विविध क्षेत्रातील चालू घडामोडींचे विश्लेषण !
ब्लॉगर, लेखक, संपादक श्री विजय शंकरराव पिसाळ, नातेपुते.
एम. ए. राज्यशास्र
vijaypisal49. blogspot. com
मंगळवार, २९ जानेवारी, २०१९
मा. खासदार श्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे , मा श्री अण्णासाहेब डांगे यांचे कडून कौतुक
माजी ग्रामविकास मंत्री व पंढरपूर देवस्थानचे माजी अध्यक्ष मा. श्री. अण्णासाहेब डांगे यांच्या कडून *विजयसिंह मोहिते पाटील**यांनी केलेल्या भरीव कार्याचे कौतुक.
. .१३. . जानेवारीला चौंडी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णासाहेबांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला !
तेंव्हा त्यांनी आदरणीय विजयदादांनी पर्यटन व ग्रामविकास मंत्री असताना महाराष्ट्रातील विविध तिर्थक्षेत्रांना व चौंडी येथील *"पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर "* यांच्या शिल्पसृष्ठी साठी कसा भरीव निधी दिला आणि दादासाहेबांनी कशा प्रकारे मंत्री म्हणून कामे केली हे या निमित्ताने सर्वांना सांगितले. आदरणीय दादासाहेब मतभेद असो किंवा पक्ष वेगवेगळे असोत विकास कामात कधीच राजकारण आणत नाहीत हेच यावरून दिसते . दादासाहेबांनी सर्व जाती धर्मातील माणसे जोडायचे काम आजवर केले हीच खरी दादासाहेबांची ओळख आहे .
राजकारणात इतक्या मोठ्या विविध पदांवर काम करून सुद्धा दादासाहेबांनी नेहमी सामान्य जनतेची नाळ तुटू दिली नाही . . .
म्हणूनच दादासााहेबांवर सामान्य जनता मनापासून प्रेम करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा