vijaypisal49. blogspot. com

रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

मन

मन. . . .

मन तस प्रत्येकाचं वेगवेगळं असतं . .
कुणाचं मन  प्रेमाचं भुकेलं असतं. .
तर कुणाच  मन आपुलकीने भरलेलं असतं. . .
काळोखात सुद्धा चांदण्याची चममच पाहतं . .
तर लख्ख प्रकाशात अंधारात चाचपडतं . . .
कधी कधी ते खोलवर
तर कधी कधी ते दुरवर असतं . .
कधी ते खूप भावनिक असतं. .
कधी ते कठोर सुद्धा होतं . . शेवटी ते मनच असतं . .
कधी खूप खूप हळवं होतं . .
तर कधी फुलांपेक्षाही नाजूक होतं . . .
कधी ते भुतकाळात रमून जातं. . .
तर कधी भविष्याचा भला मोठा वेध घेतं . .
आयुष्याचा प्रत्येक  निर्णय हे मनच घेतं . .
सुंदर आनंदी  काळासाठी नुसती वाट पाहातं. . .
कधी कधी एकांतात मजेशीर  गाणीही गातं . .
तर कधी कधी जोडतं निरभ्र  आभाळाशी घट्ट नातं . .
रमतं कधी स्वप्नात. . .
कधी जोडतं भावनिक नातं कुणाच्या तरी ह्रदयात. .
तर कधी हळुवार लपतं कुणाच्या तरी मनात. . .
नाही अडकत कसल्याही परिघात. . . .
जगण्याचा आनंद फक्त मानायला मिळते मनातल्या मनात. .
होतं कधी कधी फुलपाखरू क्षणात. .
हिंडत असते एकटच रानावनात. . .
स्वप्नरंजन करतं कधी  जायचं काचेच्या महालात. .
तर विसावतंं कधी लहाशा झोपडीतं. . .
मनाला आवडतात नाती , म्हणून आपलेपण पाहतं प्रत्येकात. .
कळत नकळत घर करतं रे कुणाच्या तरी ह्रदयात. .
नसलं बळ जरी दमलेल्या शरीरात. .
तरी खूप उंच उंच भरारी घेतं रे स्वप्नांच्या जगात. .
मनाला  भास काय  किंवा  अभास काय? नसतो फरक कळलेला , गप्पा गोष्ठी फक्त होतात रे मनातल्या मनात. .
कधी होतं ते व्यक्त क्षणात. .
तर कधी गुंतून जातं खोल खोल विचारात . . .
परिभाषाच वेगळी त्याची , शोधत आनंद स्वप्नात. .
मनाला काहीच फरक पडत नसतो वास्तवात. .
मनाची घालमेल ओळखायला सुद्धा प्रेमळ    विचार असावेच लागतात मनात. .
मन जातं रे , मन येतं रे , मन बोलतं रे मन तोलत रे
आयुष्याला शोधत शोधत सु़ख दुःख सर्व पाहतं आतल्या आत. .
मन नसेल तर नसते रे मजा या जगण्यात. .
विचार तर करा मनातल्या मनात. . . . विजय पिसाळ, नातेपुते . . . .
९४२३६१३४४९