vijaypisal49. blogspot. com

सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२०

भारत हा धर्मशाळा नाही . कुणीही बेकायदा या ठिकाणी रहावे आणि देशातील जनतेने निमुटपणे सहन करावे !

चालू घडामोडींचे विश्लेषण





भारतीयांनो जागे होऊया !  हा देश आपल्या  सर्वांसाठी  महत्वाचा आहे . सत्ता कुणाचीही येईल जाईल पण आपल्या सर्व देशवाशियांमधील विश्वास डळमळीत होता कामा नये ! इंग्रजांचे फोडा  व राज्य करा या नितीला बळी पडूनच आपल्या देशाचे तुकडे झाले . देशात एक सुत्रता येण्यासाठी . . स्वतःच्या  धर्माचे आचरण करताना , हा देश कोणत्याही धर्मातील तत्वानुसार किंवा धर्मगुरूंच्या इशार्यावर न चालता घटनेच्या व कायद्याच्या चौकटीनुसार चालला पाहिजे . या देशातील प्रत्येकाचे हक्क अधिकार देतानाच, प्रत्येकाला कर्तव्याची सुद्धा जाणीव असली पाहिजे . जात पात धर्म बाजूला ठेवून सर्व भारतीयांसाठी सर्व कायदे समान असले पाहिजेत. त्याच बरोबर, अल्पसंख्यांक, आदिवासी, सामाजिक व आर्थिक मागास आणि भटक्या जाती जमाती यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत, त्यासाठीच त्यांची संपुर्ण माहिती एका छत्राखाली असायला पाहिजे . म्हणूनच
*संपुर्ण भारतीयांची  धर्म, जात,  प्रांत , जिल्हा, तालुका  व गावनिहाय  जनगणना होऊन एक रजिस्टर बनले पाहिजे . .*
विजय पिसाळ नातेपुते .  संपुर्ण लेख वाचा . .
भारत हा विविध भाषा , विविध संस्कृती , विविध चालीरीती , विविध  रुढीपरंपरा विविध जाती , विविध  धर्म  यांनी बनलेला विशाल मोठा देश आहे . या देशावर पुर्वीच्या काळात असंख्य राजे , महाराजे , यांनी राज्य केले , विविध परकीय आक्रमकांनी शेकडोवेळा या देशाची लुट केली , राजेशाही नंतर भारतावर,  सर्वाधिक काळ  राज्य केले ते ब्रिटीशांनी , शेकडो वेळा लुट होऊन, हजारो लढाया,  रणसंग्राम होऊनही या देशाची संस्कृती टिकली  या देशात  ब्रिटीश राजवटीपर्यंत फारशा समस्या नव्हत्या ,  सातत्याने युद्ध व यादवी याने जरी अंतर्गत कलह होता तरीदेखील  हा भूभाग समृद्ध होता , अखंड  भारतात जेंव्हा ब्रिटीशांनी इथल्या सर्व  राजेशाहींचा पराभव करून एकछत्री राज्यकारभार सुरू केला व या देशातील हातमाग, लघुउद्योग,  कुटीर उद्योग, संपुष्टात आणले  आणि या  देशातील सगळ्या संपत्तीची लुट केली , जनतेला गुलाम बनवले ,  अन्याय अत्याचार केले तेंव्हा पासून एकसंघ भारतीयांच्या मनात असुरक्षित वातावरण तयार झाले , जणू भारत देश गुलामगिरीच्या खाईट लोटला गेला .  ब्रिटीशांच्या धोरणाला कंटाळून जनतेच्या मनात असंतोष निर्माण होऊन सरकार विरूद्ध सामूहिकपणे जनक्षोभ तयार होऊ लागला तेंव्हा ब्रिटीशांनी आपल्या कुटील डावपेचांना सुरुवात केली , सुरूवातीला त्यांनी बळाचा वापर करून, तरूणांची धरपकड करणे , १८५७ उठाव मोडून काढणे , असंख्य नेते व तरुणांना तुरुंगात डांबणे हे प्रयोग केले , जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणले पण जनक्षोभ काही केल्या कमी होत नाही हे दिसताच धर्माच्या आधारे  बंगालच्या फाळणीचा घाट घातला व भारतीय समाजात फुटीची बीजे रोवली , बॅरिस्टर  जीना सारख्या कपटी व महत्वकांक्षी मुस्लिम नेत्याला हाताशी धरून अखंड भारताचे तुकडे तुकडे कसे होतील हेच पाहिले . भारतीयांच्या दुर्दैवाने बॅरिस्टर  जीनाने देशाला स्वातंत्र्य मिळण्या अगोदरच धर्माच्या आधारावर भारताचे तुकडे तुकडे केले . . पाकिस्तानची निर्मिती , जम्मू काश्मीरचे सामिलीकरण, व बांग्लादेशची निर्मिती हे विषय वेगवेगळे आहेत त्यावर नक्की कधीतरी लिहीणं होईलच. पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर या देशातील वातावरण पुर्णपणे गढूळ करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले ते कायमचेच!!  हिंदूंचे  मुस्लिमांकडे संशयाने पहाणे व मुस्लिमांना असुरक्षित वाटू लागणे यातूनच धार्मिक संघर्ष आणि कट्टरवादाचा उदय झाला व असंख्य तरूण यात भरडले गेले .
हे मात्र नक्की . .  पाकिस्तान जरी मुस्लिम राष्ट्र झाले तरीदेखील भारताने धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारले , आणि भारताचा  प्रगतीचा प्रवास सुरू झाला !  पाकिस्तान व बांग्लादेशच्या निर्मिती नंतर पाकिस्तानी व बांग्लादेशी नेतृत्वाला तिथला राज्य कारभार नीट करता आला नाही व त्या ठिकाणी लोकशाही नीट  रुजली नाही त्यामुळे त्याठिकाणी बर्याचदा लष्कर आणि राजकीय पक्ष यांच्यात विसंवाद होऊन सरकारे बरखास्त केली गेली , लष्करी राजवटी तिथे आल्या !  भारत पाकिस्तान यांचे वय सारखे असूनदेखील व तुलनेने पाकिस्तान समृद्ध असूनदेखील, तिथल्या मूलतत्त्ववाद्यामुळे त्या देशात दहशतवाद रुजला फोफवला  ,,त्यामुळे त्या देशाची प्रगती पुर्णपणे खुंटली , पाकिस्तान आज भिकारी व बकाल झाला  तिच परिस्थिती बांग्लादेशची झाली  त्यामुळे तिथे अनियंत्रित लोकसंख्या वाढत गेली , मूलतत्त्ववाद्यांना इस्लाम कधीच कळला नाही, त्यामुळेच पाकिस्तानमध्ये  दहशतवाद्यांचे तळ निर्माण झाले .  पराकोटीचे दारिद्र्य निर्माण झाले , तरुणांच्या हाताला काम मिळत नाही , अशा परिस्थितीत तितल्या तरूणांना मूलतत्त्ववाद्यांनी जिहादी बनवण्याचा  एककलमी कार्यक्रम  हाती घेतला . पर्यायाने पाकिस्तान तर बकाल झालाच पण बांग्लादेश सुद्धा फार नीट राहिला नाही . सहाजिकच त्याची झळ   पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांच्या  सिमेवरील भारतातील  राज्यांना बसू लागली . शेजारी जर दरिद्री असेल तर चांगल्या लोकांना सुद्धा नीटपणे जगता येत नाही तिच परिस्थिती भारताची झाली .  बांग्लादेश व पाकिस्तानात  लोकांची होणारी  उपासमार व अंतर्गत गढूळ वातावरण यामुळे हाताला काम मिळावे , पोट भरता यावे यासाठी पश्चिम बंगाल, नेपाळ, आसाम, जम्मू काश्मीर या प्रदेशातून आपल्याकडे भयंकर घुसखोरी होत राहिली . तिनही देशातील सीमावर्ती भागातील संस्कृती सारखीच असल्यामुळे व सुरुवातीला आपलीही लोकसंख्या कमी असल्यामुळे त्याची झळ आपल्याला जाणवली  नाही पण हे घुसखोरीचे लोण देशाच्या कानाकोपर्या पर्यंत पसरू लागले व इथूनच खर्या अर्थाने चिंता निर्माण होऊ लागली . घुसखोरी बरोबरच आतंकवादी या देशात मुक्त संचार करू लागले आणि या देशातील लोकांचे जगणे खराब केले .
 कायदेशीर मार्गाने व्हिसा व पासपोर्ट काढून रोजगारासाठी कुणी या देशात आला असता तर समजू शकलो असतो . पण या देशातील सीमावर्ती राज्यात यांनी घुसखोरी करून स्थानिकांना हाताशी धरून कागदपत्रे बनवली , ते भारताचे रहिवासी झाले . हळूहळू ते निवडणूका लढवू लागले इतकेच काय तर इथल्या स्थानिक भारतीय नागरिकांवर अन्याय,  अत्याचार सुद्धा  करू लागले . त्यामुळे सर्वप्रथम इंदिरा गांधी यांनी घुसखोरा विरूद्ध कठोर भूमिका घेतली परंतु त्यांची नंतर हत्या झाली . नंतरच्या काळात  दुर्दैवाने राजकारणापाई घुसखोरीचा हा गंभीर मुद्दा कुणालाच गांभीर्याने घ्यावा असे कधी वाटले नाही . या देशात जे १९४७ साली लोक राहिले, या देशाची घटना व कायदे जे पाळतात  त्यांच्या बद्दल कुणाचा आक्षेप किंवा तक्रार असायचे कारण नाही . मग ते धर्माने , मुस्लिम, शिख, इसाई, बौद्ध, पारसी अशा कोणत्याही जाती धर्मातील असोत, त्यांच्या हक्क आणि अधिकारांना कुणालाही धक्का लावता येणार नाही . मात्र कोणत्याही परिस्थितीत १९४७ नंतलर पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करून बेकायदा आले त्यांची बाजू घेण्याचा व त्यांना अधिकार मागण्याचा व त्यांच्या साठी आंदोलने करण्याचा  कुणालाही हक्क  नाही   किंवा १९७१ नंतर जे बांग्लादेश किंवा अन्य देशातून बेकायदा या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्यांचीही बाजू कुणी घेऊ नये दुर्दैवाने घुसखोरीचा मुद्दा बाजूला ,,पडलाय धार्मिक रंग देऊन ध्रुवीकरण केले जातेय व त्याला बळी मात्र सामान्य पडत आहेत   आणि राजकारण मात्र जोरात चालू आहे .
सांगण्याचा मुख्य आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की , यापुढे जर या देशात बाहेरील कुणी बेकायदा घुसखोरीचा प्रयत्न केला किंवा घुसखोरी करून वास्तव्य करू लागला तर त्यांना शोधायची आपल्याकडे कोणतीही यंत्रणा दिसत नाही . Caa व nrc जरी बाजूला ठेवले तरी देशातील प्रत्येक नागरिकांच्या नोंदीचे रजिस्टर हे तयार झालेच पाहिजे . बेकायदा लोक परत घुसले व जर  नोंदणी रजिस्टर  असेल  तर ते लोक  शोधून काढता येतील.
आपल्या देशात, जमीन, रस्ते , दागिने , वस्तू ,  घरे  प्रॉपर्टी , गाड्या , प्राणी , पक्षी , यांची रितसर नोंदणी होते इतकंच काय, मतदार, पदवीधर, विविध संस्था , राजकीय पक्ष, संघटना  यांचीही नोंदणी होते .  मग देशातील नागरीकांची नोंदणी करायला कुणाचा आक्षेप असायचे कारण काय?  हा प्रश्न हिंदु -मुस्लिम या दृष्टिकोनातून बघण्याची व त्यावर राजकारण करण्याची मानसिकताच देशाला रसातळाला घेऊन जाईल. आपल्या देशातील कोणताही नागरीक बाहेर देशात बेकायदा वास्तव्य करू शकत नाही किंवा तसा कुणी प्रयत्न केला तर संबंधित देश घुसखोरावर कठोर कारवाई करतात हे आपण वेळोवेळी पाहिले आहे . मग आपण आपल्या देशात बाहेरील बेकायदा घुसखोर खपवून घे़ण्याची गरज काय?
देशात जर कायदा , सुव्यवस्था  चांगली रहायची असेल तर सर्वांनाच एकमेकांच्या हक्क व अधिकारांची जपणूक करावीच लागेल.
सवलती मिळवताना , सरकारला आपण पाहिजे ति कागदपत्रे देतोच की , साधा पासपोर्ट काढायचा असेल किंवा जातीचा दाखला काढायचा असेल त्यांना सरकारने सांगितलेली कागदपत्रे देणे बंधनकारक असते तिच या ठिकाणी पद्धत राहणार आहे . पण सध्या विनाकारण वाद निर्माण होत आहेत. राजकारण केले जात आहे .
तसेतरी आपल्या देशात राहणार्‍या प्रत्येकाला तुझे मुळ गाव कोणते , तु कोणत्या कारणांनी या गावात रहायला आला आहे . तु या ठिकाणी काय काम करतो आहे . कुणाकडे भाड्याने  राहतो आहे . याची संपुर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे यापुढे बंधनकारक केलेच पाहिजे .  घुसखोरीमुळे गुन्हेगारी वाढतेय, स्थानिकांना रोजगार नाही व बाहेरून ही घुसखोरी . पाणी , रस्ते , वीज, शिक्षण, आरोग्य अशा असंख्य समस्या या देशातील नागरिकांच्या पुढे आ वासून उभ्या आहेत. प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे की  , आपल्या शेजारी जर काही संशयास्पद घडत असेल  , बाहेरची अनोळखी लोक वारंवार एखाद्या ठिकाणी  एकत्र येत असतील. हिंदू विरूद्ध मुस्लिम असे कट रचत असतील तर त्याची खबर देशातील सुजाण नागरिकांनी पोलिसांना दिली पाहिजे . पुलवामा , पठाणकोट, मालेगाव, २६/११  , मुंबईतील साखळी बाँबस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोट  अशा प्रकारची असंख्य उदाहरणे समोर असताना नागरिकांनी गप्प राहता कामा नये . कोणत्याही कायद्याला लोकशाही मार्गाने विरोध जरूर करता येतो ये जरी खरे असले तरीदेखील कायद्याचा आपण अभ्यास न करता विरोध करणे चुकीचे आहे . राजकारणापाई देशातील वातावरण गढूळ करून सामाजिक शांतता भंग करण्याचा कुणालाही हक्क व अधिकार नाही . माझे तर प्रामाणिक मत आहे . पॅन कार्ड  , आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र अशी असंख्य ओळपत्रा ऐवजी , संपूर्ण कुटूंबाची माहिती असणारे , तो कुठेही रहायला गेला तरीदेखील मुळ गावाची व तिथली माहिती असणारे व सध्या राहतो तिथले असे एकत्र माहितीचे एकच ओळखपत्र तयार करून त्याची नोंद रजिस्टरमध्ये केली पाहिजे . त्या रजिस्टरमध्ये , त्याची प्रॉपर्टी व संपुर्ण कुटुंबांची  माहिती असली पाहिजे . खरेतर
देशातील गुन्हेगारी व अनागोंदी याला जबाबदार आपण सर्वजण आहोत.
बाहेरील घुसखोरांना सहानुभूती दाखवण्याची बिलकुल गरज आपल्याला नाही .
 सरकारने बेकायदा देशात वास्तव्य करणार्‍या लोकांना हुडकण्यासाठी गुप्तचर यंत्रणा निर्माण करून, घुसखोरांना शोधून काढले पाहिजे . भारत हा धर्मशाळा नाही व कु़णाचीही जहागीरही नाही . त्यामुळे सरकारने कठोरपणे गुप्तचर यंत्रणा निर्माण करून देशात अशांतता निर्माण करणाऱ्या , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे  आणि बाहेरील घुसखोरांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.  जात धर्मावरून होणारी आंदोलने व हिंसक घटना या बंद झाल्या पाहिजेत मग ते कोणीही असो व  कोणत्याही जाती धर्मातील असो . .
भारतभूमी सर्वांची आहे .
तिचे अखंडत्व राखणे आपले कर्तव्य  आहे . घटनेच्या चौकटीत राहून  सर्वांसाठी समान कायदे , समान संधी व समान  नियम असले पाहिजेत.
विजय पिसाळ नातेपुते .
९४२३६१३४४९