vijaypisal49. blogspot. com

सोमवार, १८ मार्च, २०१९

मा. श्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, जनता तुमच्या निर्णयाची वाट पहात आहे, मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणार्‍या जनतेला या राजकारणाचा व कट कारस्थानांचा विट आलाय, आता निर्णय घ्या !

चालू घडामोडींचे विश्लेषण
दादासाहेब शांत बसू नका . . . 
जनता आता तुमच्या निर्णयाची वाट पहाते आहे . . . 
विजय (काका) पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून! 
बांधवांनो पुर्ण  वाचा व  जागे व्हा ! 
२०१४ साली मोदी लाट असताना भल्या भल्यांची जीरली कित्येक मजबूत गड व बुरूज ढासळले  असंख्य मातब्बरांचा  पालापाचोळा होऊन ते हारले,  राजकारणातून संपले !  काहींनी तर चक्क रणांगणातून  लढाईतून पळ काढला . . .  पण त्याही  वादळात लाट परतवून लावली ति फक्त आणि फक्त मा श्री  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेबांनी . समोरचा गडी होता भावनेला हात घालणारा ,   रान पेटवणारा,  भाषणबाजीत पटाईत असणारा, हा  गडी सुद्धा चारीमुंड्या चित केला . . . 
 होय सदाभाऊला अस्मान दाखवले  आणि विजयसिंह मोहिते पाटील तथा  दादासाहेब असंख्य  घरभेदी असतानाही विक्रमी मतांनी निवडून आले. कदाचित पक्षांतर्गत विरोधकांना  याचे खूप वाईट वाटले असणार? 
 . . . 
दादासाहेब जिंकले कारण दादासाहेबांना लाभलेले जनसामान्य  जनता जनार्दनाचं  प्रेम ..
दादासाहेब जरी पट्टीचे व फर्डे वक्ते नसले तरीही  मोजके व कामाचे बोलतात ,बोलण्यात तळमळ असते व स्वच्छ आणि प्रामाणिक भावना असते ! 
 कदाचित  भाषणात थोडेफार कमी असले तरीही  कामाच्या जोरावर त्यांनी जनमानसात  आपले आपुलकीचे   स्थान निर्माण केले आहे.. भाषणबाजी करत बसण्यापेक्षा कामं करत रहाणं हा दादासाहेबांचा स्थाईभाव आहे..
गेल्या पाच वर्षात संसदेत 
महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह मध्ये दादासाहेबांचे काम असताना सुद्धा . . . पवार साहेबांवर निष्ठा व निवडून येण्याची क्षमता असतानाही,  तसेच  विद्यमान खासदार असतानाही 
 पवार साहेबांनी विनाकारण 
प्रभाकर देशमुख यांना कामाला लावले तसेच,  दीपक साळुंखे  , बबन शिंदे, रश्मी बागल यांचे चुकीचे ऐकुन म्हणा किंवा गैरसमज होऊन म्हणा दादासाहेबांना पराकोटीचा त्रास दिला . . . 
 प्रभाकर देशमुखांना मतदारसंघात फिरायला सांगून संभ्रम निर्माण केला ,,वातावरण गढूळ केले,  राष्ट्रवादी साठी सेफ व अनुकूल असणारा मतदारसंघ हातानेच  प्रतिकूल करून ठेवला . . प्रभाकर देशमुख किंवा इतर कोण चालत नाही असे दिसताच स्वतःच्या उमेदवारीचे  घोडे दामटले, जनमताचा अंदाज न घेता , विजयदादांनीच मला उभे राहण्याचा अग्रह केल्याचा बनाव निर्माण केला , तरीदेखील निष्ठावंत दादासाहेबांनी साहेबांच्या विरूद्ध एक शब्द काढला नाही, 
 मात्र इथला स्वाभिमानी मतदार पेटून उठला , उठाव करू लागला दादासाहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस साहेबांच्या कुटील डावामुळे हैराण झाला , जनमत विरोधात गेल्याची  जाणीव झाली व मग साहेबांनी  माघार घेतली . . यात मोहिते पाटलांचा काय दोष! 
हे रामायण घडत असताना  पुलाखालून बरेच पाणी वाहिले . . . 
पुलाखालून पाणी वाहिल्या नंतर परत दादासाहेबांनाच उभे रहाण्याचा आग्रह केला  गेला . ..पण मनातुन दुःखावलेले दादासाहेब लढायच्या मुडमध्ये नव्हतेच. . . 
पण तरीही दादासाहेबांनी झाले गेले विसरुन नम्रता व साहेबांचा  मान राखून रणजितदादांसाठी तिकिट द्या अशी मागणी केली पण परत तिच -ती तकलादू कारणे पुढे करून निर्णय प्रलंबित ठेवला गेला . . . 
निर्णय प्रलंबित का ठेवला  
 तर  पक्षांतर्गत कुरघोडी ... जे निष्ठावंत नाहीत त्यांचे ऐकणे ,  यामुळेच  वातावरण गढूळ होऊन  गेलं.. ज्या  विजयदादांनी पक्षासाठी व साहेबांसाठी त्यागाची सदैव भूमिका घेतली,  साहेबांचा  प्रत्येक शब्द प्रणाम मानला तिथेच वारंवार  अशा पद्धतीने अवहेलना केली गेली . .  गेली अनेक  वर्ष  सरपंच, जि. प अध्यक्ष,  मंत्रीपदावर, आमदार,ते उपमुख्यमंत्री ,  खासदार,  असल्यापासून जी  कामे केली , जनतेशी नाळ जोडली,  लोकांमध्ये प्रेम मिळवले  व पक्षासाठी कास्था  खालल्या त्याचाही पक्षाने विचार करू नये या पेक्षा आश्चर्य ते काय असू शकते . . 
दादासाहेबांनी उभ्या आयुष्यात सत्ता  कधीच  भोगली नाही तर  सत्तेचा  वापर जनतेसाठी तन मन धनाने केला व  पक्षासाठीही खूप काम केले , 
खरेतर  त्यामुळेच  त्यांचा  मतदारसंघावर प्रथम हक्क होता व आहे . आणि राहिल. . . 
कामाच्या जोरावरच मतदारसंघावर  मजबूत पकड सुद्धा ठेवली  आहे . 
असे असताना नवीन पिढी राजकारणात सक्रिय होत असताना व नव्या पिढीला संधी देण्याची भूमिका असताना , रणजितदादांसाठी तिकीट मागितले तर काय चुकले , रणजितसिंहदादा हे  दादासाहेबांचे नुसते सुपुत्रच नव्हे तर एक उमेदे नेतृत्व म्हणून तरी संधी मिळाली पाहिजे ही लोकभावना आहे.  रणजितसिंहदादांना एक हुशार संघटक म्हणून आणि तरुण रक्ताला म्हणून तरी वाव द्यायला हवा होता . . . 
नवखे पार्थदादा केवळ घरातील म्हणून चालतात? 
पण रणजितसिंहदादा नकोत? 
 पक्षाशी एकनिष्ठ नसणार्या व कानफुकण्यात हातखंडा असणार्‍या लोकांचे ऐकून साहेबांनी रणजितसिंहांच्या उमेदवारीचा  निर्णय घेतला नाही . . याचेच लोकांना  खूप वाईट वाटले . . 
ज्या रणजितसिंहांनी पक्षाच्या बांधनीसाठी जीवाचे रान केले , पक्ष चांद्या पासून बांद्या पर्यंत वाढवला  त्यांनाच अशी वागणूक असेल तर पक्षासाठी कोण काम करेल?  सामान्य कार्यकर्ता कसा जोडला जाईल. . . आज माढ्यातील  जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे . . भयंकर चिड आहे . . 
काही पत्रकार व मिडीयाला हाताशी धरून मोहिते पाटील कुटूंबाची जी  बदनामी करण्याचा कुटील डाव खेळला जातोय  त्याचा तर विट आलाय पण या मतदारसंघातील जनता हे कुटील कारस्थान व  डाव निश्चितपणे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही . . 
मोहिते पाटील घराणे हे ब्रँड असून ब्रँड संपत नसतो व तो संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही त्याची झळ निश्चितपणे लागल्या  शिवाय राहणार  नाही . .  
 असल्या खेळ्यामुळे  जनतेमध्ये व  मतदारांमध्ये खूप मोठा रोष राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या विरोधात निर्माण होत आहे. 
  इथल्याच  काही फितूर लोकांमुळे सोलापुर जिल्ह्याचे  गेल्या दहा वर्षांत  खूप मोठं नुकसान झालं  आहे व याची जाणीव संपुर्ण सोलापुरच्या जनतेला झाली आहे , 
त्या गद्दारांना जनताच धडा शिकवेल, 
आमच्या लोकप्रिय नेतृत्वाची अवहेलना व होत असलेली  मुस्कटदाबी इथली जनता कदापि सहन करणार नाही , त्याची   सव्याज परतफेड  करेल हे मात्र निश्चित आहे . . जनमानसात तिव्र प्रतिक्रिया आहेत  सामान्य लोक म्हणतात. . आजवर 
जीतकी  मुस्कट दाबी झाली आहे , जीतका त्रास झाला आहे ! 

 आता  बसं झाले , अती झाले , पुरे झाले  ! 
मोहिते पाटील हे नामांकित घराणे सोलापूर जिल्ह्याची शान व अभिमान आहे . 
 त्यांना दिला जाणारा त्रास जनता उघड्या डोळ्यांनी पहाते आहे. . काही इथले बेईमान मोहिते पाटीलांनी मोठे केलेले कोल्हे आज साहेबांचे कान भरतात व साहेब त्यांना जास्त सिरियस  घेतात हेच विशेष आहे , पण त्यामुळे पक्ष संपण्याच्या वाटेवर आहे त्याचं काय? यांना
पक्ष वाढवायचा का संपवायचा ! हेच कळत नाही . . 
राजकारणात एखादं नामांकित घराणे  संपवण्याचा  कुटील डाव आखला जातो  त्यावेळी मात्र स्थानिक जनता त्या घराण्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी रहाते . . हा इतिहास आहे , विलासराव देशमुख, अनंतराव थोपटे , पृथ्वीराज चव्हाण,  सदाशिव मंडलिक, व अशी  असंख्य घराणी संपवण्याचा अयशस्वी प्रयोग केला गेला पण ठरावीक  काळानंतर ही घराणी परत जोमानं उभी राहिली कारण तिथल्या जनतेला परकं कोण आपलं कोण यातील फरक लवकर कळतोच!   इथल्याही जनतेला नक्कीच कळेल. . . महाराष्ट्रातील 
 स्थानिक जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी  राहीलीच ..
मोहिते पाटील कुटूंबातील कोणीही  कोणत्याही पक्षातून उभे राहिले तरी त्यांचा विजय हा निश्चित होईल कारण इथली जनता स्वाभिमान जपल्या शिवाय राहणार नाही . . 
 माढा मतदारसंघातील जनता दादासाहेबांना व रणजितसिंहदादांना विनंती करतेय की ,,राष्ट्रवादीने तिकीट दिले तर ठिकच पण विनाकारण तिकीट नाकारले तर मात्र कोणत्याही पक्षातून उभे रहा कारण आमचा आता मोहिते पाटील हाच पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला निवडून यायला काहीच अडचण येणार नाही . . अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनता पेटून उठेल व 
प्रचंड मतांनी मोहिते पाटील घरातील कुणीही असले तरी निवडून येईल  हे निश्चित आहे . 
विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब  यांच्यावर मनापासून प्रेम करणारा व मोहिते पाटील परीवारावर निष्ठा ठेवणारा एक कार्यकर्ता . . . . म्हणून हा 
लेखन. . . प्रपंच! 
श्री विजय(काका )पिसाळ नातेपुते ९६६५९३६९४९