vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

मला भावलेली स्त्री




चालू घडामोडींचे विश्लेषण

मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........

कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने  जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?

आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
  स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता  सर्वांना  कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच  पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा ,  विचार नाही केला कधी स्वता:चा, 
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा  !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती ,  स्त्री म्हणजे युक्ती ,  तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
 पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर  म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते  रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते कधी विश्नांती , कधी थांबते का  ती , कोणते विश्व असते तीचे  स्वतःचे , कघी करते का ती तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ,  सगळे जीवन तिचे  विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते  परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे ,  कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे ! 

ति  कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार  , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं  खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाही कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकर करुन कायम चालवते संसार !
 विश्व तिचे मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला मिळत नाही स्वातंत्र्य आणि तिचा कधीच सहजासहजी करत नाहीत विचार, पण तिला दिले ना थोडे अधिकार तर  ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता  समुद्रापार , म्हणून मुलगी कधीच नसते वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते  आकाशाला घवसणी घालण्याचे , उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे फक्त  तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देऊन , धाडस करा पाठबळ .देण्याचे !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही , 
  स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी ,   पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी ,  बहिण देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचा आधार !
  सगळी नाती निभावताना  ति कधीच कमी पडत नाही , तरी समाज प्रत्येक गोष्टीत तिलाच धरतो जबाबदार !

 संसारासाठी ती सोडते स्वतःचे घरदार , कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार , नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार, कारण तिलाच टिकवायचे  असतात आई वडिलांचे संस्कार !
 बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा  कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून 
स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही,  दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे, 
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!

तु तापाने  फणफणलेली असतेस , तुला खोकला आलेला असतो , तुझी दुखते वेदनेने कंबर पण तु कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा  वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तुझं भरुन येतं पण तु सगळं मजेत आहे असच सांगते कारण तुझे कुटुंब हे तुझे विश्व असते व पतीला तु परमेश्वर मानतेस !

ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला  गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर  गीत आणि प्रयोग करते नृत्याचे तेंव्हा दर्शन घडते नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती 
अगदी मनमोकळी तिचे वागणे आपलेपणाचे , अल्लड होते ,  लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन माणुसकीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा