vijaypisal49. blogspot. com

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पवार साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे! ही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे ! फक्त माढ्याचा आग्रह कशासाठी करताय तेच कळेना !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय, पवार साहेब लोकसभेवर जाण्यासाठी  अट्टाहास करायला हवाच का ?  
तुम्हाला जरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व बाकीच्या सर्व  सहकार्यांनी माढ्यातून लढायचा आग्रह केला असला तरीदेखील तुम्ही विनम्र नकार द्यायला पाहिजे ! असे जनतेला वाटते , साहेब 
आज प्रत्येक पक्षात व प्रत्येक मतदारसंघात कुरबुरी असतातच, तशा राष्ट्रवादीतही आहेत,  उदयनराजे , धनंजय महाडिक, यांच्याही मतदारसंघात किरकोळ कुरबुरी होत्या व आहेत!  त्या कुरबुरी तुम्ही मिटवताच की , खरेतर तुमच्या शब्दा बाहेर कुणीच नाही ,  उलट तुम्ही वडीलकीच्या नात्याने सर्वांना ठणकावले पाहिजे व सांगितले पाहिजे की , पक्षाचा निर्णय प्रत्येकाने मान्य करावा नाहीतर तुमची गय केली जाणार नाही . जे ग्रामपंचायतीला कधी निवडून आले नाहीत असे लोक  केवळ पैसा आहे म्हणून उमेदवार म्हणून इच्छुक होतात, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करतात. याला खरंच खतपाणी घालायची गरज नाही ! पण खतपाणी घातले जातेय, साहेब तुम्ही कोणत्याही सभागृहात असला तरी संधी असेल तर नक्कीच पंतप्रधान व्हाल त्यासाठी माढ्यात उभेच रहायची गरज नाही . 
साहेब जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे व तुम्हीही जनतेची अविरत सेवा केली आहे त्यामुळे आता मनमोहनसिंग यांचे सारखे राज्यसभेवर राहून मार्गदर्शन करत रहायला पाहिजे असे वाटते ,  आपल्या जुन्या  सहकार्यांना व  पक्षाच्या कामात झोकून देणार्‍यांना संधी द्यायला पाहिजे पण होतय उलटंच? कधीच पक्षाचे काम न केलेले उमेदवारी काय मागतात पेच काय निर्माण होतो ! 
यातून साध्य काय होतंय? जनतेमध्ये  
फक्त पक्षाची नाचक्की होतेय! आज  मिडीयात  संपुर्ण पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत असा प्रचार होतोय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देणे कठीण होत  असताना ,  सामान्य  जनतेला काय वाटेल याचा तरी तुमच्या सारख्या मुरब्बी व्यक्तीमत्वाला कळायला हवे ! 
तुम्ही  विचार करायला हवा . 
लोकात चर्चा होतेय, 
तुम्ही सध्या राज्यसभेवर आहातच, अजितदादा व सुप्रियाताई सुद्धा विधिसभा व लोकसभेवर आहेत आणि रोहितदादा पण सध्या जिप सदस्य आहेत पार्थदादाची पण चर्चा आहे मग राष्ट्रवादी पक्ष केवळ पवार कुटुंबा पुरता मर्यादित आहे का ? की पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. . अशी चर्चा बरी नव्हे ! 
तुम्ही आजवर मोठ्या मान सन्मानाने सर्व निवडनुका जिंकल्या आहेत  पण यावेळची माढा लोकसभेची निवडणूक  तितक्याच फरकाने तुम्ही जिंकाल अशी शक्यता कमी वाटते ,  कारण २००९ व आत्ताची परिस्तिथी खूप  विभिन्न आहे, भाजपाची बांधनी तळागाळात पोहचलीय  व वंचित बहुजन आघाडीमुळे   दलित व मुस्लीम मतांची विभागणी अटळ आहे ,  या तोट्याच्या बाजुंचाही विचार करायला हवा . माळशिरस तालुक्यात  विजयदादा तुमचेच काम करतील हे नक्की आहे.  कारण दादांच्या स्वभावात आतुन एक करायचे  व वरून दुसरे करायचे  असे नसते पण  समजा  जरी विजयसिंह दादांनी तुमचे मनापासून काम केले तरीदेखील जनतेच्या मनात एक सुप्त अन्यायाची भावना तयार होत  आहे, राष्ट्रवादी पक्ष दादांवर अन्याय करतोय, त्यांचे जाणिवपुर्वक खच्चीकरण केले जातेय, त्यांना डावलले जातेय व ही सुप्त भावना  मतपेटीतून व्यक्त झाली तर राष्ट्रवादीचे  मताधिक्य कमालीचे घटू शकते . 
साहेब तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे , अभ्यास दांडगा आहे तुमच्या बुद्धीमत्तेला व स्मरणशक्तीला तोड नाही पण तुम्ही सध्या माढ्यात उभे रहायचा चुकीचा विचार करताय! खरेतर  तुम्ही सहकार्यांना मोठे करा आणि निवडणूक लढवायची असेलच तर  नक्कीच  बारामतीमधुन उभे रहा .पण माढ्यातून नका उभे राहु आपल्याच पक्षातील  काहीजण विजयसिंह दादांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून तुम्हाला आग्रह धरतील पण त्यातील एक दोन सोडले तर जनाधार नसलेले बहुतेक आहेत. त्यांचे ऐकु नका  त्या ऐकु नका ! 
 तुम्ही प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार द्या व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या    किमान १५ खासदारांचे बळ घेऊन दिल्लीत जावा  नक्कीच तुमची मान खूप उंचावली जाईल, जुने जानते सहकारी बरोबर घ्या काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे नवीन रक्तालाही संधी द्या मात्र माढ्यातुन स्वतः विजयदादांनी काहीही म्हटले तरी त्यांनाच तिकिट द्या कानफुक्या लोकांचे जास्त ऐकु नका , 
कोल्हापुर मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनाही डावलल्या नंतर जि सहानुभूती त्यांना मिळाली तशी सहानुभूती विजयदादांना आहे , जरी दादांनी बंडखोरी केली नाही, तुमचेच प्रामाणिक काम केले  तरीदेखील वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटील या नावावर प्रेम करणारा वर्ग दुखावला जाणार व तो भाजपाच्या वळचणीला जाणार मग साध्य काय होणार!  तुमचे मताधिक्य घटले तर काही कानफुके परत म्हणणार की विजयदादांनी तुमचे काम केले नाही , माढा गढ शाबूत राहिला पाहिजे व तुम्हीही देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे म्हणून तुम्ही शक्यतो राज्यसभा हाच पर्याय निवडा किंवा बारामतीमधुन लढा , सुप्रियाताईंना राज्यसभा पर्याय ठेवा मात्र माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील हेच पक्षाला तारक राहतील हे नक्की वाटते !
विजय पिसाळ नातेपुते

माढा मतदारसंघातील जनमताचा घेतलेला कानोसा !


नक्कीच वाचा. . . 
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . . 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . 
सामान्य मतदार म्हणतात. . 
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये , 
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही ! 
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल? 
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले ! 
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही . 
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही , 
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल! 
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात, 
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ? 
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ? 
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी , 
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक, 
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे, 
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे ! 
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा ! 
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका , 
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा ! 
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही ! 
पवार साहेब 
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!


सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न! 
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा ! 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !