vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज येथील परिवर्तन सभेकडे संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष! • राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा उद्या ३० जानेवारीला सोलापुर जिल्ह्यात येणार आहे . सोलापुर जिल्ह्यात पहिली सभा अकलूज येथे होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटीलांचे अकलूज हे होम ग्राऊंड असून उद्या अकलूजची सभा विजय चौकात जंगी होईल हे नक्की .  

  • सभेसाठी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे , अजित पवार हे येणार आहेत. विशेषतः अजितदादा उद्या  काय बोलतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . . . 
  • सभा तर जंगीच होईल पण या सभेत विजयदादांच्या उमेदवारीची घोषणा होईल का ?  हे पाहण्याची उत्सुकता आहे , उमेदवारीच्या घोषणेकडे 
  • विजयदादांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे . . 
  • सभेच्या तयारी साठी अकलूजला राष्ट्रवादीच्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक विजयदादा, धैर्यशील भैय्या , बाबाराजे दादा यांचे प्रमुख उपस्थितीत   घेण्यात आली . . 
  • उद्या तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक प्रचंड संख्येने परिवर्तन सभेसाठी जाणार असल्याचे समजते . माळशिरस सह संपुर्ण माढा लोकसभा  मतदारसंघात विजयदादांनी कामाचा जो   धडाका लावला आहे व विजयदादा कामाच्या बळावर आणि दांडग्या संपर्कावर उमेदवारीचे तेच  प्रबळ दावेदार आहेत तसेच विजयदादांच्या बाबतीत जनतेत प्रचंड  सहानुभूती सुद्धा आहे . . 
  • त्यामुळे बहुसंख्य मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हे  बहुसंख्येने उपस्थित राहतील  . 
  • सभेची तयारी पाहता सभा एकदम मोठी व जंगी होणार असे दिसते . .

  मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे , मा श्री अण्णासाहेब डांगे यांचे कडून कौतुक