vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १९ मे, २०१८

केवळ लोकशाही साठी !

कर्नाटक सारखा परत कोणत्याही राज्यात किंवा केंद्रातही सत्ता परिवर्तनाचा पेचप्रसंग होवू नये या साठी काय करता येईल! ! !

कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाल्यापासून जो गोंधळ चालू होता तो लोकशाहीला मारक होता, भारतीय राजकारणात कित्येक वेळा विविध राज्यातील  विधानसभा , व देशाच्या लोकसभेत सुद्धा त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली पाहिली आहे , पण कर्नाटकात झाले ते लोकशाही मानणार्या माझ्या सारख्या  माणसांना वेदना देणारे होते , निवडणूकीत सर्वच पक्ष प्रचंड साम दाम दंड भेद व पैसा वापरून निवडून येतात, ते  स्वतःच्या ताकदी बरोबर पक्षाच्याही ताकदीवर निवडून येतात, हेही खरे आहे
त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू असतो तरीही कायदा मोडून पक्षांतराचे प्रयत्न,  पक्ष फोडून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होत  असतात ते खरोखर वाईट असतात, याला जबाबदार केवळ भाजपा आहे असेही नाही जवळपास सर्वच पक्षांनी आजवर सत्तेचा दुरुपयोग केला आहे आमदार खासदारच काय स्थानिक स्वराज्य संस्था , विधान परिषदा , राज्यसभा यातही सदस्य निवडताना जो घोडेबाजार होतो तो भयंकर असतो आणि तोच पायंडा पडू पाहतो आहे , या अगोदरच्या काही  प्रकरणात, माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांनी घोडेबाजार टाळण्यासाठी चांगला  पायंडा पाडला होता त्याप्रमाणे सर्व व्यवस्थित चालू होते पण सत्तेसाठी सर्व काही , हीच भावना प्रत्येक पक्षांचीच झाल्याने या घोडेबाजाराला उत आला आहे  साध्या ग्रामपंचायत निवडणूकीत सुद्धा कित्येक लाख उधळून निवडून येणारे लोक आहेत, मग या निवडणूका तर सत्तेची चावीच हाती देणार्‍या असतात, करोडो अब्जावधीचे निर्णय केवळ एका सहीने होतात त्यामुळे सहाजिकच घोडेबाजार होणार पण आज सुप्रीम कोर्टामुळे काहीप्रमाणात तरी कर्नाटकातील घोडेबाजार थांबला असला आहे  तरीही  भविष्यात विविध राज्यात व केंद्रात  निवडनुका झालेनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे याच्या सुचना किंवा स्पष्ट नियम स्पष्टपणे मानणीय  सुप्रीम कोर्टाने द्याव्येत  किंवा संसदेत कायदा तरी व्हावा हीच जनतेची अपेक्षा आहे ,
सत्ता जनता सदैव कोणत्याही एका पक्षाला देणार नाहीच बदल हे होत राहतील पण बदल सुद्धा लोकशाही मार्गाने व्हावे हेच  अपेक्षित आहे , राजकारणात कुणीही साजूक नाही ,बहुतेक संधी मिळताच  प्रत्येकाला कसेही करून सत्ता हवीच आहे पण सत्ता ही ज्या पक्षाचे तिकीट घेवून निवडून आलाय त्याच पक्षाच्या निर्णयाला अधीन राहून राबवली पाहिजे , किमान कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या निर्णया विरूद्ध लोकप्रतीधीला बहुमतावेळी  जाता येवू नये व कोणतीही पळवाट असू नये तरच लोकशाही वाचू शकते व घोडेबाजार टाळले जावू शकतात, लोकशाहीत, केवळ माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा समोरचा नेता आहे म्हणून मि मदत करेल तर हे चालणार नाही, केवळ पक्षाचा व्हीप चालेल हीच तरतूद हवी  कारण आपले राष्ट्र बळकट करण्यासाठी कोणताही पक्ष नव्हे तर लोकशाही टिकली पाहिजे , पक्ष हे मोठे होतील, सत्तेवर नवे पक्ष येतील पण देश मजबूत झाला पाहिजे , केवळ सत्तेसाठी सर्व सरकारी यंत्रणा , सुरक्षा व्यवस्थावर पडणारा तानतनाव व लोकशाहीचा खून होवू नये ,
प्रत्येक लोकप्रतिनीधीने निवडणूक लढवतानाच पक्षाला बांधिल राहून निवडणूक लढवली पाहिजे ज्यांना संधीसाधू वृत्ती ठेवायची आहे त्यांनी खूशाल अपक्ष निवडून येवून स्वतःचा दम सिद्ध करून कुणालाही पाठींबा द्यावा पण पक्षाचा झेंडा घेऊन निवडून आल्यानंतर मात्र फुटताच येणार नाही व पक्षीय बलाबल असेल  तोच बहुमताचा  आकडा ग्राह्य धरवा ! काहीवेळा विविध कारणामुळे नेताशी किंवा पक्षाशी  मतभेद झाले तर पक्षाचा  राजीनामा देवून खूशाल निवडून यावे पण बहुमत सिद्ध करायच्या अगोदर लगेच पक्षाच्या विरोधात जाता आले नाही पाहिजे ,
व निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला सदनात उपस्थित राहणे कंपल्सरी करावेच  जे सदस्य सदनात बहुमत परिक्षेला गैरहजर राहतील त्यांना किमान १२ वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालावी व आमदारकी , खासदारकीचे सर्व लाभ तात्काळ बंद व्हावेत असा कायदा झाला तरच सत्ता एका पक्षा कडून दुसर्या पक्षाकडे सहज लोकशाही मार्गाने हस्तांतरित होईल, सरकार  स्थिर  चालणे  व लोकहीताची कामे होणे आज काळाची गरज आहे
सत्ता आणि पैशाचा बाजार देशाला रसातळाला घेऊन जाईल, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, गोवा, यात पक्ष कोणते हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर सरकार बनवण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे, आवाजी मतदान, किंवा गुप्त मतदान सदनात न होता सरळसरळ बॅलेट पेपरच्या  साह्यानेच मतदान व्हायलाच हवे आज कर्नाटकात सर्वच पक्षांनी  जनेतेचा कराचा  पैसा भ्रष्टाचार करून कमावला व निवडनुकीत  उधळला गेला आणि जनतेलाच प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे हेच दुर्देवाने म्हणावे लागते  आहे , कोर्ट, वकील, पोलिस यंत्रणा व संपुर्ण भारतातील जनता यांना जो त्रास झाला तो कदाचित सर्व नियम व लोकशाही संकेत पाळले गेले असते तर कदाचित झालाच नसता व  ही वेळ निर्माण झाली नसती ,जशी  आज सत्तेतून पायउतार होण्याची वेळ भाजपावर आली तीच वेळ कदाचित काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षावर येवू शकते, जर व्यवस्थित नियम झाले , कोर्टाने डायरेक्शन दिले   तर मात्र सत्ता परिवर्तन नीट होवू शकते !
व लोकशाही टिकण्यासाठी सत्ता कुणाचीही येवो मात्र जनतेच्या खर्या मतदानातून आली पाहिजे !
कदाचित भविष्यात इव्हीएम बरोबरच बॅलेट पेपर वापरायची वेळ आली तरीदेखील लोकशाहीसाठी ते करावेच लागेल?
आजचा राजीनामा भाजपाच्या मुख्यमंत्र्याचा असेल कदाचित हीच वेळ नंतर कोणत्याही पक्षावर येवू शकते !
विजय पिसाळ नातेपुते !
९४२३६१३४४९
केवळ लोकशाहीसाठी !