vijaypisal49. blogspot. com

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०२४

मानवी स्वभाव व गुलामगिरी!

चालू घडामोडींचे विश्लेषण



आपल्या आसपास जे घडते ते कशामुळे घडते ?
समाज व्यवस्था कशी तयार होते ?
मानवाच्या जीवनात गुणात्मक , रचनात्मक , फरक नेमका कशामुळे होतो !
एक राज्याशास्त्राचा विद्यार्थी म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतोय !
©®विजय पिसाळ ,नातेपुते.
खरंच मनुष्याचे जीवन शिक्षणामुळे, संस्कारांमुळे , ग्रंथ , महापुरुषांचे ऐतिहासिक दस्ताऐवज, धर्म ग्रंथ, कथा ,कांदबर्या , धार्मिक गोष्टी ,पौराणिक कथा वाचन , अवांतर वाचन ,यामुळे बदलू शकते की ,  
आपण जिथे वाढतो, जिथे आपण आसपास घडतंय ते पाहतो आणि जिथे आपल्यावर काही बिंबवले जाते यामुळे आपण बदलतो , बिघडतो की , आपण घडतो ? नेमका आपल्या जीवनाचा मार्ग कसा ठरत असतो ? आपली ओळख कशी तयार होते, आपण सकारात्मक आणि नकारात्मक विचार कसे करु लागतो ?
मनुष्य स्वभाव अनेक प्रकारचे असतात, खरे बोलणारे,  मितभाषी, तापट, रागीट,  मनमिळाऊ, विश्वासू, नाती जपणारे ,समजूतदार, सर्वांशी आपुलकीने वागणारे , असे अनेक प्रकारचे लोक या जगात असतात, कित्येकांच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नाही  , काही  व्यक्ती  मोजकेच पण  अतिशय सोज्वळ बोलतात, सर्वांशी आदरार्थी वागतात , जास्त कधी व्यक्त होत नाहीत , आणि त्यांची छाप सर्वांच्या मनावर   पडते, तसे एखादी व्यक्ती घडते ती  आई वडील किंवा गुरुजींच्या संस्कारामुळे हे जरी काही अंशी  खरे असले तरीही , ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचा वावर असतो, ज्या सामाजिक परिस्थितीत त्या व्यक्तीच्या बालपणीचा कालावधी जातो , त्याच्यावर , त्याच्या कुटुंबावर  डोळ्यादेखत काही प्रसंग ओढावतात , ताणतणाव येतात ,  , त्याच्या बालवयात घरची आर्थिक परिस्थिती कशी असते यामुळेही सुद्धा एखादी व्यक्तीची  घडण होत  असते. ज्याच्या हाताला परिस्थितीचे चटके सोसावे लागतात तिथे , महात्मे घडतात हे तुम्हाला एखाद्या गरिब कुटुंबातला एखादा मोठ्या पदावर जातो तेंव्हा दिसते पण त्या पाठिमागे तो घडताना , त्याच्या समोर जी परिस्थिती असते आणि त्या परिस्थितीत तो जे भोगत असतो ते समाजातील कित्येकांना माहित होत नाही पण तो परिस्थितीने घडला हे घडल्यावर समजते ! तर काही वेळा  अन्याय, अत्याचार होतात ,  आणि परिस्थितीने तो वाईट मार्ग पत्करतो आणि समाज नव्या गुंडाना जन्म देत असतो हेही घडते !
 सगळी सुख ज्याच्या लहानपणी मिळतात , त्या मुलांमध्ये जनते बद्दल , समाजातील वेगवेगळ्या घटका बद्दल विशेष प्रेम नसते किंबहुना ते फार कमी असते, सोन्याचा चमचा जन्मता ज्यांना मिळतो त्यातील काही अपवाद सोडले तर बरेचसे जण हे ऐषोआरामात जगणे पसंत करतात किंवा व्यसनांच्या आहारी जातात ,त्यांना आईवडिलांच्या कष्टाची,त्यागाची जाणीव नसते , त्यांचा मित्र परिवार हा बहुतेकवेळा व्यसनी असतो किंवा गुंड प्रवृत्तीचा असतो असे मी अनेक ठिकाणी बघितले आहे. कारण जमिनीवर त्यांना सर्व साधारण गोष्टींचा सामना कधीच करावा लागलेला नसतो , आर्थिक संकट त्यांना माहित नसते , त्यामुळे त्यांना जाणीव हा प्रकार नसतो.
 मुळात समाजात वावरत असताना सगळे प्रकार हे तुम्हाला दिसतातच कारण निसर्गाचा नियमच तसा आहे , एकाच आई वडिलांच्या पोटी सुद्धा दोन चांगली लेकरे जन्माला येण्याची  शक्यता कमी असते, एखादा अतिशय कष्टाळू , दयाळू ,शांत असतो तर दुसरा उर्मट ,डांबरट , तापट , आणि सर्वांना त्रास दायक असतो ,  हे बदल का दिसतात ?
यात संस्कार सारखे जरी असले तरी संगत व जाणीव वेगवेगळी असते आणि म्हणून व्यक्ती परत्वे मनुष्य स्वभाव वेगवेगळे दिसून येतात,
"स्वभावाला औषध नाही" हे उगीच म्हटलं जात नाही.
काही लोकांना मनापासून खरे  वागायची इच्छा असते पण सामाजिक रचना अशा व्यक्तींना टिकू देत नाही, त्याला त्रास देणारे, त्याची फसवणूक करणारे ,त्याला नीट जगू देत नाहीत, आजकाल तर चांगल्या लोकांच्या मार्गात असंख्य काटे पेरलेले दिसून येतात  आणि चांगल्या लोकांच्या तक्रारी कुणी ऐकूनही घेत नाहीत,
गुंड ,भ्रष्टाचारी , यांचा सन्मान जागोजागी होताना  दिसतो व चांगली लोक हतबल होऊन वाईट मार्गाकडे आकर्षीत होताना दिसतात व त्यातूनच गुन्हेगारी व स्पर्धा वाढते , चांगले वागून काही उपयोग नाही ही भावना तयार होते तर अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोकांना समाजात मान सन्मान जास्त मिळतो  
 का  तर ?
"सामाजिक व आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या लोकांना , असे गुंड लोक किरकोळ मदत करतात त्यामुळे गांजलेल्या लोकांना गुंड व मवाली आयकॉन वाटायला लागतात" 
मला नेमकं काय म्हणायचं आहे हे समाजशास्त्र व अर्थशास्त्र समजून घेणारे योग्य प्रकारे समजून घेतील   ? मानवी स्वभाव असे का तयार होतात ते सांगताना , सामाजिक रचना काय आहे यावर ,मानवी स्वभावाची निर्मीती अवलंबून असते असे माझे मत तयार झाले आहे "
साध्या व सरळमार्गी लोकांचे  मन म्हणतं की लोक जसे आपल्याशी वागतात तसेच आपणही वागावे व त्याचेच दुसरे मन  पण, म्हणतं आपण तसे वागलो  तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील?
हि द्विधा मनस्थिती निर्माण होण्यासाठी अनेक  घटना व घटक कारणीभूत ठरत असतात.
एखाद्यावर दया दाखवून तुम्ही त्याला मदत केली,समजा ऊसणे पैसे दिले, तो भुकेला आहे म्हणून मोफत जेवण दिले किंवा त्याला काही मदत केली तर त्याची जाणीव तो फार दिवस ठेवतोच असे  नाही अर्थात जाणीव ठेवणार पण असतात फक्त संख्या कमी असते.
 पण जर त्याला कुण्या सावकाराने पैसे दिले तर तो त्या सावकाराचे हजार वेळा पाय धरत असतो , सव्याज पैसे फेडतो व सावकाराच्या धाकात राहतो, पण ज्याने विना मोबदला मदत केली  त्याला तो लक्षात ठेवतोच असे नाही,   फुकट मिळाले तर किंमत ठेवत नाही व कुणी  सावकाराने कितिही  त्याला लुटले तर मात्र तक्रार करत नाही, याच मानवी स्वभावामुळे कित्येकदा लोक गुलामगिरी पत्करतात व स्वाभिमान सोडून वागत असतात. हात पसरण्यात धन्यता मानतात ,म्हणून
 अनेक लोकांना एकाच वेळी गुलाम करण्यासाठी आर्थिक दृष्टीने कमकुवत केले जाते व काही मदत करुन त्याच्यावर उपकारांचे ओझे ठेवून त्यालाच लुटले जाते ,मात्र तरीही तो सावकार,गुंड ,मवाली लोकांच्या लुटीला उपकार समजतो असे मानवी स्वभाव आहेत.
व जोपर्यंत लोकांना सावकाराने आपली लुच केलीय हे समजत नाही तोपर्यत तो सावकार त्याला देव वाटू शकतो पण जेव्हा लुट असाह्य होते तो सावकाराचे देणे फेडू शकत नाही तेंव्हा मात्र तो एकतर पुर्ण खचतो व आत्महत्या करतो किंवा संघर्षाची तयारी करुन सावकारांशी दोन हात करतो, सगळे सावकार अधिकृत नसतातच, ते फक्त गावगुंड पाळून लोकांना छळतात इतकेच,  हा लेख जे लुटले जातात त्यांना समर्पित!
विजय पिसाळ नातेपुते !

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

संवाद मनाशी

चालू घडामोडींचे विश्लेषण

माझे विश्व भावनांचे !
माझे जगने माझ्या मनाचे !
ओझे नाही मला माझ्या कोणत्याच नात्यांचे !
कारण माझे  सुत्र फक्त आनंदी जगण्याचे   !
कधी कधी रमत नाही मन !
एकांतात घालवावे वाटतात काही क्षण !
सतत विचार येतो काय कामाची संपत्ती आणि काय कामाचे धन !
मनाला वाटते फिरावे एकटेच कुठेतरी वनवन !
काही केल्या संसार सुटत नाही पण !
मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कधी असा अनुभव आलाय ?
 एखादा दिवस, त्या  दिवसातली एखादी वेळ विनाकारण अगदीच आपणाला अस्वस्थ करते.
नेमकं काय होतंय  हे कळत नाही ? 
काय हवंय  हे उमजत नाही? स्वतःलाही स्वतःशी बोलता येत नाही , आजवरच्या प्रवासात चुकलं की बरोबर हे सांगता येत नाही , आता पुढे काय हे ठरवता येत नाही ? होतं ना कधी कधी असे , आपल्या जवळ सगळं असतं पैसा असतो , सुंदर कुटुंब असती अवतीभवती छान मित्र, नातेवाईक ,असतात , कोणतंच टेन्शन नसते , अगदी झकास चाललेलं असतं तरीही कशाचा प्रभाव आपल्यावर पडतो हे मात्र सांगता येत नाही.
 काहीच समजून येत नाही. मन रमवण्यासाठी मग आपण कुठेतरी गावात , किंवा एखाद्या आवडीच्या मंदिरात , किंवा निसर्गाच्या सानिध्यात , नाहीतर जीवल मित्रांकडे जातो व काहीच जमलं नाही तर जे आपलं ऐकतात , जे आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात त्यांच्याशी काहीतरी शेअर करतो , बरोबर ना? आणि कुणीच काहीच जेंव्हा सोबतीला नसते तेंव्हा  आवडतं पुस्तक वाचतो ना आपण  , किंवा  जुने फोटो पहतो किंवा जुनी गाणी हेडफोन लाऊन ऐकावी वाटतात ना ? अगदी किशोरकुमार, लतादीदी , रफी , आणि तरीही मन बैचेन असेल तर भक्तिगीते, भावगीते ऐकावी वाटतात ना ?
आवडीचं गाणं रिपीट मोडवर परत परत ऐकावं वाटतं ना?, 
मन मोकळं करताना मी तर जमेल तसे लिहित राहतो , मनातील भावना व्यक्त करतो भले   चार ओळी का असेनात !
तसे तर आई वडील होते तोपर्यंत त्यांचे एक एक शब्द कानी पडायचे व मन तृप्त व्हायचे , मनाला वाटतं जगात सगळे बेभरवशी आहे , आहे जीवन सर्वांशी मनसोक्त बोलत , आनंदी जगावे बरोबर ना?पण तरीही कधी कधी 
   मन अजिबात  कुठेच  रमत नाही..
स्वतःला आपण विसरून जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात  एखाद्या दिवशी,एखाद्या वेळी, आपण असे का अवघडतो कु णास ठाऊक? 
विजय पिसाळ , नातेपुते!

मला भावलेली स्त्री !




चालू घडामोडींचे विश्लेषण

मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........

कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने  जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?

आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
  स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता  सर्वांना  कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच  पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा ,  विचार नाही केला कधी स्वता:चा, 
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा  !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती ,  स्त्री म्हणजे युक्ती ,  तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
 पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर  म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते  रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते का तिला कधी विश्नांती ?कधी थांबते का  ती ? कोणते विश्व असते तीचे  स्वतःचे ? कधी करते का ती काही  तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ! सगळे जीवन तिचे  विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते  परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे!
  कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे ! 
ति  कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार  , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं  खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाहीत  कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकसर करुन कायम चालवते संसार !
 विश्व तिचेही  मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला कधी काही  मिळत नाही!
तिलाही हवं थोडं  स्वातंत्र्य असा कोणी विचार करत नाहीत !
 तिला मिळाले जर  थोडे निर्णयाचे  अधिकार !तर  ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता समुद्रापार!
 म्हणून मुलगी कधीच नसते ती  वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते  आकाशाला घवसणी घालण्याचे ! उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे !
फक्त  तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देणारे 
 , धाडसाने  तिला  पाठबळ .देणारंं !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही ! 
  स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी ,  पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी ,  बहिण म्हणून  देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचाच मिळतो  आधार !
  सगळी नाती निभावताना  ति कधीच कमी पडत नाही , तरीही  तिच्या मनासारखं कधी होत नाही !
 संसारासाठी ती सोडते स्वतःचे हक्काचे   घरदार !
 कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार !
नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार!
कारण तिलाच टिकवायचे  असतात आई वडिलांचे संस्कार !
 बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा  कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही,  दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे!
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!
ती  तापाने  फणफणलेली असते , तिला खोकला आलेला असतो , तिझी  दुखते वेदनेने कंबर पण ती कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा  वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तिचं  भरुन येतं पण ति सगळं मजेत आहे असच सांगते कारण तिझे  कुटुंब हे तिचे विश्व असते व कसा का असेना  पतीलाच ति परमेश्वर मानते !

ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला  गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर  गीत आणि प्रयोग करते नृत्याचे , तेंव्हा दर्शन घडते खरे नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती अगदी मनमोकळी , तिचे वागणे असते आपलेपणाचे , अल्लड होते ,  लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन तिच्यातील  माणुसकीचे !
म्हणून स्त्रियांचा आदर करा ,मान राखा होतील संसार सुखाचे !
आणि मार्ग दिसतील तुम्हाला प्रगतीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949

मला भावलेली स्त्री




चालू घडामोडींचे विश्लेषण

मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........

कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने  जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?

आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
  स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता  सर्वांना  कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच  पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा ,  विचार नाही केला कधी स्वता:चा, 
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा  !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती ,  स्त्री म्हणजे युक्ती ,  तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
 पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर  म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते  रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते कधी विश्नांती , कधी थांबते का  ती , कोणते विश्व असते तीचे  स्वतःचे , कघी करते का ती तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ,  सगळे जीवन तिचे  विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते  परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे ,  कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे ! 

ति  कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार  , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं  खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाही कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकर करुन कायम चालवते संसार !
 विश्व तिचे मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला मिळत नाही स्वातंत्र्य आणि तिचा कधीच सहजासहजी करत नाहीत विचार, पण तिला दिले ना थोडे अधिकार तर  ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता  समुद्रापार , म्हणून मुलगी कधीच नसते वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते  आकाशाला घवसणी घालण्याचे , उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे फक्त  तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देऊन , धाडस करा पाठबळ .देण्याचे !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही , 
  स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी ,   पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी ,  बहिण देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचा आधार !
  सगळी नाती निभावताना  ति कधीच कमी पडत नाही , तरी समाज प्रत्येक गोष्टीत तिलाच धरतो जबाबदार !

 संसारासाठी ती सोडते स्वतःचे घरदार , कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार , नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार, कारण तिलाच टिकवायचे  असतात आई वडिलांचे संस्कार !
 बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा  कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून 
स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही,  दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे, 
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!

तु तापाने  फणफणलेली असतेस , तुला खोकला आलेला असतो , तुझी दुखते वेदनेने कंबर पण तु कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा  वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तुझं भरुन येतं पण तु सगळं मजेत आहे असच सांगते कारण तुझे कुटुंब हे तुझे विश्व असते व पतीला तु परमेश्वर मानतेस !

ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला  गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर  गीत आणि प्रयोग करते नृत्याचे तेंव्हा दर्शन घडते नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती 
अगदी मनमोकळी तिचे वागणे आपलेपणाचे , अल्लड होते ,  लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन माणुसकीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949


मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

बा.ज. दाते प्रशाला, माझी शाळा

चालू घडामोडींचे विश्लेषण


मला आज थोडं लिहायचं आहे परत एकदा तुझ्या आठवणीत रमायचं आहे.
बालपणी लागला तुझा लळा !
तुझ्यामुळेच मी पाहिला पाटी पेन्सिल व फळा !
माझी आवडती तुच एक शाळा !
मित्र मैत्रीणी आणि  सोबती तुझ्यामुळेच झाले गोळा !
सर्व सुखांची एक तु आठवण !
जीवलगांची ह्यदयात साठवण !
खरंच तुझ्यावर कितीही लिहिलं तरी मला शब्द कमी पडतील पण तुझ्या आठवणी संपणार नाही.
होय मी विजय पिसाळ ,नातेपुते !
  एक सामान्य मध्यवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण विदयार्थी म्हणून तुझ्या कडे आलो आणि तुझ्यामुळेच मी घडलो ! ©®विजय पिसाळ नातेपुते. 9665936949
हो हो मी माझी प्रिय शाळा  डॉ. बा.दाते प्रशाले बद्दल थोड व्यक्त होतोय ! मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केलाय शेवटपर्यंत वाचाल ही अपेक्षा करतो ...
 मी विजय शंकरराव पिसाळ व माझे सगळे मिञ व मैत्रिणी यांनी1987 /1988 या वर्षी दाते प्रशालेत  प्रवेश घेतला आणि  तिच्या अंगणात खेळू लागलो  शिकु लागलो , मस्तपैकी  आनंदाने दिवस घालवत होतो किती मजेचे ते दिवस होते , प्रशालेच्या सहवासात असतांना माझी शाळा या विषयावर  खूपदा मराठीत  मोडकी तोडकी  पत्र लिहिली. निंबध लिहिले  तेंव्हा मराठी विषयात  जेमतेम मार्क मिळायचे म्हटलं तर मी सर्वसाधारण विदयार्थी अगदी कसेबसे पासिंग आणि हस्ताक्षर तर खूपच खराब .. पण, आज आनंदाने माझ्या शाळेविषयी लिहिताना अभिमान वाटतो म्हणून हा लेखन प्रपंच कारण, मला व माझ्या मित्र मैत्रीणींना तुझी  येणारी आठवण व आमच्यातील घट्ट मैत्रीचा तुच एक धागा , तुझ्या मुळे आम्हाला डॉक्टर, इंजिनिअर ,वकील  शिक्षक ,तर कुणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे तर कुणी तुझ्या संस्कारातून तयार झालेली अभ्यासू  मित्र व मैत्रिणी मिळालेत , खरेतर  बारावी  परीक्षेनंतर( 1995 )तुझ्या पासून दूर जात असताना वाटायचं आता मस्तपैकी कॉलेज करुया , मौजमजा करुया , स्वच्छंदी जगुया , आपले विश्व खूप मोठे होईल आणि पंखांना बळ येईल म्हणून बारावी नंतर  काही वेळ आनंदी जीवन जगायला मिळेल  असं वाटायचं , ग्रॅज्युएशन झालं ,पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तरीही मी शाळेपासून दुर गेलो याच फार वाईट वाटलं नाही. कारण त्या वयात एकच धारणा होती ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका झाली !...
 आता आकाशात मी स्वच्छंदी  झेप  घेतली ... या कल्पनेत मी रममाण झालो होतो ,मी  वेगळ्याच हवेत होतो असेच थोडक्यात .. जेंव्हा मी कॉलेज व पी जी पुर्ण केलं तेंव्हा मला समजलं नाही आपली तीच ती शाळा होती व त्या शाळेची मजा जगातील कोणत्याही ठिकाणी गेला तरीही येणार नाही.
 आता मात्र मी जेंव्हा केंव्हा शैक्षणिक आयुष्यात डोकावतो ,चर्चा करतो तेंव्हा आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या तथाकथित आयुष्या पेक्षा या उंच  आकाशापेक्षा मला माझ्या दाते प्रशालेचा पिंजरा,  हो  तो पिंजराच किती छान होता ,किती   सुरक्षित होता याची वारंवार  प्रचिती येते .. छडी मिळाली तरी दुःख नाही की , परिक्षा जवळ आली म्हणून कधी टेंशन नाही . खरोखर खूप 
दंगामस्ती करायची, खूप खेळायचं ,एकमेकांचे डबे खायचे , एकमेकांना चिडवायचे हो , खूप खूप बिनधास्त भांडण करायचे पण कधीच खुन्नस नसायची एक दिवसात परत जीवलग मैत्री असायची , मी  मुलांशी काही मुलींशी तेंव्हा खूप भांडलो पण कधी त्यांचे बद्दल राग नसायचा कारण मैत्री म्हटलं की भांडण पाहिजेच , खिजवायला हवंच ,मस्त वाटतं , आजही मी गंमतीने भांडतो , खेचाखेची करतो ,सगळे समजदार असल्यामुळे तात्पुरते चिडले तरीही आपलेपणा जपतात , वैचारिक मतभेदांना मैत्रीत थारा देत नाहीत आणि म्हणून मला माझ्या शाळेतील मित्र मैत्रीणींचाही अभिमान वाटतो , तेंव्हा    एखादी गोळी सुद्धा आनंद द्यायची खरंच ते दिवस आठवले की मन भरून येतं , चिंचा ,बोरं किती मनसोक्त खालली  आम्ही , खरचं सगळे   मित्र मैत्रीणी खूप छान आहेत अगदी  वयाने मोठे आहेत पण आपलेपणा तोच आहे , काहींची परमेश्वरी इच्छेमुळे एक्झिट झालीय पण त्यांच्या आठवणी सुद्धा तशाच सतावत असतात ,  म्हणून  आम्हाला आमच्या शाळेची जाता येता आठवण येते , आमची  शाळा मात्र तशीच जाता येता उभी आहे ...

आजही वाटत दाते प्रशालेच्या  पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा जाऊन बसावं पाठीवर दप्तर घेऊन यावं ..परत तीच  घंटा वाजावी , वाघ मामा , साळवे मामा , अभंगराव मामा,  वसगडेकर मामा  यांनी  वाजवलेल्या घंटेचा  आवाज परत परत कानी यावा  .....
राऊत सरांनी परत एकदा म्हणावं परेड सावधान ! परेड विश्राम !
जोशी मॅडम यांनी सुंदर पटी वाजवत , प्रार्थना व 
 राष्ट्रगीत आणि पसायदान म्हणावे होय  ती  प्रतिज्ञा आणि  रोज वेगळी प्रार्थना म्हणायची इच्छा आहे. एन बी  दिक्षीत सरांचा तबला कानावर पडावा  आणि आम्ही तल्लीन व्हावे ... 
 फळ्यावर भरते सरांच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलेला  सुविचारही वाचायचा आहे.
 बडवे सर , जमदाडे सर , कुचेकर  सरांचे
विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहावेत ...
गणिताच्या एस पी  दिक्षीत सरांनी परत एकदा लसावी व मसावी व प्रमेय  शिकवावीत  , हो सगळे आलेख काढूनच जायला लागेल पण हरकत नाही , एस पी  दिक्षीत सर म्हणजे विद्यार्थी घडवणारे मनापासून आवडणारे गुरुवर्य आणि आयुष्यभर ज्यांचे उपकार फिटणार नाही असे व्यक्तीमत्व, वाया गेलेला विद्यार्थी मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिक्षीत सरांचा खूप मोठा वाटा आहे. 
शिंदे सरांच्या इंग्रजी तासाला जर लक्ष दिले असते तर कदाचित वेगळ्या वळणावर असलो असतो, सर खूप जीव तोडून शिकवायचे पण मी कधीच इंग्रजीचे पुस्तक उघडले नाही, शब्द पाठांतर केले नाहीत की मनापासून इंग्रजी शिकली पाहिजे असे तेंव्हा वाटले नाही.
इयत्ता दहावीला ढोपे सर जर इंग्रजीला आले नसते तर कदाचित पहिल्यांदा डबल परिक्षा द्यायला लागली असती , ढोपे सरांनी व्याकरण खूप चांगले करुन घेतले आणि म्हणून माझी गाडी पुढे सरकली ,  जैन सर , कसबे सर, ढवळे मॅडम, बर्वे मॅडम साळवे सर,  असे अनेक शिक्षकांनी शिकवताना कधीच भीती वाटली नाही. राऊत सरांनी खेळाच्या बाबतीत खूप चांगली प्रॅक्टिस घेतली आणि खेळाचा मनसोक्त आनंद घेतला ,
खोचरे सरांनी व एन बी दिक्षीत सरांनीही खेळाच्या तासाला भरपूर खेळ शिकवले ,तसेच खडतरे सरांच्याही तासाला मजा यायची !
बाबर  सरांचा
मंत्रमुग्ध करणारा इतिहास  परत परत  ऐकायचा आहे...इतिहास म्हणजे पाठांतर करायला आवडणारा विषय मनापासून आवडायचा 
आणि हो
इयत्ता पाचवी ,सहावी,सातवी व आठवी ,नववी पर्यंत ढवळे मॅडम यांचा मराठीचा तास हवा पण दहावीसाठी मात्र मला परत एकदा  मराठीचं व्याकरण जोशी मॅडम यांच्या कडून शिकवायचय कारण तेंव्हा फळ्याकडे थोडं कमी लक्ष होतं म्हणून माझं कधी कधी लिहितांना दिर्घ र्हस्व चुकतं !
आणि मला आठवी ते दहावीला एम पी के मॅडम 
 संस्कृतसाठी पाहिजेत ,कारण अनेक सुभाषितं विसरलोय , उजळणी व पाठांतर हवं आहे. ब मधून अ मध्ये जायचंय व खास संस्कृतच्या तासाला बसायचं आहे, मन लावून सुभाषित ऐकायची आहेत  !
मधल्या सुट्टीत घरुन   आणलेला डबा आणि मित्रांचा डबा एकत्र  खायचाय , मनसोक्त कबड्डी, खो-खो , खेळायचं आहे
 आणि स्काऊट गाईडसाठी परत एकदा ,मांडवे , शिंगणापूर व धर्मपुरी बंगला या ठिकाणी ,
तीन तीन  दिवसांची शिबीर पाहिजेत , सोबतीला डी डी के सर, जाधवर सर , कसबे सर , स्वामी सर ,डांगे सर , एन बी दिक्षीत सर असतीलच , 
ग्रंथालयात जास्त गेलोच नाही पण जेवढी  पुस्तकं शशी काकांकडून आणली तेवढी मी मन लावून दारी धरत वाचली  व अजून  वाचावी वाटतात ... एखाद्या ऑफ  तासाला बाकावर कान ठेवून तबला पण वाजवावा वाटतोय किंवा दंगा करत बसावे वाटतंय , मला अजूनही आठवत, एकदा  मैदानावर खेळायला गेलतो  व मुली मात्र वर्गातच होत्या मी  अचानक  वर्गात आलो तर माझे दप्तर गायब झाले , बघतोय तर दप्तर व माझ्या सगळ्या वह्या पुस्तके  पोरींच्या हातात 😃 पटापट दप्तर व वह्या पुस्तके माझ्याकडे आले,मी पण काय बोललो नाही व त्या पण बोलल्या नाहीत, विषय समाप्त नाहीतर परत आम्हालाच मार मिळाला असता राऊत सरांचा !
26 जानेवारी व पंधरा ऑगस्ट  स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायला जावसं वाटतंय  नानासाहेब देशमुख, आर एफ दोशी , चंद्रकांत घुगरदे अशी मोठ्या उंचीची माणसे व शिस्तप्रिय व्ही एस कुलकर्णी सर यांना परत एकदा पहायचं आहे ..होय 
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण केलेलं बक्षिस स्काऊट गाईडचा गणवेश घालून घ्यायचं आहे. रनिंग व वेट लिप्टिंग मध्ये मिळवलेला पहिला नंबर परत काढायचा आहे. शामची आई परिक्षा द्यायला व जोशी मॅडम यांचेकडून शिकायला आवडेल, स्वामी विवेकानंद यांचा वेश परिधान करुन , स्वामी विवेकानंद यांचं अमेरिकेतील ते भाषण परत एकदा  विजय चित्र मंदिर या ठिकाणी म्हणायचं आहे.
पहिल्यांदाच भरते सरांनी पाठांतर करुन घेतले होते व मेकअप पण केला होता!
"All Americans are my Brother and sister" याने सुरुवात करायची व चित्रपट गृहात टाळ्यांचा कडकडाट हवाच , " रघुनाशेठ उराडे, शांतीलाल शेठ गांधी, जंबुकुमार दावडा अशा मोठ्या लोकांसमोर तो कार्यक्रम होता.
वार्षिक स्नेहसंमेलनात , ग्रामपंचायत पटांगणात ,विजय पिसाळ ,बापु रुपनवर ,सुधिर काळे व अजून कोणतरी मिळून एक नाटक केलं होतं तेही परत करायचं आहे.
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात इयत्ता दहावीत असताना स्काऊट गाईडचा संघनायक म्हणून पाहुण्यांना व ध्वजाला सलामी द्यायची आहे फक्त स्वामी सर हवेत सराव घ्यायला ! खाकी हाफ पँट ,अजूनही आठवते , रस्त्यावरुन  मोठ्याने  ....भारत माता...की......जय.....अशी आरोळी ठोकायचीय !
परीक्षेच्या कालावधीत पाठांतर करायचे आहे तेही घरची कामे करत करत , इतिहास, भुगोल, नागरिक शास्त्र, विज्ञान, गणित, भुमिती ,इंग्रजी खूप खूप छान शिकायचे आहे व  सारा अभ्यास करायचाय... आवडत्या विषयांचे पेपर सोडवताना पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...
    खर सांगू  शाळेत जेवढं शिकवलं तेच डोक्यात बसायचं घरी कामं खूप असायची त्यामुळे होमवर्क कधी पुर्ण होत नव्हता , गणित व इतिहास , विज्ञान व भुगोल मनापासून आवडायचे , व म्हणून मनापासून शाळेत येऊन बसायचे आहे व शाळे   सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत .  खरं मला सायन्सची आवड होती अकरावीत फार समजत नाही मी एच के सरांच्या तासाला थोडा गोंधळ केला व सरांनी माझ्यावर एक तास लेक्चर दिलं ,मला तेंव्हा वाईट वाटलं आणि मी सायन्स सोडून कॉमर्सचा वर्ग निवडा तिथेही अकाउंट, इकॉनॉमिक्स, सेक्रेटरी प्रॅक्टिस , यासाठी पाटील सर , होळ सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं , वाणिज्य अशा विषयांचा अभ्यास केला  , कॉलेज करताना बि कॉम केले तिथेही   स्टँट व मॅथ्स , इकॉनॉमिक्स, अकाउंट ,बँकिंग या विषयांचा अभ्यास करायला मिळाला  , अगदी नंतर  मी माझ्या आवडीच्या कला शाखेतून , इतिहास, पॉलिटिक्स, सायंटिफिक मेथड ,मराठी व इंग्रजी हे विषय घेऊन ग्रॅज्युएशन केलं व पॉलिटिक्स विषय घेऊन एम ए केलं  पण कुठेच दाते प्रशाले सारखा मनापासून आनंद मिळाला नाही .
 मित्रांनो आपण  परत एकदा  आपल्या शाळेत जाऊया  ती आपल्याला  बोलावते आहे , कदाचित फळे बदलले असतील  पण त्याच भिंती ,तेच ग्राऊंड व तिच इमारत पहायची आहे.
होय दाते प्रशाला सांग ना ?  मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?
    १२ वी निरोप समारंभाच्या वेळी तेंव्हा मुख्याध्यापक असलेले  व्ही एस कुलकर्णी सर यांचे भाषण आजही आठवणीत आहे.
“तुम्ही या शाळेत जे शिकलात ते कितीही मोठे झालात तरी विसरू नका , तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तुम्हाला या शाळेची आठवण येत राहिल व या शाळेतील आनंदी क्षण  तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
   म्हणून वाटते !
ते  घालवलेले शाळेतील  दिवस  आपल्या जीवनात  परत येणार नाहीत... याची  मला अगदी मनोमन जाणीव आहे...
दाते प्रशालेतीचे या लेखातून ह्यदयापासून आभार मानायचे आहेत . कारण भारत मातेच्या लाखो लेकरांवर हजारो शाळा संस्कार करत असतील पण आपली  शाळा व आपले  गुरुजन हे केवळ शाळा व गुरुजन नव्हते तर ते साक्षात होते एक विद्येचे माहेरघर , विद्येचे मंदीर व त्या मंदिरात मला व माझ्या मित्रांना   ज्ञान देणारे  साक्षात परमेश्वर समान गुरुजन , म्हणून मला लिहिण्याचे वेड लागले व बोलण्याचे धाडस प्राप्त झाले ! प्रत्येकाचा मान कसा राखावा , कुणाचा  आदर करावा हे धडे कुठल्याच पुस्तकात मिळत नाहीत , त्यासाठी हवी दाते प्रशाला !
माझ्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत झाली ती केवळ दाते प्रशालेत  बहुसंख्य शिक्षकांनी शिकवलेल्या एका एका धड्यातून , सांगितलेल्या एका एका गोष्टीतून!
जगण्याचं व लढण्याचं बळ प्राप्त झालं ते तिथेच 
 आज  शेती ,व्यवसाय आणि माझ्या आयुष्यात जे  चांगल घडलं आहे हे दाते प्रशालेतील  सुसंस्कृत ,संस्कारी गुरुजनांचं पाठबळ आहे..
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात, जेंव्हा जेंव्हा मी उंच भरारी घेईन तेंव्हा दाते प्रशालेचा विद्यार्थी म्हणून  मी दाते प्रशालेचे  नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...©®
श्री विजय शंकरराव पिसाळ नातेपुते…
9665936949
😊

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

मराठा समाजाची दिशा काय असावी


चालू घडामोडींचे विश्लेषण

मी शक्यतो
मराठा बांधवांनो  जातीच्या विषयावर लिहित नाही , बोलत नाही किंवा त्यावर जास्त व्यक्त होण्याइतपत मला ज्ञानही नाही. हो मी तुमचा बांधव श्री विजय पिसाळ नातेपुते. तुमच्याशी आज या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय , माझे तुम्हाला मत पटले तर विचार करा नाही पटले तर सोडून द्या!
तर बांधवांनो मी माझे वैयक्तिक मत तुमच्या समोर या मिडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय ,नंतर सविस्तर पणे माझ्या युट्युब चॅनलवर व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न करेन, खरेतर आपल्या देशात  प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या  जातीचा अभिमान असतो , फक्त कुणी तो जाहीर दाखवतो तर कुणी समाजाच्या कामातून दाखवतो तर कुणी छुपा का होईना जातीचा अभिमान बाळगतो ही मी अनेक ठिकाणी पाहिलंय , अनुभवलंय, व काहींचे अनुभव मला त्यांनी शेअर केलेत , म्हणून तुम्हाला सांगतो आपण समाजासाठी एखादी मागणी करताना , एखादी गोष्ट सरकार दरबारी मांडत असताना इतरांच्याही भावनांना ठेच लागणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे, मला मान्य आहे की मराठा समाजात जितके अती श्रीमंत, श्रीमंत लोक आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने गरीब पण आहेत , आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ठोस मागण्या आपण सरकार दरबारी करायलाच हव्यात , जसे की , गरिब मुलांना शैक्षणिक शुल्क माफी , होस्टेल व मेस मध्ये सवलती,  हुशार मुला मुलींना , स्कॉलरशिप  ,मेडिकल , इंजिनिअरिंग व ज्या ठिकाणी शैक्षणिक फि , खूप जास्त आहे ती फि माफी होण्यासाठी  सरकार दरबारी पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 
अजून एक अत्यंत महत्त्वाचे , मराठा समाजाला कोणतेही सरकार ओबीसीतू आरक्षण देणार नाही हे अगदी सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. फक्त ओबीसी बांधवांना ज्या शैक्षणिक सवलती व जेवढे शैक्षणिक शुल्क भरावे लागते तेच गरीब मराठा समाजाला भरावे लागले पाहिजे यासाठी सरकारवर  निश्चित दबाव टाकणे योग्य राहिल .
  कितीही आंदोलने झाली तरी मराठा समाजात फुट पाडायचे राजकीय डावपेच हे सर्व राजकीय पक्षांना माहित आहेतच , त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्षाचा नेता आरक्षण  देणार असे बोलत असेल तर ते तो  खोटं बोलतोय हे ध्यानी घ्या ,  मराठा- दलित, मराठा- ओबीसी, मराठा-मुस्लिम , मराठा -ब्राह्मण असे वाद लावून सगळ्या राजकीय पक्षांनी आपआपली पोळी भाजून घेतली आहे पण मराठ्यांच्या पदरात काही मिळालेले नाही, व मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर अगदी सर्वांनीच केलाय व नेत्यांना त्यातून पाहिजे ते मिळाले आहे पण गोरगरीब मराठ्यांना काहीच मिळाले नाही, म्हणून मराठा बांधवांनो माझी तुम्हाला विनंती आहे,  जो अभ्यासात हुशार आहे त्यांने मन लावून अभ्यास करावा , व फक्त क्षमता असेल त्यांनीच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी व प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करावेत , न्यायपालिका, आयटी क्षेत्र यात विशेष परिश्रम घेऊन संधी प्राप्त कराव्यात तिथे  क्षमता असेल तर तुम्हाला संधी आहेत  पण सरसकट सर्वांनी एकमेकांच्या नादी लागून स्पर्धा परीक्षा देत बसू नये  किंवा सर्वांनीच आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी इंजिनिअरिंग करु नये पण स्वतःकडे क्षमता असेल तर निश्चित ते क्षेत्र निवडावे अन्यथा वेळ पैसा खूप जातो आणि मानसिक ताणतणाव येऊन जीवनात नैराश्य येते व   इतर क्षेत्रात करिअर करायच्या संधीपण निघून जातात ,  ज्यांना शेती आहे  पाणी आहे  त्यांनी शेतीत मन लावून अभ्यासपुर्ण शेती करावी , शेतीकडे दुर्लक्ष करु नये , शासनाच्या योजनांचा फायदा जरुर घ्यावा पण त्या योजनांसाठी एखादा प्रोजेक्ट बिलकुल करु नये , केवळ आणि केवळ आपले उदिष्ट हे ज्या पिकांना चांगला बाजारभाव मिळू शकतो व ज्या पिकांमध्ये रिस्क कमी असते ती पिके घेऊन , त्याकडे पुर्ण लक्ष देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कार्यरत रहावे ,  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा , बाजारभाव जरी हातात नसला तरी एकाच पिका ऐवजी वेगवेगळी पिके घेऊन व ताजे चलन कसे मिळेल याकडे लक्ष द्यावे , मजूर टंचाई खूप भासतेय त्यामुळे सर्वच क्षेत्र लागवडीसाठी न वापरता काही क्षेत्राला विश्रांती द्या ,  विषमुक्त , सेंद्रिय शेती हे ऐकायला मस्त वाटते पण करायला थोडे कठिण असते म्हणून सेंद्रिय व विषमुक्त शेती करायचीच असेल तर , अगोदर या शेतीच्या मार्केटचा अभ्यास करावा ,  व शेती करताना  पिकांची फेरपालट करा , जरी सरकारी धोरणे शेतकरी विरोधी असली तरी ,  नकारात्मक दृष्टीकोन बाजूला ठेवा आणि ज्या पिकांना सरकार हात लावू शकत नाही अशा पिकांवर लक्ष द्या, सोयाबीन, कापून ,कांदा या पिकांची लागवड थोडी हिशोबात करा व एकरी उत्पन्न कसे वाढेल यावर लक्ष केंद्रित करा , हे झालं शेतीचं , अजून खूप तुमच्याशी शेअर करायला मुद्दे आहेत हळूहळू प्रत्येक मुद्दा मी बोलत राहिल , मित्रांनो  तुम्हाला जिथे कुणाचाही द्वेष ,राग मत्सर शिकवला जात नाही अशा कोणत्याही संघटनेत जायला हरकत नाही पण जास्तीत जास्त वेळ आपल्या कामासाठी, धंद्यासाठी द्या,  बहुजनवाद , हिंदुत्व वगैरे गोष्टी फक्त राजकीय आहेत , त्याने तुमच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, तुम्हाला तरीही जावेच वाटले तर नक्की जा पण घरात आपल्या पीठ आहे का  हे पण बघा , आपल्या आई वडिलांना शेतात , धंद्यात मदत करा , नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा व कोणतेही काम हलके समजू नका व कोणत्याही व्यवसायाला लाजू नका ,  सकाळी रोज 100 पेंढ्या कोथिंबीर विकून आनंदी व मजेत जगणारे लोक मी पाहतो तुम्ही पण मंडईत जाऊन बघा, फक्त सकाळी दोन तास ,संध्याकाळी दोन तास काम असते,
बांधवांनो  आजचे युग हे खाजगीकरणाचे आहे ,त्यामुळे खाजगी नोकरीत जास्त पगार मिळणार नाहीत किंवा तुम्हाला परमनंट ऑर्डर पण भेटण्याची शक्यता कमीच आहे, म्हणून ज्यांना जमेल त्यांनी न लाजता परिस्थितीनुसार ,  किराणा, ऑटोमोबाईल, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक,  हॉटेल ,मेस ,पान टपरी ,फर्निचर , वेल्डिंग, पंक्चर , गाड्या दुरुस्ती , रिपेअरिंग , शिलाईकाम असे शेकडो धंदे आहेत करण्यासाठी धडपड केली पाहिजे, काही दिवस जम बसायला लागतो, शून्यातून सुरवात करावी लागते ,पण न खचता काम करत राहिले तर धंदा यशस्वी होतो हे 100% सत्य आहे. 
आणि सगळ्यात महत्वाचे मराठा बांधवांनो आपण मोठेपणासाठी नको तिथे वारेमाप खर्च करतो तो टाळायला हवा, साधेपणा व कमी खर्च यातूनच बचत होऊ शकते, मानवी जीवनात रोज संकटे येतात , त्यामुळे थोडी बचत करा , आणि आपण स्वतः व्यसन करु नका , कुणाला व्यसन लावू नका व जर कुणी व्यसनी होत असेल तर त्याला व्यसनापासून दुर करा , व्यसनामुळे कितीतरी बांधवांनी जमिनी विकल्यात, कितीतरी बांधव कर्जबाजारी झालेत व कितीतरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत,  आणि अजून खूप महत्त्वाचे आपल्या घरात एकनिष्ठ रहा , कुटुंब ही संपत्ती आहे , ती टिकवा , एखादा चुकला तर थोडे दुर्लक्ष करा पण नको तिथे हुज्जत घालून वेळ व पैसा बरबाद करु नका, बाई ,बाटली , नाच गाणे यात जो वहात गेला तो बरबाद झाला हे विसरू नका, जमिनी शक्यतो विकू नका आणि तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची असेल , नवीन चांगली गुंतवणूक असेल  तरच काही जमिन विकायची वेळ आली तरच विका पण शक्यतो जमिनी परत मिळणार नाहीत, याचे भान सदैव असुद्या ,आपल्या  समाजात व इतर कोणत्याही समाज बांधवांबरोबर  कोणताही व्यव्हार करताना  फसवणूक करु नका , विश्वासाला तडा जाईल असे वर्तन केले तर थोडाफार फायदा काही काळ होईल  मार्केटमध्ये नाव खराब होऊन कालांतराने त्याचे वाईट व दुरगामी परिणाम होत असतात, आपल्या घरातील सर्वांना  वाचन ,लेखन याची आवड निर्माण झाली पाहिजे , अध्यात्मिक  पुस्तके , कथा काव्य ,कादंबरी, महापुरुषांची चरित्र , धर्मग्रंथ , आणि यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा  ,त्यातून संस्कार होत असतात हे ध्यानी घ्या , आपले सर्व जाती धर्मातील  शेजारी, आपले भावबंध यांच्या सर्व सुख दुःखात सहभागी व्हा , सर्वांना मदतीची भावना ठेवा , आपोआप तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही, राजकारणात भाग घेताना आपली योग्यता, स्वतःचे सामाजिक काम , याचाही विचार करा ,केवळ आपल्याच बांधवांना त्रास देण्यासाठी , भावकीची जिरवण्यासाठी  राजकारणात भाग घेऊ नका,  आपल्या समाजातील आपल्या गावातील एखादा जर राजकीय दृष्ट्या सक्षम असेल ,त्यांना किंमत असेल तर पायात पाय घालू नका, तो मराठा असो की कोणत्याही जातीचा असो  नेहमी सपोर्ट करा तरच तुमची कामे होतील  व इतर समाजातील कोणत्याही नेत्याबाबत खालच्या लेवलला जावून टिका करु नका, त्याने तुमचे संस्कार दिसून येतात, 
मराठा समाजाचा कुणीही शत्रू नाही, ब्राह्मण, मुस्लिम, ओबीसी, दलित बांधव हे हजारो वर्षापासून मराठा समाजाचे नैसर्गिक मित्र आहेत , कुणीही आपला विरोधक नाही, कुणीही आपला स्पर्धक नाही व कुणीही आपल्याला त्रास दिलेला नाही , आपले सर्व जाती धर्मातील लोकांशी पिढ्यानपिढ्या  ऋणानुबंध राहिले आहेत, एकमेकांना सर्वांनी मदत केलीय हा इतिहास आहे, काही वाद हे सर्व राजकीय पक्षांनी पेरलेले आहेत व त्यापासून आपण सावध असले पाहिजे.
आपल्या घरी सर्व जाती धर्मातील लोक येतात व त्यांचे आदरपूर्वक स्वागत आपण करतो हे संस्कार आपल्यावर आपल्या पूर्वजांनी केलेत याचा विसर पडू देऊ नका , आपल्या समाजातील काही प्रश्न सोडवण्यासाठी इतरांना टार्गेट करणे हे अत्यंत चुकिचे आहे,
हो मी पण माझे शेतीचे प्रश्न मांडताना सरकार विरुद्ध लिहितो पण व्यक्तीगत द्वेष ,जातीय चेष्मा  म्हणून माझे लिखाण नसते, राजकीय भुमिका वेगळी व सामाजिक काम ते मराठा समाजाचे असो कि ,  बाकीचे सामाजिक काम असो तिथे कोणताही पुर्वग्रह नको की कुणाच्या भावनांना ठेच नको ,
न टिकणारे आरक्षण रद्द करावे व ईडब्ल्यूएसचा लाभ समाजाने घ्यावा हे माझे मत आहे.
आणि सर्वात महत्वाचे सरकार कडे जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आग्रही रहावे , सर्वांची संख्या समजली तर प्रत्येक समाजाला त्याचा फायदा होईल व सरकारला सुद्धा सर्व समाजाच्या गोरगरीब लोकांसाठी योजना राबवताना सर्वांना लोकसंख्येच्या पटीत आर्थिक तरतूद करता येईल.
मला खूप बोलायचं आहे लिहायचं आहे पण सर्वांना माझे मत रुचेल असेही नाही.©®
विजय पिसाळ नातेपुते.
9665936949