vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १८ मे, २०१९

नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार मा. श्री शंकर नाना जानकर हे नुकतेच भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले , त्यांच्या यशस्वी कारकीर्दचा घेतलेला हा आढावा .











चालू घडामोडींचे विश्लेषण


नुकतेच नातेपुते गावचे सुपुत्र सुभेदार *मा श्री शंकर नाना जानकर*  हे ३० वर्षांच्या प्रदीर्घ  सैन्यदलातील यशस्वी सेवेनंतर सेवानिवृत्त झाले . . .
 त्यांच्या सैन्यदलातील व शालेय जीवनातील खडतर  कारकीर्दीचा आढावा घेतलाय लेखक, कवी, सामाजिक व राजकीय विषयांचे अभ्यासक आणि  वक्ते  श्री विजयकाका  पिसाळ नातेपुते  यांनी . . . . . . .

नातेपुते गावच्या पश्चिमेस कॅनॉल लगत जानकर वस्ती आहे. या वस्तीवर  नाना मारूती जानकर व त्यांच्या पत्नी हौसाबाई नाना जानकर रहाण्यास होते ते दोघे मिळून  आपला पारंपारिक मेंढपाळाचा (मेंढी पालनचा ) व्यवसाय करत होते. घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची होती . मेंढपाळाचा व्यवसाय असल्याने मेंढ्यांना चारा उपलब्ध होईल त्या ठिकाणी त्यांना मेंढ्यांना घेऊन चारणी (चारण्या) साठी वेगवेगळ्या भागात जावे लागत असे,  सोबतीला लहान  लहान मुलं एक दोन घोडी, त्यावर जीवनावश्यक सर्व पसारा, वाघरी , घोंगडी ,  लहान लहान कोकरी , करडं , टाकायची व  शेळ्या, मेंढ्या ,  कोंबड्या , सोबतीला घेऊन,  राखण करायला इमानदार दोन ते चार श्वान  बरोबर घेऊन गावोगावी फिरायचे व मुलांचे संगोपन करायचे,  संसाराचा गाडा हाकायचा, शेळ्या व मेंढ्या यांना चारा व पाणी  मिळावे  म्हणून त्यांना भटकंती करावी  लागत असे,  बहुतांश वेळा चार ते पाच महिने नातेपुते गावात व ७ ते ८महिने त्यांना  बाहेरगावीच रहावे लागत असे , प्रामुख्याने ते वाई, सातारा या भागात दिवाळी संपली की,  नातेपुते परिसरातील चारा संपल्या नंतर  उन्हाळ्यात व पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत तिकडेच गावोगावी रहात असत. . .  नाना व हौसाबाई यां दाम्पत्याला ,
 कै दशरथ नाना जानकर
श्री दाजी नाना जानकर
श्री मोहन नाना जानकर
श्री बाळू नाना जानकर
श्री शिवाजी नाना जानकर
श्री शंकर नाना जानकर
श्री सुखदेव नाना जानकर
श्री बापुराव नाना जानकर
ही मुले झाली . . .
या पैकी  श्री दाजी नाना जानकर, श्री शिवाजी नाना जानकर व श्री शंकर नाना जानकर हे तिघेजण भारतीय लष्करात विविध हुद्यावर सेवा करून यशस्वी सेवानिवृत्त झाले . . . . . . . . सहाजिकच या कुटूंबात शिस्तिचे व देशप्रेमाचे वातावरण त्याकाळी  तयार झाले होते व आजही पुढच्या पिढीत आहे,
या अगोदरच लष्करी सेवेतून  दोघे म्हणजे दाजी नाना जानकर व शिवाजी नाना जानकर सेवानिवृत्त झाले असून,   सुभेदार *श्री शंकर नाना जानकर* यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने  सैन्यदलातील दैदिप्यमान कारकीर्दचा या लेखात आढावा घेतला  आहे . . .
 *श्री शंकर नाना जानकर*  यांचा जन्म १ जून १९६९ साली गरीब हिंदू  धनगर कुटूंबातील मेंढपाळाच्या घरी झाला त्यांचे वडील नाना व आई हौसाबाई व जेष्ठ बंधू  यांनी कठीण परिस्थितीत  त्यांचे संगोपन व शिक्षण यासाठी पोत्साहन दिले.  शंकर जानकर यांचे  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण हे दाते प्रशाला नातेपुते या ठिकाणी झाले . .
घरची परिस्तिथी अतिशय हलाखीची व  बेताचीच असल्याने त्यांना सैन्यदलात जाण्या अगोदर विविध ठिकाणी रोजंदारीवर कामाला जावे लागत असे,  कुटूंब मोठे असल्याने केवळ आई वडील व मोठ्या भावांच्या कष्टावर  घर चालणे तसे कठिण होते.  त्यामुळे त्यांना शिक्षणाचा व  वह्या पुस्तकांचा खर्च भागवण्यासाठी शनिवार, रविवार व दिवाळी आणि उन्हाळ्यातील सुट्टीत कामाला जाणे व कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता . . . घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व घरातच आई वडीलांकडून देशसेवेचे धडे मिळाल्या मुळे श्री   शंकर नाना जानकर यांनाही सैन्यदला बद्दल विशेष आकर्षण होते व त्यांचे शरीर कष्टाचे आणि चपळ असल्या कारणाने त्यांनीही सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला .
मुळातच घरातील मोठे दोन बंधू सैन्यदलात असल्याने व संपुर्ण कुटूंबातील लोकांनाही देशाबद्दल विशेष प्रेम असल्याने त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा जो निर्णय घेतला त्याला घरातील सर्वांनीच मनापासून पाठिंबा दिला व साथही दिली . इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण पुर्ण होताच ते  ९/४/१९८९ ला सैन्यदलात भरती झाले . जरी ते इयत्ता १२ वि नंतर भरती झाले तरीदेखील त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले ,  जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर  स्वकर्तृत्वाने ते  एक एक टप्पा पुर्ण  करत पदोन्नती मिळवत गेले  . . .
सन १९८९ला ते  सैनिक म्हणून भरती झाले ,  परंतू अभ्यासू वृत्ती व  कर्तृत्व याच्या बळावर ते
१५/८/१९९७ला लान्स नायक झाले  नंतर
१/४/२०००साली नायक म्हणून त्यांना  बढती मिळाली . त्यांच्या  उत्कृष्ट सेवेमुळे
१७/८/२००५ ला हवालदार म्हणून परत बढती मिळाली .
त्याच प्रमाणे १/३/२०१३ साली नायब सुभेदार या पदावर पोहचले आणि १/३/२०१५ ला मा श्री  शंकर नाना जानकर हे सुभेदार झाले . . . हा त्यांचा लष्करातील प्रवास साधासुधा नव्हता तर प्रत्येक टप्प्यावर त्यांना खडतर आव्हानांचा सामना करावा लागला,  या प्रवासात त्यांनी स्वतःचे मनोबल वाढवले आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून  प्रवास केला   . . लष्करातील सेवेच्या काळात त्यांना विविध पदावर काम करताना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली  व विविध आव्हानांचा सामना करण्याचे सुद्धा प्रसंग आले . त्यांनी आपल्या सेवेच्या काळात, आसाम (तेजपुर ), उत्तर प्रदेश (इलाहाबाद ), जम्मू काश्मीर (श्रीनगर ), पंजाब (जालंधर ),  महाराष्ट्र (पुणे) , परत जम्मू काश्मीर (कारगिल ), परत महाराष्ट्र मुंबई, परत उत्तर प्रदेश (मेरठ )जम्मू काश्मीर (महू), नागालँड, आंध्र प्रदेश, सिक्कीम, परत पंजाब(भटींडा), परत महाराष्ट्र (पुणे),
इतक्या ठिकाणी काम केले व विविध ठिकाणी प्रवास करावा लागला व लष्करी सेवेचे आव्हानात्मक काम  करावे लागले . जम्मू काश्मीर मध्ये १९९९ ला देशसेवा बजावत असतानाच पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी कारगिल मध्ये घुसखोरी केल्याचे निदर्शनात येताच भारतीय लष्कराने त्यांना पिटाळून लावण्यासाठी , युद्ध सुरू केले यात सहभागी होऊन शेकडो अतिरेकी व पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावण्याची मोलाची  कामगिरी भारतीय सैनिकांनी  केली यात नातेपुते  गावचे सुपुत्र म्हणून सुभेदार शंकर नाना जानकर यांनी मोठे काम केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . ऑफरेशन विजय मध्ये सुद्धा त्यांनी  महत्वपुर्ण भुमिका निभावली . .
लष्करातील सेवा करत असतानाच   वर्षा सिताराम गावडे  एकशीव  यांचे बरोबर दिनांक  २७ /९/१९९२ रोजी त्यांचे  लग्न झाले व आपल्या सुखी संसाराची सुरवात केली वर्षा यांचे बरोबर केली , कु.  वर्षा  गावडे  शंकर नाना जानकर यांचे बरोबर विवाह बंधनात आडकल्या नंतर सासरी नातेपुतेला सौ . वर्षा शंकर जानकर झाल्या व  त्यांनी आपल्या पतीला पुर्णपणे साथ दिली,  घरातील संपुर्ण जबाबदारी  व मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले , आज या सुखी दाम्पत्याची दोन्हीही मुले उच्च शिक्षित असून  कु अंकिता या डॉक्टर झाल्या आहेत  व अमरजित यांनी डी फार्मसी केलेले आहे .
अशा नातेपुते गावच्या सुपुत्राचा सेवा निवृत्ती निमित्ताने यथोचित गौरव होतोय. . . व पुढील आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा . . .
प्रेस नोट. . . . . .
*दिनांक १६/५/२०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता  नातेपुते गावचे सुपुत्र  सुभेदार श्री शंकर नाना जानकर हे तिस वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाले . . . .*

*या  निमित्ताने त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ माजी सैनिक संघटना , ग्रामपंचायत नातेपुते व गावातील जानकर कुटूंबावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी विधान परिषदेचे आमदार मा श्री  आर जी रुपनवर यांचे  शुभहस्ते आयोजित केला होता . .*
*सदर कार्यक्रमाला . . .*
*माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती किशोर सुळ, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते गावचे सरपंच श्री  बी वाय राऊत वकील व युवा नेते दादासाहेब उराडे, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, सामाजिक कार्यकर्ते श्री विजयकाका पिसाळ, मार्केट कमिटीचे संचालक सुधीर काळे, प्रतिष्ठीत व्यापारी श्री महेश शेटे, सनीभैय्या देवकाते पाटील,*
 *श्री रणजित सुळ, रणवीर देशमुखआदी मान्यवर उपस्थित होते*.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन करून व त्यांच्या माता पित्यांच्या प्रतिमांचे पुजन करून करण्यात आली . सुरवातीला विविध ठिकाणी सेवा बजावत असताना जे लष्करातील जवान शहिद झाले आहेत त्यांना सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली . सदर कार्यक्रमाचे  प्रास्तविक माजी सैनिक व अधिकारी  श्री मानाजी जगताप यांनी केले
*या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते*
*श्री विजयकाका पिसाळ, माजी सरपंच श्री रावसाहेब पांढरे, विद्यमान सरपंच बी वाय राऊत वकील  व आमदार श्री आर जी रुपनवर यांची समयोचित* व *सुभेदार शंकर नाना जानकर यांच्या लष्करी सेवेतील कामगिरी बद्दल गौरवपूर्ण उल्लेख व अभिनंदन करणारी आणि लष्करी सेवेचा आढावा घेणारी  झाली भाषणे झाली*
या प्रसंगी बोलताना आमदार  आर जी रुपनवर म्हणाले की , शंकर नाना जानकर यांच्या सारखे सुपुत्र या मातीत जन्माला येत आहेत तो पर्यंत आपल्या देशाच्या सिमा सुरक्षित आहेत,  ज्या माता पित्यानी त्यांना घडवले व ज्या धर्मपत्नीने आजवरच्या वाटचालीस साथ दिली यांचेही कौतुक केले पाहिजे अशी भावना आमदार रुपनवर यांनी व्यक्त केली , त्याचप्रमाने आर जी रुपनवर पुढे बोलताना म्हणाले की , जवान सिमेवर लढतात व शेतकरी कष्ट करतात म्हणून आपण सुखाची झोप व आनंदाने दोन घास खाऊ शकतो .
*सुभेदार श्री शंकर नाना जानकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या लष्करी सेवेतील खडतर कामगिरीचा आढावा घेतला . . .*
*नातेपुते गावातील जानकर कुटूंब हे एकमेव असे कुटुंब आहे की एकाच कुटूंबातील सख्खे तिन भाऊ लष्करी सेवेत होते व लष्करी सेवा पुर्ण करून नातेपुते गावात सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. . .*
*या आनंदायी  कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरीक व लष्करी सेवेतून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक व माता भगिनी उपस्थित होत्या*
*शब्दांकन. . . श्री विजयकाका पिसाळ नातेपुते . . .*