vijaypisal49. blogspot. com

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकायची असेल तर माळशिरस तालुक्यातून मताधिक्य महत्वाचे !

माळशिरस तालुक्याची साथ असल्याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघ  जिंकणे अशक्य. . . ?
माळशिरस तालुका हा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला कालही होता , आजही आहे व भविष्यातही राहिल,  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा एक अपवाद वगळता आजतागायत माळशिरस तालुक्यातील जनतेने कोणतीही  लाट असो किंवा काहीही असो आदरणीय विजयसिंह  मोहिते पाटील यांना मजबूत साथ दिली आहे .
कारण दादासाहेबांकडे सरपंच पदापासून, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्री ते उपमुख्यमंत्री आणि गेली पाच वर्ष खासदार असा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे.
त्यामुळेच त्यांना जनतेची संपुर्ण नस माहिती झाली आहे .
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम इथल्या जनतेने केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ , शिक्षण क्षेत्र,  रस्ते,  विज, पाणी , यासाठी सातत्याने काम केले , संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर  पालखी महामार्ग, सोलापुर विद्यापीठ, कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना , उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना असेल, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव असेल असे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वे मार्ग, कुर्डूवाडी वर्कशॉप यासाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणणे , 
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे सहापदरी व चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी , नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी   केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी असी कामे मार्गी लावलेली आहेत  .जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटी ओ ऑफीस, पासपोर्ट कार्यालय, ग्रामीण रूग्णालये अशा   विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली , जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे केली . .
 सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुखात उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .
त्यामुळे विजयदादांना माळशिरस तालुक्यातील जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे .
चुकीच्यामुळे किंवा काही नेत्यांच्या  खोट्या नाराजीचे भांडवल करत  दादासाहेबांवर जर पक्षाने अन्याय केला ,
 दुय्यम वागणूक दिली , डावलण्याचा प्रयत्न केला तर इथली जनता नाराज होईलच पण पक्षाला मोठ्ठा फटकाही बसेल ,कारण माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवरील अन्यायाने  व्यथित होते व दादासाहेबांच्या पाठिशी ठामपणे उभी राहते . माढा लोकसभा मतदारसंघात सगळ्यांत जास्त मतदान हे माळशिरस तालुक्याचे आहे व या ठिकाणी तर दादासाहेब सदैव ८० ते ९० हजाराचे मताधिक्य घेतात, माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.
गेल्या लोकसभेलाही पक्षातील बर्याच लोकांनी दादासाहेबांना छुपा विरोध केला पण जनता सोबत असल्याने दादासाहेब मोदी लाटेतही निवडून आले .
त्यातही माळशिरस तालुका दादासाहेबांच्या पाठिशी ठाम उभा राहिला .
विजयदादांना व माळशिरस तालुक्याला डावलण्याचा प्रयत्न झालात तर, माढा लोकसभा व माळशिरस, करमाळा , पंढरपूर, माढा विधानसभा विनाकारण अडचणीत येण्याचीही  शक्यता नाकारता येत नाही  .
आदरणीय विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसने मानसन्मान द्यावा , त्यांच्या अनुभवाचा पक्षासाठी उपयोग करावा हीच सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची  व जनतेची भावना दिसून येते . .
मतदारसंघात फिरत असताना , टपरीवर चहा घेताना सुद्धा  गावोगावी विजयदादांच्या नावाची चर्चा होत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इच्छुक बरेच असले तरी काम आणि अनुभव विजयदादा इतका कुणाकडेच नाही हे सत्यही  लपवता येत नाही  ,माढा लोकसभा मतदारसंघात   काहीजण स्वखर्चाने जाहिराती करत अाहेत. नवीन पायंडा पाडत आहेत, लोकामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत तरीदेखील विजयदादा शांतपणे काम करत आहेत.
विजयदादांनी अमृतमोहत्सवी  वाढदिवसाच्या  करमाळा येथील सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना सहज सांगितले की , मला उमेदवारीची चिंता नाही व आजवर मि कधीच पक्षाकडे उमेदवारी मागितली  नाही , यातच दादासाहेबांचा संयम आणि दृढनिश्चय दिसून येतो .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेस येणार्‍या सर्व नेतेमंडळींना सामान्य कार्यकर्ते यांचेकडून एकच अपेक्षा आहे ति म्हणजे पक्षातील गटबाजीला कुणीही खतपाणी न घालता , गटबाजी मोडून काढावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला परत एकदा चांगले दिवस आणावेत.
सामान्य जनता भाजपासेनेच्या सरकारला वैतागली आहे या  सरकारवर नाराज आहे .
फक्त आपला पक्ष एकसंघ निवडणूकीला कोणतीही कुरघोडी न करता सामोरा गेला पाहिजे . .
यश नक्कीच आपले आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते