vijaypisal49. blogspot. com

रविवार, १० मार्च, २०१९

दिपक शामराव ठोंबरे यांचे पोलिस उपनिरीक्षक निवडीने नातेपुते गावात चैतन्य!

चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते नगरीत श्री शामराव (दादा) ठोंबरे हे आपला पारंपारिक व्यवसाय करत आहेत. व्यवसाय करताना एकवेळ काम कमी झाले तरी चालेल पण ग्राहकाला चांगली सेवा देणे स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे आणि येणार्‍या प्रत्येक ग्राहका बरोबर हसतखेळत बोलून काम करणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी नातेपुते परिसरातील असंख्य माणसे जोडली व त्यांचा ग्राहक सुद्धा त्यांच्याशी  आदरपूर्वक आस्थेवाईक संबध जपून राहिला . . 
त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व राहणीमानात जी विनम्रता व वाणीमध्ये जो गोडवा आहे तोच गुण त्यांच्या तिन्ही  मुलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो . . 
थोरला रणजित  हा सुरवातीला त्यांना  त्यांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी मदत करत असे शामरावदादांच्या हाताखाली काम करत करत तोच आता त्यांचा व्यवसाय पुर्णपणे सांभाळतो  गावातील इतर दुकानांच्या तुलनेने जास्त दर ठेवून सुद्धा स्वच्छता व टापटीप यामुळे ग्राहक कोणतीही कुरकुर न करता जास्तीचे पैसे देतात हाच शामरावदादांचा  व्यवसायिक पैलू रणजित जपतोय. . 
दुसरा किशोर यानेही शिक्षण घेत असताना खडतर प्रवास केला आहे , एबीए करत असताना त्यालाही असंख्य अडचणींचा सामना करावा लागला पण त्यानेही कधीच चिकाटी सोडली नाही , जेव्हा त्याचे शिक्षण चालू होते तेंव्हा तो सुट्टीत शामरावदादांना व रणजितला मदत करत असे एकदाही वेळेचा कधी त्याने अपव्यय केलेला दिसला नाही . तो जेंव्हा जॉबला लागला तेंव्हा पासून शामराव दादांना आधार वाटू लागला , रणजित हाताखाली काम करत होता व किशोर जॉबला लागल्याने दिपकलाही पुढील अभ्यासासाठी मदत करणे शक्य होत गेले , 
 सदैव परिस्तिथीची जाणीव ठेवणार्या कुटूंबातील दिपक सर्वात लहान पण तोही हुशार, त्याकाळात त्याने शाळेत गुणवत्तेने शिक्षण घेत  असताना कुठेतरी लवकर मुलगा रुटीनला लागावा म्हणून शामरावदादांनी त्याला डीएडला ठेवले पण त्याचे डिएड पुर्ण होताच शिक्षक भरती पुर्णपणे थंडावली आणि त्याच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला खीळ बसली पण खचून न जाता त्याने कॉलेज पुर्ण केले व कॉलेज पुर्ण केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा उराशी ध्यास बाळगला , सतत अभ्यास, परिश्रम आणि चिकाटी या बळावर तो परिक्षा देत राहिला , खरंतर मागील तिन चार परिक्षात त्याचे थोड्या किरकोळ मार्कांनी  सिलेक्शन हुकायचे  मात्र त्याने हार मानली नाही आणि २०१७ ला दिलेल्या परिक्षेत तो यशस्वी झालाच. . व खर्या अर्थाने शामरावदादा ठोंबरे यांच्या खडतर जीवन प्रवासाचे चिज झाले . . 
तिनही मुले संस्कारी , निर्व्यसनी आणि कर्तृत्वान निघाली . . 
कुठेतरी त्यांच्या मनाला आतुन समाधान मिळत असेलच आणि तिनही मुलांसाठी शामरावदादांच्या सौभाग्यवती व तिघांच्या मातोश्री यांचीही मोलाची व अखंड कष्टमय साथ मिळाली याचेही त्यांनाही खूप खूप समाधान असेल. . 
नव्या पिढीतील मध्यमवर्गीय घरातील व  सर्वांनीच या कुटुंबातील मुलांकडून प्रेरणा घेऊन आपले भविष्य घडवायला हवे . . 
नातेपुते गावातील समस्त नागरिकांना या कुटूंबाचा अभिमान वाटतो. . . 
खरंतर गावातील, जयपाल देठे , अभिमान माने, मोरे व असंख्य मुले ही सर्वसाधारण घरातून पुढे आली व यशाला गवसणी घालून गावचे नाव मोठे केले . . . तिच प्रेरणा इतर तरूणांनी घ्यावी . . . 
शब्दांकन. 
विजय पिसाळ नातेपुते

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण

नातेपुते येथे शिवजयंती उत्साहात साजरी . 

नातेपुते येथे शिवजयंती निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून खर्या अर्थाने शिवरायांना विशिष्ट एका जाती पुरते मर्यादित ठेवण्याला विरोधक करणारी व शिवविचार सर्वांच्याच मनात रुजवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न  करणारी म्हणून नातेपुते पंचकृषीत नावलौकिक असणारी  म्हणजेच,  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते व समस्त ग्रामस्थ नातेपुते* यांच्या वतीने मंगळवार दिनांक  १९ फेब्रुवारी रोजी खास  निवृत्त लष्करी अधिकारी मेजर श्री हनुमंत माने,मेजर  श्री दाजी जानकर, मेजर सुरेश पांढरे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले ! 
यातुन लष्करी सेवेत असताना  सर्व देशवासियांचे,  सिमेवर संरक्षण करणार्‍या जवानांना निवृत्ती नंतरही समाजात मानसन्मान व प्रतिष्ठा मिळावी या उदात्त हेतुने माजी सैनिकांच्या हस्ते शिवजयंती निमित्ताने शिवरायांचे  पुतळ्यांचे  पुजन करण्यात आले , 
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, आप्पासाहेब  भांड,  पत्रकार सुनिल राऊत, पत्रकार आनंद जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य   श्रीगणेश पागे व  समिर सोरटे ,शिक्षक  श्री संजय ढवळे, व बाबुराव जमाले  तसेच  सामाजिक कार्यकर्ते  एकनाथ ननवरे ,राहुल पदमन,कैलास सोनवणे,   करीम शेख, सुनिल ढोबळे , सागर बिचुकले ,रुपेश इंगोले, राहुल बोत्रे,  विजय डुबल,चंद्रशेखर शेटे, विवेक राऊत, गणेश ठोंबरे , धनंजय राऊत, रवि भंडारे  आदी मान्यवर  उपस्थित होते !
कार्यक्रमाची सांगता झाले  नंतर वेळात वेळ काढुन  माझी सरपंच अमरशील देशमुख, माजी उपसरपंच श्री धैर्यशील देशमुख,प्रा.  उत्तम सांवत यांनीही भेट देऊन प्रतिमा पुजन केले ,  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी !  शिवजयंती सोहळा समितीचे  प्रमुख. . . 
श्री विजय पिसाळ,
श्री संभाजी पवार,
श्री सतिष जाधव,  
अक्षय बावकर, 
ओकांर निकम, 
यांनी विशेष परिश्रम घेतले !

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

नातेपुते नगरीचे कर्तव्यदक्ष सपोनि श्री राजकुमार भुजबळ साहेब.

चालू घडामोडींचे विश्लेषण

नातेपुते नगरीचे कर्तव्य दक्ष सपोनि *मा श्री राजकुमार* यांनी नातेपुते गावचा सपोनि चा कार्यभार सांभाळल्यापासून, विविध गुन्हे उघडकीस आणले , त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर बर्यापैकी वचक बसवला ,बर्याच गुन्ह्याचा छडा तातडीने लावून संबधितांना न्याय मिळवून दिला ,  विशेष म्हणजे गावात होणारे सतत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नातेपुते नगरीतील नागरीकांचे सहकार्याने "गावातील सर्व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी" *सीसीटीव्ही कॅमेरे* बसवून अभिनव असा उपक्रम राबवला आणि त्यातून, मोटारसायकलचे  पेट्रोल चोरी असेल, मोटारसायकलींची  चोरी असेल, रोड रोमियोंचा  शाळा व कॉलेजमधील मुलींना होणारा त्रास असेल  हा बर्याच अंशी कमी झाला आहे .
 एसटी स्टँड व परिसरात होणार्‍या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली, साहेबांनी सीसीटीव्ही बसवल्यामुळे व बरेच  गुन्हे तात्काळ उघडकीस आले आहेत. याच बरोबर भुजबळ साहेब नातेपुते येथे रूजू झाले पासून गावातील शांतता व जातीय सलोखा अबाधित आहे व ति  टिकण्यास खूप मोठी भुमिका साहेबांनी पार पाडली आहे .  
कुणावरही कधीही कसलाही  अन्याय न करता नातेपुते हे पुर्णपणे शांततामय कसे राहिल व किरकोळ वाद कसे मिटतील व सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल हीच भुमिका भुजबळ साहेबांची नेहमी असते. गावातील सर्वांनाच सहकार्याची भुमिका साहेब घेतात, या सर्व गोष्टीमुळे *आदरणीय राजकुमार भुजबळ साहेबांना व नातेपुते पोलिस स्टेशनला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे* 
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या गुणांकन संकल्पनेनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे व पोलिस उपविभागाच्या कार्यालयाचे एकुण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारी २०१९ मध्ये नातेपुते पोलिस ठाणे व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे . 
या विशेष  गौरवा बद्दल  भुजबळ साहेबांचे  मनःपूर्वक  हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा . . . 
विजयकाका  पिसाळ नातेपुते

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

आता फक्त युद्ध करूया !

चालू घडामोडींचे विश्लेषण
संपुर्ण ब्लॉग वाचा व मगच प्रतिक्रिया द्या ! 

प्रत्येकाचे रक्त सळसळतंय,होय!  पाकिस्तानचा बदला घ्यायला हात शीवशीव करतात, मनात रागाचा कडेलोट होतोय, सगळे चॅनलवाले, पत्रकार व संपुर्ण देशप्रेमी हेच सांगत आहेत, 
युद्ध करावं माजलेल्या  पाकिस्तानला धडा शिकवावा , पाकव्याप्त  काश्मीर पासून सुरूवात करावी ते थेट , लाहोर, इस्लामाबाद, रावळपिंडी, अशी शहरं , एकामागून एक,  एका दिवसात बेचिराख करावीत, लाखो सैनिक घुसवून एका एका सैनिकाच्या बदल्यात किमान  हजार तरी मारावेत, 
रक्तपात करावा , 
सगळं पाकिस्तान जाळून टाकावं , बेचिराख करावं , नेस्तनाबूत करावं , जगाच्या नकाशावरून त्याचं निशाण  कायमचं मिटवावं ! 
हेच प्रत्येक भारतीयाला वाटतंय! पाकिस्तानचा रागच तितका आलाय,  
 वाटणं सहाजिकच आहे . पण हे करताना , कितीजण सैनिकांबरोबर जायला तयार आहेत, कितीजण कुटूंब घरदार, बायका -मुलं आई वडील सोडून युद्धभुमिवर जायला तयार आहेत, भारतमातेची सेवा करायला व जीवाची बाजी लावून जीवनाची आहुती द्यायला कोण कोण येणार आहे,  कितीजण, आजच्या पेक्षा दुप्पट टॅक्स भरायला तयार आहेत, कितीजण, युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांची जबाबदारी घेणार आहेत, कितीजण, त्यांच्या आई, वडील, भाऊ, बहीण, व पत्नीला आधार देणार आहेत! 
कितीजण, त्यांचे अश्रू पुसणार आहेत?  कितीजण आपल्या उत्पन्नातील किमान चवथा हिस्सा शहिदांच्या वारसांना द्यायला तयार आहेत, दहा रूपये  दान करताना ज्यांची फाटते ते नुसते फेसबुक व वॉटसपवर मोकळी अक्कल पाजळतात  , मला माहीत आहे बहुसंख्य भारतीय त्याग करतीलही पण, सगळेच  करतील का ?  याचे उत्तर इतिहासाची पाने चाळताना  पहावे लागेल  !  
पाकिस्तान बेचिराख करताना , तो नुसते शेपूट घालून पळून जाईल का ? 
त्यांचे १० मारताना आपलेही २ ते ३ जण शहीद होतील की नाही ?  याचा तरी कधी विचार केलाय का ? 
युध्दज्वर चढविणे व अंगात संचारणे  सहज शक्य होते पण युद्ध करणे हे विनाशाकडे घेऊन जाते, हे कधीतरी शहीद कुटुंबाचे वारसांना भेटा मग कळते , फुकटचे सल्ले देणारे,  प्रत्यक्षात सगळे नाही पण बरेच भेकड सुद्धा असतात, लेखनीला तरबेज असतात व वेळ आलीच तर  कडी लाऊन आत बसून अक्कल पाजळतात, कारण त्यांच्या घरचा कुणीच सीमेवर लढत नसतो, पाकिस्तानचे  युद्धात  समजा ४०लाख मारले तर किमान आपलेही १० लाख तरी शहीद होतील याचातरी विचार केलाय का ?  पानिपतची तेंव्हा लढाई झाली होती तर कित्येकजण युद्ध कैदी होऊन आजही पाकव्याप्त बलुचिस्तान मध्ये जगताना दिसतात, पहिल्या व दुसर्‍या महा यु़द्धाच्या कथा जरी इतिहासात वाचल्यातरी जगाचा विनाष युद्धामुळे होऊ शकतो, संपुर्ण मानवजात संपुष्टात येवू शकते कारण आता मोठे युद्ध कदाचित अणुबॉम्बचेही होऊ शकते , नालायक पाकिस्तान बरोबर युद्ध करत  असताना , त्यांच्या बाजूने चीन उतरला व आपल्या बाजूनेही , ब्रिटन  , अमेरिका , रशिया , उतरले व आपल्या पक्षाची सरसी होऊ लागली व त्यांनी पराभवाच्या भितीमुळे का होईना प्रथम  अणुबॉम्बचा  हल्ला केला तर व  आपली , दिल्ली , मुंबई, बेंगळुरू , कलकत्ता , अशी शहरं त्यांनी लक्ष केली तर कितीजणांना जीव गमवावा लागेल, किती कुटुंबे बेचिराख होतील हे नुसते मनात विचार करून बघा , किंकाळ्या , आरोळ्या  , विव्हळत पडलीली , जणावरे , माणसे , मुलं बाळं रक्त मासाचे सेडच्या सडे, पडलेली प्रेत तरी उचलायला माणसे राहतील का ? 
कारण आताचे युद्ध मुळात तलवारीचे राहिलेले नाही , टँक बारूद, अणुबॉम्ब व कितीतरी नरसंहारक घातक शस्त्रांचा वापर युद्धात होऊ शकतो , 
जैविक व रासायनिक हल्ले वेगळेच! 
समजा असा विचार करा की,  आपल्याच घरावर बाँब टागला गेला व आपलीच  लहान लहान मुलं , आईवडील व आपण त्याचे शिकार झालो तर काय होईल! हडा मासांच्या चिंध्या चिंंध्या झाल्यातर सोसेल का ? 
 व समजा आपणही अणुबॉम्ब टाकायला सुरूवात केली तर त्याचे जागतिक  काय परिणाम होतील, याचा तरी विचार केलाय का ? 
अणुबॉम्ब मुळे तसेही कुठलेच राष्ट्र दुबळे राहिले नाही . 
हो अतिरेकी संपवायलाच पाहिजेत पण त्यासाठी योग्य मार्ग निवडवा लागेल, मुसद्दी पणाने छुपे लढावे लागेल, हो त्यासाठी आपल्या यंत्रणा बळकट कराव्या लागतील, 
दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे . . .
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र यायची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून शिक्षण दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसताव लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्याच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच   वार्तांकन करता आले नाही पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाणे , बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायला पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. 
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

दहशतवाद संपवणे शक्य आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण

दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे ! 
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र येण्याची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून राष्ट्रीय शिक्षण  दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसता, लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्यांच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच वार्तांकन करता आले  पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाने व बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायलाच पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. काही
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण
*विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घेण्याची निर्णायक वेळ आली आहे !* 
पुर्ण वाचा व जास्तीत जास्त शेअर करा . . . . 
विजय पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून. . . 
आदरणीय विजयसिंह मोहिते -पाटील तथा दादासाहेब आपणांस नम्र विनंती की , मोठ्या मनाने पवार साहेबांना माढा लोकसभेला उभे राहण्याची ऑफर दिली .(ति त्यांनी तात्काळ नाकारायला हवी होती पण तेही लगेच तयारी दाखवू राहिले ) तुमचे प्रेम साहेबांवर आहे हे आम्हालाही माहिती आहे पण आजवरच्या साहेबांच्या तुमच्या  बाबतीतील  अनुभवाने माझ्या सारखे तुमचे लाखो चाहते , अनुयायी व्यतीत व निराश झाले आहेत. जे काय राष्ट्रवादी पक्षात  चालू आहे त्यामुळे पराकोटीचे दुःख आम्हाला झाले आहे . आदरणीय पवार साहेब पंतप्रधान व्हावेत जसे  तुम्हाला मनोमन  वाटते तसेच सर्वांनाच वाटते , त्यांचे शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील काम सुद्धा चांगलेच आहे या बद्दल दुमत असायचे कारण नाही ,  पण त्यांच्यावर मनापासून आपण प्रेम करून सुद्धा , निष्ठा ठेवून सुद्धा  त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सुद्धा ,  त्यांनी सातत्याने आपल्याला सापत्नतेचीच  वागणूक दिली  ही सल आमच्या मनात लसलसते आहे  एक काळ असा होता की, संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मुख्यमंत्री व साहेबांना पंतप्रधान बघण्यासाठी आतुर झाली होती पण साहेबांना त्यांच्या कर्माने (विश्वासाती स्वभावामुळेच ) पंतप्रधान पद मिळाले नाही व तेंव्हा  काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त येवूनही केवळ तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केले हा इतिहास आहे  .सातत्याने  तुमचा पक्षातील आवाज दाबण्याचे  काम केले गेले ,  महत्वाची खाती काढून तुलनेने दुय्यम खाती दिली गेली  पण तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे तुम्ही  ग्रामविकासा सारख्या दुय्यम खात्यालाही मोठे करायचे काम  केले , ग्रामविकास मंत्री म्हणून जोरदार ठसा उमटवला , तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या निष्ठावंत आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्यांना विविध प्रलोभने  दाखवून  व विविध क्लृप्त्या लढवून तुमच्या पासून दुर करायचे काम केले . २००९ ला पंढरपूर मधून तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला मुद्दामहून तिथून उभे केले व तुमच्या पराभवाची तजवीज केली गेली  आणि परिचारक व तुमच्यात कायमचा दुरावा निर्माण केला , त्या अगोदच तुम्ही त्यांना  मोठ्या मनापासून  २००९ला  माढ्यातून लोकसभेवर निवडून दिले पण तरीही त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही व त्यांच्या ताकदीचा व शब्दाचा मतदार संघातील विकासकामासाठी म्हणावा तसाव उपयोग केला नाही, पाठपुरावा केला नाही  , पंढरपूरच्या पराभवा नंतर तातडीने तुमचे पुनर्वसन करणे अपेक्षित होते , पण त्यासाठी सुद्धा दोन वर्षे ताटकळत ठेवले  व नंतर राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली आणि  परत मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही , तुमच्या पक्षातील विरोधकांना सातत्याने बळ दिले, तरीही  आम्हाला  वाटायचे राजकारणात कमीजास्त चालते आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, रणजितदादांना कुठेतरी सामावून घेतले जाईल पण तसे झाले नाही , साहेबांना  त्यांच्या मुलीची  , पुतण्याची व आता नातुचीच जास्त काळजी आहे पण ते करताना दुसर्‍याचे किती वाटोळे करावे याचेही भान राहिलेले नाही , पक्षीय राजकारणात गट तट हे असतात ते सगळ्यात पक्षात दिसून येतात पण इतर पक्षांचे पक्ष प्रमुख किंवा अध्यक्ष सर्व गटातटांना सामावून घेताना गटबाजी वाढणार नाही याचीही दक्षता घेतात, हे मात्र माजी सनदी अधिकारी व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनाच पुढे करून तुमच्या पायात साप सोडायचे काम करतात,  हो इथे मात्र साहेब किंवा अजितदादा गटबाजीला खतपाणी घालतात जेष्ठ सहकार्याला आव्हान उभे करतात व  सहकार्याचाच  , स्वतःच कसा पराभव होईल हे पाहतात हो हे फक्त राष्ट्रवादीतच होत आहे . त्यामुळे आमच्या सारखे हजारो लाखो कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत. 
दादासाहेब आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते तुमच्यावरील अन्यायाने खिन्न झालोय, व्यतीत झालोय, राजकारणात जर आपलाच नेता आपले खच्चीकरण करत असेल तर आपण का या पक्षात रहावे ! हीच वेळ आहे बंड करायची , स्वाभिमानी जनता व लाखो तुमचे चाहते , कार्यकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पहात आहेत, जनतेत फिरताना आम्हाला त्याची प्रचिती येत आहे , हो दादासाहेब आता काहीही होवो पण आर या पार होऊद्या त्यांनी आपल्याला सातत्याने अपशकुन केलाय आपण आता करा ही लोकांची भावना  आहे . हो  हीच वेळ आहे कि आता त्यांनाही आपली किंमत दाखवून देण्याची हीच वेळ आहे बंड करून उठण्याची , दादासाहेब "अभी नही तो, कभी नही " हो आजही वाटते मनोमन वाटतेय साहेब पंतप्रधान व्हावेत. 
पण सुप्रियाताईंनी वडीलांसाठी जरा थांबायला काय हरकत आहे ! त्यागाचा मक्ता फक्त आपणच घेतलाय का ? 
  साहेबांनी शिरूर, मावळ याठिकाणी प्रचंड कामे केली आहेत की, तिथून लढावे येथील ना ते निवडून तिथे तिथून पळ काढून इकडे कशासाठी त्यांचा डोळा ! नातुची काळजी लागलीय का ?  पार्थदादाचे तरी कुठे अजून वय झालेय? 
दादासाहेब तुम्ही आम्हाला सांगताय साहेबांना आपण आमंत्रण दिलंय, निवडून आणायची जबाबदारी आपली आहे , पण दादासाहेब त्यांनी कधी आपल्यासाठी त्याग केलाय का ? त्यांनी कधी आपल्याला बारामतीतून उभे रहायची ऑफर केलीय का ? प्रेम हे निःस्वार्थी व निस्सीम असायला हवे मात्र ते कधीच एकतर्फी असता कामा नये ! 
२००९ च्या आपल्या पंढरपूरातील  पराभवाच्या जखमा आजही आमच्या अंगातून  भळभळून वहात आहेत, साहेब माढ्यातून नक्कीच माघार घेतील मात्र ते जर जनमताचा कौल न जाणता  उभे  राहिलेच  तर मात्र बहुसंख्य कार्यकर्ते तुमचेही ऐकायच्या मनस्थितीत राहणार  नाहीत हे जनतेत फिरताना आम्हाला पदोपदी जाणवते , हा लेख मि माझ्या मनाने नव्हे तर जनतेच्या असणाऱ्या प्रतिक्रिया तुम्हाला कळाव्या म्हणून लिहलाय, जनता म्हणते  पंढरपूरच्या विजयदादांच्या  पराभवाचे उट्टे काढायची संधी आली तर, घेऊ साधून! 
असंख्य कार्यकर्ते संधीच शोधत आहेत व साहेब उभे राहिलेच तर ति त्यांना आपोआपच मिळण्याची शक्यता आहे .
विजय पिसाळ नातेपुते !

शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१९

पवार साहेब तुम्ही पंतप्रधान व्हायला हवे! ही तर तमाम महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे ! फक्त माढ्याचा आग्रह कशासाठी करताय तेच कळेना !

चालू घडामोडींचे विश्लेषण

आदरणीय, पवार साहेब लोकसभेवर जाण्यासाठी  अट्टाहास करायला हवाच का ?  
तुम्हाला जरी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व बाकीच्या सर्व  सहकार्यांनी माढ्यातून लढायचा आग्रह केला असला तरीदेखील तुम्ही विनम्र नकार द्यायला पाहिजे ! असे जनतेला वाटते , साहेब 
आज प्रत्येक पक्षात व प्रत्येक मतदारसंघात कुरबुरी असतातच, तशा राष्ट्रवादीतही आहेत,  उदयनराजे , धनंजय महाडिक, यांच्याही मतदारसंघात किरकोळ कुरबुरी होत्या व आहेत!  त्या कुरबुरी तुम्ही मिटवताच की , खरेतर तुमच्या शब्दा बाहेर कुणीच नाही ,  उलट तुम्ही वडीलकीच्या नात्याने सर्वांना ठणकावले पाहिजे व सांगितले पाहिजे की , पक्षाचा निर्णय प्रत्येकाने मान्य करावा नाहीतर तुमची गय केली जाणार नाही . जे ग्रामपंचायतीला कधी निवडून आले नाहीत असे लोक  केवळ पैसा आहे म्हणून उमेदवार म्हणून इच्छुक होतात, स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करतात. याला खरंच खतपाणी घालायची गरज नाही ! पण खतपाणी घातले जातेय, साहेब तुम्ही कोणत्याही सभागृहात असला तरी संधी असेल तर नक्कीच पंतप्रधान व्हाल त्यासाठी माढ्यात उभेच रहायची गरज नाही . 
साहेब जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे व तुम्हीही जनतेची अविरत सेवा केली आहे त्यामुळे आता मनमोहनसिंग यांचे सारखे राज्यसभेवर राहून मार्गदर्शन करत रहायला पाहिजे असे वाटते ,  आपल्या जुन्या  सहकार्यांना व  पक्षाच्या कामात झोकून देणार्‍यांना संधी द्यायला पाहिजे पण होतय उलटंच? कधीच पक्षाचे काम न केलेले उमेदवारी काय मागतात पेच काय निर्माण होतो ! 
यातून साध्य काय होतंय? जनतेमध्ये  
फक्त पक्षाची नाचक्की होतेय! आज  मिडीयात  संपुर्ण पवार कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत असा प्रचार होतोय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उत्तर देणे कठीण होत  असताना ,  सामान्य  जनतेला काय वाटेल याचा तरी तुमच्या सारख्या मुरब्बी व्यक्तीमत्वाला कळायला हवे ! 
तुम्ही  विचार करायला हवा . 
लोकात चर्चा होतेय, 
तुम्ही सध्या राज्यसभेवर आहातच, अजितदादा व सुप्रियाताई सुद्धा विधिसभा व लोकसभेवर आहेत आणि रोहितदादा पण सध्या जिप सदस्य आहेत पार्थदादाची पण चर्चा आहे मग राष्ट्रवादी पक्ष केवळ पवार कुटुंबा पुरता मर्यादित आहे का ? की पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. . अशी चर्चा बरी नव्हे ! 
तुम्ही आजवर मोठ्या मान सन्मानाने सर्व निवडनुका जिंकल्या आहेत  पण यावेळची माढा लोकसभेची निवडणूक  तितक्याच फरकाने तुम्ही जिंकाल अशी शक्यता कमी वाटते ,  कारण २००९ व आत्ताची परिस्तिथी खूप  विभिन्न आहे, भाजपाची बांधनी तळागाळात पोहचलीय  व वंचित बहुजन आघाडीमुळे   दलित व मुस्लीम मतांची विभागणी अटळ आहे ,  या तोट्याच्या बाजुंचाही विचार करायला हवा . माळशिरस तालुक्यात  विजयदादा तुमचेच काम करतील हे नक्की आहे.  कारण दादांच्या स्वभावात आतुन एक करायचे  व वरून दुसरे करायचे  असे नसते पण  समजा  जरी विजयसिंह दादांनी तुमचे मनापासून काम केले तरीदेखील जनतेच्या मनात एक सुप्त अन्यायाची भावना तयार होत  आहे, राष्ट्रवादी पक्ष दादांवर अन्याय करतोय, त्यांचे जाणिवपुर्वक खच्चीकरण केले जातेय, त्यांना डावलले जातेय व ही सुप्त भावना  मतपेटीतून व्यक्त झाली तर राष्ट्रवादीचे  मताधिक्य कमालीचे घटू शकते . 
साहेब तुमची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे , अभ्यास दांडगा आहे तुमच्या बुद्धीमत्तेला व स्मरणशक्तीला तोड नाही पण तुम्ही सध्या माढ्यात उभे रहायचा चुकीचा विचार करताय! खरेतर  तुम्ही सहकार्यांना मोठे करा आणि निवडणूक लढवायची असेलच तर  नक्कीच  बारामतीमधुन उभे रहा .पण माढ्यातून नका उभे राहु आपल्याच पक्षातील  काहीजण विजयसिंह दादांना त्रास देण्यासाठी मुद्दामहून तुम्हाला आग्रह धरतील पण त्यातील एक दोन सोडले तर जनाधार नसलेले बहुतेक आहेत. त्यांचे ऐकु नका  त्या ऐकु नका ! 
 तुम्ही प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार द्या व महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या    किमान १५ खासदारांचे बळ घेऊन दिल्लीत जावा  नक्कीच तुमची मान खूप उंचावली जाईल, जुने जानते सहकारी बरोबर घ्या काही ठिकाणी जिथे गरज आहे तिथे नवीन रक्तालाही संधी द्या मात्र माढ्यातुन स्वतः विजयदादांनी काहीही म्हटले तरी त्यांनाच तिकिट द्या कानफुक्या लोकांचे जास्त ऐकु नका , 
कोल्हापुर मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनाही डावलल्या नंतर जि सहानुभूती त्यांना मिळाली तशी सहानुभूती विजयदादांना आहे , जरी दादांनी बंडखोरी केली नाही, तुमचेच प्रामाणिक काम केले  तरीदेखील वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटील या नावावर प्रेम करणारा वर्ग दुखावला जाणार व तो भाजपाच्या वळचणीला जाणार मग साध्य काय होणार!  तुमचे मताधिक्य घटले तर काही कानफुके परत म्हणणार की विजयदादांनी तुमचे काम केले नाही , माढा गढ शाबूत राहिला पाहिजे व तुम्हीही देशाचे पंतप्रधान झाला पाहिजे म्हणून तुम्ही शक्यतो राज्यसभा हाच पर्याय निवडा किंवा बारामतीमधुन लढा , सुप्रियाताईंना राज्यसभा पर्याय ठेवा मात्र माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील हेच पक्षाला तारक राहतील हे नक्की वाटते !
विजय पिसाळ नातेपुते

माढा मतदारसंघातील जनमताचा घेतलेला कानोसा !

नक्कीच वाचा. . . 
हे माझे वैयक्तिक मत नाही माढा मतदारसंघात फिरत असताना जनमताचा घेतलेला कानोसा . . . . 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . 
सामान्य मतदार म्हणतात. . 
पवार साहेबांनी स्वतःच्या महत्वकांक्षा पुर्ण करण्यासाठी बारामती मधून जरूर उभे रहावे व  सुप्रियाताई सुळे यांना राज्य सभेवर पाठवावे मात्र ज्या विजयदादांनी पक्ष स्थापनेपासून साथ दिली त्यांना बाजूला करून माढ्यामधून उभे राहू नये , 
पवार साहेब तुमचे , नेतृत्व कर्तृत्व, आम्हाला जरी मान्य असले तरी आमच्या ह्यदयातील आदरणीय विजयदादांवर   षडयंत्र रचून त्यांचे  खच्चीकरण करून तुम्हाला जे पाहिजे ते  आम्ही कदापि सहन करणार नाही ! 
आजवरच्या राजकीय वाटचालीत तुम्हाला जनतेने मनापासून साथ दिली पण ज्या ज्या लोकांनी (नेत्यांनी )साथ दिली , ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच जर खच्चीकरण करणार असाल तर, तुमच्या महत्वकांक्षा कशा पुर्ण होतील? व तुमची विश्वासार्हता कशी राहिल? 
तुम्ही प्रत्येक जिल्हात प्रस्थापित नेतृत्वाला शह देण्यासाठी दुसर्‍यांना ताकद दिली, मोठे केले व प्रस्थापित नेतृत्वाचे खच्चीकरण करायचा प्रयत्न केला, एवढे करून सुद्धा ज्यांना लोकांना  तुम्ही ताकद दिली त्यांनीच तुम्हाला आव्हान दिले मात्र तुमच्यावर निष्ठा ठेवून ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांनाच तुम्ही खच्ची करू लागला  त्यामुळेच पक्ष वाढीला मर्यादा आल्या ,  तुम्हीच असे वागु लागल्याने , तुमच्यावर विश्वास ठेवणारे , तुमच्यावर प्रेम करणारे ,  तुम्हाला साथ देणारे , सातारा , नगर, पुणे, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, नाशिक, उस्मानाबाद , ठाणे जिल्ह्यातील असंख्य सहकारी तुम्हाला सोडून गेले ! 
खरे तर तुम्ही तुमच्या घरच्या हक्काच्या ,  लोकसभेला बारामती मतदारसंघातून उभे रहायला काहीच हरकत नाही , पण केवळ तुमच्या  मुलीची सोय म्हणून तुम्ही माढ्यात उभे रहात आहात,
 सुप्रियाताईला तुम्ही कुठेपण  संधी देवू शकता पण माढ्यात उभे राहून विजयदादांचे खच्चीकरण करणे बरोबर नाही . 
तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही खूप चांगले निर्णय केले पण विश्वासार्हयता संपादन करायला कमी पडला हे खेदाने म्हणावे लागते, वसंतदादाच्या पाठित  खंजीर खुपसण्याचा शिक्का पुसायच्या ऐवजी ठळक होत आहे , तुम्ही तो शिक्का पुसू  शकला नाही , 
आपल्याच जुन्या जानत्या  सहकार्याचे राजकीय जीवन संपवून तुम्हाला काय साध्य करता येईल! 
तुम्ही पंतप्रधान व्हावे ही तमाम मराठी माणसांची इच्छा पण तुमच्या अशा वागण्यामुळे एक एक मतदारसंघातुन राष्ट्रवादीचे उमेदवार पडत गेले, टोकाचा विरोध पक्षा  बाहेरील लोकांचा तुम्हाला झाला नाही , पण तुम्हीच मोठे केलेले तुम्हाला त्रास देतात, 
२००९ ला सुद्धा विजयदादांनी मोठ्या मनाने तुमची उमेदवारी स्वीकारली तुम्हाला निवडून आणले ? 
त्याची परतफेड तुम्ही दादांना पंढरपूरला उभे करून कशी केली हे सर्वजण जाणत आहेतच,(सामान्य लोकातील चर्चा ) आतातरी या वयात विचार करा , प्रभाकर देशमुख, दिपक साळुंखे सारखी पिल्ले सोडून विजयदादांना विरोध   असल्याचे तुम्हीच चित्र तयार करायचे व तुम्हीच परत असे वागायचे बरे नव्हे ! तुमचे शब्द दादांचे आहेत हे सांगायचे ? 
साहेब तुम्ही माढ्यातून २००९ला उभे होता तेंव्हा आम्ही लोकांनी  जीवाचे रान केले का तर इथे बारामती सारखा विकास होईल पण, माढ्याचा कोणताही प्रश्न तुम्ही सोडवला नाही ! पाणी, एम आय डी सी , 
रेल्वे, हायवे, व इतर कामे तुमच्या एका शब्दावर झाली असती मात्र ते तुम्ही केले नाही  ही लोकात कुजबुज होते, तरीही आम्ही तुमच्यावर वडीलधारे म्हणून खूप अपेक्षेने व आपुलकीने  पहात आलो आहोत पण तुम्ही परत परत त्याच चुका करत आहात, अरूण जगताप, जयदत्त क्षीरसागर (सोडायच्या मार्गावर ), बबनराव पाचपुते , राहूल कुल, कै. सदाशिवराव मंडलिक, 
सुरेश धस, सुरेश कलमाडी , आजम पानसरे , सुरेश जैन, प्रशांत  परिचारक, संजय पाटील, संजय जगताप, शिवाजीराव आढळराव पाटील, लक्ष्मण जगताप, लक्ष्मण माने , लक्ष्मण ढोबळे , संजय शिंदे , संजय काकडे, नायकवडी , अशी शेकडो तुम्ही मोठी केलेली माणसे तुम्हाला सोडून गेली !  तुम्हालाच आव्हान देवू लागली याचा तरी विचार करा! पंढरपूरातील पराभव, जिल्हा परिषदेतील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव,  इतके सर्व होवूनही विजयदादा तुमच्या सोबत राहिले त्याची परतफेड तुम्ही अशी करावी हे बरे नव्हे, 
ज्या हर्षवर्धन पाटीलांनी सुप्रिया ताईंना लिड दिले त्यानांही पाडायचे काम तुम्ही केले याला काय म्हणावे , कसले राजकारण हे ! 
साहेब तुमचे हजारो गुण चांगले आहेत मात्र तुम्ही जवळच्याच सहकार्यांना संपवत राहिला तर पक्ष संपायला वेळ लागत नाही , तुमच्यावर आम्ही लोक मनापासून  प्रेम करतो पण, विजयदादांना डावलून जे तुम्ही करत आहात ते आम्हाला मुळीच मान्य नाही , तुम्हाला जर २०१९ ला पंतप्रधान किंवा  मोठ्या पदावर बसायचे असेल जनसामान्यातुन आलेले व   कार्यकर्ते व तुमचे जुने  सहकारी यांना संधी द्या , पक्षाच्या सीट वाढवायच्या असतील तर धोका पत्करून, शिरूर, मावळ, नगर अशा ठिकाणी उभे रहा ! 
 पण पवार फॅमिली पुरता राष्ट्रवादी पक्ष करू नका , 
घरातून तुम्ही किंवा सुप्रिया असे एकजणच लोकसभा  लढा ! 
नाहीतर माढ्यातील  राजकारणाची दिशा सुद्धा  शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघा सारखी होईल व हातचा मतदारसंघ कायमचा भाजपाकडे जाईल. साहेब वेळ गेलेली नाही ! 
पवार साहेब 
तुम्हाला पंतप्रधान पदासाठी व राजकीय कारकिर्दीसाठी  खूप खूप शुभेच्छा  धन्यवाद!

सामान्य लोकांना भेटल्यावर अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तेच तुमच्या कानावर घालायचा छोटासा प्रयत्न! 
शेवटी तुम्ही योग्य निर्णय घ्याल हीच अपेक्षा ! 
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१९

माढा मतदारसंघातून जाणून घेतलेला लोकांचा कल!

चालू घडामोडींचे विश्लेषण. . . .

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

ओळख आदरणीय, माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. खासदार विजयसिंह मोहिते- पाटील तथा दादासाहेबांच्या कार्याची !

ओळख आदरणीय खासदार  विजयसिंह मोहिते पाटील तथा  विजयदादांच्या कार्याची. आदरणीय
दादासाहेबांनी
अकलूज ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला, अकलूजचे सरपंचपदाचा यशस्वी कारभार पाहिल्या नंतर दादासाहेब हे सोलापूर  जिल्हा परिषद अध्यक्ष झाले आणि नेमका  त्यावेळीच  दुष्काळ पडला दादासाहेबांच्या  नेतृत्वाचा  कसोटीचा काळ चालू झाला ,  लोकांच्या  हाताला काम नव्हते , प्यायला पाणी नव्हते, जणावरांना चारा नव्हता अशा परिस्थितीत दादासाहेबांनी  आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर संपुर्ण जिल्हा जिल्हा परिषद मार्फत नाला बंडीग, पाणंद रस्त्यांची कामे , छोटेमोठे तलावातील गाळ काढणे अशी कामे सुरू केली, मजुरांना हाताला काम दिले गोरगरीबांच्या चुली पेटवण्याची व दुष्काळात लोकांना  जगवण्याचे काम दादासाहेबांनी केले , राज्य सरकार मध्ये मोहिते पाटील घराण्याचा दबदबा असल्याने तेंव्हाच्या सरकारने दुष्काळासाठी मुबलक निधी केवळ दादासाहेबांमुळेच  जिल्हा परिषदला उपलब्ध करून दिला, "नव्हे निधी खेचून आणला " गावोगावी वाड्या वस्त्यावर  पिण्याच्या पाण्याचे टँकर, जणावरांना चारा छावण्या उभारून दादासाहेबांनी दुष्काळावर यशस्वी मात केली छोटेमोठे पाझर तलाव, मातीचे बंधारे याचीही मोठ्या प्रमाणात कामे केली . नंतरच्या काळात
आदरणीय दादासाहेब जेंव्हा प्रथमच विधानसभेला उभे राहिले व राज्यात त्यावेळी सर्वाधिक मताधिक्याने शिडी या चिन्हावर निवडून आले, कारण तेंव्हा तांत्रिक अडचणी मुळे दादासाहेबांना पक्षाचे चिन्ह मिळाले नाही . दादासाहेब विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर दादासाहेबांची ख्याती संपुर्ण देशभरात पसरली गेली , पश्चिम महाराष्ट्रात जेंव्हा जेंव्हा स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी , राजीवजी गांधी आले तेंव्हा तेंव्हा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात दादासाहेबांना मानाचे स्थान मिळाले बर्याचदा दादासाहेबांनी व इंदिराजी आणि राजीवजी यांनी एकाच गाडीतून प्रवास केला त्यामुळे दादासाहेबांच्या शब्दाला दिल्लीत सुद्धा मान होता व आहे  आणि त्याचा फायदा सातत्याने सोलापुर सह पुणे, सातारा , सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी झालेला आहे . दादासाहेबांचा राजकिय आलेख सातत्याने उंच उंच होत गेला विविध खात्याचे मंत्री म्हणून काम करताना दादासाहेबांनी निरा देवघर प्रकल्प मार्गी लावला , जिल्ह्यात सहकर्यांच्या माध्यमातून  साखर कारखाने निर्माण केले , विशेषतः बांधकाम खाते सांभाळत असताना संपुर्ण ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले , विविध ठिकाणी पुल बांधले ,  पाटबंधारे मंत्री असताना भाटगर, वीर, व उजनी सह संपुर्ण राज्यातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन केले एकदा तर निरा खोर्यातील धरणे पन्नास टक्के सुद्धा भरली नसताना विजयदादांच्या अचूक नियोजनातून उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची दोन आवर्तने लोकांना मिळाली व कमांड एरियात  पाणी टंचाई जाणवली नाही , ग्रामविकास मंत्री असताना , सरपंचांचे मानधन वाढवले , अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडवले आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ग्रामपंतायती मधील कर्मचार्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला व हजारो कर्मचारी यांना न्याय मिळाला , ग्रामविकास मंत्री असतानाच दादासाहेबांनी , भूमिगत गटार योजनेची ग्रामीण भागात  सुरूवात केली व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व रस्ते सिमेंटचे करायचा निर्णय केला . राजकीय कारकीर्द चालू असताना दादासाहेबांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली त्याही संधीचे सोने दादासाहेबांनी केले , सातारा , सांगली , सोलापूर पुणे आणि संपूर्ण मराठवाड्याची तहान भागेल असा कृष्णा भिमा स्थिरीकरण प्रकल्प मंजूर केला व संपुर्ण राज्याला पतदर्शी ठरेल असा हा प्रकल्प होता कारण, या प्रकल्पात शेतकर्यांना पाणी तर मिळणार होतेच मात्र त्यासाठी एक इंचही जमीन भूसंपादन करायची गरज नव्हती, कुणीही विस्थापित होणार नव्हते ,  कारण हा संपुर्ण प्रकल्प भूमीगत बोगदा खोदून होणार होता . माळशिरस विधिसभा मतदारसंघ राखीव झाल्याने दादासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातून काही काळ अलिप्त रहावे लागले त्यामुळे काही लोकांनी या प्रकल्पाला खीळ घालण्याचे काम केले कारण हा प्रकल्प झालाच तर त्याचे श्रेय दादासाहेबांना मिळेल हा कोता विचार काहींनी केला.
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात. म्हणून दादासाहेबांना जनतेचे प्रेम लाभते व  मान मिळतो आहे.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य  लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्या सह सोलापूर, पुणे , सातारा , सांगली या ठिकाणची बहुतांश  जनता  दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते,
माळशिरस तालुक्यातील जनतेने तर सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम  केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली, ग्रामीण भागात  शिक्षण उपलब्ध करून दिले ,  रस्ते,  विज, पाणी ,आणि आरोग्य क्षेत्रात मोठे काम केले विशेषतः ग्रामीण रूग्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्रांची गावोगावी निर्मिती दादासाहेबांनी केली . आपुर्या विद्युत प्रवाहाने मोठ्या  प्रमाणावर शेतकर्यांच्या मोटारी जळत होत्या , पुर्ण दाबाने विज पुरवठा होत नव्हता तेंव्हा दादासाहेबांनी खास बाब म्हणून विज उपकेंद्रांची निर्मिती केली .जनतेसाठी  तळमळीने काम करणारा असा नेता कुठेही दिसणार नाही .संत तुकाराम महाराज  व संत ज्ञानेश्वर महाराज  पालखी महामार्ग,महाराष्ट्रात एका जिल्ह्यात स्वतंत्र  विद्यापीठ म्हणून सोलापूर विद्यापीठ आणण्याचे  कामे केले . उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना सर्वप्रथम दादासाहेबांनीच मांडलेली आपणांस  दिसून येते.  सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव दादासाहेबांच्या मार्गदर्शना खाली झाला , विजदादांनी सोलापूर विमानसेवेसाठी बरेच प्रयत्न केले व काहीकाळ विमानसेवा सुरू देखील केली होती,  असे जिल्ह्यातील असंख्य  प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वेचा प्रश्न सातत्याने लावून धरून तो  रेल्वे मार्ग मंजूर करून घेतला,  बंद पडलेल्या  कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉपसाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणण्याचे काम दादासाहेबांनी केले .
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे राष्ट्रीय  सहापदरी व राज्य महामार्गाच्या अंतर्गत येणारे  चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. पालखीतळ, खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी संबधित शेतकर्यांना मिळवून दिल्या. माळशिरस कोर्टासाठी भव्य  इमारत, पंचायत समिती व तहसील कार्यालयाची भव्य इमारत दादासाहेबांमुळेच उभी राहिली .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी दिला, नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी केली ,  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी अशी विविध  कामे मार्गी लावलेली आहेत . माळशिरस येथील लोकांना सोलापूर व पंढरपूर लांब पडत होते म्हणून खास बाब म्हणून जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटीओ ऑफीस माळशिरस तालुक्यात आणले याचाही लाभ माळशिरस सह आसपासच्या तालुक्यातील जनतेला  होताना दिसतोय,
 पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे काम असेल तेही दादासाहेबांनीच केले आहे ,
 केळी, डाळींब, भाजीपाला व भुसार मार्केट चालू करून शेतकर्यांच्या मालाला स्थानिक ठिकाणीच बाजारपेठ उपलब्ध करून दिली व त्या माध्यमातून हजारो, व्यापारी , मजूर आणि कामगार यांच्या हाताला काम सुद्धा दिलेले आहे .
संपुर्ण महाराष्ट्रातील मोठा घोडेबाजार, शेळी मेंढी व जणावरांचा बाजार सुद्धा याठिकाणी भरतो, अशा बारीकसारीक  विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या आहेत  !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी उपलब्ध करून दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली ,वादळी वार्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करून देणे असो ,  जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे दादासाहेबांनी  केली .दलित मुस्लीम यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या व सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुद्धा  उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .अकलूज माळशिरस येथे वेळोवेळी  कृषी प्रदर्शन भरवून शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञान देण्याचे काम केले .
त्यामुळेच  विजयदादांना माळशिरस तालुक्या सह  सोलापूर सातारा जिल्ह्यातील  जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे , हजारो लाखो कामे अज्ञात आहेत,
माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य, माजी आमदार  व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.   आता  जे  गावोगावी सत्कार होत आहेत, अमृत मोहोत्सव साजरा होत आहे ते पाहता दादासाहेबांचे सार्वजनिक जीवन कृतार्थ झाल्याचे दिसून येते .
दादासाहेबांवरील  निस्सीम प्रेमातून सुचलेल्या  चार ओळी लिहण्याचा माझा प्रयत्न तुम्हा सर्वांना  नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील तथा
दादासाहेब व मोहिते पाटील कुटूंबावर प्रेम करणारा एक सामान्य
 कार्यकर्ता म्हणून हा लेखन प्रपंच!
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते.
९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
हा लेख दादासाहेबांच्या कार्याचा गौरव म्हणून जास्तीत जास्त शेअर करा .
व आम्हालाही प्रतिक्रिया कळवा ही विनंती

बुधवार, ३० जानेवारी, २०१९

माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जिंकायची असेल तर माळशिरस तालुक्यातून मताधिक्य महत्वाचे !

माळशिरस तालुक्याची साथ असल्याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघ  जिंकणे अशक्य. . . ?
माळशिरस तालुका हा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला कालही होता , आजही आहे व भविष्यातही राहिल,  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा एक अपवाद वगळता आजतागायत माळशिरस तालुक्यातील जनतेने कोणतीही  लाट असो किंवा काहीही असो आदरणीय विजयसिंह  मोहिते पाटील यांना मजबूत साथ दिली आहे .
कारण दादासाहेबांकडे सरपंच पदापासून, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्री ते उपमुख्यमंत्री आणि गेली पाच वर्ष खासदार असा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे.
त्यामुळेच त्यांना जनतेची संपुर्ण नस माहिती झाली आहे .
दादासाहेबांचा मितभाषी स्वभाव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात असलेला मान सन्मान तसेच सत्तेत असताना जनतेची कामे करतानाच विरोधी पक्षातील नेत्यांशी ठेवलेले जिव्हाळ्याचे संबध यामुळे सत्ता नसली तरीदेखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि विजयदादांनी सुचवलेली कामे मार्गी लागतात.
 दादासाहेबांनी सत्तेत असताना कायम सत्तेचा वापर जनसामान्य लोकांसाठीच केला . म्हणून  माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवर मनापासून प्रेम करते सातत्याने दादासाहेबांना प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मताधिक्य  द्यायचे काम इथल्या जनतेने केले आहे . माळशिरस तालुक्याचा कायापालट करत असतानाच  दादासाहेबांनी  सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ , शिक्षण क्षेत्र,  रस्ते,  विज, पाणी , यासाठी सातत्याने काम केले , संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर  पालखी महामार्ग, सोलापुर विद्यापीठ, कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना , उजनीचा पाणीसाठा वाढवण्यासाठी व शासनाला महसूल मिळण्यासाठी वाळूचा लिलाव केला पाहिजे,
 ही संकल्पना असेल, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा अकलूज ग्रामपंचायत व माळशिरस पंचायत समितीचा ठराव असेल असे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावलेले आहेत.
 तसेच  पंढरपूर -लोणंद रेल्वे मार्ग, कुर्डूवाडी वर्कशॉप यासाठी मोठ्या प्रमाणात  निधी आणणे , 
 माढा लोकसभा मतदारसंघातून  जाणारे सहापदरी व चारपदरी रस्ते याचेही प्रश्न विजयदादांनीच मार्गी लावले आहेत. .
अरणला संत सावता महाराज मंदिराचा जिर्णोद्धार, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक व सिल्पसृष्ठीला भरीव निधी , नायगावला माता सावित्रीबाई फुले सिल्पसृष्ठीची उभारणी, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्यासाठी   केलेली भरीव तरतूद, भुईकोट किल्ला  तसेच शिवसिल्प सृष्टी असी कामे मार्गी लावलेली आहेत  .जिल्हा न्यायालय, प्रांत ऑफीस, आरटी ओ ऑफीस, पासपोर्ट कार्यालय, ग्रामीण रूग्णालये अशा   विविध योजना दादासाहेबांनीच तडीस नेहल्या !
 देवघर धरणातील धरणग्रस्तांचे  पुनर्वसन करताना धरणग्रस्तावर  अन्याय न करता त्यांना सोईनुसार जमिन घेता यावी म्हणून त्यांना पैशाच्या स्वरूपात आणि त्यांच्या सोईनुसार कुठेही जमिन घेता यावी  म्हणून  मुबलक निधी दिला तसेच    माळशिरस तालुक्यातील जनतेची हजारो हेक्टर जमीन सुद्धा  वाचवली . सातत्याने , दुष्काळ असो, गारपीट असो, टंचाई असो,  दादासाहेबांनी तातडीने , चारा छावण्या , पिण्याच्या पाण्याचे टँकर, रोजगार हमीची कामे उपलब्ध करून  दिली , जिल्हा परिषद,  पंचायत समिती,  आमदार व खासदार फंडातून विविध रस्ते , समाज मंदिरे , सभा मंडप, हातपंप, सौर दिवे ,
हायमास्ट दिवे आणि एस टी थांब्याच्या ठिकाणी पिकप सेडची मोठ्या प्रमाणात कामे केली . .
 सातत्याने मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या ,जनेच्या प्रत्येक  दुःखात सहभागी होऊन नेहमीच संवेदनशील पणा कृतीतून दाखवून दिला.
तसेच जनतेच्या आनंददायक कार्यक्रमात,
सुखात उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा  सदैव आनंद द्विगुणित केला.
  त्याच प्रमाणे सर्व सार्वजनिक उपक्रमांना उपस्थित राहून मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले .
त्यामुळे विजयदादांना माळशिरस तालुक्यातील जनता कधीच विसरु शकत नाही .
दादासाहेबांची ओळख कामातून आहे .
चुकीच्यामुळे किंवा काही नेत्यांच्या  खोट्या नाराजीचे भांडवल करत  दादासाहेबांवर जर पक्षाने अन्याय केला ,
 दुय्यम वागणूक दिली , डावलण्याचा प्रयत्न केला तर इथली जनता नाराज होईलच पण पक्षाला मोठ्ठा फटकाही बसेल ,कारण माळशिरस तालुक्यातील जनता दादासाहेबांवरील अन्यायाने  व्यथित होते व दादासाहेबांच्या पाठिशी ठामपणे उभी राहते . माढा लोकसभा मतदारसंघात सगळ्यांत जास्त मतदान हे माळशिरस तालुक्याचे आहे व या ठिकाणी तर दादासाहेब सदैव ८० ते ९० हजाराचे मताधिक्य घेतात, माढा  , करमाळा , सांगोला , पंढरपूर, या ठिकाणचे बहुतेक जुने जाणते कार्यकर्ते , सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य व अडचणीच्या काळात ज्या शेतकर्यांचा ऊस गाळप केला ते हजारो शेतकरी दादासाहेबांवर मनापासून प्रेम करतात.
गेल्या लोकसभेलाही पक्षातील बर्याच लोकांनी दादासाहेबांना छुपा विरोध केला पण जनता सोबत असल्याने दादासाहेब मोदी लाटेतही निवडून आले .
त्यातही माळशिरस तालुका दादासाहेबांच्या पाठिशी ठाम उभा राहिला .
विजयदादांना व माळशिरस तालुक्याला डावलण्याचा प्रयत्न झालात तर, माढा लोकसभा व माळशिरस, करमाळा , पंढरपूर, माढा विधानसभा विनाकारण अडचणीत येण्याचीही  शक्यता नाकारता येत नाही  .
आदरणीय विजयदादांना राष्ट्रवादी काँग्रेसने मानसन्मान द्यावा , त्यांच्या अनुभवाचा पक्षासाठी उपयोग करावा हीच सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची  व जनतेची भावना दिसून येते . .
मतदारसंघात फिरत असताना , टपरीवर चहा घेताना सुद्धा  गावोगावी विजयदादांच्या नावाची चर्चा होत असते.
राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इच्छुक बरेच असले तरी काम आणि अनुभव विजयदादा इतका कुणाकडेच नाही हे सत्यही  लपवता येत नाही  ,माढा लोकसभा मतदारसंघात   काहीजण स्वखर्चाने जाहिराती करत अाहेत. नवीन पायंडा पाडत आहेत, लोकामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत तरीदेखील विजयदादा शांतपणे काम करत आहेत.
विजयदादांनी अमृतमोहत्सवी  वाढदिवसाच्या  करमाळा येथील सत्काराच्या कार्यक्रमात भाषण करताना सहज सांगितले की , मला उमेदवारीची चिंता नाही व आजवर मि कधीच पक्षाकडे उमेदवारी मागितली  नाही , यातच दादासाहेबांचा संयम आणि दृढनिश्चय दिसून येतो .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेस येणार्‍या सर्व नेतेमंडळींना सामान्य कार्यकर्ते यांचेकडून एकच अपेक्षा आहे ति म्हणजे पक्षातील गटबाजीला कुणीही खतपाणी न घालता , गटबाजी मोडून काढावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला परत एकदा चांगले दिवस आणावेत.
सामान्य जनता भाजपासेनेच्या सरकारला वैतागली आहे या  सरकारवर नाराज आहे .
फक्त आपला पक्ष एकसंघ निवडणूकीला कोणतीही कुरघोडी न करता सामोरा गेला पाहिजे . .
यश नक्कीच आपले आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकलूज येथील परिवर्तन सभेकडे संपुर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष!

  • राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा उद्या ३० जानेवारीला सोलापुर जिल्ह्यात येणार आहे . सोलापुर जिल्ह्यात पहिली सभा अकलूज येथे होणार आहे. विजयसिंह मोहिते पाटीलांचे अकलूज हे होम ग्राऊंड असून उद्या अकलूजची सभा विजय चौकात जंगी होईल हे नक्की .  

    • सभेसाठी  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे , अजित पवार हे येणार आहेत. विशेषतः अजितदादा उद्या  काय बोलतात याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . . . 
    • सभा तर जंगीच होईल पण या सभेत विजयदादांच्या उमेदवारीची घोषणा होईल का ?  हे पाहण्याची उत्सुकता आहे , उमेदवारीच्या घोषणेकडे 
    • विजयदादांच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे . . 
    • सभेच्या तयारी साठी अकलूजला राष्ट्रवादीच्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक विजयदादा, धैर्यशील भैय्या , बाबाराजे दादा यांचे प्रमुख उपस्थितीत   घेण्यात आली . . 
    • उद्या तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक प्रचंड संख्येने परिवर्तन सभेसाठी जाणार असल्याचे समजते . माळशिरस सह संपुर्ण माढा लोकसभा  मतदारसंघात विजयदादांनी कामाचा जो   धडाका लावला आहे व विजयदादा कामाच्या बळावर आणि दांडग्या संपर्कावर उमेदवारीचे तेच  प्रबळ दावेदार आहेत तसेच विजयदादांच्या बाबतीत जनतेत प्रचंड  सहानुभूती सुद्धा आहे . . 
    • त्यामुळे बहुसंख्य मोहिते पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते हे  बहुसंख्येने उपस्थित राहतील  . 
    • सभेची तयारी पाहता सभा एकदम मोठी व जंगी होणार असे दिसते . .

    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे , मा श्री अण्णासाहेब डांगे यांचे कडून कौतुक

    सोमवार, २८ जानेवारी, २०१९

    शेतकरी टॅक्स भरतो का ?

    मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील

    विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास हे समीकरण गेली पन्नास वर्ष महाराष्ट्रातील जनता पाहते आहे . . . . . त्यामुळेच दादासाहेबांची नाळ सामान्य जनतेशी जोडली गेलेली आहे व त्यातूनच लाखो कार्यकर्ते दादासाहेबांवर जीवापाड प्रेम करतात. . . . त्यामुळेच दादासाहेबांना "विकासरत्न " ही उपाधी जनतेने बहाल केली . . . लोकशाहीत कोणत्याही पक्षामध्ये काम करत असताना असंख्य स्पर्धक हे असतातच त्यात गैर काही नाही, काही स्पर्धक नव्याने राजकारणात आलेले असतात व ते सक्रिय असल्याचा अभास करत असतात, पण त्यांच्या कामाचे मुल्यमापण झालेले नसते मात्र कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला जनतेची नस माहित असणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील नेतृत्वाची पारख असते , आणि हो ज्या व्यक्तीमत्वाला जनतेत मान असतो व जे व्यक्तिमत्व जनतेसाठी अहोरात्र झटत असते, अशाच व्यक्तीमत्वाचा विचार पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला करावा लागतो . . . . त्यामुळे दादासाहेबांना , ना उमेदवारी चिंता करायची गरज आहे , ना निवडणूक जिंकायची चिंता आहे , दादासाहेब निवडणूक लढवतील व विक्रमी लाखोंच्या मतांनी जिंकतील हे सुद्धा निश्चित आहे . त्यामुळे येणार्‍या कोणत्याही निवडणूकीत आदरणीय दादासाहेबांची भूमिका निर्णायक तर राहिलच पण राज्याच्या राजकारणावर सुद्धा त्याचे दूरगामी परिणाम नक्कीच होतील. . . . लेखन:-विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

    दुष्काळाचा पंचनामा

    पंचनामा . . . दुष्काळाचा आणि शेतकरी समस्यांचा !

    जावे दुष्काळाच्या देशात. . . .

    आटलेल्या विहिरी फफुट्याने माखलेल्या पायवाटा  ,   पिके नसल्याने भकास उघड्या बोडक्या झालेल्या जमिनी , पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या लहान मुलं मुली , म्हातारी कोतारी माणसे व  बायका . . . चार्या  अभावी  जणावरांची खपाटीला गेलेली पोटं हाताला काम नसल्याने शेतकरी , मजूर यांची कामासाठी शोधाशोध जवळपास ७०% ग्रामीण भागातील हे चित्र ह्रदय पिळवटून टाकणारे आहे . . कित्येक शेतकर्यांना आपली जणावरे एकतर सोडून द्यावी लागत आहेत किंवा येईल त्या किंमतीला विकावी लागत आहेत, आज, पशुधन वाचवण्यासाठी ना सरकार पुढे येतय ना कोणते लोकप्रतिनीधी पुढे येताना दिसत आहे , मुकी जित्राबं मालकाकडे बघून दिवसभर हंबरडा फोडत आहे पण असाह्य पणे पाहण्याशिवाय मालकही काहीच करू शकत नाही . .  कारण त्याच्या खिशात दमडाही नाही . .
    दुष्काळी अनुदान नाही , चारा छावण्या नाहीत, चारा डेपो नाहीत, रोजगारहमीची कामे नाहीत. . .
    ''नुसता ग्रामीण भाग होरपळतोय''
    मायबाप सरकारला कधी पाझर फुटणार देव जाणे . . .
    गावच्या गावं ओस पडू लागली आहेत , खेडीच्या खेडी  जणू रंडकी होत चालली आहेत  . . तरूण बायका मुलींनाही
    कपाळाला कुंकू लावायची सुद्धा आता लाज वाटू लागली आहे  ! कारण त्यांचा धनी कधी जीव देईल याचा काहीही  भरोसा राहिलेला  नाही . .
    सततच्या नापिकीने, दुष्काळाने, गारपिटीने , वादळी वार्याने बळीराजा खचून गेलाय. . त्याच्या हातात काय येतच नाही , दुकानदाराची उधारी  व सावकाराची कर्जे फेडायची कशी ??किराना सामान सुद्धा घ्यायची पत राहिली नाही ! जगायचं कसं  याचीच चिंता त्याला लागून राहिलीय। . .
    फसवी कर्जमाफी व फसवा हमीभाव!
     आजही इतक्या भयंकर दुष्काळात भाजीपाला , धान्य, कवडीमोल भावाने जातोय, ऊसाचे बील नाही , तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके करपून जाताना बघवत नाही  !
    "कुणालाच पाझर फुटेना"
    काही जणांनी बँकेचा त्रास नको म्हणून वाट्टेल ते करून जमीन विकून, घाणवट ठेवून,उसने पासने करून,  सावकाराकडून कर्ज काढून बँकेचे कर्ज,  ओटीएस मध्ये भरले , त्यामुळे  cbil रेकॉर्ड खराब झाले कित्येक शेतकर्यांचे . . .
    त्यामुळे कोणतीही बँक अशा शेतकर्यांना दारात उभी करत नाही . . . अशा विचित्र कात्रीत बळीराजा सापडलाय पण, त्यातून त्याला बाहेर कोण काढणार?
    आज राजकारण हे जाती धर्म आणि आरक्षण यापलीकडे जातच नाही . . प्रत्येक पक्ष हा एकमेकांची उणीधुनी काढण्यात मश्गुल आहे ,
    जातीय तेढ निर्माण करून मताच्या तुंबड्या भरल्या की राजकीय पक्षांचे भागतेय पण रोज शेकडो शेतकर्यांच्या आत्महत्या कुणालाही दिसत नाहीत, इतकेच काय परदेशातून बहुमोल परकीय चलन खर्चून
    तेल, डाळी , साखर, कांदा वेळोवेळी आयात करून इथल्या शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळले जातेय. .
    हजारो हेक्टर जमिनी भूसंपादन करून विकासाच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात कवडीमोल भावाने घालायचा गोरख धंदा खुलेआम चालू आहे . . त्याच जमिनी नंतर करोडो रुपयांना विकल्या जातात. .
     "न्यायासाठी शेकडो धर्मा पाटलांचे " बलिदान जात आहे . . पण
    कोण वाचा फोडणार याला ? कोण धावणार मदतीला कोण सोडवणार हे प्रश्न!
    कांदा चाळी ,
    शेततळी तोकड्या अनुदानामुळे परवडत नाहीत. .

    रोजगारा अभावी जगणं मुस्किल झालंय. . . स्थलांतर करावे तर मुक्या जित्राबाचे व घरातील बाया बापड्यांचं आणि म्हातार्या माणसांचं करायचं तरी काय?
    म्हणून हा माझ्या सारख्या दुष्काळाची जाणीव असणाऱ्या शेतकर्यांने केलेला हा व्यवस्थेचा  पंचनामा !
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते !

    गटबाजी संपली तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण

    गटबाजी मोडून काढून जेष्ठांनाही मानसन्मान दिला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी नक्कीच सत्तापरीवर्तन करेल. . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांनीच लक्ष घालून प्रत्येक मतदारसंघातील गटबाजी संपवली तर राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी घवघवीत यश मिळेल याची आम्हा सामान्य जनतेला व पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींना पुर्णपणे खात्री वाटते  . .
    महाराष्ट्रातील शेतकरी , शेतमजूर, सामान्य जनता दलित आदिवासी , कामगार, मुस्लीम या सर्वांनीच  या पाच वर्षांत बरेच भोगले आहे, शेतकर्यांना तर सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी अक्षरशः  वार्यावर सोडले , धनगर, मराठा या समाजाला खोटी अश्वासने दिली, शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, झाले नाही . . जातीय सलोखा यांनी जाणीवपुर्वक बिघडवण्याचे काम केले , भाजपाच्या धनंजय कुलकर्णी कडे शस्त्रांचा साठा सापडूनही लगेच जामीन दिला जातो व इतरांना नक्शलवादी ठरवून खोट्या गुन्ह्यात अडकून तुरूंगात डांबले जाते ,  शेतकरी आत्महत्या करत असताना , यांनी पाकिस्तान मधून साखर व कांदा आयात केला या व अशा असंख्य कारणांनी जनता यांना कंटाळली आहे . म्हणून जनतेला आता  बदल हवा आहे कारण भाजपा सरकारने सर्वच  घटकांना वार्यावर सोडल्यामुळे व शेतमालाच्या किंमती कवडीमोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला  अनकुल वातावरण तयार आहे . . त्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक जागेवर प्रचंड गटबाजी निर्माण झाल्याने अनुकूल वातावरण असतानाही त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत  आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा  पक्षातील गटबाजीमुळेच आजवर घात झाला आहे . .
    बारामती , माढा, सातारा , कोल्हापूर, भंडारा गोंदिया हे मतदारसंघ तर राष्ट्रवादी सहज जिंकू शकते फक्त या ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी द्यायला हवी कारण विद्यमान खासदारांचे काम चांगले आहे व त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे . . विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया ताई, उदयन महाराज हे तर पक्षाला सहज विजय मिळवून देवू शकतात,  त्यांना जनतेतूनच जास्त प्रेम  आहे पण पक्षातील विरोधकांना , हे सहन होत नाही , म्हणून ते विरोध करताना दिसत आहेत,  मात्र जनता विद्यमान खासदारांच्या पाठिशी आहे , हे मात्र नक्की . .
    वरिल पाच मतदारसंघा बरोबर, राष्ट्रवादीला . . नाशिक,
    शिरूर, रायगड, मावळ, नगर, परभणी , रावेर, बीड, जालना, नवी मुंबई,(ठाणे ) उस्मानाबाद, हे मतदारसंघ  सुद्धा अनुकूल आहेत आणि या आकरा  मतदारसंघापैकी किमान राष्ट्रवादी काँग्रेस  सात ते दहा  ठिकाणी सहज जिंकू शकेल अशीच स्थिती आहे , त्यामुळे यावेळी किमान  एकुण बारा  ते पंधरा  जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळतील  , फक्त राष्ट्रवादीने उमेदवार निवडताना जुने जानते व तगडे उमेदवार दिले पाहिजेत तरच यश मिळेल. . .
    आणि सगळ्यांत महत्वाचे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून ते जाहीर केले पाहिजेत,  उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचाराला मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. .
    राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपआपल्या  विधिसभा मतदारसंघात मजबूत आहेत, स्थानिक राजकारणात,  पंचायत समिती , जिल्हा परिषद, यातही बहुतेक ठिकाणी सत्तेवर आहेत, मात्र लोकसभेला एकमेकांची जिरवा जिरवी करण्याच्या नादात पक्षाच्या उमेदवारा विरूद्ध काम करतात आणि यामुळे पक्षाच्या  उमेदवारांचे पराभव होतात. . .
    त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनीच सर्वांना समज देऊन विद्यमान सर्वच  खासदारांना परत  संधी देऊन, संभ्रम संपुष्टात आणायला हवा . . . ग्रामीण भागातील
    जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व सत्तापरीवर्तनाची नितांत गरज आहे . . .
    कारण भाजपाच्या  काळात. दुध, सोयाबीन, तुर,कापूस  कांदा , ऊस, भाजीपाला , आंबा , डाळिंब उत्पादक शेतकरी भरडला गेला . . .
    शेतकर्यांना वार्यावर सोडले गेले . .
    सामान्य जनता पवार साहेब सत्तेवर यायची  वाट पाहतेय. . .
    फक्त विविध मतदारसंघात जे उमेदवारीवरून घोळ चालू आहेत एकमेकांची जिरवण्याची भाषा चालू आहे ति बंद झाली तर नक्कीच. . . महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होईल. . स्थानिक परिस्तिथी वरिष्ठांना  समजावी ,
    पक्षाला व जनतेला चांगले दिवस यावेत यासाठीच हा लेखन प्रपंच. . .
    एक कार्यकर्ता . . .
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . .

    सोलापुर जिल्ह्यात गटबाजीमुळे पोखरत चाललेली राष्ट्रवादी काँग्रेस

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना गटबाजीची खंंत . . . .
    तिच खंत व्यक्त केलीय
    राष्ट्रवादीचे सामान्य
    कार्यकर्ते
    श्री विजय शंकरराव पिसाळ यांनी . . . .

    पवार साहेबांनी वेळीच लक्ष घालून राष्ट्रवादीतील गटबाजी संपवली नाही तर माढा मतदारसंघ हातून जाईल. . . . .

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे .
    पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे आणि त्यांना शेतकरी , शेतमजूर,   आदिवासी ,  दलित, मुस्लीम, इतर  मागासवर्गीय बांधव यांच्या समस्याची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची सुद्धा धमक त्यांच्यात आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व  आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा , सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .
    पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले  नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय. . .
    एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .
    पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी  , विजयदादांना  मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली ,  स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर  उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला .
     विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले ,
    आदरणीय पवार साहेबांना  २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी  कितीही,  काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही . . दादांना
    पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव  मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत  सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच  पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली , याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले , राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय?  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी   भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या  वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात सोलापुर जिल्हा परिषदेवर  . . राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री  बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने  घडवून आणला,  विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला ,  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो  अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला . . तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली . .
    बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्‍या सर्वच नगरसेवकांची पक्षातून  हकालपट्टी केली . .
    पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .
     मात्र सोलापुरात काही लोकांकडून  विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच  ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते . .
    जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .
      प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब  गावोगावी फिरून वातावरण तापवून  उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय?
     आदरणीय  साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान   होईल  हा तरी  पक्षाने विचार करायला हवा . . . !
    लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
    आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे .  तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल. . असे वाटते . .
    आज  देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस  परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले  व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते . . . . . . राष्ट्रवादीचा एक  सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच!
    श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते

    शनिवार, १९ जानेवारी, २०१९

    गटबाजीमुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे होणारे नुकसान