vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, २४ मार्च, २०२२

स्वातंत्र्य तुला जगण्याचे !     

   . . . . . . . . . . .

   स्वातंत्र्य तुला जगण्याचे तू बिनधास्त जगू शकतो ! 

   असेल तुझा विश्वास परमेश्वरावर तर त्याला पाहिजे ते तू मागू शकतो !

    नसेल तुझा विश्वास परमेश्वरावर तर मार्ग तुझा तू शोधू शकतो ! 

   कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी , तु तुझी लढाई लढू शकतो ! 

   श्रद्धा अंधश्रद्धा हे सर्व तुझ्या विचारावर, पाहिजे तसा तू जगू शकतो ! 

   कुणाच्या श्रद्धेवर तू बोलू नको , त्याचाही एक विचार आहे , हे तू समजू शकतो ! 

   प्रत्येकाचे विचार वेगवेगळे , हवं तसं प्रत्येकजण वागू शकतो ! 

   वाट शोधताना जीवनाची , प्रवास खडतर असू शकतो !

    चुकला तुझा मार्ग तर दुःख तुझे तूच भोगू शकतो ! 

   मार्ग तुझा सत्याचा असेल तर आनंद सुद्धा तुलाच मिळू शकतो ! 

   पाप पुण्य काय असते , कुणास ठावूक? पण निसर्ग हा क्रियेला प्रतिक्रिया देऊ शकतो ! 

   जगणं तुझ्या हाती , हवं ते तू निवडू शकतो !

    माणूस आहेस तू , सर्वांवर प्रेम तू करु शकतो !

    निसर्ग चक्राशी तू समरस हो , निसर्गाचा तू एक छोटा भाग होऊ शकतो !

    जमिनीवर पाय असतील तुझे तर तु उंच भरारी घेऊ शकतो.! 

    . . रचना. . . विजय पिसाळ नातेपुते. ९६६५९३६९४९/ ९४२३६१३४४९ ©®

   कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

   टिप्पणी पोस्ट करा