vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, १२ मार्च, २०१९

खरेतर पवार साहेबांची माढ्यातून उमेदवारी दादासाहेबांनीच मागितली होती , परंतु साहेबांनी राज्यसभेवर राहण्याचा निर्णय घेतल्याने आदरणीय साहेबांच्या निर्णयाचा आम्ही सर्वजण आदरच करतो व जर पक्षाने मोहिते पाटलांना उमेदवारी दिली तर मनापासून सर्वजण स्वागतच करू, आणि मोहिते पाटलांच्या उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटीच मिळणार ! हेही निश्चित आहे





मोहिते पाटलांच्या   उमेदवारी मुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार बळकटी . . . 
लेखन. . विजय पिसाळ नातेपुते . . . ..वॉटसप  ९४२३६१३४४९
आदरणीय रणजितसिंह (दादा ) मोहिते पाटील  असोत कि, विजयसिंह मोहिते पाटील तथा मोठे  दादासाहेब असोत. .  सातत्याने पवार साहेबांवर प्रेम करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सदैव  निष्ठा ठेवून काम करत आले आहेत पक्षात विविध कारणांनी जरी किरकोळ विरोध झाला किंवा किरकोळ मतभेद झाले किंवा डावलले गेले  तरीदेखील दादासाहेब व रणजितसिंहदादांची  साहेबांवरील निष्ठा बिलकुल कमी न होता सतत पक्षाने दिलेल्या संधीचं सोनंच करायचं काम दोन्ही दादा आणि मोहिते पाटील परिवाराने केले आहे . . आदरणीय रणजितसिंहदादांनी तर युवकचे प्रदेशाध्यक्ष असताना संपुर्ण महाराष्ट्रात साहेबांचे विचार व पक्षाची ध्येय धोरणे पोहचवली आहेत व त्याच कामाची पोचपावती म्हणून रणजितसिंहदादांना विधान परिषदेत व राज्यसभेवर काम करायची संधी पक्षाने दिली  व या संधीचे सोने करत रणजितसिंहदादांनी , रेल्वे , रस्ते , सोलापूर विद्यापीठ याचा पाठपुरावा करून आपल्या कामाची चुणूक दाखवली व युवक आमदार व एक युवक खासदार कसा असावा हा आदर्शच नव्या पिढीला घालून दिला ! आदरणीय रणजितसिंहदादांनी 
जुन्या व नव्या पिढीतही आपल्या कामाच्या बळावर दांडगा संपर्क ठेवलेला आहे . मतदारसंघातील 
गावागावात आदरणीय दोन्ही दादांनी स्थानिक नेतृत्वाला नेहमीच बळ दिले व सर्वांनाच  मोठे करत असतानाच पक्षाची नवीन तरूण फळी निर्माण केली  . 
गाव तिथे राष्ट्रवादी व पवार साहेबांचा विचार पोहचवला  , विरोधक सुद्धा दोन्ही दादांना मनापासून ताकदीने  विरोध करत नाहीत कारण दोन्ही दादांनी व मोहिते पाटील परिवाराने  सर्वांशीच राजकारणा पलिकडचे नाते जपायचे काम केले आहे आणि यामुळे माढा मतदारसंघात मोहिते पाटील परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग आपणाला दिसून येतो, विजयसिंहदादा किंवा त्यांच्या घरातील कुणीही सत्तेवर असता कधीही सुडाचे राजकारण केले नाही ,  आज माढा मतदारसंघात जेवढे आमदार, जि प सदस्य, पंचायत समिती सदस्य  आहेत त्यातील बहुतांश जणांना अडचणीच्या काळात मोठी मदत मोहिते पाटील परिवाराने केली आहे , राजकीय महत्वकांक्षा प्रत्येकास असतात व त्यातून काहीजण उमेदवारी जाहीर होईपर्यंत किरकोळ विरोध करत असतात मात्र साहेबांनी प्रत्येकाला मोलाचा सल्ला दिला तर मात्र सर्वजण ऐकोप्याने काम करतात हा मागील इतिहास आहे, 
आजच्या परिस्थितीत पाडापाडीचे राजकारण केले तर सर्वजण सत्तेपासून दुर तर राहतील पण आपसातील हेव्यादाव्यामुळे पक्षाची व पर्यायाने सर्वांचीच शक्ती क्षीण होईल याची जाणीव प्रत्येकास नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही , त्यामुळे आदरणीय साहेब सर्वांनाच एकत्र बसवून कानउघाडणी करून सक्रीय करतील हे नक्की , यातच सर्वांचेच हित आहे, आज देशात, कारखानदारी , दुध धंदा , सहकार, बँकींग, बेरोजगारी  शेतीचे  व इतर नागरी प्रश्न आवासून उभे आहेत, सध्याचे शासनातील प्रमुख हे सर्वांना न्याय देत नाहीत ही भावना आहे , आजच्या काळातील  नवतरूण मतदार हे अभ्यासू व वैचारिक झालेले आहेत त्यामुळे  त्यांना अभ्यासू व प्रभावी वक्तृत्व असणाऱ्या नेतृत्वाची ओढ आहे व ति ओढ आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील हे पुर्ण करतील हा जनतेत दृढ विश्वास आहे , निष्ठा व वैचारिक भूमिका हेच बलस्थान रणजितसिंह मोहिते पाटील व विजयसिंह मोहिते पाटील यांचे आहे,  व त्यामुळेच २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीची माळ मोहिते पाटील परिवारातील दोन दादां पैकी नक्कीच एका दादांचे गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही , 
आज, सुप्रियाताई असतील,  धनंजय मुंडे साहेब,  पार्थदादा , रोहितदादा,  यांच्यावर पक्षाची जबाबदारी येत असून त्यांच्या जोडीला पक्ष वाढीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील असने  तितकेच महत्वाचे आहे , 
नुसता माढाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करायचा असेल तर गतीमान नेतृत्वाची गरज आहे आणि त्यासाठी तरूणांचे संघटन मोलाचे ठरते त्यामुळे अभ्यासू रणजितदादा हे सुप्रिया ताई व पार्थदादा यांच्या बरोबर संसदेत असावेत अशी तरूणांच्या मनात भावना आहे, व ति भावना आदरणीय पवार साहेब निश्चित जाणतील  यात तिळमात्र शंका नाही , रणजितसिंहदादांचे प्रभावी वक्तृत्व व असलेले सखोल ज्ञान संसदेत पक्षाची भूमिका मांडायला व पक्ष वाढीसाठी महत्वाची ठरेल, 
 मागच्या काळात  पक्षांतर्गत,  सर्वांकडूनच ज्या किरकोळ चुका झाल्या त्या टाळून परत एकदा , सोलापूर जिल्ह्याची  थोडीफार विस्कटलेली घडी पवार  साहेबांच्या आदेशाने व  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,  बबनदादा, रश्मी दिदी, दिपकआबा, राजन पाटील साहेब, सोपल साहेब, व संपुर्ण मोहिते पाटील परिवार एकत्र येऊन नक्कीच परत एकदा बसवतील व परत एकदा संपुर्ण सोलापुर जिल्हा राष्ट्रवादीमय करतील हीच भावना सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे , आदरणीय साहेब पंतप्रधान व्हावेत व आदरणीय अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हीच जनभावना महाराष्ट्रातील जनतेची आहे . 
माढा लोकसभा मतदारसंघा पुरते बोलायचे झाले पक्ष मजबूत असल्यामुळे  विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब, रणजितसिंहदादा , प्रभाकर देशमुख साहेब,  दिपक आबा हे इच्छुक होते सर्वांचेच काम चांगले आहे, पक्ष लोकशाही मानणारा असल्यामुळे अनेकजण इच्छुक हे राहणारचं व पक्षात लोकशाही असल्यामुळेच, विजयसिंह मोहिते पाटील साहेब,  भुजबळ साहेब, कै.  आर आर पाटील साहेब, आदरणीय अजितदादा या सर्वांनाच पक्षाने उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली  व यापुढेही पक्षात लोकशाही  राहिल!
 बदलत्या परिस्तिथी नुसार जेंव्हा  साहेबांना पंतप्रधान पदाची संधी येतेय हे जाणून आदरणीय विजयसिंहदादांनी साहेबांनाच माढ्यातून उभे राहण्याची विनंती केली व साहेबांनीही दादासाहेबांचा मान राखून होकार दिला इथेच नेतृत्वावर  निष्ठा कशी  असावी याचा आदर्शच दादासाहेबांनी घालून दिला , कार्यकर्ते जरी भावनेच्या भरात नाराज झाले तरीदेखील दादासाहेबांनी समजूत घालून साहेबांचेच निष्ठापुर्वक काम करायचे हाच आदेश दिला . . 
 मात्र पवार साहेबांच्या  कुटूंबातून सर्वांनीच एकमुखाने  साहेबांनी न लढता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी हे ठरल्यामुळेच आदरणीय रणजितसिंहदादांचे नाव माढा लोकसभेला व मावळ मधून पार्थदादांचे  प्रकर्षाने पुढे आले व रणजितसिंहदादांचे  व पार्थदादांचे नाव  पुढे येताच तरूणांच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले म्हणून आता पक्षातील धुरीणांनी नव्या पिढीला संधी द्यायचा निर्णय घेतलाच आहे  तर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांनाच  उमेदवारी द्यावी हीच भावना आहे माढा मतदारसंघात आहे 
व समजा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब यांच्या अनुभवाचा पक्षाला  फायदा करून घ्यायचा असेल तर दादासाहेबांचा विचार करावा , आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब किंवा इतर सर्व इच्छुकांना भविष्यात पक्षानेही मानसन्मान देऊन योग्य ठिकाणी संधी द्यावी मात्र यापुढे सर्वांनीच गटबाजीला मुठमाती देऊन आदरणीय साहेबांची दिल्लीतील ताकद आणि मान उंचावण्यासाठी एकदिलाने काम करावे हीच आम्हा सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते मंडळींची भावना आहे . . 
विजय पिसाळ नातेपुते !