vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

गटबाजी संपली तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल वातावरण

गटबाजी मोडून काढून जेष्ठांनाही मानसन्मान दिला तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी नक्कीच सत्तापरीवर्तन करेल. . . .

आदरणीय शरद पवार साहेबांनीच लक्ष घालून प्रत्येक मतदारसंघातील गटबाजी संपवली तर राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी घवघवीत यश मिळेल याची आम्हा सामान्य जनतेला व पक्षाच्या कार्यकर्ते मंडळींना पुर्णपणे खात्री वाटते  . .
महाराष्ट्रातील शेतकरी , शेतमजूर, सामान्य जनता दलित आदिवासी , कामगार, मुस्लीम या सर्वांनीच  या पाच वर्षांत बरेच भोगले आहे, शेतकर्यांना तर सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी अक्षरशः  वार्यावर सोडले , धनगर, मराठा या समाजाला खोटी अश्वासने दिली, शिवस्मारक, इंदूमिलच्या जागेवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, झाले नाही . . जातीय सलोखा यांनी जाणीवपुर्वक बिघडवण्याचे काम केले , भाजपाच्या धनंजय कुलकर्णी कडे शस्त्रांचा साठा सापडूनही लगेच जामीन दिला जातो व इतरांना नक्शलवादी ठरवून खोट्या गुन्ह्यात अडकून तुरूंगात डांबले जाते ,  शेतकरी आत्महत्या करत असताना , यांनी पाकिस्तान मधून साखर व कांदा आयात केला या व अशा असंख्य कारणांनी जनता यांना कंटाळली आहे . म्हणून जनतेला आता  बदल हवा आहे कारण भाजपा सरकारने सर्वच  घटकांना वार्यावर सोडल्यामुळे व शेतमालाच्या किंमती कवडीमोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेसला  अनकुल वातावरण तयार आहे . . त्या पैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार्‍या प्रत्येक जागेवर प्रचंड गटबाजी निर्माण झाल्याने अनुकूल वातावरण असतानाही त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत  आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचा  पक्षातील गटबाजीमुळेच आजवर घात झाला आहे . .
बारामती , माढा, सातारा , कोल्हापूर, भंडारा गोंदिया हे मतदारसंघ तर राष्ट्रवादी सहज जिंकू शकते फक्त या ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी द्यायला हवी कारण विद्यमान खासदारांचे काम चांगले आहे व त्यांची जनतेशी नाळ जोडलेली आहे . . विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया ताई, उदयन महाराज हे तर पक्षाला सहज विजय मिळवून देवू शकतात,  त्यांना जनतेतूनच जास्त प्रेम  आहे पण पक्षातील विरोधकांना , हे सहन होत नाही , म्हणून ते विरोध करताना दिसत आहेत,  मात्र जनता विद्यमान खासदारांच्या पाठिशी आहे , हे मात्र नक्की . .
वरिल पाच मतदारसंघा बरोबर, राष्ट्रवादीला . . नाशिक,
शिरूर, रायगड, मावळ, नगर, परभणी , रावेर, बीड, जालना, नवी मुंबई,(ठाणे ) उस्मानाबाद, हे मतदारसंघ  सुद्धा अनुकूल आहेत आणि या आकरा  मतदारसंघापैकी किमान राष्ट्रवादी काँग्रेस  सात ते दहा  ठिकाणी सहज जिंकू शकेल अशीच स्थिती आहे , त्यामुळे यावेळी किमान  एकुण बारा  ते पंधरा  जागा राष्ट्रवादीला नक्कीच मिळतील  , फक्त राष्ट्रवादीने उमेदवार निवडताना जुने जानते व तगडे उमेदवार दिले पाहिजेत तरच यश मिळेल. . .
आणि सगळ्यांत महत्वाचे लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून ते जाहीर केले पाहिजेत,  उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ प्रचाराला मिळाला पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. .
राष्ट्रवादीचे बहुतेक नेते आपआपल्या  विधिसभा मतदारसंघात मजबूत आहेत, स्थानिक राजकारणात,  पंचायत समिती , जिल्हा परिषद, यातही बहुतेक ठिकाणी सत्तेवर आहेत, मात्र लोकसभेला एकमेकांची जिरवा जिरवी करण्याच्या नादात पक्षाच्या उमेदवारा विरूद्ध काम करतात आणि यामुळे पक्षाच्या  उमेदवारांचे पराभव होतात. . .
त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनीच सर्वांना समज देऊन विद्यमान सर्वच  खासदारांना परत  संधी देऊन, संभ्रम संपुष्टात आणायला हवा . . . ग्रामीण भागातील
जनतेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची व सत्तापरीवर्तनाची नितांत गरज आहे . . .
कारण भाजपाच्या  काळात. दुध, सोयाबीन, तुर,कापूस  कांदा , ऊस, भाजीपाला , आंबा , डाळिंब उत्पादक शेतकरी भरडला गेला . . .
शेतकर्यांना वार्यावर सोडले गेले . .
सामान्य जनता पवार साहेब सत्तेवर यायची  वाट पाहतेय. . .
फक्त विविध मतदारसंघात जे उमेदवारीवरून घोळ चालू आहेत एकमेकांची जिरवण्याची भाषा चालू आहे ति बंद झाली तर नक्कीच. . . महाराष्ट्रासह देशात परिवर्तन होईल. . स्थानिक परिस्तिथी वरिष्ठांना  समजावी ,
पक्षाला व जनतेला चांगले दिवस यावेत यासाठीच हा लेखन प्रपंच. . .
एक कार्यकर्ता . . .
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा