vijaypisal49. blogspot. com

रविवार, १० मार्च, २०१९

दिपक शामराव ठोंबरे यांचे पोलिस उपनिरीक्षक निवडीने नातेपुते गावात चैतन्य!

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते नगरीत श्री शामराव (दादा) ठोंबरे हे आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करताना एकवेळ काम कमी झाले तरी चालेल पण ग्राहकाला चांगली सेवा देणे स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे आणि येणार्‍या प्रत्येक ग्राहका बरोबर हसतखेळत बोलून काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी नातेपुते परिसरातील असंख्य माणसे जोडली व त्यांचा ग्राहक सुद्धा त्यांच्याशी  आदरपूर्वक आस्थेवाईक संबध जपून राहिला . . 
त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानात जी विनम्रता व वाणीमध्ये जो गोडवा आहे तोच गुण त्यांच्या तिन्ही  मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो . . 
थोरला रणजित  हा सुरवातीला त्यांना  त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत असे शामरावदादांच्या हाताखाली काम करत करत तोच आता त्यांचा व्यवसाय पुर्णपणे सांभाळतो  गावातील इतर दुकानांच्या तुलनेने जास्त दर ठेवून सुद्धा स्वच्छता व टापटीप यामुळे ग्राहक कोणतीही कुरकुर न करता जास्तीचे पैसे देतात हाच शामरावदादांचा  व्यवसायिक पैलू रणजित जपतोय. . 
दुसरा किशोर यानेही शिक्षण घेत असताना खडतर प्रवास केला आहे , एबीए करत असताना त्यालाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला पण त्यानेही कधीच चिकाटी सोडली नाही , जेव्हा त्याचे शिक्षण चालू होते तेंव्हा तो सुट्टीत शामरावदादांना व रणजितला मदत करत असे एकदाही वेळेचा कधी त्याने अपव्यय केलेला दिसला नाही . तो जेंव्हा जॉबला लागला तेंव्हा पासून शामराव दादांना आधार वाटू लागला , रणजित हाताखाली काम करत होता व किशोर जॉबला लागल्याने दिपकलाही पुढील अभ्यासासाठी मदत करणे शक्य होत गेले , 
 सदैव परिस्तिथीची जाणीव ठेवणार्या कुटूंबातील दिपक सर्वात लहान पण तोही हुशार, त्याकाळात त्याने शाळेत गुणवत्तेने शिक्षण घेत  असताना कुठेतरी लवकर मुलगा रुटीनला लागावा म्हणून शामरावदादांनी त्याला डीएडला ठेवले पण त्याचे डिएड पुर्ण होताच शिक्षक भरती पुर्णपणे थंडावली आणि त्याच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला खीळ बसली पण खचून न जाता त्याने कॉलेज पुर्ण केले व कॉलेज पुर्ण केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा उराशी ध्यास बाळगला , सतत अभ्यास, परिश्रम आणि चिकाटी या बळावर तो परिक्षा देत राहिला , खरंतर मागील तिन चार परिक्षात त्याचे थोड्या किरकोळ मार्कांनी  सिलेक्शन हुकायचे  मात्र त्याने हार मानली नाही आणि २०१७ ला दिलेल्या परिक्षेत तो यशस्वी झालाच. . व खर्या अर्थाने शामरावदादा ठोंबरे यांच्या खडतर जीवन प्रवासाचे चिज झाले . . 
तिनही मुले संस्कारी , निर्व्यसनी आणि कर्तृत्वान निघाली . . 
कुठेतरी त्यांच्या मनाला आतुन समाधान मिळत असेलच आणि तिनही मुलांसाठी शामरावदादांच्या सौभाग्यवती व तिघांच्या मातोश्री यांचीही मोलाची व अखंड कष्टमय साथ मिळाली याचेही त्यांनाही खूप खूप समाधान असेल. . 
नव्या पिढीतील मध्यमवर्गीय घरातील व  सर्वांनीच या कुटुंबातील मुलांकडून प्रेरणा घेऊन आपले भविष्य घडवायला हवे . . 
नातेपुते गावातील समस्त नागरिकांना या कुटूंबाचा अभिमान वाटतो. . . 
खरंतर गावातील, जयपाल देठे , अभिमान माने, मोरे व असंख्य मुले ही सर्वसाधारण घरातून पुढे आली व यशाला गवसणी घालून गावचे नाव मोठे केले . . . तिच प्रेरणा इतर तरूणांनी घ्यावी . . . 
शब्दांकन. 
विजय पिसाळ नातेपुते