vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

संस्कृती

संस्कृती . . .

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

संस्कृती म्हणजे काय तर साधे आणि सरळ भाषेत सांगायचे म्हटले तर, आजच्या आधुनिक जगात बदलत्या वातावरणात आवश्यक थोडेफार बदल स्विकारून  आपल्या चालीरीती अबाधित ठेवून मानवी जीवनातील  उच्च मुल्ल्यांची जपणूक करणे यालाच आपण संस्कृती असे म्हणू शकतो !
या संस्कृतीचा ठेवा हा विविधतेने नटलेला आपल्याला दिसून येतो !  संस्कारातून व
संस्कृती मधून घरात, परिसरात जे घडते तेच आपल्या मनावर बिंबवले जाते , लहानपणापासून, ज्या समाजात आपण वाढतो , ज्या प्रकारे आपल्याला वातावरण मिळत जाते त्याच प्रकारचे संस्कार आपल्या मनावर होत असतात,
धार्मिक गोष्टी असतील, उपासना असेल, किंवा होणारे घरातील छोटे मोठे कार्यक्रम असतील, त्या प्रमाणे आपली जडणघडण होत असते ,
अमुक तमुक  केले तर काहीतरी मिळेल हेही आपल्या मनावर खोल रूजवले जाते , त्याचाही आपल्या आयुष्यावर बराच परिणाम होतो !
आपल्या संस्कृती मध्ये सदैव सत्याचा मार्ग सांगितला जातो, पुण्यकर्म, दानधर्म  करायला शिकवले जाते, सेवा करणे हाच एक पुण्याचा मार्ग आपली संस्कृती सांगत असते , मग ति सेवा देवाची असो की, रंजल्या गांजलेल्यांची असो , त्यातून मनुष्याला परोपकारी करण्याचा मार्ग सांगितला जातो .
भिती साठी का होईना पाप पुण्य सांगून मनुष्याला सत्यमार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केले जाते हीच आपली संस्कृती आहे , (अज्ञानाचा गैरफायदा घेणारे आजकाल सगळीकडे आहेत तो भाग निराळा)
संस्कृती व संस्कार या नाण्याच्या दोन बाजू आहेत,
दोन्ही पैकी एक गोष्ट जरी जीवनात नसेल तर मनुष्य परिपूर्ण बनुच शकत नाही . ज्या परिस्थितीतून, ज्या परिसरातातून, ज्या वातावरणातून आपण येतो त्याच   संस्कृती मधून जन्मताच काही गोष्टी लागू होतात तर संस्कार हे मानवाला परिपूर्ण करतात.
आपल्या संस्कृती मध्ये अहिंसा व सहिष्णुता याला जास्त महत्व आहे व ते करण्यासाठी व तसे संस्कार होण्यासाठी विविध पुजा , उपवास, व अनमोल अशा विविध धर्म ग्रंथांचे वाचन करायचे असते किंवा ते कुणाकडून तरी कानी पडावे लागते !
या सर्व गोष्टी मुळेच आपली संस्कृती टिकून आहे . ज्या ज्या राज्यकर्त्यांना संस्कृती कळली किंवा तसे त्यांच्या मनावर संस्कार झाले ते ते राज्यकर्ते किंवा राजे भारताच्या इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटून गेले , त्यांनाच लोकांनी सदैव प्रेम दिले .
आपल्या संस्कृती मध्ये , शिक्षण, धर्म, राजकारण, शेती अशा विविध विषयांवर मंथन होत आले आहे . सामाजिक जडणघडण व अभिसरण हे त्यातूनच होत असते . .
भारतीय नागरिकांची विविध ठिकाणी , संस्कृती जरी थोड्याफार फरकाने विभिन्न असली तरी , सर्वांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना आहे , सहिष्णुता आहे , विविधते मध्ये एकता जपण्याची परंपरा आहे .
विविध चालीरीती , विविध भाषा,विविध पेहराव, प्रदेशानुसार  शारिरीक व कलर मध्ये होणारे बदल हे जरी बाह्य रूपाने वेगवेगळे वाटत असले तरी गाभा मात्र एकच आहे , म्हणून आपल्या देशात विविधतेत एकात्मता दिसून येते .
प्रांतीय वाद, भाषिक वाद, धार्मिक वाद, जातीयवाद, साधन संपत्तीच्या वाटनीतून निर्माण होणारे वाद, या सर्वांचा परिणाम जरी संस्कृतीवर होत असला तरी , ९५%जनता ही कोणत्या तरी देवाची , कोणत्या तरी पंताची उपासक आहेच. व त्यातूनच धार्मिकता येत गेलेली आहे . .
म्हणूनच दक्षिणचा मनुष्य उत्तरेकडील देवांची यात्रा करतो किंवा उत्तरेकडील मनुष्य दक्षिणेतील मोठमोठय़ा मंदिरात जात असतो . .
म्हणून आपण एकसंघ आहोत व एकसंघ असल्यानेच आपली संस्कृती महान आहे . 

विजय पिसाळ नातेपुते .
एम ए राज्यशास्त्र
९४२३६१३४४९