vijaypisal49. blogspot. com

शनिवार, २१ जुलै, २०१८

मराठा समाजाची मानसिकता

आमची मानसिकता कधी बदलणार?
जो समाज गावाला जेवायला घालत होता !
जो समाज कोणत्याही संकटात सर्वांनाच बरोबर घेऊन संकटावर मात करत होता !
गावगाड्यातील, तंटे असो की कोणताही प्रश्न असो तो पुढे येऊन सोडवत होता !
दुष्काळ असो की अजून काही असो जो समाज स्वतः उपाशी राहून गावाची भुक भागवत होता !
मान सन्मान होता, जमिन जुमला होता , पैसा अडका बर्यापैकी होता !
मग ६० /७० वर्षांत झाले तरी काय
मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ आली !
मित्रांनो कुणी समाजातील  प्रस्थापित नेतृत्वाला दोष देतो !
कुणी सरकारला दोष देतो !
कुणी दुसऱ्या जातीच्या लोकांना दोष देतो
पण
आपण कुठे चुकलो याचा कधी विचार करत नाही !

१ आम्ही कधीही व्यापाराकडे वळलो नाही सांगा
चुक कुणाची
२आम्ही कधीही लघु उद्योग केला नाही , नेहमी लाज बाळगली सांगा चुक कुणाची
३ आम्ही भाव भावकीतील वाद सामोपचाराने मिटवले नाहीत सांगा चुक कुणाची
४ आम्ही जत्रा खेत्रा केल्या पण शिक्षणाकडे लक्ष दिले नाही सांगा चुक कुणाची

५ आम्ही गावाला जेवण घातली , उधळपट्टी केली सांगा चुक कुणाची
६ आम्ही एकमेकांची  राजकारणात जिरवण्यासाठी लाखो रूपयांची उधळपट्टी केली सांगा चुक कुणाची
७ शेतात तोटा होत असताना शहरात धाव घेऊन पर्याय शोधला नाही  सांगा चुक कुणाची
८ उच्च निचता पाळून दुसऱ्या लोकांना दुय्यम वागणूक देवून विनाकारण वाद घालत बसलो सांगा चुक कुणाची
९ रोटी बेटी व्यव्हार करताना सुद्धा मतभेद करत बसलो सांगा चुक कुणाची
१०  विविध व्यसनाच्या आहारी जावून जमिनी गमावायची वेळ आली तरीही व्यसनाचा त्याग केला नाही चुक कुणाची !
११ आम्ही कुणाचे ऐकून कधी हिंदूत्ववादी , कधी बहुजन वादी, कधी धर्मनिरपेक्ष झालो पण प्रपंचात लक्ष केंद्रित केले नाही
१२ कधी , ब्राह्मण, कधी दलित, कधी मुस्लिम तर कधी ओबीसी समाजालाही नावे ठेवत बसलो व विविध समाजातील लोकांशी  गरज नसताना शत्रुत्व निर्माण केली , सांगा दोष कुणाचा !
बांधवांनो , जेव्हा शिक्षणाची ज्ञानाची गरज होते तेंव्हा आपले सर्व बांधव राजकारणात व्यग्र!
जेंव्हा शेतात काम करायची गरज असते तेंव्हा आमचे तरूण गावात कुठेतरी गप्पा टप्पा , राजकीय चर्चात व्यस्त
जेंव्हा मुलांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करायला हवे तेंव्हा मुलं सोशल मिडीयात व्यस्त!
कसा मराठा समाज प्रवाहा बरोबर राहील
आजच्या परिस्थितीत आपण इतरांच्या तुलनेत खूप मागे पडलो आहोत केवळ सोशल मिडियात तेवढा आपला बोलबाला चालतोय!
कोणताही समाज केंव्हा मोठा होतो , जेव्हा तो पडेल ते काम, खडतर परिस्थितीतून शिक्षण, कष्टाची तयारी व व्यसानाला लांब ठेवतो तोच समाज पैसा कमावतो ,
पैसा नसेल तर तुम्हाला काहीही साध्य करता येत नाही !
आता आपली मानसिकता बदलायला हवी अगोदर व्यसना त्याग केला पाहिजे ,
शिक्षणाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे .
लहान मोठा धंदा केला पाहिजे .
मिळेल ति नोकरी केली पाहिजे
पैशाची बचत करायला शिकले पाहिजे
राजकारण व मोठमोठे लग्न सोहळे यातील उधळपट्टी थांबवली पाहिजे !
कोणताही राज्यकर्ता  पक्ष  केवळ मराठा समाजाची बाजू धरणार नाही तर मराठा समाजाला , मराठा समकक्ष जातींना बरोबर घेऊन हा आरक्षणाचा लढा देश पातळीवर घेवून जावा लागेल!
एका जातीला आरक्षण मिळणे कठीण असते , त्या साठी आहे त्या प्रवर्गात किंवा घटनेत बदल करून नवीन प्रवर्ग तयार करून आरक्षण मागावे लागेल व नवीन प्रवर्ग तयार करायचा म्हटलं की , विविध राज्यातील जातींना बरोबर घेऊन लढावे लागेल
तर काहीतरी साध्य होईल.
आरक्षणाचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे तितकाच प्रश्न समाजाने स्वतःच्या मानसिकतेत बदल करण्याचा सुद्धा आहे !
तुम्हाला खर्च कमी करावेच लागतील, तुम्हाला आधुनिक शेती करावीच लागेल व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्या तरी नादी लागून, कुणाला तरी नावे ठेवणे व शत्रूत्व निर्माण करणे बंद करावे लागेल!

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९