबावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी विधान परिषदेचे आमदार मा श्री  आर जी रुपनवर यांचे  शुभहस्ते आयोजित केला होता . .*
*सदर कार्यक्रमाला . . .*
*माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते गावचे सरपंच श्री  बी वाय राऊत वकील व युवा नेते दादासाहेब उराडे, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, सामाजिक कार्यकर्ते श्री विजयकाका पिसाळ, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर काळे, प्रतिष्ठीत व्यापारी श्री महेश शेटे, सनीभैय्या देवकाते पाटील,*
 *श्री रणजित सुळ, रणवीर देशमुखआदी मान्यवर उपस्थित होते*.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून व त्यांच्या माता पित्यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली . सुरवातीला विविध ठिकाणी सेवा बजावत असताना जे लष्करातील जवान शहिद झाले आहेत त्यांना सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली . सदर कार्यक्रमाचे  प्रास्तविक माजी सैनिक व अधिकारी  श्री मानाजी जगताप यांनी केले
*या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते*
*श्री विजयकाका पिसाळ, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, विद्यमान सरपंच बी वाय राऊत वकील  व आमदार श्री आर जी रुपनवर यांची समयोचित* व *सुभेदार शंकर नाना जानकर यांच्या लष्करी सेवेतील कामगिरी बद्दल गौरवपूर्ण उल्लेख व अभिनंदन करणारी आणि लष्करी सेवेचा आढावा घेणारी  झाली भाषणे झाली*
या प्रसंगी बोलताना आमदार  आर जी रुपनवर म्हणाले की , शंकर नाना जानकर यांच्या सारखे सुपुत्र या मातीत जन्माला येत आहेत तो पर्यंत आपल्या देशाच्या सिमा सुरक्षित आहेत,  ज्या माता पित्यानी त्यांना घडवले व ज्या धर्मपत्नीने आजवरच्या वाटचालीस साथ दिली यांचेही कौतुक केले पाहिजे अशी भावना आमदार रुपनवर यांनी व्यक्त केली , त्याचप्रमाने आर जी रुपनवर पुढे बोलताना म्हणाले की , जवान सिमेवर लढतात व शेतकरी कष्ट करतात म्हणून आपण सुखाची झोप व आनंदाने दोन घास खाऊ शकतो .
*सुभेदार श्री शंकर नाना जानकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या लष्करी सेवेतील खडतर कामगिरीचा आढावा घेतला . . .*
*नातेपुते गावातील जानकर कुटूंब हे एकमेव असे कुटुंब आहे की एकाच कुटूंबातील सख्खे तिन भाऊ लष्करी सेवेत होते व लष्करी सेवा पुर्ण करून नातेपुते गावात सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. . .*
*या आनंदायी  कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरीक व लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व माता भगिनी उपस्थित होत्या*
*शब्दांकन. . . श्री विजयकाका पिसाळ नातेपुते . . .*

रविवार, १२ मे, २०१९

झाडे वाचली तरच आपण वाचणार!

चालू घडामोडींचे विश्लेषण





























वृक्ष संवर्धना शिवाय. . . . निसर्गाचा समतोल कठीणच. . . . . 
©® लेखन. .    विजय पिसाळ नातेपुते . . . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९

आज जिकडे तिकडे प्रचंड उकाडा , तापमान वाढ आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे  पाऊसमान, यामुळे वारंवार  पडणारा दुष्काळ या दुष्टचक्रात भारत देशातील ७० %भाग आडकला आहे ! 
"डोंगर उजाड झाले , पाऊसमान संपून गेले" 
ही अवस्था आज जवळ जवळ ७० %भारत देशाची झाली आहे . . 
दरवर्षी करोडोंचा खर्च वृक्ष लागवडीसाठी व देशातील विविध भागातील दुष्काळ निवारणासाठी केला जातो . . पण दुष्काळ व तापमानवाढ ही समस्या तशीच राहते आहे . . . देशातील किंवा राज्यातील  सरकार कोणतेही असो सुदैवाने  वृक्ष लागवड  तर केली जाते मात्र  दुर्दैवाने  लावलेले वृक्ष संवर्धन करण्यासाठी ना सरकारला अस्था असते ना सामाजिक स्थरावरील लोक पुढाकार घेतात. . मुळातच देशातील नागरीकांना प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे वाटते ! जनसहभाग नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होत नाही . . 
आज अनैसर्गिक पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने  ओढे नाले साफसफाई केली जातेय तोच गाळ कडेला टाकला जातोय व तोच गाळ परत ओढ्यात येतोय,  जमिनीवर चर खोदून सुपीक जमिनीत पाणी मुरवण्याचा अयशस्वी प्रयोग केला जातोय, मुळात जमिन खोदून माती काढून तिची प्रचंड प्रमाणात धूप केली जातेय व तिच माती ओढे व धरणे यात परत येऊन साचतेय व ओढे आणि धरणे गाळाने भरत आहेत,  मुळात नैसर्गिक ओढे व त्यातील वाळूच जर उपसली गेली तर पाणी जमिनीत मुरणार कसे !  वाळू  उपसून ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले गेल्यावर वाळूच नष्ट होणार व  यात वाळू  नष्ट झाल्यामुळे बंधार्यात फक्त  पावसाळ्या मध्ये  मुबलक दिसते , छानपैकी फोटो काढले जातात पण ते पाणी मात्र टिकत नाही ! त्याचे प्रचंड  बाष्पीभवन होऊन ते पाणी  संपुष्टात येते व परत दुष्काळ मात्र पाचवीला आहेच! 
या साठी निसर्ग नियमानुसार ओढ्यात व नद्यात वाळू आवश्यक आहे व त्याचा उपसा सुद्धा नियंत्रणात गरजेनुसार व्हायला हवा !     मुळात जलतज्ज्ञ , डॉ राजेंद्रसिंह, समाजसेवक  अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी जे पॅटर्न राबले ते खूप महत्वाचे होते व आहेत! त्यात 
चराई बंदी, कु-हाड बंदी करणे व  यातून वृक्ष आणि  जंगलाचे संरक्षण आवश्यक आहे .
पडणारे पाणी झाडामुळे तर जमिनीत मुरतेच पण  साखळी बंधारे ,,नाला बंडीग,  कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व लघू प्रकल्पच  यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब आडवला जाऊन  दुष्काळ हटवता येऊ शकतो  व डोंगराळ भागात याला भरपूर स्कोप आहे पण मुळात, कोणत्यातरी शासकीय अधिकार्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना राबवून दुष्काळ हटवण्याचे प्रयोग केले जात आहेत. . त्याचाच एक नमुना म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने चालू असलेले जलयुक्त शिवार अभियान. . . यात ठेकेदार, ट्रॅक्टर मालक व जेसीबी मालक हे आणि अधिकारी मालामाल झाले पण पाणी पातळी पावसाळा सोडला तर जैसे थे ! 
मुळात जल संवर्धन हे जंगल संवर्धनावर अवलंबून आहे .  जंगल नसेल तर पाऊस पडणार नाही व पाणीच पडले नाही तर वॉटरकप काय? जययुक्त शिवार काय? नुसता उलटा कार्यक्रम होणार हे नक्की ! 
आज कित्येक ठिकाणी झाडाची अनियंत्रित कत्तल चालू आहे . वनसंरक्षक व वनअधिकारी हे समाजातील गाव गुंड व सरपन आणि झाडांची तस्करी करणारे  संबधित लोकामुळे हतबल झालेले आहेत. 
काही ठिकाणी तर वनसंरक्षक व वनअधिकारी यांचे आशीर्वादानेच संरक्षित वनांची कत्तल होत आहे. 
कागदोपत्री वृक्ष लागवडीचे करोडोंचे आकडे दरवर्षी प्रसिद्ध होतात मात्र लावलेली झाडे किती वाचवली जातात हा खरा  मुख्य   संशोधनाचा  विषय आहे . . . 
वाढते शहरीकरण व रस्त्यासाठी , कित्येक डोंगर आणि झाडे भुईसपाट करावी लागत आहेत पण त्याची भरपाई इतर ठिकाणी झाडे लावून व ति  मोठी करून केली जात नाही . . 
डोंगररांगा जर गच्च झाडांनी वेलींनी वेढल्या व डोंगरांना जाणीव पुर्वक आगी लावायचे बंद झाले नाही तर मात्र सर्व कठीण आहे . . 
आज काही नालायक लोक बीडी सिगारेट ओढून पेटती काडी व सिगारेट बीडी रस्त्यावर किंवा डोंगरावर टाकतात व क्षणात ते ठिकाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडते . . . या बिडी व सिगारेटला पायबंद कोण घालणार! 
काही दारूडे जंगलात जाऊन दारू पितात व दारूनंतर तिथेच बीडी सिगारेट व मटणाच्या पार्ट्या करून आग न विझवता तसेच नशेत येतात त्यानेच जंगलांना आगी लागलेल्या दिसून येते ! 
सांगायचा मुद्दा हाच आहे की, 
त्याला पायबंद घातला पाहिजे ! 
यापुढे सरकारने 
 शेतकर्यांना सुद्धा  उपयुक्त  आणि निसर्गासाठी  आंबा , चिक्कू, चिंच, आवळा , कळक(बांबू ) ही बांधावर व कंपल्सरी कायदा करून झाडे लावायला लावली पाहिजेत त्याला काही वर्षे अनुदान दिले पाहिजे . वनजमीनीवर झाडांचे संवर्धन करण्यासाठी , तलाठी , ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, कृषी सहाय्यक  व सामाजिक संस्था आणि होतकरू तरूणांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबवून झाडे लावा व त्याचे संवर्धन करा हा उपक्रम हाती घेतला पाहिजे . . 
नुसती दरवर्षी झाडे लावून व ति जळून जाऊन तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन हे रोखले जाऊ शकत नाही . 
त्यासाठी झाडे मर्यादित लावावीत मात्र ति किमान ८०%जगावीत तरच काहीतरी साध्य होईल! 
संपुर्ण देशात व राज्यात संपुर्ण वनक्षेत्रात कु-हाड बंदीची अंमलबजावणी १००%व्हायला पाहिजे ! 
आज रस्त्याच्या कडेचे लिंब, चिंच, वड, आंबे,  सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या चार्यासाठी तोडले जात आहेत. . 
त्यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही .
म्हणून सरकार आणि समाजातील जागृत घटकांनी पुढे आले पाहिजे . . . 
प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक गावाला झाडे जगवण्याचे टार्गेट दिले पाहिजे व त्यावरूनच त्याला अनुदान सुद्धा निश्चित केले गेले पाहिजे ! 
व त्या झाडांचे अॉडीट केले पाहिजे तरच संपुर्ण भारत व आपले राज्य दुष्काळ मुक्त होईल! 
लेखक. . विजय पिसाळ नातेपुते ©®९४२३६१३४४९/९६६५९३६९६९