चालू घडामोडींचे विश्लेषण
मला भावलेली स्त्री..
©®विजय पिसाळ नातेपुते.
9665936949
बरेच दिवस झालं लिहायचं होतं तिच्या बद्दल, पण योग येत नव्हता , वेळ मिळाला व सुचलं मला वाटतं स्त्री बद्दल हजारो पानं लिहिली तरी ते लिखाण कमी पडणार आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचतं तसं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो........
कणखर असते ती !
हळवी असते ती !
रणरागिणी असते ती !
प्रेमळ असते ती !
निर्माती असते ती !
आदर असते ती !
विश्वास असते ती !
तेजस्वी असते ती !
ज्वाला असते ती !
पण.....
थोडसं स्वता:साठी तिने जगलं पाहिजे, कधीतरी स्वतःकडे पाहिलं पाहिजे या युगात तिने बिनधास्त वागलं पाहिजे!
असं कधीच कुणाला का वाटत नाही ?
आदर करते सर्वांचा ,मान राखते थोरामोठयांचा , का अधिकार नसावा तिला तिचं मन जपण्याचा ?
खरंच ती असते स्वाभिमानी ती असते तेजस्वी ,ती असते ध्येयवेडी !
स्व:ताचा मान सन्मान तिलाही जपण्याचा अधिकार आहे हे कुठेतरी आता सर्वांना कळलं पाहिजे पाहिजे.... ?
आजवर तिनेच पेलल्या आहेत जबाबदाऱ्या , तिने उचललाय पुरुषा इतकाच भार संसाराचा , विचार नाही केला कधी स्वता:चा,
खरंच समाजाला अभिमान वाटला पाहिजे समस्त स्त्रियांचा !
स्त्री म्हणजे भक्ती , स्त्री म्हणजे शक्ती , स्त्री म्हणजे युक्ती , तिच्या प्रत्येक कलेला जपलं पाहिजे !
तिलाही कुठेतरी आपलं मत असतं हेही जाणलं पाहिजे !
पुरुष प्रधान संस्कृती म्हणून नव्हे तर आपलं घर म्हणून ती आजही राब ,राब राबते , सर्वांसाठी पहाटे पाच वाजले पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कितीही थकली तरीही जागते , सांगा ती स्वतःला कधी काही वेगळं मागते ?
समजून घेताना सर्वांना थक थक थकते , पण परमेश्वराला नैवेद्य दाखवाताना कुटुंबासाठी सर्व सुखच पहिले मागते !
कुठे असते का तिला कधी विश्नांती ?कधी थांबते का ती ? कोणते विश्व असते तीचे स्वतःचे ? कधी करते का ती काही तिच्या मनाचे ?
काहीतरी धडे घ्या तिच्याकडून स्वाभिमानाचे ! सगळे जीवन तिचे विश्वास आणि प्रेमळ आनंदाचे !
तिच्यात असते ताकद , तिच्यात असते हिमंत, ति लढते परिस्थितीशी , ति लढते अनिष्ट प्रवृत्तीशी , तरीही तुम्ही तिला अबला कसे म्हणता ?
तिची असते अफाट क्षमता , ती घेते नेहमी समजून , रडगाणे नसते कुणाचे!
कधी समजून घेणार तुम्ही तीच्या मनातील विश्व भावनांचे !
ति कधीच कमजोर नसते , ती नसते भेकडही , ती नसते लाचार , तिचे असतात समर्पणाचे विचार, म्हणून तर ती वाहते आयुष्यभर कुटुंबाचा भार व बनते सर्वांचा आधार !
हाती घेतलेले काम कधी ती अर्धवट ठेवत नाही , आपलं ओझं कुटूंबावर टाकत नाही, तिचं दुखलं खूपलं तर ती सहजासहजी सांगत नाही , खरेतर तिच विश्व हे कुटुंब असतं म्हणून ती स्वतःसाठी कधीच जगत नाही.
तिची क्षमता असते अफाट, ती नसते काम चुकार , तिला आवडत नाहीत कुणाचेही उपकार, म्हणून ती करते सतत बचतीचा विचार , आणि काटकसर करुन कायम चालवते संसार !
विश्व तिचेही मोठेच असते ,ती नेहमी स्वप्न सुद्धा मोठी पाहते पण मनासारखे तिला कधी काही मिळत नाही!
तिलाही हवं थोडं स्वातंत्र्य असा कोणी विचार करत नाहीत !
तिला मिळाले जर थोडे निर्णयाचे अधिकार !तर ती स्वतः बरोबर कुटुंबाचेही नाव करते साता समुद्रापार!
म्हणून मुलगी कधीच नसते ती वडीलांना व कुटुंबाला भार !
तिच्यात सामर्थ्य असते आकाशाला घवसणी घालण्याचे ! उंच भरारी घेत मनसोक्त उडण्याचे !
फक्त तिला हवं असतं कुणीतरी तिच्या पंखांना बळ देणारे
, धाडसाने तिला पाठबळ .देणारंं !
ती कधीच रडत नाही, ती वेगळं काही मागत नाही , ती दुःख कधी सांगत नाही की ती कधी डगमतही नाही !
स्री म्हणजे साक्षात रुप आई तुळजाभवानीचं , सामर्थ्य तिच्यात धारधार तलवारचं !
ती आई म्हणून घेते काळजी , पत्नी म्हणून पार पाडते जबाबदारी , बहिण म्हणून देते प्रेम , तर सासू बनून करते संस्कार आणि कुटुंबाला सगळ्या रुपात तिचाच मिळतो आधार !
सगळी नाती निभावताना ति कधीच कमी पडत नाही , तरीही तिच्या मनासारखं कधी होत नाही !
संसारासाठी ती सोडते स्वतःचे हक्काचे घरदार !
कायमचं आई वडिलांचे घर सोडताना कुठे असतो तीच्या मनात भीतीचा विचार?
चांगला पती मिळाला तर तिला वाटतो आधार !
नाहीतर आतल्या आत जे दुःख होतं ते सुद्धा कधीच कुणाला नाही सांगणार!
कारण तिलाच टिकवायचे असतात आई वडिलांचे संस्कार !
बाप होण्याच सुख ती नवऱ्याला देते , नातवंडे खेळवण्याचं सुख सासु सासर्यांना मिळते आणि समाजातील काहीजण स्त्रीला भोग वस्तू समजतात हा कसा काय येतो मनात अविचार?
राब राब राबून स्वताला कायम मागे मागे ठेवते , थोरामोठयांचा मान राखत संसार मात्र सावरते !
कित्येक कुटुंबात आजही तीला स्वातंत्र्य ही बिलकुल नाही, दागदागिने केले म्हणजे सारे कर्तव्य आपण केले असाच समज आहे!
स्त्रियांच्या भावनांचं तिथे आजही मरण आहे!
ती तापाने फणफणलेली असते , तिला खोकला आलेला असतो , तिझी दुखते वेदनेने कंबर पण ती कधी सांगत नाही , वेदना कधी चेहऱ्यावर दाखवत नाही , तरीही कुणाबद्दल तु कधी आकस ठेवत नाही.
ती मनमोकळी बोलते फक्त तिच्या जीवलग मैत्रिणीशी व आई वडील व बहीणींशी , करते थोडं मन मोकळं ,तेही घरातील कुणालाच चालत नाही !
थोडा वेळ मैत्रिणीशी बोलू लागतेस तेंव्हा मन तिचं भरुन येतं पण ति सगळं मजेत आहे असच सांगते कारण तिझे कुटुंब हे तिचे विश्व असते व कसा का असेना पतीलाच ति परमेश्वर मानते !
ती जेंव्हा छंद जोपासत असते स्वतःचे , ती जेंव्हा दर्शन घडवते कला गुणांचे , ती जेंव्हा सादरीकरण करते लावण्याचे , ती जेंव्हा गाते सुंदर गीत आणि प्रयोग करते नृत्याचे , तेंव्हा दर्शन घडते खरे नारी शक्तीचे !
असते जेंव्हा ती अगदी मनमोकळी , तिचे वागणे असते आपलेपणाचे , अल्लड होते , लहान होते , वागणे तीचे गोड ,होते दर्शन तिच्यातील माणुसकीचे !
म्हणून स्त्रियांचा आदर करा ,मान राखा होतील संसार सुखाचे !
आणि मार्ग दिसतील तुम्हाला प्रगतीचे !
©®विजय पिसाळ नातेपुते.. 9665936949
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा