vijaypisal49. blogspot. com

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण









नातेपुते येथे शिवजयंती उत्साहात साजरी . 

नातेपुते येथे शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून खर्या अर्थाने शिवरायांना विशिष्ट एका जाती पुरते मर्यादित ठेवण्याला विरोधक करणारी व शिवविचार सर्वांच्याच मनात रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न  करणारी म्हणून नातेपुते पंचकृषीत नावलौकिक असणारी  म्हणजेच,  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते* यांच्या वतीने मंगळवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी खास  निवृत्त लष्करी अधिकारी मेजर श्री हनुमंत माने,मेजर  श्री दाजी जानकर, मेजर सुरेश पांढरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले ! 
यातुन लष्करी सेवेत असताना  सर्व देशवासियांचे,  सिमेवर संरक्षण करणार्‍या जवानांना निवृत्ती नंतरही समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळावी या उदात्त हेतुने माजी सैनिकांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने शिवरायांचे  पुतळ्यांचे  पुजन करण्यात आले , 
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, आप्पासाहेब  भांड,  पत्रकार सुनिल राऊत, पत्रकार आनंद जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य   श्रीगणेश पागे व  समिर सोरटे ,शिक्षक  श्री संजय ढवळे, व बाबुराव जमाले  तसेच  सामाजिक कार्यकर्ते  एकनाथ ननवरे ,राहुल पदमन,कैलास सोनवणे,   करीम शेख, सुनिल ढोबळे , सागर बिचुकले ,रुपेश इंगोले, राहुल बोत्रे,  विजय डुबल,चंद्रशेखर शेटे, विवेक राऊत, गणेश ठोंबरे , धनंजय राऊत, रवि भंडारे  आदी मान्यवर  उपस्थित होते !
कार्यक्रमाची सांगता झाले  नंतर वेळात वेळ काढुन  माझी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच श्री धैर्यशील देशमुख,प्रा.  उत्तम सांवत यांनीही भेट देऊन प्रतिमा पुजन केले ,  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी !  शिवजयंती सोहळा समितीचे  प्रमुख. . . 
श्री विजय पिसाळ,
श्री संभाजी पवार,
श्री सतिष जाधव,  
अक्षय बावकर, 
ओकांर निकम, 
यांनी विशेष परिश्रम घेतले !