चालू घडामोडींचे विश्लेषण
*विजयसिंह मोहिते पाटील तथा दादासाहेब आता निर्णय घेण्याची निर्णायक वेळ आली आहे !*
पुर्ण वाचा व जास्तीत जास्त शेअर करा . . . .
विजय पिसाळ नातेपुते यांच्या लेखनीतून. . .
आदरणीय विजयसिंह मोहिते -पाटील तथा दादासाहेब आपणांस नम्र विनंती की , मोठ्या मनाने पवार साहेबांना माढा लोकसभेला उभे राहण्याची ऑफर दिली .(ति त्यांनी तात्काळ नाकारायला हवी होती पण तेही लगेच तयारी दाखवू राहिले ) तुमचे प्रेम साहेबांवर आहे हे आम्हालाही माहिती आहे पण आजवरच्या साहेबांच्या तुमच्या बाबतीतील अनुभवाने माझ्या सारखे तुमचे लाखो चाहते , अनुयायी व्यतीत व निराश झाले आहेत. जे काय राष्ट्रवादी पक्षात चालू आहे त्यामुळे पराकोटीचे दुःख आम्हाला झाले आहे . आदरणीय पवार साहेब पंतप्रधान व्हावेत जसे तुम्हाला मनोमन वाटते तसेच सर्वांनाच वाटते , त्यांचे शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील काम सुद्धा चांगलेच आहे या बद्दल दुमत असायचे कारण नाही , पण त्यांच्यावर मनापासून आपण प्रेम करून सुद्धा , निष्ठा ठेवून सुद्धा त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन सुद्धा , त्यांनी सातत्याने आपल्याला सापत्नतेचीच वागणूक दिली ही सल आमच्या मनात लसलसते आहे एक काळ असा होता की, संपुर्ण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मुख्यमंत्री व साहेबांना पंतप्रधान बघण्यासाठी आतुर झाली होती पण साहेबांना त्यांच्या कर्माने (विश्वासाती स्वभावामुळेच ) पंतप्रधान पद मिळाले नाही व तेंव्हा काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त येवूनही केवळ तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणून काँग्रेसला मुख्यमंत्रीपद बहाल केले हा इतिहास आहे .सातत्याने तुमचा पक्षातील आवाज दाबण्याचे काम केले गेले , महत्वाची खाती काढून तुलनेने दुय्यम खाती दिली गेली पण तुमच्यातील नेतृत्व गुणामुळे तुम्ही ग्रामविकासा सारख्या दुय्यम खात्यालाही मोठे करायचे काम केले , ग्रामविकास मंत्री म्हणून जोरदार ठसा उमटवला , तुमच्या सोबत असणाऱ्या तुमच्या निष्ठावंत आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्यांना विविध प्रलोभने दाखवून व विविध क्लृप्त्या लढवून तुमच्या पासून दुर करायचे काम केले . २००९ ला पंढरपूर मधून तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला मुद्दामहून तिथून उभे केले व तुमच्या पराभवाची तजवीज केली गेली आणि परिचारक व तुमच्यात कायमचा दुरावा निर्माण केला , त्या अगोदच तुम्ही त्यांना मोठ्या मनापासून २००९ला माढ्यातून लोकसभेवर निवडून दिले पण तरीही त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही व त्यांच्या ताकदीचा व शब्दाचा मतदार संघातील विकासकामासाठी म्हणावा तसाव उपयोग केला नाही, पाठपुरावा केला नाही , पंढरपूरच्या पराभवा नंतर तातडीने तुमचे पुनर्वसन करणे अपेक्षित होते , पण त्यासाठी सुद्धा दोन वर्षे ताटकळत ठेवले व नंतर राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली आणि परत मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही , तुमच्या पक्षातील विरोधकांना सातत्याने बळ दिले, तरीही आम्हाला वाटायचे राजकारणात कमीजास्त चालते आज ना उद्या आपल्याला न्याय मिळेल, रणजितदादांना कुठेतरी सामावून घेतले जाईल पण तसे झाले नाही , साहेबांना त्यांच्या मुलीची , पुतण्याची व आता नातुचीच जास्त काळजी आहे पण ते करताना दुसर्याचे किती वाटोळे करावे याचेही भान राहिलेले नाही , पक्षीय राजकारणात गट तट हे असतात ते सगळ्यात पक्षात दिसून येतात पण इतर पक्षांचे पक्ष प्रमुख किंवा अध्यक्ष सर्व गटातटांना सामावून घेताना गटबाजी वाढणार नाही याचीही दक्षता घेतात, हे मात्र माजी सनदी अधिकारी व पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यांनाच पुढे करून तुमच्या पायात साप सोडायचे काम करतात, हो इथे मात्र साहेब किंवा अजितदादा गटबाजीला खतपाणी घालतात जेष्ठ सहकार्याला आव्हान उभे करतात व सहकार्याचाच , स्वतःच कसा पराभव होईल हे पाहतात हो हे फक्त राष्ट्रवादीतच होत आहे . त्यामुळे आमच्या सारखे हजारो लाखो कार्यकर्ते अस्वस्थ होत आहेत.
दादासाहेब आम्ही तुमच्यावर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते तुमच्यावरील अन्यायाने खिन्न झालोय, व्यतीत झालोय, राजकारणात जर आपलाच नेता आपले खच्चीकरण करत असेल तर आपण का या पक्षात रहावे ! हीच वेळ आहे बंड करायची , स्वाभिमानी जनता व लाखो तुमचे चाहते , कार्यकर्ते तुमच्या निर्णयाची वाट पहात आहेत, जनतेत फिरताना आम्हाला त्याची प्रचिती येत आहे , हो दादासाहेब आता काहीही होवो पण आर या पार होऊद्या त्यांनी आपल्याला सातत्याने अपशकुन केलाय आपण आता करा ही लोकांची भावना आहे . हो हीच वेळ आहे कि आता त्यांनाही आपली किंमत दाखवून देण्याची हीच वेळ आहे बंड करून उठण्याची , दादासाहेब "अभी नही तो, कभी नही " हो आजही वाटते मनोमन वाटतेय साहेब पंतप्रधान व्हावेत.
पण सुप्रियाताईंनी वडीलांसाठी जरा थांबायला काय हरकत आहे ! त्यागाचा मक्ता फक्त आपणच घेतलाय का ?
साहेबांनी शिरूर, मावळ याठिकाणी प्रचंड कामे केली आहेत की, तिथून लढावे येथील ना ते निवडून तिथे तिथून पळ काढून इकडे कशासाठी त्यांचा डोळा ! नातुची काळजी लागलीय का ? पार्थदादाचे तरी कुठे अजून वय झालेय?
दादासाहेब तुम्ही आम्हाला सांगताय साहेबांना आपण आमंत्रण दिलंय, निवडून आणायची जबाबदारी आपली आहे , पण दादासाहेब त्यांनी कधी आपल्यासाठी त्याग केलाय का ? त्यांनी कधी आपल्याला बारामतीतून उभे रहायची ऑफर केलीय का ? प्रेम हे निःस्वार्थी व निस्सीम असायला हवे मात्र ते कधीच एकतर्फी असता कामा नये !
२००९ च्या आपल्या पंढरपूरातील पराभवाच्या जखमा आजही आमच्या अंगातून भळभळून वहात आहेत, साहेब माढ्यातून नक्कीच माघार घेतील मात्र ते जर जनमताचा कौल न जाणता उभे राहिलेच तर मात्र बहुसंख्य कार्यकर्ते तुमचेही ऐकायच्या मनस्थितीत राहणार नाहीत हे जनतेत फिरताना आम्हाला पदोपदी जाणवते , हा लेख मि माझ्या मनाने नव्हे तर जनतेच्या असणाऱ्या प्रतिक्रिया तुम्हाला कळाव्या म्हणून लिहलाय, जनता म्हणते पंढरपूरच्या विजयदादांच्या पराभवाचे उट्टे काढायची संधी आली तर, घेऊ साधून!
असंख्य कार्यकर्ते संधीच शोधत आहेत व साहेब उभे राहिलेच तर ति त्यांना आपोआपच मिळण्याची शक्यता आहे .
विजय पिसाळ नातेपुते !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा