नवा पक्षीय विचार
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल!
इथल्या मातीवर, प्रेम करणार्या सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून सुशिक्षित समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं तरुण शेतकरी , व्यावसायिक, कामगार यांचा विचार करणारा पक्ष पाहिजे . . ..
श्री विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो हि केवळ एक जात, एक समुह किंवा एक व्यक्ती परिवर्तन करू शकत नाही . तर त्या साठी सर्वांनी सामुहिक पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे . हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व याच मातीतले . . यातील काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या आणि काही जणांना हाल आपेष्ठांचे जीने नशीबी आले आणि काहींचे जीवन स्थिरस्थावर झाले . . पण आजची परिस्थिती भयंकर आहे मोजके १० ते २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . प्रस्थापित व्यवस्था व राजकीय पक्ष हे सत्ता व त्यातून पैसा यातच गुंतले असून ठरावीक लोकांचे लांगूलचालन करत आहेत. ८० ते ९० % जनतेवर नाहक विविध कर लादून लुटत आहेत, त्यांना दाबत आहेत. तात्पुरता महाराष्ट्रातील माणसांचा विचार केला तर, नोकरदार सुखी नाही , कामगार, शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसायिक सुद्धा सुखी नाहीत मग हे राज्य व देश कुणासाठी चालवले जाते हा प्रश्न आहे . लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे पण हे सत्य नाही पचत . . यावर पर्याय काय का ? हे फक्त सहन करायचे ? भविष्यासाठी काय योजना करायची का ठरावीक लोकांची गुलामगिरी स्वीकारून गुलामगिरीत जगायचे ! विचार करण्याची वेळ आली आहे ना ?
यासाठी वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही आपण एकसंघ रहात नाही , कारण आपल्याला दाणे टाकून जाती जातीत झुंजवले जातेय, उच्चनिचता मनावर खोल रुजवून आपआपसात दुहिची बीजे पेरण्यात आली व इथेच सत्यानाश झाला . .
शिवकाळा अगोदर पासून सर्वजण गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील सर्व घटक थोड्याफार फरकाने त्याकाळी सुखी होते कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात सर्व समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात तर काहीजण आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून मोर्चे व प्रतिमोर्चे काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या विरूद्ध कोर्टात जावून एकमेकांच्या विरूद्ध लढत असतात . . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून! आम्ही फक्त संकुचित विचार करतो . आजच्या घडीला कोणत्याही समूहातील लोकांना इतरांची भिती का वाटते , तर एकमेकांची मने दुभंगण्याचे काम या ठिकाणी पद्धशीर झाले . . खरेतर . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . ..तर . परत एकदा समाज मनातील कटूता जाईल व राजकारण वेगळ्या उंचीवर जाईल . . . कधीकाळी गुण्या गोविंदाने नांदलेला समाज एकत्र येईल, कुणी मोठा व कुणी छोटा न राहता सर्वांचा बांधव होईल . . आणि व्यापारी , कर्जदार, शेतकरी , व्यावसायिक, कामगार या सर्वांनाच संरक्षण मिळेल. ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ताटातूट थोडेफार काढून भले त्यांच्या कडून कर्ज रुपाने घेऊन, सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्न करता येतील!
सामान्य, कष्टकरी यांचे साठी कायदे आहेत त्याचा नीट वापर करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा करता येईल . . . . पण आज किती जण मनापासून नवीन राजकीय विचार यावर बोलतील, प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून नवीन व्यवस्था स्वीकारतील ? यावरच सर्व भवितव्य ठरणार आहे . बांधवांनो श्रींमत २ ते ५ % लोक सर्वांना पिळत आहेत. राजकीय पक्षांचे राजकारण त्यांचे साठीच आहे , याला पायबंद घालायची ताकद निर्माण झाली तरच सर्वांना भवितव्य आहे . . किती जणांना वाटते , सर्वांना समान संधी व समान सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते सर्वांचेच प्रश्न सुटले पाहिजेत, सर्वांनाच मोफत शिक्षण मिळाले पाहिजे . . . . सर्वांनाच नोकर्यात लोकसंख्येच्या हिशेबाने संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना हे व्हावे वाटते . पण बहुसंख्य लोकांच्या मनात पक्षीय गुलामगिरी व नेत्यांची भलावण करून मिळेल तर पदरात पाडून जगायची सवय सहजासहजी बदलणार नाही , त्यासाठी ठाम रहावे लागेल, जो एकमेकां बद्दल पुर्वग्रह आहे तोच घालवावा लागेल , सर्वांना न्याय देईल असा विचार करावा लागेल . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित पुढारपण करणार्या जातींना त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा