vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

शेतकरी टॅक्स भरतो का ?



शेतकरी टॅक्स भरत नाही !
असं  म्हणणार्या  मुर्ख लोकांसाठी !

जेंव्हा १००० रू किंमतीचा शेतमाल ५०० रूपयात जाईल अशी व्यवस्था निर्माण केली जाते तेंव्हा अप्रत्यक्ष (लुट)
५०० रू टॅक्स शेतकर्यांकडून वसूल केला जातो ! (कारण सगळे मिळून ते ५०० खातात )
बाजारातील शेतकर्यांना लागणाऱ्या बहुतांश  वस्तूवर जीएसटी १२ ते २८ %आहे
त्यातूनही आम्ही शेतकरी टॅक्स भरतो !
आमच्या शेतमालाच्या जीवावर
हजारो घटक उपजीविका करतात तोही आमचा शेतमाल कमी किंमतीत घेवून डबल नफा कमवून ते घटक टॅक्स भरतात,  तोही टॅक्स अप्रत्यक्ष आमच्याच खिशातून घेतला जातो ,
बहुतेक घटकांना कच्चा माल शेतातील लागतो त्याला कवडीमोल बाजार दिला जातो व तोच माल प्रक्रिया करून ग्राहकांना विकताना चौपट भावात विकला जातो तिथेही अप्रत्यक्ष टॅक्स शेतकरी भरतोच!
फक्त काही मुर्खांना वाटते आम्हीच फक्त टॅक्स भरतो ! (सगळ्यांना नव्हे ) उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या नोकरदाराला ,
ज्या ठिकाणी  ३० हजार रुपये  पगारात संपुर्ण कुटूंब चालते ,
 तिथे वेगवेगळे  वेतन आयोग नेमून ५० हजार पगार होतो व त्यातुन कुठे दोन पाच हजार टॅक्स भरला जातो म्हणजे २० हजार गरजेपेक्षा जास्त घ्यायचे आणि दोन पाच हजार भरायचे याला  आपल्याकडे टॅक्स पेअर म्हटलं जाते .
मुळात ज्यांच्या कामाचे तास फिक्स असतात, हक्काच्या रजा व सुट्या असतात!
व्यापारी व उद्योगपती हे तर वस्तू व सेवा यावर नफा कमावून व वरून  सर्व टॅक्स ग्राहकाकडून वसूल करून सरकरी तिजोरीत ते फक्त माध्यम म्हणून  भरतात,
त्यांच्या खिशातील नव्हे ,
म्हणून
संपुर्ण जगातील, नोकरदार, व्यापारी , उद्योगपती , यांच्या  संपत्तीचा आलेख सतत वाढतो व शेतकरी व सामान्य कामगार (नोकरदार  नव्हे )हे गरिब राहतात!
बहुसंख्य शेतकरी व कामगार हे बाजार पेठेतील सर्वात जास्त खरेदीदार असतात, तिथेही सर्व टॅक्स लावून आलेला माल टॅक्स भरूनच खरेदी केला जातो !
तरीदेखील शेतकर्यांना टॅक्स भरत नाहीत हा शिक्का मारला जातो !

विजय पिसाळ नातेपुते
९४२३६१३४४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा