vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

मा.श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांचे मुळे भाजपात चैतन्याचे वातावरण व पक्षाच्या ताकदीतही लक्षणीय वाढ.

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय. . .  रणजितसिंहदादामुळे भाजपाचे बळ वाढले . . . 
वाचा . . . श्री विजयकाका पिसाळ यांचे लेखणीतून. . .
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने युवक नेते व  तरूणांचे आदर्श मा.श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आणि खर्या अर्थाने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाची अभूतपूर्व ताकद वाढायला मदत  झाली , रणजितसिंहदादांच्या प्रवेशामुळे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, विजयराज डोंगरे, कल्याणराव काळे , अशी दिग्गज मंडळी भाजपाकडे आकर्षित झालेली दिसून येते , करमाळा , माढा, सांगोला , माण, फलटण, पंढरपूर या भागातील सर्व भाजपाचे जुने कार्यकर्ते  सुद्धा जोमाने कामाला लागल्याचे चित्र पहायला मिळते,सर्व  परीचारक कुटूंब, नारायण पाटील, सविताराजे भोसले ,   राजाभाऊ राऊत, साठे कुटूंब,सांवत बंधू, शहाजी पाटील, अतुल खूपसे, श्रीकांत देशमुख, गणेश चिवटे  , एकदिलाने काम करताना दिसत आहेत, त्याचप्रमाणे माण मधील, गोरे बंधूंची साथ मिळताना दिसत आहे . माळशिरस तालुका तर जवळपास संपुर्ण एक झाल्याचे चित्र असून सर्वजण एकत्रितपणे या निवडणुकीत काम करण्याची शक्यता बळावली आहे. . 
भाजपाच्या नेतृत्वाला रणजितसिंहदादांच्या नेतृत्वाची पारख झाल्यामुळे माढा मतदारसंघात तर भाजपाची ताकद वाढलीच आहे ..पण  त्याचबरोबर मोहिते पाटील यांना मानणारा  महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील वर्ग सुद्धा आज भाजपाचा पाठिराखा झाल्याचे दिसून येते , रणजितसिंह दादांनी वैयक्तिक कोणताही स्वार्थ न ठेवता , लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी व पाण्याचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न व मतदारसंघातील पासपोर्ट कार्यालये व विविध प्रश्न  मार्गी लागण्यासाठी भाजपला साथ दिली असल्याने व विनाअट भाजपात प्रवेश केल्यामुळे रणजितसिंहदादांची जनमानसातील असणारी चांगली प्रतिमा अजून कित्येक पटीने उजाळली आहे,  यातच मोहिते पाटील यांचा विजय आहे . 
माढा लोकसभा मतदारसंघात सगळे गटतट विसरून, भाजपा सेना व मित्र पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र नक्कीच भाजपाच्या व सेनेच्या  वरिष्ठांना सुखावणारे राहिल यात तिळमात्र शंका नाही . 
यापुढच्या काळात भाजपाने रणजितसिंहदादांचे संघटन कौशल्य व नेतृत्व गुण ओळखून मोठी जबाबदारी दिली तर पक्षासाठी रणजितसिंहदादा हे दिर्घकालीन व फायदेशीर नेतृत्व करू शकतात. 
आजवर रणजितसिंहदादांनी निस्वार्थी राजकारण व समाजकारण केल्यामुळे हजारो , लाखो तरूण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात व जोडले गेले आहेत,  मात्र राष्ट्रवादीतील काही अपप्रवृत्तीमुळे रणजितसिंहदादांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी   पक्षाने योग्य उपयोग करून घेतला नाही ..पण  भाजपाने  रणजितसिंहदादांच्या रुपाने खर्या अर्थाने हिर्याची पारख केली आहे . . 
रणजितसिंहदादा सर्वांना बरोबर घेऊन सामुहिक ताकद लावून  माढा लोकसभेला तर भाजपाचा उमेदवार निवडून आणतीलच मात्र त्याच बरोबर संपुर्ण महाराष्ट्रात किमान पक्षासाठी १० ते १२ आमदार सुद्धा वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतील हे मात्र नक्की आहे . . .  सोलापुर जिल्हयातील  अकलूजच्या खाणीतील हिर्याची पारख भाजपाने केली आहेच. . . फक्त त्याला ताकद मिळाली पाहिजे . . . 
लेखन. . विजयकाका पिसाळ नातेपुते . . .