चालू घडामोडींचे विश्लेषण
नातेपुते नगरीचे कर्तव्य दक्ष सपोनि *मा श्री राजकुमार* यांनी नातेपुते गावचा सपोनि चा कार्यभार सांभाळल्यापासून, विविध गुन्हे उघडकीस आणले , त्याच प्रमाणे गुन्हेगारांवर बर्यापैकी वचक बसवला ,बर्याच गुन्ह्याचा छडा तातडीने लावून संबधितांना न्याय मिळवून दिला , विशेष म्हणजे गावात होणारे सतत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी नातेपुते नगरीतील नागरीकांचे सहकार्याने "गावातील सर्व मुख्य वर्दळीच्या ठिकाणी" *सीसीटीव्ही कॅमेरे* बसवून अभिनव असा उपक्रम राबवला आणि त्यातून, मोटारसायकलचे पेट्रोल चोरी असेल, मोटारसायकलींची चोरी असेल, रोड रोमियोंचा शाळा व कॉलेजमधील मुलींना होणारा त्रास असेल हा बर्याच अंशी कमी झाला आहे .
एसटी स्टँड व परिसरात होणार्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली, साहेबांनी सीसीटीव्ही बसवल्यामुळे व बरेच गुन्हे तात्काळ उघडकीस आले आहेत. याच बरोबर भुजबळ साहेब नातेपुते येथे रूजू झाले पासून गावातील शांतता व जातीय सलोखा अबाधित आहे व ति टिकण्यास खूप मोठी भुमिका साहेबांनी पार पाडली आहे .
कुणावरही कधीही कसलाही अन्याय न करता नातेपुते हे पुर्णपणे शांततामय कसे राहिल व किरकोळ वाद कसे मिटतील व सामान्य जनतेला कसा न्याय मिळेल हीच भुमिका भुजबळ साहेबांची नेहमी असते. गावातील सर्वांनाच सहकार्याची भुमिका साहेब घेतात, या सर्व गोष्टीमुळे *आदरणीय राजकुमार भुजबळ साहेबांना व नातेपुते पोलिस स्टेशनला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे*
सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांच्या गुणांकन संकल्पनेनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाणे व पोलिस उपविभागाच्या कार्यालयाचे एकुण कामकाजावरून केलेल्या गुणांकनाच्या आधारे जानेवारी २०१९ मध्ये नातेपुते पोलिस ठाणे व सपोनि राजकुमार भुजबळ यांनी प्रथम स्थान प्राप्त केले आहे .
या विशेष गौरवा बद्दल भुजबळ साहेबांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा . . .
विजयकाका पिसाळ नातेपुते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा