चालू घडामोडींचे विश्लेषण
शेतकरी ते ग्राहक साखळी तयार केल्या शिवाय पर्याय नाही . .
विजय पिसाळ नातेपुते . .
कोरोना सारखे साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम वारंवार होत असल्यामुळे प्रशासनाला वारंवार भाजीपाला व फळे मार्केट बंद करावे लागते आहे . कारण काही ठिकाणी किरकोळ व्यापारी , ग्राहक, हमाल नियमांना तिलांजली देतात. त्यामुळे कोरोना सारख्या रोगाचा फैलाव रोखणे कठिण जाते, यासाठी यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने सहकार्य करून डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही चैन तयार करावी लागणार आहे . त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या मुलांना छोटी कुलिंग वाहने व , शेतावरच फळे पिकवण्यासाठी रायपनिंग चेंबर या साठी प्रोत्साहन पर अनुदान दिले पाहिजे , तसेच त्यांना बँका मार्फत कमी व्याजदराने किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून, त्याला शासनाने थकहमी दिली पाहिजे . फळे व भाजीपाला हा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शहरातील वेगवेगळ्या भागात घरपोच दिला पाहिजे व तसेच ग्राहक ते शेतकरी साखळी तयार झाली पाहिजे . संबधित शहरातील मोठ मोठ मोठ्या सोसायट्या व वेगवेगळे ग्राहक यांनी शेतकऱ्यांना जर व्हॉट्सपवरून दैनंदिन लागणार्या मालाची ऑर्डर्स दिल्या व तेवढा माल शेतकऱ्यांनी रास्त दराने ग्राहकांना पुरवला तर ग्राहकांना योग्य दराने भाजीपाला व फळे मिळतील व शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळेल व वाहतूक कोंडी न होता सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊन शहरात भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळेल. भाजीपाला वारंवार हाताळल्या मुळे होणारी नासाडी सुद्धा टळेल. .
यापुढील काळात असे केले तरच कोरोना सारख्या आजारावर मात करता येईल व ग्राहक आणि शेतकरी यांचेही नुकसान टाळता येईल.
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा