vijaypisal49. blogspot. com

गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४

संवाद मनाशी

चालू घडामोडींचे विश्लेषण

माझे विश्व भावनांचे !
माझे जगने माझ्या मनाचे !
ओझे नाही मला माझ्या कोणत्याच नात्यांचे !
कारण माझे  सुत्र फक्त आनंदी जगण्याचे   !
कधी कधी रमत नाही मन !
एकांतात घालवावे वाटतात काही क्षण !
सतत विचार येतो काय कामाची संपत्ती आणि काय कामाचे धन !
मनाला वाटते फिरावे एकटेच कुठेतरी वनवन !
काही केल्या संसार सुटत नाही पण !
मित्र मैत्रिणींनो तुम्हाला कधी असा अनुभव आलाय ?
 एखादा दिवस, त्या  दिवसातली एखादी वेळ विनाकारण अगदीच आपणाला अस्वस्थ करते.
नेमकं काय होतंय  हे कळत नाही ? 
काय हवंय  हे उमजत नाही? स्वतःलाही स्वतःशी बोलता येत नाही , आजवरच्या प्रवासात चुकलं की बरोबर हे सांगता येत नाही , आता पुढे काय हे ठरवता येत नाही ? होतं ना कधी कधी असे , आपल्या जवळ सगळं असतं पैसा असतो , सुंदर कुटुंब असती अवतीभवती छान मित्र, नातेवाईक ,असतात , कोणतंच टेन्शन नसते , अगदी झकास चाललेलं असतं तरीही कशाचा प्रभाव आपल्यावर पडतो हे मात्र सांगता येत नाही.
 काहीच समजून येत नाही. मन रमवण्यासाठी मग आपण कुठेतरी गावात , किंवा एखाद्या आवडीच्या मंदिरात , किंवा निसर्गाच्या सानिध्यात , नाहीतर जीवल मित्रांकडे जातो व काहीच जमलं नाही तर जे आपलं ऐकतात , जे आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात त्यांच्याशी काहीतरी शेअर करतो , बरोबर ना? आणि कुणीच काहीच जेंव्हा सोबतीला नसते तेंव्हा  आवडतं पुस्तक वाचतो ना आपण  , किंवा  जुने फोटो पहतो किंवा जुनी गाणी हेडफोन लाऊन ऐकावी वाटतात ना ? अगदी किशोरकुमार, लतादीदी , रफी , आणि तरीही मन बैचेन असेल तर भक्तिगीते, भावगीते ऐकावी वाटतात ना ?
आवडीचं गाणं रिपीट मोडवर परत परत ऐकावं वाटतं ना?, 
मन मोकळं करताना मी तर जमेल तसे लिहित राहतो , मनातील भावना व्यक्त करतो भले   चार ओळी का असेनात !
तसे तर आई वडील होते तोपर्यंत त्यांचे एक एक शब्द कानी पडायचे व मन तृप्त व्हायचे , मनाला वाटतं जगात सगळे बेभरवशी आहे , आहे जीवन सर्वांशी मनसोक्त बोलत , आनंदी जगावे बरोबर ना?पण तरीही कधी कधी 
   मन अजिबात  कुठेच  रमत नाही..
स्वतःला आपण विसरून जातो. आपल्या वैयक्तिक आयुष्यात  एखाद्या दिवशी,एखाद्या वेळी, आपण असे का अवघडतो कु णास ठाऊक? 
विजय पिसाळ , नातेपुते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा