vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

आयुष्याचे सार्थक कधी होईल!

**आयुष्याचे सार्थक कधी होईल!*

**भारतासारख्या महान देशात आपला जन्म होणं हीच गोष्ट मुळात आपल्या भाग्याची आहे*
**विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९
**मुळात आपल्याला आपल्या अवतीभवती असणाऱ्या चांगल्या गोष्ठींचा विसर पडत चालला आहे, आपण आज जगत असताना किती आनंदी असतो ,  आपल्या मनात इतरां बद्दल किती आदर असतो? **
**आपल्या मनाला आपण काही प्रश्न विचारतो का?
मि कोण? माझी निर्मिती कशासाठी ? माझे अस्तित्व का ? मला नेमके काय करायचे आहे ? माझा माझ्यावर विश्वास आहे का ? मला नक्की काय हवंय? मि कशासाठी जगतो आहे ? माझे कोण?
**या प्रश्नांची उत्तेरे शोधायचा आपण सामान्य पण कधीच विचार करत नाही , कुणीतरी आपल्याला ज्ञान देतो,कुणाचेतरी आपण ऐकतो आणि  आपण पैसा , संपत्ती , याच्या मागे लागत लागत कधी वाईट कृत्य करतो हेही आपल्यालाच कळत नाही ,*
मित्रांनो जगायला पैसा लागतो पण, केवळ पैशामुळेच जीवन सुखी होते असा नाही , तुम्हाला तुमच्यातील आतील आवाजाची जाणीव झाली  पाहिजे  तरच तुम्ही या जगातील मोजक्या लोकांच्या पंक्तीत बसू शकता , ईश्वर आहे का ? नाही ? या वादात न पडता स्वतःला काहीतरी विचारा मग तुम्हाला स्वामी विवेकानंद भेटतील,  तुम्हाला तुकोबाराय भेटतील, तुम्हाला शिवराय, बाबासाहेब प्रेरणा देतील, तुमच्यातील गुणांचा परिचय तुम्हाला होईल, **भोगवादी वृत्ती नष्ट होऊन, तुम्ही वास्तविक जीवन जगू लागाल,* गरजा ओळखून तुमचा खर्च कमी होत जाईल पण या साठी तुम्हाला तुमच्या मनासीच संवाद करावा लागेल!
**आपले अस्तित्व शोधावे लागेल, मनातील भय, मनातील आत्मदुर्बलता काढावी लागेल, मंदिरात  कादाचित देव भेटेल की नाही हे मि  सांगू शकत नाही  मात्र एकांता मध्ये , तुम्ही स्वतःशीच बोलून जगातील तुमच्या अस्तित्वाचे कोडे सोडवू शकाल,* मनाची एकाग्रता व मनाची खंबीर भावना कोणत्याही संकटावर मात करायला नक्कीच शिकवेल, पैशाच्या पाठिमागे धावता धावता आपला विनाश तर होणार नाही ना हाही कधीतरी विचार मनासी करायला पाहिजे ,
**ज्ञान प्राप्तीसाठी जशी गुरूंची आवश्यता असते , तसेच कठोर अभ्यास व मनन चिंतन हे तुम्हाला दिव्य ज्ञान प्राप्त करून देवू शकते* ,
**मोबाईल, इंटरनेटच्या या जगात काॅपी पेस्ट करून पोस्ट पुढे पाठवण्या इतके आयुष्य सहज सोपे नाही **,
दुसर्यांची  फसवणूक करून कदाचित काही काळ श्रींमती येते सुद्धा पण अंतरीक मनातून मात्र  समाधान लाभण्याची शक्यता बिलकुल असत नाही**
**साधी सरळ जीवनपद्धती तुम्हाला या जगात महान बनवू शकते **
**कोणत्याही साधू मुनी कडे  संपत्ती नसताना सुद्धा जग पाया पडते* व मोठ मोठे भ्रष्टाचारी नोकरदार, मंत्री संत्री यांना संरक्षणा शिवाय वावरता येत नाही यातच, तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शोधू शकता !
**तुम्हाला जर आयुष्यात काय करावेच वाटले तर तुम्ही प्रथम माणूस बना , आपल्या  संस्कृतीची जपणूक करा , तुमची महानता ही जातीवर, धर्मावर नसते , तुमच्या पैशावरून ठरत नसते , यासाठी तुम्हाला स्वामी विवेकानंद  , डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, साने गुरूजी , अशी थोर व्यक्तीमत्व कळावी लागतील!**
**यापुढेही जावून तुम्हाला , या मनुष्य जातीवर, या पवित्र मातीवर, प्रेम करावेच लागेल, रंजल्या गांजलेल्यांचे अश्रू पुसावेच लागतील स्वतःच्या अस्तित्वाचा अभ्यास करावाच लागेल,*
**काहीही न कमावता केवळ विचारांमुळेच संत ज्ञानेश्वर, तुकोबाराय, संत कबीर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखोबा,संत सावता महाराज, संत गोरोबाराय, संत गाडगेबाबा , हजारो लोकांच्या तनामनात आजही आहेत*
आणि हजारो कोटीहून जास्तीची संपत्ती असणारे कुणी बाबा बुवा तुरुंगात आहेत तर कुणी आयुष्यात त्रस्त आहेत, कशाचेही पाप नसेल तर भय वाटत नाही व भयमुक्त जीवन हाच मार्ग तुम्हाला ईश्वर असो किंवा नसो मात्र ईश्वर पदा इतके महान करतो ,त्यामुळे निराशा आणि भय हे कधीच बाळगून जगू नका !
**प्रेमाणे  रहा , प्रेम द्या प्रेम घ्या तुमच्या आयुष्याचे सार्थक होवून खर्या अर्थाने तुम्ही महान आहातच अजून महान झाल्या शिवाय रहात नाही !*
आणि हो आयुष्यात दुसर्यासाठी जगणे हाच खरा त्याग असतो !
लोकात मिसळा , लोकांना एकत्र करा ही पवित्र भूमीला तुमची गरज आहे ,
बलात्कार  , खून, दरोडेखोर यांची संख्या तुमच्या सारखे सज्जन शांतपणे पहात असतात म्हणून वाढते आहे केवळ शिवरायांचे नाव घेऊन भागणार नाही तर,
शिवरायांचे विचाराप्रमाणे न्याय निवाडे होण्यासाठी , लोकशाहीच्या पवित्र मंदिरात असो की, सामाजिक, धार्मिक कार्यात असो चारित्र्य संपन्न लोकांची गरज आहे व ति गरज तुम्हाला पुर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची आहे !
जो लोकशाहीचा शत्रू , जो भारतमातेचा शत्रू , जो गोरगरीब व कष्टकरी शेतकरी  यांचा शत्रू तोच आपला शत्रू ! मुळात कुठलाही जात, धर्म वाईट नसतो तर त्यातील अपप्रवृत्तीच शत्रू असतात!
म्हणून तुम्ही अगोदर स्वतःचे अस्तित्व शोधा नक्कीच
या पवित्र भूमीला गतवैभव प्राप्त होईल
 विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

हिंदू धर्म

हिंदू धर्म. . . .

धर्माला , देवाला नावे ठेवणं तसं फार सोप्पं असतं त्यातल्या त्यात असंख्य लोकांना दुसर्‍याच्या धर्माला जास्त नावे ठेवायला आवडते !
पण धर्म समजून घेणे त्याचे रोजच्या जीवनात आचरण करणे तसे महा कठीण काम!
शिव्या घालायला थोडेच पैसे लागतात!
म्हणून धर्म जाणून घ्या , वाईट प्रवृत्तींकडे लक्ष देवू नका , सर्वच धर्मात वाईट लोक असतात म्हणून धर्माला वाईट म्हणता येत नाही !
आजही ९९% धर्माचे पालन करतात पण, ते स्वतःच्या पातळीवर करतात!
काही मतभेद असतात, मात्र त्याचे रूपांतर मनभेदात होवू नये !
चर्चा करताना धर्मातील अनिष्ट प्रथावर बोलताना कोणी मार्ग सांगितले म्हणून लगेच त्याला धर्मद्रोही म्हणू नये !

हिंदू धर्म आहे की हिंदू संस्कृती आहे की, जीवन जगण्याची कला आहे हे निश्चित पणे मला तरी  सांगता येत नाही ,पण
 माझ्या मते
मनःशांती साठी प्रार्थना करणे  माता पिता व संस्कृती या बद्दल कृतार्थ भाव असणे . .
गुरू बद्दल आदर, पुर्वजा बद्दलचा अभिमान, जेष्ठांचा मानसन्मान, ज्या  चराचरात आपण रहातो खातो, पितो वाढतो , याच्या संवर्धनासाठी,  त्याचे जतन करण्यासाठी,  विविध मार्गाने त्याची उपासना करणे म्हणजे संस्कृती जपणे हीच ति संस्कृती आहे . .
जिथे, सुर्य चंद्र तारे ग्रह यांची उपासना केली जाते !  देव देवतांना मानुन उपासना केली जाते, उपवास केले जातात,
त्यामुळे शरीर व मन शुद्ध होते ! थकवा कमी होतो !
देवाला नमस्कार केल्याने देव प्रसन्न होईल की नाही मात्र देवालयाच्या पायर्या चढताना , फेर्या मारताना निश्चित शरीराला फायदाच होतो . .
देवाच्या नैवेद्याच्या निमित्ताने आपल्याच गोडधोड मिळते , नव नवीन पदार्थ खावून आनंददायी जीवन जगता येते !
हीच शिकवण सर्व  धर्मामध्ये असते . . .
कारण  धर्मीक कार्यातून व सर्वच गोष्टीतून,
 प्रत्येकातून मानवाला आवश्यक अशी उर्जा प्राप्त होत असते . . त्यांचे मानवी जीवनात असाधारण महत्व आहे !
या नैसर्गिक गोष्टीतून मानवी जीवन समृद्ध बनत असते . . जसे
निसर्गातील उर्जा असेल तरच अन्न वस्त्र निवारा यांची निर्मिती होते म्हणून आपण निसर्गातील, वेली , पाने , फुले , फळे , याचा जगण्यासाठी उपयोग करत असतो . . तसेच
परमेश्वराच्या नावाने आणलेले फुल देवघरात देवाला वाहिल्यानंतर संपुर्ण घरात सुगंध दरवळू लागतो हाच भाव देव पुजेमागे असावा असे मला तरी वाटते . .
देव आहे की नाही यात न जाता . .
त्याची पुजा अर्चा श्लोक पठण, आरती उच्चारण,  केल्याने मन तर प्रसन्न होतेच पण आपल्या वाणीमध्ये मधुरता येते , पाठांतराची आवड निर्माण होते . .
एक प्रकारे  चांगले वागण्याचे मनावर संस्कार होत असतात!
या साठी सर्व गोष्टी स्वतः करायच्या असतात,असतात,हो  केवळ स्वतःच!
बाहेरील गुरूजी बोलावून पारायण केल्याने , किंवा पुजा घातल्याने स्वतःवर संस्कार ते काय होणार?
कार्यक्रम केल्याने  लोकांना खायला घालून लोकांना सोबत घेतल्याने जरूर मनाला आनंद मिळतो पण तेही करताना आपली आर्थिक परिस्थिती बघून करावे . . .
नुसते पुण्य लाभेल या भ्रमात न राहता . .
असंख्य लोकांना गाव जेवण घालून थोडेच पुण्य लाभते ?
त्यासाठी सत्कर्म करावे लागते . .
रोजच्या जगण्यात सत्यपना लागतो , कुणाचीही फसवणूक आपल्या हातून होता कामा नये !
हाच हिंदू धर्म सांगतो
केवळ एखादा सत्यनारायण घातला तर फक्त. .
गुरूजी येणार त्यांच्या वेळेच्या नुसार थोडेफार मंत्र उच्चारण करणार पण ते आपल्या डोक्यात काय जाणार?
त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास. .
जोपर्यंत एखादी गोष्ट आपण स्वतःहून आवडीने करत नाही , तिची सत्यता पडताळत नाही   तिचा सर्व कसोट्यावर  अभ्यास करत नाही , तोपर्यंत तिचा फायदा किंवा तोटा कधीच आपल्याला समजत नाही . .
हिंदू संस्कृती ही देव, देवळे, पुजा अर्चा , अभिषेक, नारायण नागबळी या पुरती नुसती  मर्यादित नाही तर ति खूप महान व विशाल आहे , तसेही ही  कर्मकांडे करण्याची  गरज नाही ! हिंदू धर्मातील परंपरा थोर आहेत. .
हिंदू  संस्कृती कितीतरी मोठी आहे , या संस्कृतीचा आणि भारतीय जनतेचा तसाही खूप मोठा संबंध आहे .
हिंदू संस्कृती ही कृषी संस्कृती आहे म्हणून हिंदू संस्कृती मध्ये गायीला पवित्र स्थान आहेच  ,,मात्र  प्राण्यासाठी सुद्धा सण उत्सव आहेत,  गाईचे  दुध दुपते व तिच्या पासून मिळणारे पशूधन हे शेतीसाठी आवश्यक आहे!  यातील काही गोष्टी  खूप मनाला भावतात आणि कुठल्याही संस्कृती मधील ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच स्वीकारायच्या असतात. .
वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो
तसेच या हिंदू संस्कृती बाबतीत आहे
यात काही चुकिची कर्मकांडे, चातुरवर्ण व्यवस्था , जातीभेद हे तसेही चुकच आहेत,
कुणाला उच्च कुणाला नीच समजने हेही गैर आहे
मात्र हिंदूच्या  सर्वच धर्मग्रंथामध्ये या वाईट गोष्टींचे कुठेही समर्थन दिसून येत नाही . . .
काही ठिकाणी घुसखोरी झाली असेलही . .
पण त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे . .
आपली संस्कृती कोणत्याही समुदायाचा द्वेष करायला शिकवत नाही . . . कोणत्याही जातीचा द्वेष करणे हि आपली परंपरा नाही ,
म्हणून आपली असलेली हिंदू संस्कृती अबाधित राहिली पाहिजे !
ति आपली आहे , तिचे महत्व मोठे आहे ति संस्कृती परकीय  लोकांची नाही !
या भुमिवरील पवित्र हिंदू धर्माचे कोण वाटोळ करत  तर नाही ना याचाही विचार करूया !

धर्म हि गोष्ट पवित्र आहे, त्यात शांती असते, त्यात जीवन जगण्याचा मार्ग असतो . .
धर्म हा अभ्यासाचा विषय आहे . .
कुणी राजकीय फायद्यासाठी धर्मचा वापर करू नये, केवळ आणि केवळ राजकारण धर्मात आल्यामुळे धर्मात विविध विचार प्रवाह निर्माण झाले . . राजकारण विरहित धर्म जपला पाहिजे तरच सर्व हिंदू बांधव एकत्र येवून जगाला आदर्श असा हा देश बनवू शकतील!  पण .
राजकीय लोकांमुळे धर्म बदनाम होत आहे ! 

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९