vijaypisal49. blogspot. com

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

दहशतवाद संपवणे शक्य आहे !

चालू घडामोडींचे विश्लेषण



दहशतवाद संपविणे शक्य आहे का ? 
तर त्याच उत्तर होय दहशतवाद संपविणे शक्य आहे ! 
असेच आहे . . 
फक्त सर्व राजकीय पक्षांची राजकारण विरहित एकत्र येण्याची गरज आहे . 
राजकीय पोळी भाजणे सर्वांनीच बंद करायला हवे . . 
त्यासाठी ज्या भागात वारंवार दहशतवादी हल्ले होतात तिथेले सर्वांचेच, दुरध्वनी व  मोबाईल संभाषण हे ट्रॅप केले गेले पाहिजे . . 
संशयित घरांवर गुप्त पाळत ठेवली  पाहिजे . . 
त्यांच्यातच संचार करू शकणारे व  राहणारे  काही पगारी गुप्तहेर नेमले  पाहिजेत. 
तिथल्या भूमीवर कंट्रोल करण्यासाठी सक्तीने राष्ट्रीय भाषेतून राष्ट्रीय शिक्षण  दिले पाहिजे . . 
तिथल्या लोकांमधुन कंपल्सरी तितल्या १६ ते ३५ वयोगटातील तरूणांना भारताच्या इतर भागात रोजगार देऊन फुकट न पोसता, लश्कराच्या निगराणीखाली काम करून घेतले पाहिजे व त्यांच्या कामा प्रकारानुसार त्यांना मोबदलाही  दिला पाहिजे . . 
त्यांना कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाताना बायोमेट्रीक मशीन द्वारे नोंद करणे कंपल्सरी केले पाहिजे . .
त्यांच्या बँक अकौंटची तपासणी वारंवार केली पाहिजे . . व पैसे कुठून येतात कुठे जातात हे तपासले पाहिजे . 
मानवाधिकारवाले, टिव्ही चॅनल व पत्रकार यांना लष्कराच्या परवानगीनेच वार्तांकन करता आले  पाहिजे . 
प्रक्षोभक व देशविरोधी वार्तांकन केल्यास त्या चॅनलचे व संबधित प्रसारमाध्यमाचे संपुर्ण अधिकार हिरावून घेतले पाहिजेत. 
लष्कराला बुलेटप्रूफ वहाने व बुलेटप्रूफ जाकिटे पुरवली पाहिजेत. . 
प्रत्येक घरात घुसून त्यांच्या घरातील, घातक शस्त्रांचा शोध घेतला पाहिजे . 
३७० कलमानुसार तिथे जि इतर भारतीयांना जमिन खरेदी विक्रीची बंदी आहे ति सर्वप्रथम उठवली पाहिजे . 
भारताचे सर्व कायदे, ध्वज व इतर मौलिक अधिकार जम्मू काश्मीरला सुद्धा लागु व्हायलाच पाहिजेत. 
फक्त लष्कराने सुद्धा लहान निष्पाप मुले व स्त्रियांशी व मुलींशी  छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या शिकवणी प्रमाणे वागले पाहिजे . कोणत्याही लश्करी जवानांने किंवा अधिकार्यांने स्त्रिया व मुलींचे शारीरिक व अगर लैंगिक शोषण करू नये त्यासाठी सुद्धा कठोर नियम असायलाच पाहिजेत. 
लश्करी जवानांचा संचार होत असताना किंवा ताफा जात असताना खासगी वाहणांचा पुर्णपणे झाडाझडती घेऊन तपास केला पाहिजे . . 
तितल्या जनतेला आपले शिक्षण बंधनकारक करावे व जे ऐकणार नाहीत त्यांना पाकिस्तानात पाठवावे . . 
पण ही किड घालवण्यासाठी कठोर निर्णय केलेच पाहिजेत. काही
राजकीय पक्षांच्या छिन्नाल राजकारणासाठी आपल्या जवानांचे रक्त सांडता कामा नये . 
सरकारने वेळ न दवडता ३७० कलम रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे . . व ते विधेयक मांडावेच नुसत्या राजकीय फायद्यासाठी वल्गना करू नयेत. 
विजय शंकरराव  पिसाळ नातेपुते

३ टिप्पण्या: