vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

आमचा २०१६ चा गणेशोत्सव

आमचा गणेशउत्सव!!!

गणेशाचे आगमन होणार आणि सगळ्यांना आनंद होणार
हे तर नक्कीच चित्र सर्वांच्या घरी असतेच
आमच्या सौं नी घरातील आवरा आवर केली
मि,माझी मोठी मुलगी विअर्ती,लहान मुलगी स्वेतश्री व छोटे चिरंजीव  हिंदवीर
असे आम्ही चौघेजण मुर्ती आणायला गेलो आगोदरच ठरल्या प्रमाणेच सगळ्यांत लहान असणारी श्रींची मुर्ती किंमतीत घासाघीस न  करता खरेदी केली प्रसादासाठी
घरच्या ओल्या नारळाचे मोदक करून व साधेपणाने सजावट इतर कोणताही खर्च न करता गणेश प्रतिष्ठापना केली.
शेतातील दुर्वा आणि घरीच बनवलेला नैवेद्य व आरती व साधेपणा हे आमच्या कडील वातावरण असते
मि घरात असो नसो आमच्या सौभाग्यवती नियमीतपणे दोन वेळा आरती व पुजा करतात आणि मुलांना सर्व कामात बरोबर घेतात
मला आपल्या संस्कृतीत  असलेले सर्व सण उत्सव आवडतात
आमच्या कडे सगळे सण सर्व सगळ्यां समाजातील लोकांना सहभागी करून साजरे केले जातात
शक्यतो साधेपणा जपुन
आपल्या आसपासच्या गरिबांचा विचार करून कोणताही माज न करता आम्ही परंपरा जपतो
बहुसंख्य आपले बांधव दोन वेळच्या भाकरी साठी धडपडत असताना अनावश्‍यक खर्च करून आपण कशासाठी नसलेल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करावे हाच विचार मनात असतो.
आपल्या परंपरा जपताना सण उत्सव पारंपारिक पद्धतीनं व्हावेत हा आमचा प्रयत्न राहतो
घरातील वातावरण भक्तिमय व प्रसन्न कसे  राहील आणि सर्वांना आनंद कसा मिळेल हे महत्त्वाचे वाटते
रोजच्या जीवनातून आपणाला ताण कमी व्हावेत हाच सणावारांचा खरातर उद्देश असावा पण
नको तिथे शेजारी आणि श्रीमंतांची बरोबरी करण्याच्या नादात आपला खर्च वाढतो व आपले बजेट कोलमडून जाते आणि आपण महागाई व परस्थितीला दोष देतो
सर्वच मंडळे व लोकांनी कमित कमी खर्चात उत्सव केला,
वर्गनीचा बोजा कमीतकमी सर्वांवर टाकला व अनावश्‍यक खर्च टाळला व गरीब,गरजू मुलांना शिक्षणासाठी मदत केली
पारंपारिक वाद्यांचा वापर केला
कोणत्याही जाती धर्मावर टीका न करता कुणालाही नावे न ठेवता
आपले उत्सव व परंपरा जपल्या आपल्या उच्च व महान संस्कृतीचे दर्शन घडवले तर मनाला व सर्वच लोकांना किती आनंद होईल!
सर्व मंडळांनी जर कर्णकर्कश आवाजा ऐवजी सुमधूर आवाजातील भक्तिगीते,भावगीते,व संगीत कला याचा वापर केला तर किती आनंद होईल,
सिनेमातील गाणी न लावता भक्तिमय वातावरण व व्यसनमुक्त तरुणाई हे चित्र दिसले तर,महान संस्कृतीचे दर्शन घडवत सण उत्सव केले तर
, सर्वच मंडळांनी स्पर्धा न करता संघर्ष न करता आपल्या एकिचे व महान  संस्कृतीचे दर्शन घडवले  तर मला वाटतं आपण
महापुरुषांनी घालुन दिलेल्या आदर्शा प्रमाणेच चाललो तर सर्व बांधव एकत्रित आले तर खर्या अर्थाने आपला ठेवा जगापुढे आदर्शवत आहे आणि पुढेही राहील आणि
भारत जगात आदर्शवत राष्ट्र असेल

विजयकाका पिसाळ