vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा आम्हाला मान्य आहे का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
आरक्षणाची समिक्षा व फेरआढावा  आम्हाला मान्य आहे का ? 
भारत देश स्वतंत्र झाला आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी आली , बाबासाहेब सारख्या विद्वान व्यक्तीने इथल्या , सामाजिक, भोगोलिक,  सर्व प्रश्नांचा अभ्यास बारकाईने  केला , जगातील विविध घटनांचाही अभ्यास केला आणि विविध जाती धर्म पंत भाषा यांना एका चौकटीत आणून न्याय देण्याचा  प्रयत्न केला ,  कायदे व घटनेतही  काळानुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला दिला , विविध कलमे , विविध विषय घटनेत समाविष्ट करून  सर्वांचाच समावेश घटनेत केला , त्याच प्रमाणे बाबासाहेबांनी , मुळ प्रवाहा पासून कोसो दुर लोकांसाठी प्रवाहात येण्यासाठी , प्रस्थापित लोकांपेक्षा , सामाजिक व आर्थिक  मागास राहिलेल्या लोकांसाठी , शिक्षण, नोकरी व राजकीय जागा यात आरक्षण दिले .  प्रामुख्याने हे आरक्षण एससी व एसटी समुदायातील लोकांसाठी होते , तेंव्हाची त्यांची लोकसंख्या ही ७ % व १३ इतकी होती व त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या पटीत १००% आरक्षण दिले  पण  त्या मुळ एससी व एसटी मध्येही नंतर असंख्य जातींचा वेळोवेळी समावेश करण्यात आला त्यात राजकीय भाग होता व खरे सुद्धा लोक त्या निकषात बसणारेही होते , त्यामुळे   तो त्यांचा नैसर्गिक अधिकार होता कारण ते मुख्य प्रवाहापासून कोसो दुर होते .  आणि  बाबासाहेबांनी आरक्षणाची वेळोवेळी समिक्षा करण्याचे तेंव्हा घटनेत स्पष्ट केले होते .   तेव्हा इतर मागासवर्ग हा विषय अजेंड्यावर नव्हता , पण  संविधानात सर्व धर्मातील  मागासलेल्या जातींसाठी कलम ३४० मध्ये त्यांचे मागासलेपण दुर करण्यासाठी तरतूद केली होती आणि त्याच आधारे मंडल आयोगाची निर्मिती झाली होती .  मंडल आयोगाची निर्मिती १ जानेवारी १९७९ ला झाली तेंव्हाच्या मोरारजी देसाई सरकारने केली  पण तिच्या अंमलबजावणीला १९९२ साल उजाडले व त्या साठी व्ही पी सिंग यांनी पुढाकार घेतला आणि कांशीराम यांनी आवाज उठवला , खूप मोठी आंदोलने झाली  व व्ही पी सिंग यांना त्याची राजकीय किंमत सुद्धा चुकवावी लागली ,  १९८० सालापर्यंत  जनता पक्ष  व हा एक पक्ष होता व तेंव्हा जनता पक्ष फुटून  जनसंघ तयार झाला , म्हणजेच आत्ताचा भाजपा  ,  नंतर जनता पक्ष असंख्य वेळा फुटला , जनता दलाचे असंख्य पक्ष तयार झाले , तो विषय राजकीय वेगळा पाहता येईल,  पण 
 मंडल आयोगाने देशातील ३७४२ जातींना इतर  मागसवर्गीय ठरवून  त्यांची लोकसंख्या ५२%  तेंव्हाच्या लोकसंख्ये प्रमाणे गृहित धरून २७% आरक्षण दिले गेले व त्याची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी करण्यात आली .  नंतरच्या काळात राजकीय सोईनुसार काही समाजांना विविध राज्यातील केवळ राज्य सरकारांनी  केंद्राकडे  शिफारसी  करून ओबीसीत समाविष्ट केले गेले , त्यांचे मागासलेपण ठरवण्यासाठी कोणत्याही आयोगाची शिफारस घेतली  नव्हती .  किंवा आयोगाने मागासलेपण   तपासले नव्हते .  आपल्या देशात 
गंमतीचा भाग असा  आहे की ,  एससी १३% , एसटी  ७% , ओबीसी , ५४ % मुस्लिम ११% ब्राह्मण ३% जैन २%  इतके सांगितले जातात?  हे होतात ९०%  मग मराठा , जाट, गुज्जर, रजपूत,  पटेल, (पाटीदार ) सी के पी , सारस्वत, वैश्य, मारवाडी , खत्री , बनिया ,  हे  सर्व मिळून फक्त १०% आहेत का ?  तर याचे उत्तर कुणाकडेही नाही मुळात  सध्याचे ओपनमधील जाती जवळपास   २० ते २५ % च्या आसपास    असतील.  
पण याचा  खर्या अर्थाने परफेक्ट डाटाच कुणाकडेही  नाही.  त्यामुळे कुणाचा वाटा कोण गिळंकृत करतंय तेच कळत नाही  आणि कुणाला काहीही   मिळतच नाही बरीच भानगड आहे , म्हणून प्रत्येक प्रवर्गात अ ब क ड, ई फ हे लोकसंख्येच्या प्रमाणात फोडून दिले पाहिजे म्हणजे प्रवर्गातील  कोणतीही  एकच जात  त्या त्या प्रवर्गातील संपुर्ण  आरक्षण गिळंकृत करणार नाही  आणि परफेक्ट डेटा नाही आणि  आरक्षणाचे वाद हे सुरू आहेत. मंडल आयोगाने सुद्धा  २० वर्षांनी आरक्षणाची समिक्षा करण्याची शिफारस केली आहे व घटनेतही तशी तरतूद आहे पण कोणतेही सरकार यावर काम करत नाही .  घटनेतील तरतूदीनुसार जर आरक्षणाची समिक्षा झाली  फेर आढावा घेतला  तर निश्चितपणे वादविवाद थांबले असते पण तसे घडत नाही .   घटनाकारांना जे समाज आरक्षणाचा फायदा घेतील त्यांनी मुख्य प्रवाहात यावे व जे मागास राहतील त्यांना ते मिळावे यासाठी तरतूद केली आहे .  पण हल्ली एकदा का  एखादा समाज त्यात समाविष्ट झाला की बाहेर पडायला विरोध होतोय,  व तो प्रवर्ग म्हणजे केवळ आम्हीच हे स्वतःच ठरवले जातेय  ,  कोर्टाने तर ५०% मर्यादा घातलीय मग यातून मार्ग कसा निघणार कि देश असाच घुमसत राहणार? 
खरेतर आरक्षणाचा फेरआढावा घ्यावा आणि  प्रत्येक समाजाला  लोकसंख्येच्या ५०% आरक्षण शिक्षण आणि नोकरीत द्यावे ,   व खूला गट सर्वांसाठीच   ५०% खुला असावा किंवा लोकसंख्येच्या पटीत सर्वांनाच १००% जागा वाटून आरक्षण द्यावे असेच वाटते . केंद्र,  राज्य सरकारला आरक्षणाचे  अधिकार असूच नयेत,  तर त्या साठी घटनेनुसार  स्वतंत्र  केंद्रीय अयोय असावा व त्यात सर्व जाती धर्मातील व सर्व राज्यातील गैर राजकीय  प्रतिनिधींचा समावेश असावा .  व  केवळ विशिष्ट  निकष लावून  प्रत्येकाची दर २० वर्षांनी समिक्षा व्हावी व फेरआढावा घ्यावा !  सर्व समुदायातील लोकांना लोकसंख्येच्या पटीत आणि क्रिमिलेअरची अट लावून आरक्षण लागू करावे .  व त्यातील मेरीटनुसारच जागा भराव्यात  नाहीतर आपला देश यादवीत कमजोर होईल. 
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९



बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

नवा पक्षीय विचार

चालू घडामोडींचे विश्लेषण


नवा पक्षीय विचार

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व अंगाने जर प्रत्येकास समानता हवी असेल! 
इथल्या मातीवर,                            प्रेम  करणार्‍या  सर्वांनाच समान संधी देणारी पिढी घडवायची असेल तर सर्वांनांच सोबत घेऊन चालावे लागेल, कुणालाही तो उच्च आहे, तो कनिष्ठ आहे म्हणून हक्क व अधिकार नाकारता येणार नाही म्हणून सुशिक्षित  समाजानेच पुढाकार घेऊन, नव्याने मांडणी करून आता सर्वांच्या न्याय हक्कासाठी व आपल्याही उत्कर्षासाठी कटिबद्ध होऊन, सखोल चर्चा करून. . . सर्वांनाच समान संधी, समान न्याय देणारा, सर्व लोकांनी. . . लोकशाही मार्गाने चालवलेला खरचं तरुण शेतकरी , व्यावसायिक, कामगार यांचा विचार करणारा  पक्ष पाहिजे . . ..
श्री  विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ आपण सर्वजण याच मातीत, जन्मलेलो आपण सर्वांनीच या मातीसाठी रक्त सांडले आपण आज याच व्यवस्थेला न्याय मागतोय. . हा . कुठला न्याय. . . आपण आता जागे होवू , नियम सर्वांना सोबत घेऊन आपण करू , न्याय सर्वांनाच समान देवू सगळे करण्याची ताकद आपल्या मनगटात आहे, तेवढे बाहुबल आपल्यात आहे . . अरे बांधवांनो  हि केवळ एक जात, एक समुह किंवा एक व्यक्ती परिवर्तन करू शकत  नाही .  तर त्या साठी  सर्वांनी  सामुहिक पुढाकार घेऊन पुढे आले पाहिजे .  हिंदवी स्वराज्या साठी ज्यांनी ज्यांनी रक्त सांडले, ज्यांनी ज्यांनी प्राणार्पण केले ते सर्व याच मातीतले . . यातील  काही बांधवांना न्याय मिळाला तथाकथित व्यवस्थेत कागदोपत्री , जाती वेगवेगळ्या पडल्या किंवा पाडल्या  आणि काही जणांना हाल  आपेष्ठांचे जीने नशीबी आले आणि काहींचे जीवन स्थिरस्थावर झाले   . . पण आजची परिस्थिती भयंकर आहे मोजके १० ते  २०%लोक सोडले तर प्रत्येक, भारतीयांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .  प्रस्थापित व्यवस्था व राजकीय पक्ष हे सत्ता व त्यातून पैसा यातच गुंतले असून ठरावीक लोकांचे लांगूलचालन करत आहेत.  ८० ते ९० % जनतेवर नाहक विविध कर लादून लुटत आहेत, त्यांना दाबत आहेत. तात्पुरता  महाराष्ट्रातील माणसांचा  विचार केला तर, नोकरदार सुखी नाही , कामगार, शेतकरी आणि छोटे मोठे व्यवसायिक सुद्धा सुखी नाहीत मग हे राज्य व देश कुणासाठी चालवले जाते हा प्रश्न आहे .  लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे पण  हे सत्य नाही पचत . . यावर पर्याय काय का ?  हे फक्त सहन करायचे ?  भविष्यासाठी काय योजना करायची का ठरावीक लोकांची गुलामगिरी स्वीकारून गुलामगिरीत जगायचे !  विचार करण्याची वेळ आली आहे ना ? 
 यासाठी  वर्तमानात कसे जगायचे व कसे पुढे जायचे हे बघूया . . . . बहुसंख्य लोकांचे देव एकच, पुजाविधी, लग्न विधी एकच, देवळातील पुजा अर्चा एकच, पुजारी एकच. . . खाण्यापिण्याच्या सवयी एकच तरीही आपण एकसंघ रहात नाही , कारण आपल्याला दाणे टाकून  जाती जातीत झुंजवले जातेय,    उच्चनिचता मनावर खोल रुजवून आपआपसात दुहिची बीजे पेरण्यात  आली व  इथेच सत्यानाश झाला . . 
 शिवकाळा अगोदर पासून   सर्वजण  गुण्या गोविंदाने नांदत होते याच समूहातील सर्व  घटक थोड्याफार  फरकाने  त्याकाळी सुखी  होते  कारण तेंव्हा अर्थ व्यवस्था कृषिप्रधान होती . . . त्यात सर्व  समुदायात सुद्धा भरपुर पोटजाती होत्या पण जातीयवाद नव्हता तर कर्तृत्ववाद होता . . ज्याच्या कडे पाटीलकी, देशमुखी, सरदारकी होती ते त्याच घराण्यात विवाह करत, जो अगोदर पाटील, देशमुख सरदार नसेल तोही लढाईत कर्तृत्व गाजवून पाटील, देशमुख, सरदार होत असे याला जातीचा आधार नव्हता तर कर्तृत्वाचा आधार होता व एकदा कर्तृत्व सिद्ध केले की एकमेकांशी रोटी बेटी व्यव्हार सुद्धा होत होता . . . म्हणून तर पश्चिम महाराष्ट्रातील शहाजीराजे व विदर्भातील जिजाऊ आईसाहेब यांचा विवाह त्या काळात झाला . . . आज मात्र आपण हे विसरून आपल्याच बांधवांना विरोध करतो तेही कुणाच्या तरी सांगण्यावरूण, फुस लावण्यावरून! कुणी कायद्यातील तरतुदी सांगतात आपल्याला. . . कुणी संयमाने घ्यायला सांगतात आपल्याला . . . . कुणी जाळपोळ, नासधूस या साठी जबाबदार धरतात तर काहीजण  आपल्याला . . शांततेचे सल्लेही देतात कित्येकजण. . . जेंव्हा शांततामय चालू असते तेंव्हा आपल्याच बांधवांना उचकवून मोर्चे  व  प्रतिमोर्चे  काढायला सांगून विभागणी करतात. . कुणी आंदोलना विरूद्ध, कुणी आपल्या  विरूद्ध कोर्टात  जावून एकमेकांच्या विरूद्ध लढत असतात  . . कारण का तर आम्ही विभागलेले आहोत म्हणून!  आम्ही फक्त संकुचित विचार करतो .  आजच्या घडीला   कोणत्याही  समूहातील  लोकांना इतरांची भिती का वाटते , तर एकमेकांची मने दुभंगण्याचे काम या ठिकाणी पद्धशीर झाले  . . खरेतर . सर्वांना बरोबर घेतले व सर्वांसाठीच स्वतःचे रक्त सांडून सगळ्या प्रजेचे संरक्षण केले . . . . या सर्व कामात जात पात भेदभाव न करता सर्वांना बरोबर घेवून  प्रत्येकास त्याच्या कामानुसार वाटाही दिला . . कधी कुणाची चुल पेटली नाही . . तर काळ्या रात्री असेल ते दिले . ..तर  . परत एकदा  समाज मनातील कटूता जाईल व राजकारण वेगळ्या उंचीवर जाईल  . . .  कधीकाळी  गुण्या गोविंदाने नांदलेला समाज एकत्र येईल, कुणी मोठा व कुणी छोटा न राहता  सर्वांचा  बांधव होईल  . .  आणि   व्यापारी , कर्जदार, शेतकरी , व्यावसायिक,  कामगार  या सर्वांनाच संरक्षण मिळेल.  ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ताटातूट थोडेफार काढून  भले  त्यांच्या कडून कर्ज रुपाने  घेऊन, सामान्य लोकांना देण्यासाठी प्रयत्न करता येतील!  
 सामान्य, कष्टकरी यांचे साठी कायदे आहेत त्याचा नीट वापर  करून त्यांच्या भरभराटीला मदत सु़द्धा करता येईल  . . . . पण आज किती जण मनापासून  नवीन राजकीय विचार यावर बोलतील, प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून नवीन व्यवस्था स्वीकारतील  ?  यावरच सर्व भवितव्य ठरणार आहे .  बांधवांनो श्रींमत  २  ते ५ % लोक सर्वांना पिळत   आहेत. राजकीय पक्षांचे राजकारण त्यांचे साठीच आहे , याला पायबंद घालायची ताकद निर्माण झाली तरच सर्वांना भवितव्य आहे  . . किती जणांना वाटते , सर्वांना समान संधी व समान  सुद्धा न्याय मिळाला पाहिजे . . . किती जणांना वाटते सर्वांचेच   प्रश्न सुटले पाहिजेत, सर्वांनाच मोफत  शिक्षण मिळाले पाहिजे . . . . सर्वांनाच  नोकर्यात लोकसंख्येच्या हिशेबाने  संधी मिळाली पाहिजे . . . हो नक्कीच काही सुज्ञ व मोजक्या लोकांना हे व्हावे वाटते .  पण बहुसंख्य लोकांच्या मनात पक्षीय गुलामगिरी व नेत्यांची भलावण करून मिळेल तर पदरात पाडून जगायची सवय सहजासहजी बदलणार नाही , त्यासाठी ठाम रहावे लागेल, जो एकमेकां बद्दल   पुर्वग्रह आहे तोच घालवावा लागेल  , सर्वांना  न्याय देईल असा विचार करावा लागेल  . . . व सर्वांनाच सोबत घेऊन या भुमिला सुखी समृद्ध करेल असा पक्ष काढावा लागेल. . . . या साठी इतिहासात थोडे जावूया . . भारत हा अनादी काळापासून सुखी समृद्ध होता. . . या ठिकाणी विषमता , अन्याय अत्याचार याला थारा नव्हता . . . कामाच्या वाटणीवरून जेंव्हा जाती पडल्या तेंव्हा पासून हळूहळू माणसे एकमेकां पासून दूर जावू लागली परिणामी भारतमातेचे असंख्य तुकडे तुकडे होत गेले व झाले व देश राजे रजवाडे यात विभागला जावू लागला , इथली कृषी संस्कृती नष्ट होवू लागली . . . सरंजामशाही वाढत गेली . . याला त्या काळात कोणताही पक्ष नव्हता व त्यामुळे इथली वर्णव्यवस्था व धर्मसत्ताच जबाबदार होती . . . या भूमीवर असंख्य अक्रमने झाली , संबंध समाज जाती जातीत विभागला गेल्याने व एकसंघ नसल्याने ही टोळधाड वाढतच गेली परिणामी या भूमीची , लुट झाली , या भूमीवर हजारो वर्ष परकीयांनी राज्य केले , जातीपातीत विभागल्या गेलेल्या संपुर्ण समाजाला गुलाम बनवले गेले , केवळ जाती जातीत विभागणी झाली म्हणून! तरीही आमच्या धर्मातील तथाकथित  पुढारपण करणार्‍या जातींना  त्या काळात जाग आली नाही , परिणामी असंख्य बांधवांनी नाइलाजाने धर्मांतर केले , या भूमीचे तुकडे होत राहिले . . . आजही जातीजातीत भांडणे लावून सत्ता मिळवण्याचा व वर्चस्व टिकवण्याचा प्रयास चालूच आहे . . तुम्ही जरूर सत्ता मिळवा लोकशाही आहे पण. . जाती जातीत विष कालवू नका तरच इतिहासातील चुका टाळता येतील असे वाटते . . . . शिवरायांचे काळात एक आशेचा किरण निर्माण झाला होता पण या भूमीवर त्या काळातही गद्दार व फुटीर लोकांची कमी नव्हती त्यामुळे स्वराज्य विस्तार अपेक्षे प्रमाणे देशभरात झाला नाही . . . गद्दारी करणार्‍या आपल्यातील खेकड्यामुळेच शिवरायांनाही संपुर्ण देशावर अंमल करता आला नाही व शिवकाळानंतर तर जातीयवादाने थैमान घातले . . . जगाच्या पाठीवर आदर्शवत संस्कृती असलेला हा भुप्रदेश , जाती जातीत दुभंगल्या मुळे परत इंग्रजी सत्तेचा १७५ वर्ष गुलाम झाला , केवळ माणसाला माणसांनी योग्य व उचित वागणूक न दिल्याने हे होत गेले काही बांधवांना तर नाईलाजाने इंग्रजांच्या बाजूने लढावे लागले , केवळ माणसाला माणूस म्हणून वागणूक न मिळाल्याने हे प्रश्न निर्माण झाले . . . जातीयवादाने आपली लुट झाली . . . आपल्यावर अन्याय अत्याचार झाले हे का व कुणामुळे झाले याला जबाबदार कोण यात दोष कुणाचा या प्रश्नांची उत्तरे शोधून काहीही होणार नाही . . मात्र यामुळे भविष्या साठी किमान धडा तरी घेता येईल. . . जातीयवाद न पोसता पुढे जावून. . वरील इतिहास का सांगायची वेळ आली याचा जरा सखोल अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि पुर्वीच्या काळात. . . विशिष्ठ वर्गाला न्याय मिळत नव्हता , अन्याय होत होता , म्हणून तो वर्ग बाजूला गेला . . बंड करू लागला . . . तो दुसर्‍या धर्मातील लोकांच्या आश्रयाला गेला , जो राहिला तो गुलाम केला गेला , असे झाले नसते तर हा भारत आज जळत राहिला नसता. . . आज लोकशाही मध्ये वावरत असताना बहुसंख्य जनतेला मुठभर भांडवलदार लोकांना जपण्यासाठी त्यांना जगवण्यासाठी इथली व्यवस्था सर्व प्रजेवर अन्याय करत आहे व ज्यांच्यावर अन्याय होतोय तेच एकमेकां मध्ये भांडणतंटे करत आहेत, एकमेकांना कोर्टात खेचत आहेत, एकमेकांचे मुडदे पाडत आहेत, एकमेकांना गोळ्या घालत आहेत व ते हे घृणास्पद कृत्य ते स्वतःच्या बुद्धीचा वापर करून करत नाहीत तर कुणाचीतरी गुलामगिरी पत्करून, किरकोळ मिळणार्‍या तुकड्या साठी करत आहेत. . मग त्यात प्रत्येक धर्मातील, जातीतील भांडवलदार आलेच. . . यातून मार्ग कसा निघणार तर खालील मुद्दे घेऊन नव्याने मांडणी करून आपल्या संस्कृतीला अनुसरून एक पक्ष निघालाच पाहिजे . . . त्याची घटना साधी व सरळ असली पाहिजे . यात प्रत्येक समाज घटकांना समान संधी असतील . . . . प्रत्येकास, नोकरी , शिक्षण, व राजकारण यात लोकसंख्येच्या प्रमाणात समान वाटा . मिळेल . . प्रत्येक समाजातील सर्व गरिबांना मोफत व सक्तीचे शिक्षण. . मिळेल . प्रत्येक समाजातील गरीब तरुणांना मोफत शिक्षण. . . व व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराची समान संधी . . उपलब्ध होईल. . नोकर्या निर्मिती साठी . . उद्योगांना पोत्साहन देतानाच, शेतकरी , कामगार यांच्याही हिताची जपणूक. ..होईल देव, धर्म याचे स्वातंत्र, मान्य करतानाच, ति प्रत्येकाची वैयक्तिक बाब समजून देवाच्या नावाखाली , धर्माच्या नावाखाली देश हिताला कोणतीही बाधा येता कामा नये याचाही सर्वंकष विचार होईल. . . प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केलाच पाहिजे मात्र. . . कोणत्याही परिस्थितीत, बळजबरीने धर्मांतर होता कामा नये . . सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आंतरजातीय विवाह होत असताना . आताच्या कायद्यानुसार फक्त वडीलांची जात दाखल्यावर लावता येते . . . ति पद्धत बदलून ज्यांनी आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केले अशांच्या आपत्यांना , मुला मुलींना स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या आईची किंवा वडीलांची यापैकी एक जि वाटेल ति जात लावता आली पाहिजे , म्हणजे आपोआप जातीयवाद संपण्यास मदत होईल. . . आकसापोटी , किंवा आर्थिक लाभासाठी किंवा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी , आज काही कायद्यांचा वापर केला जातो . . तो गैरवापर टाळण्यासाठी कुणालाही कुणावर कोणत्याही परिस्थितीत जातीच्या धर्माच्या आधारावर अन्याय करता येणार नाही . . प्रत्येकाच्या न्याय हक्काचे जपणूक ही कायद्याने झाली पाहिजे . . प्रत्येकास समान गुन्ह्याला समान शिक्षा व समान कलमे लागली पाहिजेत या साठी काम केले पाहिजे . . शेती व शेतीमालाला योग्य बाजारभाव, त्यावरील प्रक्रिया उद्योग व शाश्वत सिंचन आणि शेतीला लागणारा वित्तपुरवठा हा उद्योगांच्याच धर्तीवर झाला पाहिजे . . . . . घटस्फोट, विधवा विवाह, पोटगी, संपत्तीतील वाटणीतील अधिकार हे प्रत्येक भारतीय महिलांना समान पाहिजेत. . . . यात धार्मिक कायदे आड येणार नाहीत अशी घटनात्मक तरतूद हवीच. . पाठीमागे काय झाले या पेक्षा पुढे काय करायचे याचा विचार करून कोणत्याही जातीतील बांधवांना त्रास होऊ नये . . त्रास दिला जावू नये व सार्वजनिक, खाजगी जीवनात भेदभावाला, उच्चनीचतेला बिलकुल थारा नसावा हाच आपला मुलमंत्र. . असावा आणि महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष २५च्या आतील कोणत्याही महिला किंवा पुरूषांना देहव्यापार करता आला नाही पाहिजे . स्व खूशीने देहव्यापार करणार्‍या पुरूष किंवा महिला यांना जरूर लायन्स द्यावीत मात्र जबरदस्तीने या व्यवसायात २५ वर्षा खालील मुलींना महिलांना ढकलणार्या लोकांना , त्या साखळीतील प्रत्येकास मृत्यूदंड झाला पाहिजे . . कोणत्याही मुलीचे आयुष्य उध्वस्त होता कामा नये स्त्रियांना जो आपल्या संस्कृती मध्ये दर्जा देण्यात आला आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे . . आपल्या भारतात गायींचे संगोपन केले जाते मात्र बाईला जबरदस्तीने , नाचवले जाते , जबरदस्तीने व्यश्या व्यवसायात ढकलेले जाते. . हे किती भयंकर आहे . . . वरिल मुद्यांवर जो सोबत काम करेल त्याला बरोबर घेऊन आता पुढे जावूया . हिच भारतीयांची ओळख आहे हीच आपली संस्कृती आहे . . विजय पिसाळ नातेपुते . . . ९४२३६१३४४९



बुधवार, १० जून, २०२०

संगत

चालू घडामोडींचे विश्लेषण




संगत. . . ! 
मनुष्य हा अनादी काळापासून आजपर्यंत  समुहाने राहणारा , संघटीत काम करणारा, सहजीवन जगणारा  प्राणी आहे .  सहाजिकच प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या गरिब, श्रीमंत, सुशिक्षित किंवा अडाणी अशा कोणत्याही  व्यक्तीला कोणाची ना कोणाची संगत असल्या शिवाय जीवन जगताच येत नाही .  किंबहुना संगत नसेल तर त्याला मनुष्य जन्मात फारसी किंमत नसते . नव्हे त्याला जगणेच कठिण असते , खरेतर  ज्याच्या संगतीला कुणीच नसते त्याला या समाजातील  लोक, एकलकोंडा , वेडा , मनोरुग्ण अशी शेलकी विशेषणे लावतात. 
तसेही कुणी व्यक्त होतो तर कुणी अव्यक्त होतो पण तरीदेखील संगत सर्वांना हवीच असते व असायलाही पाहिजे . जीवनातील सुख दुःख शेअर करण्यासाठी , आनंद व्यक्त करण्यासाठी , कामातील ताणतणाव दुर करण्यासाठी , मन मोकळे करण्यासाठी ,  कठीण प्रसंगात धीर मिळण्यासाठी संगत आवश्यक ठरतेच, त्या शिवाय मनुष्याला जीवन जगताही येत नाही . 
संगत कुणाची करावी हे प्रत्येकाच्या स्वभाव गुणावर अवलंबून असते .  दोन टोकाची मते असणारे लोक फारकाळ एकत्र राहतीलच असेही नाही . खरेतर   प्रथम दर्शनी   शक्यतो बहुतेक लोक संगत करताना , जात धर्म, लिंग, भाषा  काही पहात नाहीत , जिथे आपले कुणी ऐकून घेते तिथेच संगत केली जाते किंवा ति आपोआप होते हे खरे  व हे अगदी नैसर्गिक होत असते .  जसे शाळेत  मुलांना घातले की , खोडकर मुलांचा एक ग्रुप बनतो, हुशार मुलांचा वेगळाच ग्रुप बनतो , खेळाडूंचा , कलाकारांचा , असे वेगवेगळे ग्रुप होतात व संगतीचा प्रवास चालू होतो . तसेच मोठेपणीही डॉक्टरांचा एक ग्रुप, वकिलांचा , शिक्षकांचा , व्यापार्यांचा , शेतर्यांचा असे ग्रुप बनतात, नाती गोती काहीच नसताना समान उद्देशानेही लोक एकत्र येतात व संगत घडते , 
तसेतर  लहाणपणी मनुष्याचे  मन हे कोरीपाटी असते त्यामुळे कोणताही भेदभाव न करता संगत घडते , कोवळ्या  मनात  द्वेषाची भावना कधीच येत नाही .  पण  वय वाढेल तसे शाळेतील संगतीचे रुपांतर जेंव्हा चांगल्या संगतीत होते तेंव्हा मनुष्य घडतो मग तो  व्यवसाय, नोकरी , शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी होतो . खरेतर संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते सुद्धा ,  ज्यांना चांगली संगत लाभली  ते घडतात व प्रगती करतात, मात्र ज्यांना संगत चांगली लाभलेली नसते ते चैन करतात, मग कधी तंबाखू , गुटखा , सिगारेट पिता पिता दारूच्याही आहारी जातात.  त्यामुळे त्यांचे विचार, राहणीमान जशी संगत आहे तसेच असते . मोठ मोठ्या घरचीही मुले वाया जातात,  जगात अशी खूप उदाहरणे आहेत, कि एक दारूडा कित्येक लोकांना त्रास देतो . तो कुणाचा तरी संगतीमुळेच दारू प्यायला लागलेला असतो ना ? 
 त्याने दारू सोडावी म्हणून देव पाण्यात घातले तरीदेखील दारू तो सोडू शकत नाही .  पण तोच मनुष्य एखाद्या चांगल्या सद्गूनी  व्यक्तीच्या संपर्कात आला तर क्षणातही त्याची दारू सुटू शकते .  तसेच जर पाच दहा दारूडे असतील तर निर्व्यसनी  सुद्धा संगतीचा परिणाम होऊन व्यसनी बनतो . दारू पिऊन बरबाद होऊ शकतो . 
  म्हणून वाटते प्रत्येकाच्या  जीवनाचा पाया हा बर्याच अंशी संगतीवर अवलंबून असतो . कित्येक हुशार लोक सुद्धा  वाईट  संगतीमुळे वाया जातात व चांगली संगत लाभली तर एखाद्या झोपडपट्टीतही व्यसनी दारीद्रिय असलेल्या घरातही  हिरे जन्माला येतात.  
संगतीमुळे मनुष्याचा स्वभाव बदलतो, भाषा बदलते , राहणीमान बदलते ,  संगतीमुळे मनुष्याचे वागणे बदलते , संगतीमुळे मनुष्य गैरमार्गालाही लागू शकतो ,  संगतीमुळे मनुष्य चांगलाही प्रपंच करू  लागतो व संगतीमुळे मनुष्य फार प्रगती सुद्धा करतो . हिर्यांची किंमत कितीही असली तरीदेखील त्याला घडवल्या शिवाय मुल्य प्राप्त होत नाही . व त्याचा दागिना बनवायचा असेल तर दुसऱ्या धातूची मदत घ्यावीच लागते व तो धातू सुद्धा मौल्यवान असावा लागतो .  तरच तो हिरा उठून दिसतो .  नुसता हिरा मौल्यवान असून चालत नाही . 
तात्पर्य काय?  
तुम्हाला घडायचे असेल तर तुम्ही कोणाच्या संगतीत राहता , वाढता , उठता , बसता , यावरच तुमची भविष्यातील वाटचाल अवलंबून असते . 
संगत चांगली करा , तुम्हाला चांगल्या संधी नक्कीच मिळतील! 
विजय पिसाळ नातेपुते !



शनिवार, २५ एप्रिल, २०२०

गावगाडा कसा चालणार?

चालू घडामोडींचे विश्लेषण
*कसा चालणार रुतलेला गावगाडा !*
वारंवारची संकटे झेलून झेलून शेतकरी मेटाकुटीला आलाय, कधी बाजारभावाचा प्रश्न, कधी जास्त उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकण्याची वेळ येते , कधी वादळी वारे पीक भुईसपाट करतात  , कधी गारपीटीने होत्याचे नव्हते होते , कधी महापूरात सर्वस्व संपून जाते , कधी ओल्या  दुष्काळात पीक सडून जाते , तर कधी कोरड्या  दुष्काळात पीकांची होरपळ होते   तर कधी परदेशातून आयात केलेल्या मालामुळे दर पाडले जातात,  पाडलेले   गेलेले बाजारभाव अशी  नैसर्गिक व सरकार निर्मित  शेतकरी संकटे झेलून झेलून तो थकलाय,   त्याची लुट करून करून सगळे मजेत आहेत, लुट करणारांना , त्याचे शोषण करणारांना ,  त्याला आत्महत्या करायला भाग पाडणारांना कोणीही शाप देत नाही , त्याच्या टाळूवरील लोणी खाणारांना कोणताही देव शिक्षा देत नाही .  त्याची सर्रासपणे लुट केली तरीदेखील आजवर ना कोणत्या सरकारला , ना कोणत्या सावकाराला ना फुकट खाणारांना पाप लागले आहे . त्याला षडयंत्र रचून रचून घायला आणायचे काम करायचे , सगळ्यांना पोसण्यासाठी पिळवणूक करायची . आणि त्याचाच नावाने राजकारण करून मगरीचे आसू ढाळायचे .   आतातर  त्याच्यातील काहींना ६००० हजारांचा नको असलेला उतारा टाकलाय?  जणू भीक टाकावी व त्याने पोट भरावे तसे !  या कोरोनाच्या संकटात तो पुरता संपलाय. .  त्यासाठी राजकारण म्हणून सुद्धा कुणी पुढे आले नाही . 
 पोटच्या पोरापेक्षा जास्त जपलेल्या , फळबागा , भाजीपाला , शेतात सडून गेला , जागेवर माल पीकून खराब झाला !  कित्येक माझ्या बांधवांना तो  विकताच आला नाही . खूप महत प्रयासाने  विकायची परवानगी भेटली तर वाहतूकीची साधने नाहीत. शेतमालाची ने आण करायला परवानगी , डिझेल टाकायला पास  , 
शेतातील तयार झालेली फळे पिकवण्याची त्याच्याकडे यंत्रणाच नाही ?  आणि तो माल   पिकवला तर माल विकत बसायचे की, शेतात कधी  राबायचे ?  शेती कधी  करायची ?   बाहेर माल विकायला जावे म्हटलं तर शेतातील गुरे , जनावरे बघायची कोणी ?  त्यातूनही सवड काढली तर  बाहेरगावी जाता येत नाही .   व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने घेतात व अशाही संकटात  लोकांना मात्र अव्वाच्या सव्वा दराने विकतात.  नुसती ग्राहक व शेतकर्यांची लुट चालू आहे .  यावर सत्ताधारी व विरोधक मुग गिळून गप्प आहेत .  लाखो रूपये शेतकर्यांनी फळ बागांसाठी,  भाजीपाल्यासाठी घातले . आता त्यातील १० ते २०% तरी वसूल होतील का नाही शंका आहे  ? सरकारी मलपट्टी होईल, मदतीचे आकडे जाहीर होतील पण शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार घंटा ?  फॉर्म भरणारे , फॉर्म जमा करून घेणारे , याद्या तयार करणारे मात्र मालामाल होणार? 
 मदत मिळेत ति पण ठरावीक लोकांनाच मात्र जाहिरातींची पाने भरभरून छापून येतील हे मात्र नक्की . या महामारीत 
  प्रचंड नुकसानीमुळे   कित्येक शेतकऱ्यांचे  कर्ज थकणार, यात जवळपास ८० % शेतकऱ्यांचे सीबील खराब होणार, त्यामुळे थकीत गेलेल्या शेतकर्यांना  बँका पुढील हंगामात  पतपुरवठा करतील का नाही . ही शंका आहेच  . खाजगी सावकार लुटणार हेही नक्की आहे . सामान्य शेतकऱ्यांनीच नव्हे तर मोठ मोठ्या शेतकऱ्यांनीही  मशागत, मजूर,  खते , बियाणे, डिझेल, पेट्रोल  यासाठी पैसा कसा व कुठून उपलब्ध करायचा हा गंभीर प्रश्न आहे .  शेतकर्यांना  या लॉकडाऊनमध्ये ना पोलिसांनी समजून घेतले , ना महसूल विभागाने समजून घेतले . शेतकऱ्यांचा  किरकोळ माल विकतानाही नाकीनऊ आणले . तेल मिठ सुद्धा बंद पाडले , शेतकरी  लोकांना डिझेल, पेट्रोल यासाठी वनवन करावी लागली , गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना काठीचा प्रसाद खावा लागला . सातत्याने अडवणूक झाली .  त्यामुळे  शेतातील असंख्य कामे पेंडींग राहिली आहेत. मजूरांना शेतात जाताना येताना  भयंकर त्रास सहन करावा लागला , कसा हा तोटा भरून काढायचा  , उपसलेल्या बँका कशा भरायच्या ? 
 पुढच्या काळात   शेती जर पिकली नाही तर हे लोक काय खाणार आहेत कुणास ठावूक. .  प्रशासनाने शिस्त लावायची असते नियम घालून द्यायचे असतात,  पुढाकार घ्यायचा असतो . उपाय योजना करताना गोरगरीबांचे  कमीतकमी नुकसान कसे होईल हे पहायचे असते ?   पण इथे मात्र लोकांना हुसकावून लावणे , मारहाण करणे अपमानास्पद बोलणे सर्रासपणे चालूच होते. किराणा दुकाने बँकात सोशल डिस्टन्सिंगचे किती काटेकोरपणे पालन झाले ?  पण मोटार सायकलवरून फिरून भाजी विकणारांना मात्र हुसकावून लावले गेले , भाजी विकायला चालला तरीदेखील, लायसन्स मागीतले गेले !   ज्या हाताने माणसे पोटभर खातात ते तर शेतातून आलेले असते व त्याच शेतकऱ्यांना   मारहाण केली जाते ?  किती दुर्दैवी आहे .  सगळ्या जगात  जागोजागी मि पोलिस मित्र पाहतोय , प्राणीमित्र, पक्षीमित्र, पाहतोय, पण एकही शेतकरी मित्र पाहिला नाही , जो शेतमाल विकायला मदत करेल!  जो तो फुकट लुटायला , फुकट मिळवायला बसलेला मि पाहिला ! 
 ज्यांना काहीतरी आमचे दुःख समजेल? असे दिसलेच नाहीत! 
या मानवतेच्या ढोंगीपणात  शेतकर्यांच्या व्यथा मांडायला यंत्रणा मुकी झालीय,  शेतकर्यांच्या व्यथा एेकायला यंत्रणा बहिरी झालीय.  शेतकर्यांचा माल फेकून देत असताना सगळी यंत्रणा आंधळी झालीय.   सगळे  ड्रामेबाज कार्यक्रम व त्याचे काय ते कौतुक?   मेडिकल, बँका , किराणा दुकाने या ठिकाणी  किती सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले ?  मुळात भाजीपाला फळे जेवढे नियम पाळून विकली तेवढे बाकी काहीच विकले गेले नाही . कितीजण हँडवॉश व सॅनेटा़ईझरचा वापर करतात?  पण शेतमाल विकताना मात्र यांना नियम दिसतात. नियम पाहिजेत पण सर्वांसाठी सारखेच असावेत ना ? 
  बळीराजाच्या मृत्यू नंतर   शेतकऱ्यांना कुणीच वाली राहिला नाही . 
येणारा काळ भयंकर असेल हे मात्र नक्की !  
विजय पिसाळ नातेपुते.

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

सोशल मिडिया शाप की , वरदान?

चालू घडामोडींचे विश्लेषण


*सोशल मिडिया शाप की वरदान. .* 
काहीजण चोवीस तास सोशल मिडिया वापरतील, मनसोक्त करमणूक करून घेतील,  करमणूक करतील, एकमेकांशी संवाद साधतील,  हजारो , लाखो लोकांपर्यंत याच माध्यमातून पोहोचतील, सोशल मिडीयाचाच  वापर करून सोशल मिडिया किती बेकार आहे हे पण सांगतील असो ! हेही खरे आहे  ,  हातात काम असताना सोशल मिडियाचा अती वापर करणं हे चुकच आहे .  पण सोशल मिडिया हा नुसता टाईमपास आहे का ?  सोशल मिडिया नुसती करमणूक आहे का ? हे जर आपण हो म्हणत असू  तर नक्कीच आपण कुठेतरी चुकतोय!  
याच सोशल मिडियामुळे गावागातील समस्या वरिष्ठा पर्यंत पोहचू लागल्या हे विसरता येईल का ? फेसबुक व व्हॉट्सपच्या व सर्वच सोशल मिडियाच्या  माध्यमातून सर्व प्रकारचा व्यापार होऊ लागला आहे  .  जगातील ज्ञान, विज्ञान, कला , क्रिडा यांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे  .  नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा , वस्तूंचे बाजारभाव हे सुद्धा क्षणात आम्हाला मिळू लागले . रोडवरील  अपघात असो कि  घरातील छानसा कार्यक्रम असो त्याचे व्हीडिओ, अॅडिओ, फोटो लगेच मिळतात, त्यामुळे अपघातात मदत होतेच ना ?  इतरांच्या आनंदात सहभागी होता येतेच ना ?  रक्तदान शिबिरे , आरोग्य शिबीरे  यांचे आवाहन हजारो लोकांना करता येते.  विधायक कामासाठी लोकांना आवाहन करता येते , लोकांचा सहभाग वाढवता येतो  हे केवळ सोशल मिडियामुळेच शक्य झाले की नाही .  कोणत्या शहरात, कोणत्या भागात काय समस्या आहेत हे पण समजू लागले .  शाळा , कॉलेज, ट्यूशन, यांच्या डेली अपडेट्स याच प्लॅटफॉर्मवर मिळू लागल्या . वर्ग बंद ठेवले तरीदेखील याच माध्यमातून शिक्षण उपलब्ध होत आहे . स्पर्धा परिक्षांची तयारी , विविध अभ्यासक्रम याच माध्यमातून चालू आहेत.  आपला पाल्य शाळेत येतो का , त्याची तयारी कशी आहे . तो सर्व तासांना असतो का ?  याची माहिती घरबसल्या पालकांना  मिळू लागली आहे  .  जगाच्या कानाकोपर्यातील सर्व माहिती क्षणात प्राप्त होऊ लागली आहे.  परदेशात,  परगावात, शहरात   नोकरी व शिक्षण या निमित्ताने असलेली  मुले, नातवंडे , सुना यांच्याशी घरातील वडिलधारी मंडळी व्हीडिओ कॉलवरून बोलू लागली .  शासकीय आदेश क्षणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होऊ लागले आहेत  .  किराणा  दुकानदार, भाजीवाले  ,  या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू लागले आहेत  .  शेतकऱ्यांना जागेवरून माल विकता येतोय, त्याची जाहिरात करता येतेय,  विविध वाचणीय पुस्तके घरबसल्या वाचता येऊ लागली आहेत . मनोरंजनाचे साधन जरूर  आहे सोशल मिडिया , पण आपुलकीच्या  संवादाचे माध्यम सुद्धा  आहे सोशल मिडिया , मदतीला धावणारा आहे सोशल मिडिया . गोरगरीबांच्या अडचणींचे निराकरण करण्यास मदत आहे सोशल मिडिया .  धावपळीच्या जीवनात एकमेकांना जोडणारा आहे सोशल मिडिया . शाळा कॉलेज संपल्या नंतर  दुरावलेले मित्र मैत्रिणी  एकत्र करणारा आहे सोशल मिडिया . सर्व वस्तुंच्या किंमती , खरेदी व विक्री करणाऱ्या कंपन्या यांची माहिती मिळण्याचे ठिकाण आहे सोशल मिडिया . उत्पादक ते ग्राहक जोडणारा आहे हाच सोशल मिडिया .  गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आहे सोशल मिडिया . .  किरकोळ तोटे जरी असले तरीदेखील फार महत्वाचा आहे सोशल मिडिया . .  फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच त्याचे फायदे समजतील नाहीतर फक्त  , त्याचाच वापर करून सोशल मिडिया खराब आहे असे म्हणणेही  योग्य नाही .  
मला तर सोशल मिडिया हा मानवाला वरदान आहे असेच वाटते . 
विजय पिसाळ नातेपुते . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

३ मे नंतर सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल!

चालू घडामोडींचे विश्लेषण

3 मे रोजी कदाचित  लॉकडाऊन संपेल, सरकार अर्थव्यवस्था व गोरगरीबांच्या जीवनमरणाचा विचार करून लॉकडाऊन वाढवणार नाही .  पण याचा अर्थ आपल्या देशातून ३ मे पर्यंत संपुर्ण कोरोनाचे उच्चाटन होईल असा बिलकुल नाही .
 ३ मे नंतर सरकारची जबाबदारी कमी व स्वतःची जबाबदारी जास्त वाढणार आहे . लोकांचे जथ्थेच्या जथ्थे बाहेर पडतील, मॉल, रेल्वे स्टेशन, सिनेमा हॉल, बस स्थानके , बाजारपेठा , विविध दुकाने  या ठिकाणी लोक प्रचंड संख्येने जातील व येतील. यामुळे कोरोनाची खरी लढाई ३ मे नंतर चालू होणार आहे .  आपल्याकडचे लोक  लॉकडाऊन असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत,  सरकारच्या आदेशाला जुमानत नाहीत, गुपचूप एकत्र येतात, पार्ट्या करतात,  त्यामुळे ही चैन ब्रेक झाली नाही .  आणि म्हणूनच ३ मे नंतर सुद्धा चैन ब्रेक होणार नाही असेच वाटते . 
  ३ मे नंतर जे जे लोक  स्वतःच स्वतःची काळजी घेतील,  सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक समारंभ, सार्वजनिक रित्या होणारे  धार्मिक कार्यक्रम  व मोठ मोठे होणारे लग्न विधी टाळतील, घरात बाहेरच्या लोकांना कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत  काहीकाळ येऊ देणार नाहीत.  आपल्या वाहनांचाच वापर करतील, भाडोत्री गाड्या सांगणार नाहीत. 
 तेच लोक यातून सहीसलामत राहतील.   खरेतर मोठ मोठ्या शहरातील भाजीपाला व फळे व्यापार हा डायरेक्ट घरोघरी जावून संबंधित व्यापारी आणि शेतकरी यांनी करायला पाहिजे .  मोठ्या शहरातील मार्केट कमिट्यात सोशल डिस्टन्सिंगचे तिन तेरा होत आहेत.  त्यापेक्षा व्यापार्यांनी शेतमाल बांधावर खरेदी करावा व घरोघरी जावून तो ग्राहकांना  विकावा तरच यातून आपण वाचू शकतो.  
सरकारने  , शाळा , कॉलेज, परिक्षा , या किमान ऑगस्ट पर्यंत तरी घेण्याचा विचार करू नये .
 शाळेतील मुलं संपुर्ण गावातील किंवा शहरातील वेगवेगळ्या भागातील असतात त्यामुळे धोका वाढू शकतो.  कोरोनाचे संपुर्ण उच्चाटन होईपर्यंत होणारे लग्न समारंभ हे छोटेखानी व घरगुती किंवा रजिस्टर पद्धतीने व्हायला हवेत.  आपल्या देशाची लोकसंख्या आणि सामाजिक सौहार्द यामुळे लग्न समारंभ मोठ मोठे करण्यासाठी संपुर्ण परिसरातील लोकांना निमंत्रित करण्याची प्रथा व परंपरा आहेत पण यापुढे हे कोरोना संपेपर्यंत थांबवावे लागेल  . 
सरकारने परदेशी पर्यटनाला, प्रवासाला  किमान १ वर्ष तरी बंदी ठेवली पाहिजे .  व ज्यांना   केवळ नोकरीसाठी व शिक्षणासाठी  परदेशात  जायचे किंवा यायचे आहे .  त्यांना कंपल्सरी विमानतळावरून थेट १४ दिवस आयसोलेटेड केले पाहिजे .
सध्याची परिस्थिती लगेच सुधारणार नाही त्यामुळे सार्वजनिक प्रवाशी  वाहतूक काही काळ बंद ठेवली तरच संसर्ग थांबवता येईल.  छोटी छोटी वाहने  पुर्णपणे आतून बाहेरून फवारणी करूनच वापरली पाहिजेत.  कोरोनाचे संकट ३ मे नंतर लगेच संपेल व रस्त्यावर येऊन आम्ही दिवाळी करू हा जर विचार करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर होळी जशी गल्लोगल्ली पेटवतात तसे प्रेतांना अग्नि संस्कार करावे लागतील. 
भारतातील शेवटचा कोरोना पेशंट संपेल तेंव्हाच हे संकट संपणार आहे .  त्यामुळे ३ मे नंतर जो काळजी घेईल तोच वाचणार आहे. 
विजय पिसाळ नातेपुते . . 
९४२३६१३४४९/ ९६६५९३६९४९

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

शेतकरी ते थेड ग्राहक विक्रीला परवानगी दिल्या शिवाय पर्याय नाही !

चालू घडामोडींचे विश्लेषण





शेतकरी ते ग्राहक साखळी तयार केल्या शिवाय पर्याय नाही . . 
विजय पिसाळ नातेपुते . . 
कोरोना सारखे साथीच्या आजारामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रॉब्लेम वारंवार होत असल्यामुळे प्रशासनाला वारंवार भाजीपाला व फळे मार्केट बंद करावे लागते आहे .  कारण काही ठिकाणी  किरकोळ व्यापारी , ग्राहक, हमाल  नियमांना तिलांजली देतात. त्यामुळे कोरोना सारख्या रोगाचा फैलाव रोखणे कठिण जाते,  यासाठी यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने सहकार्य करून डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक ही चैन तयार करावी लागणार आहे .  त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या मुलांना छोटी  कुलिंग वाहने व  , शेतावरच फळे पिकवण्यासाठी  रायपनिंग चेंबर या साठी प्रोत्साहन पर अनुदान दिले पाहिजे , तसेच त्यांना बँका मार्फत कमी व्याजदराने किंवा अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून, त्याला शासनाने थकहमी दिली पाहिजे  .  फळे व  भाजीपाला हा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शहरातील वेगवेगळ्या भागात घरपोच दिला पाहिजे व तसेच ग्राहक ते शेतकरी साखळी तयार झाली पाहिजे .  संबधित शहरातील मोठ मोठ मोठ्या सोसायट्या व वेगवेगळे ग्राहक यांनी शेतकऱ्यांना जर व्हॉट्सपवरून दैनंदिन लागणार्‍या मालाची ऑर्डर्स दिल्या व तेवढा माल शेतकऱ्यांनी रास्त दराने ग्राहकांना पुरवला तर ग्राहकांना योग्य दराने भाजीपाला व फळे मिळतील व शेतकऱ्यांनाही वाजवी भाव मिळेल व वाहतूक कोंडी  न होता  सोशल डिस्टंसिंगचे पालन होऊन  शहरात भाजीपाला ग्राहकांना घरपोच मिळेल. भाजीपाला वारंवार हाताळल्या मुळे होणारी नासाडी सुद्धा टळेल. .  
यापुढील काळात असे केले तरच कोरोना सारख्या आजारावर मात करता येईल व ग्राहक आणि शेतकरी यांचेही नुकसान टाळता येईल.
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

आर्थिक आणीबाणीच्या दिशेने ?

चालू घडामोडींचे विश्लेषण


नागरीक बांधवांनो . .   देशाचा भार आता आपल्यालाच वाहवा लागेल! 
©® श्री विजय पिसाळ नातेपुते . . . 

मित्रांनो, बांधवांनो कोरोनाच्या संकटामुळे सगळ्या कंपन्यांची उत्पादने  बंद आहेत, वाहतूक बंद आहे ,  पेट्रोल  पंप, हायवे , बंद आहेत, रिअल इस्टेट क्षेत्र बंद आहे .  जवळपास देशातील  सर्व कारभार  ठप्प  आहे .  जवळपास देशातील ८० %  व्यवहार  ठप्प आहेत. 
याचाच सरळसरळ अर्थ आपल्या देशाच्या  कर संकलनात पुढील काही महिन्यांत   प्रचंड घट होणार हे ओघाने आले .  त्यामुळे  सरकारने कितीही प्रयत्न केले तरीदेखील बराच कारभार ठप्प होणारच आहे . कारण कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो . सरकारला  पगाराचा खर्च  व आरोग्यासाठीच्या योजनांचा खर्च, दैनंदिन कामकाज व गरजेचे खर्च  भागवणे अतिशय जिकीरीचे होणार आहे .  कोरोणाचे संकट जावून रुटीन लागायला कित्येक महिने लागतील. देशाची चक्र फिरणे इतके सोपे नाही कित्येक दिवसानंतरच कर संकलन हळूहळू पुर्वपदावर येईल.
कंपन्यांचा तोटा वाढत जाणार असून त्यामुळेही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.  
  हजारो लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे सरकारला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंकडे लक्ष द्यावे लागेल.  
यामुळे बाकीच्या योजनांना कात्री लागेल यामुळे जवळपास  सर्वांचीच गैरसोय होईल,  भविष्यात  काही गोष्टींचा नक्कीच  तुटवडा जाणवेल. कारण जवळपास सर्वच वस्तुंच्या  उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे . ठप्प आहे.  भविष्यात अन्नधान्य महागाईचा आलेख सुद्धा वाढणार आहे . अन्नधान्या बरोबरच इतर वस्तु व सेवा सुद्धा महाग होऊ शकतात. 
 कोरोनाच्या फटक्यामुळे  शेतकरीवर्गही  मेटाकुटीला येऊन त्याचेही प्रचंड नुकसान होऊन  क्रयशक्ती घटणार आहे .  सरकारला बाहेरून आरोग्य विषय गोष्टींची साधणे व औषधे हे  जास्तीचे पैसे खर्च करून आवक करावी लागणार आहे . सरकार कोणतेही असले तरीदेखील कर संकलना शिवाय  काही करू शकत नाही . याचाच अर्थ सर्वच देश बांधवांना महागाईची झळ बसणारच आहे . पायाभूत सुविधा , मिळणारी अनुदाने , लोकप्रिय योजना चालवताना सरकारला कसरत करावी लागेल. . प्रसंगी लोकप्रिय योजना गुंडाळाव्या लागतील. यापुर्वीच  पैसा उभा करण्यासाठी सरकारने सार्वजनिक कंपन्यातील आपली भागिदारी विकली आहे .  काही कंपण्यामधील आपली गुंतवणूक काढून घेण्याची घोषणा केली होती . पण उद्योगपती व बँकाच तोट्यात जातील व निर्गुंतवणूक सुद्धा सहजासहजी होईल असे वाटत नाही . 
निर्गुंतवणूकीचा  पुढील टप्पा सुरू होईल.  पण प्रतिसाद मिळेलच असे नाही . 
 सध्याचा कारभार ठप्प झाल्यामुळे सर्वच उद्योगपती व व्यावसायिकांचा तोटा वाढून त्यांना बँकांचे हाप्ते भरणे कठीण होणार आहे .  सहाजिकच बँकांचा एनपीए वाढणार आहे .  त्यामुळे सामान्य जनतेला व लघु उद्योगाला कर्ज मिळणे कठीण होणार आहे . ठेवीवरील व्याज कमी होईल असे दिसते.  शेतीला तातडीने  पतपुरवठा मिळण्याची शक्यता मावळणार  आहे ..मुळात  देशाचा जीडीपी घसरणार  आहे . निर्यात घटून  परकीय चलनसाठा  सुद्धा घटणार  आहे . 
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत घसरू शकतो .  शेअर बाजारात मंदिचा माहोल तयार होऊन शेअर विक्रीचा मारा जास्त होईल असेच दिसते .  त्यामुळे परकीय गुंतवणूक कमी होऊ शकते . .  महामंदीच्या लाटेत आर्थिक आणीबाणी येऊ शकते ?  
त्यामुळे जनतेने सरकारच्या भरोशा पेक्षा स्वतःच रोजगार निर्मितीचे मार्ग शोधले पाहिजेत.  स्वतः बचत केलेला पैसा जपून वापरला पाहिजे . चैनीच्या गोष्टींना बगल दिली पाहिजे . 
नजीकच्या काळात सरकार, चैनीच्या वस्तू , टीव्ही , फ्रिज, दारू , सिनेमा , टिव्ही रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, सोने चांदी , दारू , टोल, रोडटॅक्स, पानमसाला , हिर्याचे दागिने , परदेशी गाड्या यावर अतिरिक्त शुल्क आकारू शकते . 
पायाभूत सुविधांना निधी कमी  पडणार असून नवीन डेव्हलपमेंट थांबणाची शक्यता आहे . महाकाय प्रकल्प रखडले जावू शकतात. . 
गाडी पुर्वपदावर येण्यासाठी कमी माणसांत जास्त काम करून घ्यावे लागेल, सरकारी बाबूंचे लाड थांबवावे लागतील. .  भ्रष्टाचार व दप्तर दिरंगाई याला चाफ लावावा लागेल.  
एकुणच काय तर जनतेला सरकारवर जास्त अवलंबून न राहता .  स्वतःच भारताला बलशाली करण्यासाठी पुढे यावे लागेल तरच देश वाचणार आहे . 
©®विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९

शनिवार, १४ मार्च, २०२०

स्वच्छतेचा आग्रह धरा व स्वच्छता असेल त्याच ठिकाणी संबंध ठेवा . .

चालू घडामोडींचे विश्लेषण

स्वच्छता नसेल तर कोरोनाचा अटकाव करणे शक्य होईल का ? 
विजय पिसाळ नातेपुते . . . 
आपण ज्या हॉटेलमध्ये चहा पितो , ज्या ठिकाणी जेवण करतो , लग्न समारंभात जेवण करतो . . अशा ठिकाणी स्वच्छता पाहिजेच, तिच ति भांडी  परत परत ओली वापरणे   व त्याच त्या  अस्वच्छ  पाण्यात भांडी व चहाचे कप  विसळणे  हे व्हायला नको आहे . . 
हॉटेल मालकांनी , टपरी धारकांनी , कोल्ड्रींकचे गाडे , भेळ सेंटर, वडापावचे गाडे , या सर्वांनी   थोडे जास्त पैसे ग्राहकाकडून  घ्यावेत पण कागदी युज & थ्रोचे  कप व  प्लेट आणि पत्रावळी  वापराव्यात  . . 
जुन्या पत्रावळी किंवा केळीची पाने  व द्रोण वापरावेत. . . वेटरला व आचारी महिला व पुरुषांना  कंपल्सरी साबणाने आंघोळ करायला लावावी . . . त्यांचा  आणि ग्राहकांचा संपर्क येतो . त्यामुळे त्यांनाही बाधा होऊ नये म्हणून हॅन्डग्लोज व मास्क दिले पाहिजेत, रोजचे कपडे स्वच्छ साबणाने धुतलेले पाहिजेत. . 
संसर्ग हा जास्त हॉटेल व लॉज या मार्फत होऊ शकतो . कारण या ठिकाणी ग्राहक बाहेरगावचा व कुठूनही आलेला असतो .  
हॉटेल चालक मालक, मॅनेजर  व कामगार यांनी तर स्वतःची  खूप काळजी घेतली पाहिजे कारण त्यांचे ग्राहक कुठलेही बाहेरगावचे  असतात व टेबलवर जेवण केल्यामुळे , संबंधित भांडी व टेबल दुषित होऊ शकतात. . 
दुसरी गोष्ट. .  
सलुन दुकानात जातानाही ग्राहकांनी शक्यतो आपल्या ओळखीच्याच  आणि स्वच्छतेला प्राधान्य देणार्‍या दुकानातच गेले पाहिजे . . व ग्राहकांनी शक्यतो घरूनच रुमाल किंवा  नेपकीन घेऊन गेले  पाहिजेत. . 
सलुनचे सर्व साहित्य डेटॉलच्या पाण्यात धुतले पाहिजे . . 
कारण तोच तो नेपकीन वापरल्यामुळे संसर्ग वाढू शकतो कारण रुमाल नेपकीन हे दिवसभर असंख्य ग्राहकांना वापरले जातात. व पुर्णपणे वाळलेले नसतात,   कारागिर बांधवनाही याची बाधा होऊ शकते . . . त्या कारागीर बांधवांनी काटेकोरपणे प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र नेपकीन वापरला पाहिजे . . त्यासाठी  एकदाच जास्त नेपकीन खरेदी करावे , खर्च करावा लागेल पण ग्राहकाचा व स्वतःचाही जीव महत्वाचा आहे .  भलेही नेपकीन  धुवायचे व स्वच्छतेचे  पैसे जास्त घ्या पण स्वतःही सुरक्षित रहा . . 
एस टी महामंडळाने , चालक व  वाहकांना रोज नवीन मास्क दिले पाहिजेत व बसेसचे दैनंदिन निर्जंतूकरण केले पाहिजे . . हीच काळजी रेल्वेतही घेतली पाहिजे . . 
शहरातील जास्त गर्दीच्या शाळा , कॉलेज, मॉल, दुकाने व छोट्या मोठ्या  शाळांनाही विशेष खबरदारीच्या सुचना दिल्या पाहिजेत. . व त्याचे पालन सर्व संबंधिताकडून  झाले पाहिजे . जास्त फैलाव होण्या पेक्षा . . खबरदारी महत्वाची आहे . . 
जागरुक लोकांनी मोठे लग्न समारंभ, घरातील कार्यक्रम हे सध्यातरी मोठे  घेऊ नयेत. लिमिटेड लोकांनाच निमंत्रण द्यावे . .  यात्रा जत्रा भरवणार्या गावांनी  या वर्षी शासनाचे आदेश असो किंवा नसो . .  गावोगावच्या ग्रामपंचायती व पंचमंडळी यांनी ठराव करून  स्थागित कराव्यात. . . 
 व मोठ्या यात्रा यातून संसर्ग जास्त फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही . .
बाहेरगावचा सार्वजनिक व खाजगी  वहानातून प्रवास  फक्त गरजेपुरताच करावा . .  पर्यटनाला जावू नये . . 

विजय पिसाळ नातेपुते . .

मंगळवार, १० मार्च, २०२०

परत भेट होईल का ?

चालू घडामोडींचे विश्लेषण
होय ऐक ना.... ! 

©® विजय पिसाळ नातेपुते . . . . 

नुकतंच दोघांचंही  कॉलेज संपलं होतं टीवायचा पेपर संपल्यावर सर्वांनी  जेवायला जायचा बेत आखला होता हॉटेलमध्ये  , मनाची तर घालमेल चालू होतीच , परत कधीच भेटीगाठी होण्याचीही शक्यता फार नव्हती . .  कारण तेंव्हा संपर्कासाठी मोबाईल नव्हते .  लँडलाईन होते पण घरातील दबावामुळे बिनधास्त बोलणे व कॉलही करणे शक्य नव्हते . . . आम्ही पेपरच्या शेवटच्या दिवशी मस्तपैकी सर्वांनी जेवण केले . आणि जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला . . . सुजयचं (काल्पनिक नावं) फिक्स काहीच नव्हतं आणि तिनं मात्र पुण्याला पुढील शिक्षणासाठी जायचं ठरवलं होतं . . 
दोघांनीही  एकमेकांचा निरोप घेतला आणि सुजय  खोल  भुतकाळात गेला . . .  पहिल्या वर्षी जेंव्हा सुजय  कॉलेजला गेला  तेंव्हा सुजयचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं व सुजयचं  गावही  तसं छोटेसं त्यामुळे सुजयला  इंग्रजी बोलता येत नव्हतं व वर्गातील मुलं मुली मात्र फाडफाड इंग्रजी बोलायची . .  शिक्षकही इंग्रजीत शिकवायचे जणूकाही सुजयच्या  मनाची अवस्था तुरूंगात कोंडलेल्या कैद्यासारखीच व्हायची ! 
सगळे जगच नवीन ना ? 
कुणीच जुने मित्र नाहीत की मैत्रिणी नाहीत कि , जुने शिक्षकही नाहीत. .  सरांनी एखादा प्रश्न विचारला की अडखळत उत्तर द्यायचे पण वर्गात मात्र खसखस पिकायची . . सुजय शांत होता , थोडा हसतमुख पण आपल्या परिस्थितीची जाणीव असलेला ! कॉलेजला  नवीन असल्यामुळे व ग्रामीण भागातून आल्यामुळे त्या भाषा रांगडी होती . . . त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जायच्या . . . 
सुजयच्याही   हळूहळू ओळखी होऊ लागल्या तशी दिव्याचीही ओळख झाली ( काल्पनिक नाव ) दिव्या दिसायला छान, हस्ताक्षर छान, 
श्रीमंत घरातील मुलगी , गाडीवरून मोकळे केस सोडत कॉलेजला   यायची . . महागडे ड्रेस व  मॅचिंग मध्ये असायची  तसेच   बिनधास्त रहायची पण अभ्यासातही जबरदस्त  हुशार , सुजयची  अवस्था पाहून वर्ग हसायचा मात्र दिव्या कधीच हसत नव्हती , समजून घ्यायची एकेदिवशी सुजयला  कॉलेजला यायला उशीर झाला . . सरांनी सुजयची  परिस्थिती व अडचण  समजून न घेता खूप फडाफडा बोलून अपमान केला . . सुजयला  खूप वाईट वाटले . ..पण करणार काय  ? त्या दिवशी   सगळा वर्ग मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर गेला .  मात्र  सुजय एकटाच वर्गात बसून होता  . . सुजय  सर्वांबरोबर आला  नाही म्हणून दिव्याने त्याची मित्रांकडे  चौकशी केली व सुजय का सर्वांबरोबर आला  नाही हे पण खरेतर  ओळखले . . आणि सुजयला  बाहेर कॅन्टीनला   नेहण्यासाठी माघारी वर्गात परत आली  आणि जवळ येऊन  म्हणाली का इतका नाराज आहे रे सुजय !    चल ना आमच्या बरोबर चहाला !  सुजय नको  म्हणत होता , नको - नको करत होता !  सुजयला जणू खूप दुःख झाले होते  पण तिने हट्टाने चहाला त्याला  नेहलेच !  
तोपर्यंत सगळा वर्ग कॅन्टीनला गेला होता . . सुजय व दिव्या  हळूहळू गप्पा मारत चालले होते  . . 
 तिने विचारले का उशिर झाला रे सुजय ! 
सुजय काय सांगणार ?
घरची बिकट परिस्थिती ?  
एक एसटी हुकली तर,  दुसरी एसटी लगेच नसने ? 
शेतातील काबाडकष्ट? 
घरातील कामे ?  जणावरांचा चारा पाणी ?  घरोघरी वाढावे लागणारे दुध ?  की किराणा मंडई ?  शेतातील पिकांना पिकांना पाणी देणे ? 
घरातील  बाकीची  जबाबदारी ?
  नेमकं काय काय सांगायचं ? 
खरंतर कामाच्या ओझ्याखाली त्याचा अभ्यास होत नव्हता , कामामुळे कॉलेजलाही दांड्या पडायच्या , उशीर व्हायचा , बुद्धी असूनदेखील अपमान होतोय याची सल असायची ,  तसा सुजय खेळात, वक्तृत्वात,  कविता करण्यात, हुशार होता . पण या कॉलेजमध्ये नवीन असल्यामुळे त्याचे गुण थोडेच कुणाला माहिती असणार? 
   घरातील जबाबदारी आणि असणारी कामे यामुळे मात्र हतबल होता ,  सोसण्या शिवाय पर्यायचं नव्हता  . . .  आणि ग्रामीण भागातील मुलांना समजून घेतो तरी कोण?  झगमगत्या दुनियेत ! 
ही सर्व  परिस्थिती सुजयने दिव्याला  सांगितली . . तरीही  सगळी कामे  सांगितली नाहीत पण  यामुळे होणारी ओढाताण व त्याचा होणारा अभ्यासावरील परिणाम हे तो सांगत होता . . . 
 ति ऐकत होती  . . 
मग ति हळूच  म्हणाली हे सर्व  सरांना सांगायचे ना ? 
 पण सुजयला   आपली अजचण सरांना सांगावी असे कधी वाटत नव्हते  . .  त्याला कुणाच्याही सहानुभूतीची व दयेची कधी गरज वाटत नव्हती. ..
तो म्हणायचा करायचा अपमान सहन. .!  पण आपण कमी  नाही स्वतःला समजायचं . . . 
 तिलाही खूप  वाईट वाटले . तिचेही  डोळे पाणावले ,  आणि म्हणाली काळजी नको करू ,  मि तुला नोट्स देत जाईल, तुला काही आडले तर समजून सांगेन,  पण तुझी कामे करत जा आणि अभ्यासही मनापासून कर, काही  अडचण असेल तर नि संकोचपणे  मदतही  मागत जा ? पण यावर त्याने फक्त मान डोलवली . . . 
हळूहळू कॉलेजचे दिवस जातच होते .  
तेंव्हा पासून दिव्या सुजयचा अपमान झाला तर  मनातून  नाराज व्हायची , पण मनातील सल ति कुणाशीच  बोलून शकत नव्हती . . 
दिव्या तिच्या सर्व  नोट्स सुजयला द्यायची , कधीकधी तर झेरॉक्स सुद्धा त्याला द्यायची ,  काही अडले तर समजून सांगायची व वह्या द्यायची . . . जणू बेस्ट फ्रेंडच झाले होते दोघे ! 
 कॉलेमधील, गॅदरींगला , काव्यवाचन स्पर्धेला , एकांकिका स्पर्धेला , वादविवाद स्पर्धेला , छोट्यामोठ्या नाटकांना दोघे एकत्र असाचे ,  विचारांनी व मनानेही दोघे एकत्र आले होते . 
 सुख दुःख वाटून घेताना , जेवणाचा डबाही वाटून खायचे , सुजय सुद्धा हळूहळू कॉलेजच्या विश्वात रमत चालला होता.  रुळला होता  याठिकाणी तो . 
त्याला हळूहळू हे कॉलेज  समजायला लागले होते , तो सगळ्या अॅक्टीवीटीत पुढे असायचा  सहाजिकच  त्याचं कौतुकही होत होतं . दिव्याला टेबलटेनिसची आवड होती व सुजयला क्रिकेटची आवड होती . दोघेही एकमेकांना सपोर्ट करायचे . . जणू दोघांची मैत्री म्हणजे कॉलेजचा एक चर्चेचा विषयच बनली होती . 
फक्त शरीरेच दोन म्हणा की ,  मन मात्र एकच असे दोघांचे नाते तयार झाले होते . एखाद्या वेळी सुजयची टीम हरली  तर तिच्या डोळ्यात आपोआपच पाणी यायचे , दिव्याला मेडल नाही मिळाले तर सुजय एकदम खट्टू व्हायचा ! 
का असेल दोघांची ही अवस्था ?
 किती खोलीपर्यंत असेल दोघांची मैत्री ? 
काय असेल सुजयची जादू ?  
काय असेल दिव्याची भावना ? 
 हे जणूकाही न उलगडणारं कोडंच झालं होतं ?  कॉलेज संपलं , आणि शेवटचा पेपर झाला सगळेजण हॉटेलला जेवायला गेले , जेवणाची ऑर्डर सुद्धा सुजयने दिली ,  सगळ्यांनी मस्तपैकी जेवण केले , आईस्क्रीम, बडीशेप खावून झाली व  कॅमेर्यांने फोटो काढले . तेंव्हा मोबाईल नव्हते ना !  
 एकमेकांच्या निरोपाची वेळ आली . 
नकळत सुजय व दिव्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण हळूच रुमालाने डोळे पुसत कुणालाही न दाखवता ,  हसत हसत निरोप घेतला ! 
 दिव्या पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होती पण सुजयचे पुढील शिक्षणाचे   काहीच फिक्स नव्हते , निरोप घेताना कागदावर पत्ते व लँडलाईन नंबर तर दिले होते पण संपर्काचे मार्ग मात्र खडतर होते . . 
तीन वर्षात मनाने एकत्र आलेले आज विभक्त होणार होते !  जणू धुक्यात वाट हरवावी तसे होणार होते ! 
 कधी भेट होईल याची काहीच खात्री नव्हती . . . जणू सर्वजण पुढे चालले होते आयुष्याच्या पुढील वळणावरील मागील मैत्रीच्या आठवणींना मनात परत परत वेदना. .  जागवण्यासाठीच! 
कधी काळी एकत्र खेळलेली , बागडलेली पाखरं आज नव्या प्रवासाला निघाली होती , उंच स्वप्न  पाहण्याची ,  भरारी घेण्याची आणि जीवणात उंची गाठण्याची खूणगाठ  मनाशी बांधून!  तशी तर,  शरीरं दोन पण जणू  एक श्वास असलेले दिव्या व सुजय  आज वेगवेगळ्या दिशेने आयुष्याच्या  पुढील प्रवासाला चालले होते , आठवणींचा कल्लोळ डोक्यात घेऊन  ? 
कधी काळी एकमेकांशिवाय जगायचा विचारही करवत नव्हता दोघांना ! 
 एकमेकांशिवाय खाण्या पिण्याचाही   विचार त्यांच्या  मनाला शिवतही नव्हता ,  आणि  दुर होण्याचा असा विचार जरी मनात आला   तरीदेखील हे  जग सुद्धा दोघांनाही  नकोस व्हायचं ?  
खरेतर आजपासून एकमेकांशी बोलणंही होणार नाही हा विचार मनाला बेचैन करत होता .  "सागराच्या लाटा शांत व्हाव्यात, " तशी दोघांचीही अवस्था झाली होती .  मनातील वादळं शांत वरूण वाटत होती पण घालमेल मात्र आतल्या आत सुरू होती ! 
 जन्मभर मैत्रीची,  सोबतीची स्वप्न जणू तुटणार असेच वाटत होते त्यांना  .  आजपासून  एकमेकांच्या मैत्रीची   जागा जणू कोणतरी दुसर्‍याच  व्यक्ती घेणार हे मनाला पटत नव्हते . . दोघेतर आपआपल्या घराकडे निघाले होते पण भावणांचा कल्लोळ मनात घेऊन, जर माझ्या मैत्रीची जागा तू  दुसऱ्या व्यक्तीला दिलीस.. तर माझ्या आयुष्याचा  बेरंग होईल! हाच दोघांच्याही मनात विचार येत असावा ? 
 एकमेकांनी या   विरहात कसं मि जगायचं ! 
हे पुढील  आयुष्य कसं काढायचं ! 
 हाच विचार दोघांच्याही मनात घोळत होता ! 
आज  " डोळ्यातील आसवांना , गालावर ओघळतानाही " पाहणारं  जवळ कोणीच नव्हतं ! मन तर  म्हणत होतं हे आयुष्यभर का नसतं कॉलेज? 
दिव्या मनातच  म्हणत होती सुजय का रे मला एकटीला जगायला भाग पाडलंय तू !
 मला पाहिजे ति सजा दे पण माझ्यासाठी तरी तू पुण्याला ये ! , 
मनात म्हणत होती अरे सुजय,  लांडग्यांच्या कळपात नको सोडू तुझ्या लाडक्या  हरिणीला ! 
 बेसावध शिकार करतील रे हे माझी  माणसातील लांडगे   !  
तिच्या मनात विचार घोळत होता . . ति मनाशीच म्हणत होती . 
तुला आठवत का रे माझ्या वाढदिवसाला तु मला दिलेली गुलाबाची नाजूक कळी व  छानसी पेन आजही माझ्या कपाटात जपून ठेवलीय रे ! 
ति नाजूक पांढर्या  मण्यांची माळ ति तर मि एकटीच लपूनछपून घालते रे अधूनमधून ! 
 तिला आठवत होते कॉलेजमध्ये सोबतीला फिरताना तु मला कधीच रागावला नाही ! 
 कधी वाईट भावनेने माझ्याकडे  पाहिले नाही .  स्वप्न पाहताना नेहमी तु जमिनीवर राहिला , तुझ्या मनातील भावना तु कधीच बोलला नाही ?  त्यामुळे नकळत माझ्या ह्रदयात तुझी जागा खूप घट्ट झाली  आणि आज तु सोबत नाही , याची कल्पनाच  मी करू शकत नाही .... माझ्या हातचे डब्यातील पोहे तु आवडीने खाल्ले , भलेही ते चवदार नसतील तरीदेखील कौतुक केले माझे , का इतका गोड वागलास रे माझ्याशी ?  
मि एखाद्या वेळी दुःखी असले की तुला बैचेन व्हायचे  , तुला मि पुर्णपणे ओळखले रे मि  तुझ्यातील प्रेमळ माणसाला मि ह्रदयात स्थान दिले रे ! 
सांग ना सुजय! आपल्या मैत्रीत गरिब श्रीमंती , जातपात, धर्म असा भेदभाव कधीच नव्हता . . होय ना ! 
 तुला मि कित्येकदा सिनेमाला जावू असं मि  म्हटले पण तु विनम्र नकार दिला , किती प्रगल्भ होतास तू . . तुझा जीव नव्हता असे नाही पण जगाच्या नजरा तुला माहित होत्या . . 
 खरंच लाखात एक सुद्धा असा मित्र कुणालाच सापडणार नाही ! 
सुजयच्याही मनातील अवस्था केविलवाणी होती बैचेन होता .  दिव्याने वाढदिवसाला  दिलेली ग्रीटींग, पेन सारं जपून ठेवलं होतं , जणू दिव्याने दिलेल्या भेटवस्तूंची जागा त्याच्या ह्रदयातील वस्तु संग्राहलयातील एका कप्प्यात बंदिस्त केली होती त्याने  .  तो म्हणत होता मनाशी ,  की कित्येक मैत्रिणी येतील जातील पण माझ्या दुःखात हातात हात घेऊन सांत्वन करणारी , कधी पेन विसले तर लगेच देणारी ,  कुठेही गेले तरी बील देऊ न देणारी , पैसा होता म्हणून नव्हे तर जाणीव होती म्हणून आपुलकीने वागणारी ! सतत 
आठवण काढणारी दोन दिवस कॉलेज बुडले तर आपुलकीने चिडणारी . . काळजी  करणारी  , माझ्याशी असलेल्या  मैत्री साठी इतर मित्र  मैत्रिणींचेही टोमणे सहन करणारी !  सुजय मनाशीच बोलत होता  अभ्यासासाठी हट्ट धरणारी , तुझ्यापेक्षा  भारी मैत्रिण असूच शकत नाही . 
खरंतर दोघांनाही माहिती होतं तीन वर्षानंतर आपली भेट होणं कठिण आहे तरीदेखील तु मला जीव लावायची काळजी घ्यायची हे मि कसं विसरू ?  होय ना दिव्या 
 तुला खर तर त्या वेळी त्या माझी जेमतेम परिस्थिती माहिती होती.  माझ्याकडून तुला महागडी गिप्ट मिळणार नाहीत याचीही खात्री होती , वर्गात कॉलेजमध्ये खूप श्रीमंतांची व माझ्यापेक्षाही देखणी मुले होती पण तु माझ्यात फक्त  पाहिला माणूस, माझे पाहिले हळवे मन, माझी पाहिली तु धडपड  आणि माझा पाहिला तु विश्वास!  
तुच दिलेले फुल मि थरथरत्या हातांनी घेतले होते , जणू माझ्या हाताला सुद्धा स्पर्श न होण्याची मि  काळजी घेतली होती , हाच विश्वास तुला भावला हे तुच मला सांगितले . खरेतर फुलाची किंमत छोटी असते पण त्या फुलामुळे तुझ्या चेहर्‍यावर झालेला  आनंद पहिल्यांदा मला कळला  कळला !  
ते  फक्त फुलच  नव्हते तर  माझ्या मैत्रीची , माझ्या भावनेची एक अनमोल भेट होती , जणू  तुझ्यासोबतच्या  मैत्रीची व  पाहिलेल्या स्वप्नांची उंच उंच एक गुंफलेली  गाठ होती .... 
सुजय मनाशीच बोलत होता . . 
तुला आठवतय का ?  पहिल्या भेटीवेळी  आपण कॉलेजच्या हिरवळीवर  दोघेच गप्पा मारत बसलो होतो . . काय बोलावे आणि काय विषय काढावा हे तरी सुचत होते का ?  तु मला माझे बालपण विचारले , माझा भूतकाळ विचारला ! 
एका अनामिकाला जणू तु तुझ्या शब्दातून पाझर फोडलेला . . तेंव्हा 
  गेलेला  तो आपला दोन तासांचा वेळ  खर तर मला आजही आठवतो .  त्याच दिवशी तु मला  पाहिल्यांदा मा़झ्याशी आयुष्यभर  मैत्रीचा  प्रवास करण्याचे वचन घेतले होते आणि आज आपण बरोबर नाहीत याची सल सुजयला सतावत होते . . वचन पाळायला आपण कमी पजलो ही ति भावना होती. . . 
दिव्यापण मनाशी बोलत होती,  आपल्या रुममध्ये डोळे एकटीच पुसत होती , गालावरून ओघळणारे अश्रूत  जणू स्वप्न सारी भिजत होती . . . नव्हे विझत होती ! 
 मनालाच म्हणायची. सुजय  तुझ्या  भेटीची ओढ.....माझ्या मनात कायम राहिल  . 
ती आपली पहिली भेट.... मला सदैव आठवत राहिलं ! 
 पहिल्यांदा नजरेला नजर मि दिली होती पण तु तर तेवढेही धारिष्ट्य दाखवले नव्हते पण तु एक सालस शांत होता म्हणून मी नजरेला नजर तेंव्हा  भिडवली आणि तेंव्हा तुझ्याही  गालावर हळूच हसू उमटलं जणू लाजर्या मुली सारखा तु लाजला हे मि कसं विसरू ... अरे सुजय  माझ्यातर  मनातली धक धक वाढलेलीच  होती तेंव्हा  ... मला  काय बोलावं हे पण सुचत नव्हतं फक्त मि तुला एकटक पहात होते. . जणू निरागस  , मैत्री  मला खूणावत होते . खरेतर तु मुलींशी बोलायला लाजायचा यामुळेच तु मला आवडायचा रे ! 
आठवतंय का तुला ? एकदा कॅन्टीनला कॉफी घेताना किती मजा आली होती ,  कुणालाच काही कळेना.... विषय कळत नव्हता पण हसतमात्र होतो आपण?  बोलायला विषयच नव्हता पण काहीतरी बोलायचे  म्हणून संबंध  नसलेल्या विषयावर बोलत बसलेलो आपण ....सध्या   प्रत्येक गोष्टीची  तुझी आठवण  येते रे तुझी ,  तुझ्या शिवाय  दिवस जाणार नाहीत म्हणून वाईट वाटते रे , एकदा नाही का ?   अचानक रिमझिम  पाऊस सुरू  झाला आणि मि भिजले होते .  पण तु माझ्याकडे वर मान करून न पाहता मला हक्काने घरी जायला सांगितले व मि पण तुझे ऐकले का तर ते आजही मला कळत नाही रे ! 
 मित्रा तुझ्या मैत्रीच्या  स्वप्नात रंगले आहे मि !  भेटशील ना परत ... खरंतर त्या दिवशी मला तुझ्या  सोबत पावसात भिजायच होतं , माझ्या  भिजलेल्या  केसांना तू हाताने हळूवार पणे हात फिरवून बाजूला सारावे वाटत होतं . पण तुला समाजाची रित पुरती माहित होती , तु विचारांने प्रगल्भ होता , तू तसा विचार केलाच नव्हता मैत्री पलीकडे  त्यामुळेच तु मला भावतो रे  ,   तुझं ते माझ्याकडे  पाहणं कधीच वेगळं नव्हतं मात्र  यातच तुझं मोठेपण होतं , तुझ्या  डोळ्यांनी  मला तु भरभरून बघावं हे मला वाटायचं पण तु  कायम  स्वतःला यापासून दुर ठेवलं जणू तुझा आदर्श हा साक्षात सर्व युवकांनी घेतला  पाहिजे .  
 कधीतरी महाबळेश्वर, माथेरान व त्या थंड वातावरणात आपण दोघेच जायचं फिरायचं मि स्वप्न पाहिले होते   तु  व मि  गरमगरम चहा घ्यायता , शॉपिंग करायचं मस्तपैकी ति दोघांनीच जेवण करायचं व दिवसभर फिरून परत यायचं  हे माझं  स्वप्न होतं रे ! 
ते स्वप्नच राहिलं योगच नव्हता  ,  ते स्वप्न जरी साकार झालं नाही तरी तुझं वागणं   जणू आयुष्यात मैत्रीचा आदर्श सांगून गेलंय रे आपलं कॉलेज जीवन  ... 
आजची तरूणाई  किती सुंदर स्वप्न पाहतात, प्रेमाच्या आणाभाका घेतात आणि शुल्लक कारणाने लगेच दुरावतात. . पण आपल्यात असं काही झालंच नाही , तु कधी स्वप्न  दाखवलेही नाही  आणि कधी खोटं आश्वासनही दिलं नाही .  इतका कसा तू समंजस होता . . दिव्या आठवलं  तशी हुमसू हुमसून  रडत होती . . 
 मनाला समजवत होती कधीतरी येईल परत माझ्या जीवनात माझा लाडका सुजय, 
फक्त  मित्र म्हणून तरी , तो कधीच मला   विसरून जाणार नाही,  
ना.....मी कधी विसरून जाणार? 
इकडे सुजयही मनाची समजूत घालतोय, स्वप्नात जावून  अजूनही तिथंच थांबून आहे तो ,  जिथं  एकमेकांना  सोडलं... निरोप दिला . 
व्याकूळ होतोय आठवणीनी , मनाशीच म्हणतोय, जावून भेटू या अधूनमधून तिला , जरी कॉलेज माहिती नसले तरी शोधू , जरी पत्ता माहिती नसला तरी हुडकून काढू . . होईल थोडा त्रास पण  नक्की भेटू  , मैत्रीच्या  रस्त्यात जीवनात आलेली व्यक्ती जेंव्हा  दुर जाते तेंव्हा क्षितिज सुद्धा आपल्याला दिसत नाही . जीवनाचा रस्ता  दाखवणारी व्यक्ती जेव्हा दुर जाते ना त्यावेळीच  मैत्रीचा  अर्थ कळतो  , जीवनातील  धक्का देणारा तो एक क्षण  असतो..... 
खरेतर मैत्रीत जीव असतो , जिव्हाळा असतो , आपुलकीचा सागर असतो , समजून घेतले तर आयुष्याचा मार्ग असतो . 
 आपल्याला काहीच अधिकार नसतानाही कुणावर तरी हक्कदेखील असतो जणू तो आपला अधिकार सुद्धा वाटतो . 
 कुणाच्या आयुष्यासोबत न खेळता मैत्रीचा झरा फुलवता येतो , योगायोगाने त्यात प्रेमाच्या धारा बरसल्या तर तो एक योग असतो पण मैत्री हा    खेळ नसतो डाव खेळून खेळल्यागत कधी  मोडायचा नसतो . मैत्रीत भावनांचा मिलाफ असतो. 
म्हणून सुजय आणि दिव्याच्या मैत्रीचा धागा पक्का असतो व या साठीच त्यांचा जीव तुटतो . ..मैत्रीत 
दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवायची असते . दुसर्‍याचे दुःख  आपलेच आहे व ती वेळ  स्वतःवर  आल्यावरच होते. दुःख होते असे नाही तर त्यासाठी संवेदनशील असावे लागते . 
म्हणून दिव्या व सुजय स्वतः एकांतात विरह सहन करतात मात्र  ते सहन करून सुद्धा दुःखाची जाणीव होऊन देत नाहीत ... एकमेकांना 
सुजय व दिव्या भेटतील का ?  
त्यांची मैत्री पुढे जाईल   का ? 
पुढे काय होईल? 
माझ्या वाचकांनी याची उत्तरे शोधावीत माझा यावरील पुढील लेख येईपर्यंत. . . 

काल्पनिक कथा . . . 
©® विजय पिसाळ नातेपुते ९४२३६१३४४९ / ९६६५९३६९४९

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

नातेपुते गावात शिवजयंती उत्साही वातावरणात साजरी !

चालू घडामोडींचे विश्लेषण






*सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे, सर्वधर्म समभावाचे प्रतिक व दृष्ट  दुर्जनांचे संहारक, प्रजाहितदक्ष राजे, मानवतेचे रक्षक, सर्व जाती धर्माला एकत्र करून  हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे , सर्व जाती धर्मातील नागरिकांचे दैवत,  जाती पातीच्या चौकटी बाहेरील राजे , अन्याय अत्याचार व जुलूमशाही विरुद्ध रणशिंग फुंकनारे*

 श्रीमंत योगी .  श्री श्री श्री 
*छत्रपती शिवराय* यांचे  जयंती  निमित्त  बुधवार  दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी . सकाळी  ९ वाजता .  *शिवजयंती सोहळा समिती नातेपुते* यांचे वतीने प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . 
छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन . श्री. नारायणगाव देशमुख, श्री आप्पासाहेब भांड, श्री सुनिल राऊत यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन व शिवरायांचे मुर्तीला गुलाब पुष्पांचा पुष्पहार घालून  करण्यात आले  . 
सदर कार्यक्रमाला 
श्री अमरशिल देशमुख, श्री  धनंजय देशमु़ख, श्री प्रशांत सरुडकर, श्री हेमंत   देशमुख, श्री बाळासाहेब बळवंतराव, श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे ,  श्री संजय ढवळे , श्री संजय उराडे  , श्री किशोर ढवळे , श्री शक्ति पलंगे , श्री सुरज चांगण, श्री रोहित चांगण,  श्री सर्जेराव पाटील, श्री समिर सोरटे , श्री जयंत चिंचकर,  श्री नंदकुमार धालपे, श्री कुलभुषण रोटे ,  श्री सुनिल ढोबळे ,  श्री सुरज पवार, श्री संजय चांगण, श्री अरुण कर्चे , श्री प्रशांत इटकर,  श्री अमरसिंह निकम, गणेश निकम.  आदी मान्यवर व गावातील बहुसंख्य नागरीक  आणि शिवप्रेमी  बोलगोपाळ  उपस्थित होते . 
सदर कार्यक्रम अतिशय  उत्साही वातावरण संपन्न झाला . शिवजयंती सोहळा समितीच्या वतीने सर्वांना अल्पउपोहारची सोय करण्यात आली होती . 
या प्रसंगी कैलास सोनवणे यांनी  शिवरायांच्या जयघोषाच्या   घोषणा देऊन वातावरणात उत्साह  निर्माण केला .  
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोहळा समितीचे , 
 श्री विजय पिसाळ, श्री कैलास सोनवणे , श्री  कुलभुषण रोटे , श्री सुरज चांगण  , रोहित चांगण, श्री  आबा जाधव, श्री साधू आवळे , यांनी परिश्रम घेतले .

विशेष म्हणजे सर्व शिवप्रेमी नागरीक हे कोणालाही फोन न करता सुद्धा  व्हॉट्सप व फेसबुकवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित होते .