vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

धोरण लकवा व दुष्काळी महाराष्ट्र

धोरण लकवा आणि दुष्काळी महाराष्ट्र. . . . .
सगळीच सरकारे मोठं  मोठ्या घोषणा करतात विकासाच्या गप्पा मारतात मात्र काम कमी व गाजावाजा जास्त करतात, जनतेलाच आता कळेना नक्की कुणाला सत्ता द्यावी सगळेच कासवगतीने काम करणारे , भ्रष्टाचारात बरबटलेले . . . (प्रत्येकाची संपत्तीचे मार्ग काय व ति आमदार खासदार झाल्यावरचं वाढते कशी )
महाराष्ट्रात विविध सरकारे  आली . . . . . . . . .   पाणी आडवण्याच्या,  पाणी जिरवण्याच्या विविध योजना आणल्या  गेल्या . . . पाणी कुठे जिरले कुणास ठावूक. . त्याला कधी पाणलोट विकास हे नाव होते . . . . . .
तर कधी पाणी आडवा पाणी जिरवा ही घोषणा करण्यात  आली . . .
तर कधी नाल बंडीग. . .
कधी . . . . .
 कोल्हापुर पद्धतीचे बंधारे  करायचा घाट झाला . . . यातील काहीच कामे झाली नाहीत असे नाही पण. . ..झाली ती  कासवगतीने . . . .
कधी पाझर तलाव झाले तर लघू व मध्यम व मोठेही सिंचन प्रकल्प झाले . . .
या ही सरकारने मोठा गाजावाजा करत नेहमीप्रमाणेच  पुर्वीच्या योजनांचे नाव बदलत *जलयुक्त शिवार* ही योजना सुरू केली . . ..काम कमी व भ्रष्टाचार जास्त. . . याही योजनेने 
पण महाराष्ट्रातील दुष्काळ काही  हटला नाही , व भ्रष्टाचार काही थांबला नाही. . . . . .  महाराष्ट्रातील सर्वच राज्यकर्ते ऐकमेकावर दुष्काळाचे खापर फोडून मोकळे होतात. . .
पण ते प्रश्न तळमळीने शास्त्रीय दृष्ट्या योग्य प्रकारे हाताळत नाही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रश्नांचे गांभीर्य बिलकुल नसते , नको त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला जातो , सभा मंडप, धार्मिक ठिकाणे  , कंपाऊंड, हे खर्च बिनकामाचे  केले जातात पण. . . . . . .
पाणी , विज, रस्ते , हे सर्वात महत्त्वाचे विषय बाजूला ठेवले जातात. . . विज व
पाण्याच्या बाबतीत तर सरकार उदासीन दिसून येते . . . *जलयुक्त शिवार योजनेत* तर
ओढ्यातील गाळ काढून तो बाजूला टाकला गेला . . .  हजारो ब्रास वाळू ही संपत्ती खनीज संपत्ती  माती मिश्रीत केली  व संपुर्ण जनतेला वाळूचा तुटवडा निर्माण केला मुळात . .
वाळू ही काही आभाळातून पडत नाही कि ती निर्माण सुद्धा  करता येत नाही . . .
ति पाण्यावाटेच छाटे नाले , ओढे , नदी असा प्रवास करत असते मात्र सरकामधील लोकांनी सगळे ओढेच उपसून गाळ व वाळू एकत्र केले आज वाळू वाळू करून महाराष्ट्रातील जनता बोंब मारत आहे . . .
नैसर्गिक ओढे खोल करायची गरज नसतेच तर त्या ठिकाणी आढवे बांध ठिक ठिकाणी टाकून पाणी आडवायचे असते ते पाणी वाळूत जास्त मुरत असते . . . .
पण मलई खाणार्या राज्यकर्त्यांना त्याच कुठं काही पडलेलं असतय. . .
जल तज्ज्ञ अनिल पाटील. .
राजेंद्रसिंह यांनी सुचवलेल्या गोष्टींचा विचार केलाच नाही
उलट ओढ्यात जेसीबी चालल्याने माती पोकळ झाली व ओढे मोठ्या प्रमाणात खचले गेले व हजारो ब्रास सकस पिकावू माती पाण्या बरोबर वाहून गेली व नुसती वाहूनच गेली नाही तर धरणांमध्ये जावून साठली . . . .
पण मुख्यमंत्री A Cत बसून जलयुक्त शिवार मोठ मोठ्याने करत बसले . . .
मुळात महाराष्ट्रातील जनतेला मध्यम, लघू पाटबंधारे प्रकल्पांची जास्त गरज आहे . . .
त्या प्रकल्पास जमिनी कमी लागतात व पुनर्वसन जास्त करावेच लागत नाहीत किमान ५ ते १० गावांचे पाणी प्रश्न सुटतात व लोकांना दिर्घकालीन कायमस्वरूपी रोजगारही मिळतो व त्यातून अप्रत्यक्ष कर सुद्धा मिळतोच. . . . . .
पण धोरण लकवा नसेल तर ना . . .

धोरण लकवा व दुष्काळी महाराष्ट्र


रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

शेतकर्यांची परवड थांबेल कधी

शेतकर्यांची परवड  थांबेल कधी ?

कधी पाण्याची चिंता, कधी अनियमित वीज,कधी डीपीचा घोटाळा, कधी मोटारीचा घोटाळा,  तर कधी बेभरवशी बाजार भाव तर कधी ओले संकट तर कधी दुष्काळ, तर कधी
भांडवलाची कमतरता,
कधी वादळ तर कधी गारपीट
कधी रोगराई तर कधी मजुर टंचाई तर कधी  जंगली जणावरे व उंदीर घुस यांचा त्रास कधी भेसळयुक्त खते तर कधी
डुप्लिकेट बीयाने तर कधी
बोगस खते शेकंडरीच्या नावाने २५० रु बॅग ७००रू शेतकर्यांना विकणे,

या सर्व समस्यांचा सामना करत शेतकरी शेती करतो
पण याची जाणीव कित्येक लोकांना नाहीच,
बीगर चप्पलने अनवाणी फिरणारा शेतकरी, गाई, गुरे वासरे, शेळ्या मेंढ्या कोंबड्या सांभाळत संसाराची गाडी ओढणारा शेतकरी बांधव बघून वाईट वाटते, त्याच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत नाही, त्याला मोफत दवाखाना नाही, त्याच्या लेकी बाळींना संरक्षण नाही, सणासुदीला कपडे नाहीत, आनंदाचे काहीही नाही, वरून बँका सावकार यांचा जाच चालूच, शेतकर्यांना सगळे कायदे कडक,
कित्येक वर्ष झाली महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी हात रुमाला खालून व्यापर होतोय, मुंबईत तर शेतकरी अक्षरशः लुटला जातोय,
आडत मुक्तीची घोषणा झाली तरीही अनेक ठिकाणी डायरेक्ट रोख रक्कम पट्टीवर न दाखवता आडत वसूल केली जात आहे,
शेतकर्यांची कोंडी केली जात आहे,
जो पर्यंत शेतकर्यांचा माल बाजारांत येत नाही तो पर्यंत कोणताही माल दुप्पट तिप्पट किंमतीला ग्राहकाला विकला जातो,
पण तोच माल शेतकर्या जवळ आला कि बाजारांत दर प्रचंड प्रमाणात घसरतात नव्हे पाडले जातात,
यातूनही शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो,
रात्रंदिवस कष्ट करून उत्पादन घेतो
पण
सरकारचा जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायदा,
आयात निर्यात धोरण शेतकर्यांच्या  मुळावर उठते!
शेतकरी मेला तरी चालेल पण
फुकट खाणारा, लांखोंची कमाई असूनही फक्त शेतमालाच्या महागाई बाबतीत बोंबाबोंब करणारा वर्ग जगला पाहिजे हे धोरण
शेतकर्यांच्या मुळावर उठते आहे,
जगाच्या बाजार पेठेतून परकीय चलन घालवून शेती माल आयात केला जातोय, पण इथे शेतमाल कवडीमोल दराने जावूनही निर्यात  बंदी करून शेतकर्यांची कोंडी केली जाते आहे,  स्वदेशीचा पुरस्कर करणारे आपण
विदेशी कंपण्यांना भारतात गुंतवनूक करायला पोत्साहन देत आहोत,
हजारो कोटीचे कर्ज व टॅक्स उद्योजकांना माफ होतोय
पण
सामान्य शेतकरी यांची कर्जमाफी होत नाही,  मध्यम व छोटे व्यापारी यांची टॅक्स साठी वेगवेगळया नियमाने छळवणूक केली जात आहे,
शेतकरी मालाची वाहतुक व आवक जावक करणारांकडून भरमसाठ टोल वसुली केली जात आहे,
पण
चैनीच्या लाखो रुपयांच्या कार गाड्यांचा टोल मात्र माफ होत आहे,
आंतरराष्ट्रीय बाजारत क्रुड तेलाच्या किंमतही ७० %घटूनही
ग्राहकाला मात्र पेट्रोल डीझेल महागाईनेच घ्यावे लागत आहे
शेतकरी विकास फक्त भाषणात व थातूरमातूर योजणात निव्वळ दाखवला जातो आहे,
शेतकरी व शेतमजूर गोरगरीब आज मरत आहेत व उद्योगपती मात्र आनंदात आहेत
याचा शेतकर्यांच्या मुलांनी विचार करायला पाहिजे,
जातीपातीच्या बंधना ऐवजी शेतीसाठी पुरक धोरणे राबणारे जे कोणी काम करेल त्यालाच साथ दिली पाहिजे,
घरात पिठ नसल्यावर कोणी पावणा रावळा, आपल्या जाती धर्माचा म्हणून पिठ आणून देत नाही,
शाश्‍वत शेतीचा विकासच देशाला प्रगती करू देवू शकतो

विजयकाका पिसाळ नातेपुते