vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १४ मार्च, २०२०

स्वच्छतेचा आग्रह धरा व स्वच्छता असेल त्याच ठिकाणी संबंध ठेवा . .

चालू घडामोडींचे विश्लेषण

स्वच्छता नसेल तर कोरोनाचा अटकाव करणे शक्य होईल का ? 
विजय पिसाळ नातेपुते . . . 
आपण ज्या हॉटेलमध्ये चहा पितो , ज्या ठिकाणी जेवण करतो , लग्न समारंभात जेवण करतो . . अशा ठिकाणी स्वच्छता पाहिजेच, तिच ति भांडी  परत परत ओली वापरणे   व त्याच त्या  अस्वच्छ  पाण्यात भांडी व चहाचे कप  विसळणे  हे व्हायला नको आहे . . 
हॉटेल मालकांनी , टपरी धारकांनी , कोल्ड्रींकचे गाडे , भेळ सेंटर, वडापावचे गाडे , या सर्वांनी   थोडे जास्त पैसे ग्राहकाकडून  घ्यावेत पण कागदी युज & थ्रोचे  कप व  प्लेट आणि पत्रावळी  वापराव्यात  . . 
जुन्या पत्रावळी किंवा केळीची पाने  व द्रोण वापरावेत. . . वेटरला व आचारी महिला व पुरुषांना  कंपल्सरी साबणाने आंघोळ करायला लावावी . . . त्यांचा  आणि ग्राहकांचा संपर्क येतो . त्यामुळे त्यांनाही बाधा होऊ नये म्हणून हॅन्डग्लोज व मास्क दिले पाहिजेत, रोजचे कपडे स्वच्छ साबणाने धुतलेले पाहिजेत. . 
संसर्ग हा जास्त हॉटेल व लॉज या मार्फत होऊ शकतो . कारण या ठिकाणी ग्राहक बाहेरगावचा व कुठूनही आलेला असतो .  
हॉटेल चालक मालक, मॅनेजर  व कामगार यांनी तर स्वतःची  खूप काळजी घेतली पाहिजे कारण त्यांचे ग्राहक कुठलेही बाहेरगावचे  असतात व टेबलवर जेवण केल्यामुळे , संबंधित भांडी व टेबल दुषित होऊ शकतात. . 
दुसरी गोष्ट. .  
सलुन दुकानात जातानाही ग्राहकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्याच  आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार्‍या दुकानातच गेले पाहिजे . . व ग्राहकांनी शक्यतो घरूनच रुमाल किंवा  नेपकीन घेऊन गेले  पाहिजेत. . 
सलुनचे सर्व साहित्य डेटॉलच्या पाण्यात धुतले पाहिजे . . 
कारण तोच तो नेपकीन वापरल्यामुळे संसर्ग वाढू शकतो कारण रुमाल नेपकीन हे दिवसभर असंख्य ग्राहकांना वापरले जातात. व पुर्णपणे वाळलेले नसतात,   कारागिर बांधवनाही याची बाधा होऊ शकते . . . त्या कारागीर बांधवांनी काटेकोरपणे प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र नेपकीन वापरला पाहिजे . . त्यासाठी  एकदाच जास्त नेपकीन खरेदी करावे , खर्च करावा लागेल पण ग्राहकाचा व स्वतःचाही जीव महत्वाचा आहे .  भलेही नेपकीन  धुवायचे व स्वच्छतेचे  पैसे जास्त घ्या पण स्वतःही सुरक्षित रहा . . 
एस टी महामंडळाने , चालक व  वाहकांना रोज नवीन मास्क दिले पाहिजेत व बसेसचे दैनंदिन निर्जंतूकरण केले पाहिजे . . हीच काळजी रेल्वेतही घेतली पाहिजे . . 
शहरातील जास्त गर्दीच्या शाळा , कॉलेज, मॉल, दुकाने व छोट्या मोठ्या  शाळांनाही विशेष खबरदारीच्या सुचना दिल्या पाहिजेत. . व त्याचे पालन सर्व संबंधिताकडून  झाले पाहिजे . जास्त फैलाव होण्या पेक्षा . . खबरदारी महत्वाची आहे . . 
जागरुक लोकांनी मोठे लग्न समारंभ, घरातील कार्यक्रम हे सध्यातरी मोठे  घेऊ नयेत. लिमिटेड लोकांनाच निमंत्रण द्यावे . .  यात्रा जत्रा भरवणार्या गावांनी  या वर्षी शासनाचे आदेश असो किंवा नसो . .  गावोगावच्या ग्रामपंचायती व पंचमंडळी यांनी ठराव करून  स्थागित कराव्यात. . . 
 व मोठ्या यात्रा यातून संसर्ग जास्त फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही . .
बाहेरगावचा सार्वजनिक व खाजगी  वहानातून प्रवास  फक्त गरजेपुरताच करावा . .  पर्यटनाला जावू नये . . 

विजय पिसाळ नातेपुते . .