vijaypisal49. blogspot. com

मंगळवार, २१ मे, २०१९

पारदर्शक निवडणूकीसाठी , निवडणूक आयोग व न्यायालयानेही वारंवार होणारी चर्चा थांबण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत! एक सामान्य मतदार व नागरीक यांची अपेक्षा ! पाच वर्षासाठी प्रतिनिधी निवडताना , एक महिना मतदान प्रक्रिया चालत असताना निकालासाठी /मतमोजणीसाठी दोन दिवस गेले तर बिघडले कुठे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी  व राजकीय विश्लेषक म्हणून हे माझे मत आहे . . पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझे हे मत नाही . . .*

*जनतेला स्वतःच्या बहुमोल मताची ताकद जेंव्हा पुर्णपणे कळेल व प्रत्येक भारतीय जनता १००% मतदान करेल व निवडणूका १००%  निःपक्ष पणे  होतील तेंव्हाच लोकशाही खर्या अर्थाने  बळकट होईल!*
*तो पर्यंत या देशात फोडा, झोडा आणि राज्य करा हाच फॉर्म्युला सगळे लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणारे मात्र प्रत्यक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत  घराणेशाही व हुकूमशाही चालवणारे पक्ष चालू ठेवतील हे माझे आजच्या राजकीय परिस्थितीचे स्पष्ट व परखड मत आहे* . 
*मतमोजणीला एक तिथे दोन दिवस लागले तरीदेखील चालतील  पण सिस्टीमवरचा विश्वास वाढला पाहिजे व १००%  सर्वांचाच विश्वास दृढ झाला पाहिजे ! मग ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट १००% मोजले तरी कुणाला काही प्रॉब्लेम असता कामा नये अगदी निवडणूक आयोग व न्यायालय यांना सुद्धा* ! विरोधक म्हणत आहेत म्हणून नव्हे तर सर्वच भारतीयांना विश्वास देण्यासाठी हे आवश्यक आहे . 
*जसे तुम्ही पैसे मोजायला बँकेत मशिन वापरता तसे व्हीव्हीपॅट मोजायला मशिनचा वापर का करू शकत नाहीत. .*

*जर लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर ईव्हीएम ऐवजी व्हीव्हीपॅट वापरले व त्या पेट्या शिलबंद करून मशिनच्या साह्याने व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठ्या  मोजल्या तर निकाल लवकर लागतील व ज्याला मतदान केले ते आपल्या समोर चिन्ह येईल व वादविवाद बंद होतील*
दुध का दुध पाणी का पाणी . . .*

विजय पिसाळ नातेपुते !