vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

माढा मतदारसंघातून जाणून घेतलेला लोकांचा कल!

चालू घडामोडींचे विश्लेषण. . . .
नक्कीच वाचा. . .
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते .
सामान्य मतदार म्हणतात. .
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये ,
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही !
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल?
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले !
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही .
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही ,
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल!
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात,
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ?
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ?
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी ,
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक,
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे,
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे !
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा !
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका ,
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा !
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही !
पवार साहेब
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!


सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न!
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा !
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !