राजकारणात सत्ताधारी जेंव्हा जेंव्हा कुणाचेही ऐकत नाही तेंव्हा सक्षम विरोधक असावा लागतो सक्षम विरोधक नसेल तर सत्ताधारी मुजोर बनतो म्हणून काँग्रेस टिकलीच पाहिजे . . .
काँग्रेस अपयशातून धडा घेईल का ?
काँग्रेस अजून कीती काळ संयमाने राजकारण करणार!
आज काँग्रेसला आक्रमक व "इट का जवाब फत्थरसे देंगे "अशा नेतृत्वाची प्रत्येक राज्यात जरूर आहे
काँग्रेसला आक्रमक प्रवक्ते , आक्रमक वक्ते पुढे आणावेच लागतील, आय टी सेल जबरदस्त बनवावाच लागेल, खोटा नाटा प्रचार करणार्यांचा तशाच भाषेत समाचार घ्यावा लागेल,
आज काँग्रेसचे विरोधक उद्योगपती , मिडीया , सर्व शासकीय यंत्रणा , साम दाम दंड भेद वापरून प्रत्येक गड सर करत आहे , आजची काँग्रेस नुसत्या गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विसंबून राहात आहे , हे खेदाची गोष्ट आहे , समोरच्या छावणीत मोठे मुरब्बी सेनानी आहेत ते बलदंड आहेत, मॅनेजमेंट करण्याबाबत तरबेज आहेत सर्व गोष्टींत माहिर आहेत, फोडा व राज्य करा ही इंग्रजांची निती हे त्यापेक्षाही खुबीने वापरत आहेत, इलेक्शन कमिशन, न्यायपालिका, पोलिस प्रशासन, व प्रत्येक शासकीय यंत्रणात यांनी माणसे पेरली आहेत, असे जबरदस्त यांच्यासारखे खतरनाक रतिमहारती असतांना इकडे मात्र अजून शिवराय कुणीही होत नाही हे दुर्देवाने म्हणायची वेळ येत आहे, सगळे जणू आपआपसात भांडत बसून विस्कटलेले आहेत. .
ममता बॅनर्जी , पवार साहेब, जगनमोहन रेड्डी , नारायण राणे यांना काँग्रेसने योग्य सन्मान दिला असता,काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी बेरजेचे राजकारण केले असते तर बरेच काँग्रेस मधील चांगले लोक पक्ष सोडून गेले नसते, संगमा, तारीक अन्वर यांचा मान राखला असता , तर कदाचित आज चित्र वेगळे असते , आज काँग्रेस कडे, प्रणब मुखर्जी , राजेश पायलट, माधवराव शिंदे अशी दमदार फौज नाही, बरेच मुरब्बी व जेष्ठ नेते योग्यता असूनही अडगळीत टाकले गेले , राज्यसभा , विधान परिषदा यातून नको ते पुढे केले गेले व त्यांनाच मंत्रीपदे व सर्व लाभाची पदे दिली गेली,त्यामुळे जे मास लिडर होते ते तर गेलेच पण त्यांचेही कार्यकर्तेही पक्ष सोडून गेले , त्यामुळे आज एकटे राहुल गांधी नवख्या सेनापती सारखे कमी पडतात हेच वास्तव आहे , काँग्रेस प्रत्येक राज्यात अंतर्गत कलह जर मिटवू शकत नसेल तर काय होणार? विरोधकांकडे प्रदेश पातळीवर, आमदार, खासदार, नगरसेवक, या ठिकाणी घराणेशाही आहे पण केंद्रीय नेतृत्व काळानुसार सतत बदलले जाते व जनमतावर त्याचा अनुकूल परिणाम होतो !
पुर्वी काँग्रेसकडे जबरदस्त लिडरशीप होती कार्यकर्ते व नेते यात ताळमेळ होता ,
राजकीय नेते कार्यकर्ता जपत होते ,राष्ट्रीय भावना होती, कार्यकर्त्यालाही सत्तेत वाटा होता योग्यतेनुसार काहीतरी मिळत होते ,
आज काँग्रेसमधील नेते कार्यकर्त्याला काहीही देत नाहीत, (विरोधकात तरी सर्व आलबेल आहे असे नाही ),
सर्व सत्तेची पदे व संघटनेतील, पक्षातील सर्व पदे ,नेते, नेत्यांचे सगेसोयरे , बायको, मुलगा ,सुन, भाऊ, पुतण्या , जावई, मेव्हणा यातच वाटून टाकतात, पक्षाचा निधी सुद्धा कधीच खालीपर्यंत येत नाही , आणि सर्वच जाती धर्मातील, समाजातील लोकांना समान धरायच्या ऐवजी मतासाठी प्रत्येक राज्यात विशिष्ट घटकांना अती झुकते माप देते व काही लोकांचे प्रमाणाबाहेर लांगूलचालन करून बहुसंख्य बाकीच्या लोकांना नाराज करायचा उद्योग केला जातो , आजवर काँग्रेसने खूप चांगल्या योजना राबवल्या पण त्याची जाहीरात केली नाही,
ज्यांच्या साठी काँग्रेसने भरपूर योजना राबवल्या तो वर्ग सुद्धा काँग्रेस पासून दुर गेला , गावागावात विविध तंटे सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी बोटचेपी भुमिका काँग्रेस घेत राहिली,
मागच्या काळात मित्र पक्षांची जिरवण्यासाठी मित्र पक्षांवर विविध आरोप करत राहिली, मित्र पक्ष व त्यांचे नेते याचाही सन्मान केला नाही , पराभवाची कारणे न शोधता ,सतत चुका केल्या , पैसेवाले लोकांना राज्यसभा व विधान परिषद यात झुकते माफ दिले गेले , काँग्रेस सत्तेवर असतांना काही गोष्टींत ठाम राहिली नाही , जाहिरात व मार्केटिंग या गोष्टही केल्या नाहीत याची फळे आज काँग्रेस भोगते आहे , घोटाळे न करता सुद्धा घोटाळेबाज हा शिक्का लावून घेतला , ज्यांनी प्रचंड घोटाळे केले त्यांचेवर जबरदस्त व धड नीट प्रहारही केले नाहीत, हेच काँग्रेसच्या अपयशाचे कारण आहे , केंद्रीय लेवलला इतर पक्ष व्यक्ती पुजा करत नाहीत मात्र काँग्रेस वारंवार व्यक्तीपुजा करते आहे , त्यामुळे सामान्य घरातील लोकांना काँग्रेस मध्ये आपल्याला संधी नाही हीच भावना प्रबळ होताना दिसते आहे ,मनमोहन सिंगा सारखे हुशार गुणी पंतप्रधान जरी काँग्रेसने दिले तरीदेखील मास लिडर असणारे पदापासून दुर ठेवले , त्यामुळेही मासलिडरचा पाठीराखा वर्ग बाजूला गेला, काँग्रेस निर्णय घेते पण निर्णय झटपट घेत नाही , निर्णय लांबवत बसते व त्यातूनही नाराजी वाढते , आज देशात सक्षम विरोधक पाहिजे त्यासाठी हुशार चाणाक्ष व सर्वांना बरोबर घेवून जाणार्या मुरब्बी नेतृत्वाची गरज आहे , आजच्या घडीला काही काळ तरी राहुल गांधींनी बाजूला होवून दुसर्याला लिडरशिप दिली पाहिजे ,
आज काँग्रेसमध्येही जबरदस्त वक्ते आहेत, जबरदस्त काम करणारे आहेत पण त्यांना संधीच मिळत नाही , जनमताची नस माहिती नसलेले प्रत्येक राज्यात नेते लादले जातात, पृथ्वीराज चव्हाण वैयक्तीक हुशार आहेत, चांगले प्रशासक आहेत मात्र जनतेत त्यांना फारसी किंमत नाही , त्यामुळे सुद्धा महाराष्ट्र गमवावा लागला, त्यावेळी आक्रमक नारायण राणे मुख्यमंत्री केले गेले असते तर इतकी भयंकर अवस्था झाली नसती, विलासराव देशमुखांचे नंतर संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची बांधणी करणारा नेता दुर्देवाने लाभला नाही ,आज देशाचं नेतृत्व करताना काँग्रेसने स्वतः त्यागाची भुमिका घेवून पवार साहेबांना करायला सांगितले पाहिजे तरच परिवर्तन होईल,
काँग्रेसने , प्रिंट व इलेक्ट्रीक मिडीया व्यवस्थित हाताळला पाहिजे , सोशल मिडियात जी पक्षाची प्रतिमा मलीन केले जातेय ती होवू नये या साठी आयटी सेल स्ट्राँग केला पाहिजे , सिंहाची शिकार करायला नुसती हाकाटी देवून चालणार नाही तर त्याला व्यवस्थित जाळे टाकावे लागेल तरच सिंहाची शिकार होईल,
यांना रोखता येईल!
विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९