vijaypisal49. blogspot. com

सोमवार, २९ जुलै, २०१९

नव नेतृत्वाचा उदय !

चालू घडामोडींचे विश्लेषण
पुर्णपणे लेख वाचा , पटला तर शेअर करा . . चालू घडामोडींचे विश्लेषण केले आहे . . कोणत्याही एका पक्षावर टिका नाही . . . पण भारतीय लोकशाहीतील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे . . . . 
विजय पिसाळ नातेपुते 
९४२३६१३४४९

नव नेतृत्वाचा उदय. . . व सत्ता 
परिवर्तन हा तर  निसर्गाचा नियम. . . . . . . . 
काळ बदलतो तशीच सत्तेवरील माणसेही बदलत असतात. . . 
जगातील प्रत्येक देशात बदल सहजासहजी  स्वीकारले जातात व देशाच्या नेतृत्वाची सुत्रे कुणाच्या तोंडातही नसलेल्या नावाच्या व्यक्तींच्या हाती आनंदाने सोपवली जाते .  
आपल्याकडे बदल तातडीने स्वीकायची लोकांची मानसिकताच नसते . . 
नुसती व्यक्तीपुजा करत बसल्याने व नव नेतृत्वावर सहजासहजी विश्वासच  बसत नसल्याने आपले लोक ५०, ६०  ते ७० वर्ष एका एका व्यक्तीच्या , एका एका घराच्या  प्रेमात पडतात यातील दोन पाच टक्के लोक प्रतिनिधी व घराणी  ही  सक्षम व कर्तृत्ववान असतात ते निवडून आले तर दुःख वाटत नाही पण काही लोक प्रतिनिधी जेंव्हा , जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, सत्तेचा , पदाचा व भ्रष्टाचारातुन मिळवलेल्या पैशाचा बेसुमार वापर करून परत परत सत्तेवर येतात आणि राज्य करतात तेंव्हा मात्र भारतीय लोकांची  मानसिकता आणि लोकांचं अशा लोकांना मिळणारं समर्थन पाहून वाईट वाटतं . . . 
अमेरीकेत कित्येक चांगले कर्तबगार  राष्ट्राध्यक्ष होऊन गेले तरी त्यांची नावे  वारंवार तिथले  लोक घेताना दिसत नाहीत आणि आमच्याकडे मात्र वर्षानुवर्ष काही ठराविक लोकांच्या भवती राजकारण फिरताना दिसते . . . . . 
जुन्यांनी जरूर  चांगला कारभार केला असेल काही चांगले निर्णय घेतले असतील काही आदर्श घालूनही दिले असतील पण याचा अर्थ असा होत नाही की नवीन येणारे सगळे अकार्यक्षम असतील. कदाचित जुन्या लोकांपेक्षाही चांगले काम करू शकतील . . . संधी मिळाली तर असंख्य नवे तरूण सुद्धा जोमाने व नेटाने काम करु शकतात. 
संधी ही नेतृत्वगुण व कार्यक्षमता पाहून मिळायला हवी,  अगदी एखादी व्यक्ती मोठ्या घरातील आहे व तिच्यात जर क्षमता असेल तर त्या व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळायलाच हवी पण इथल्या लोकांची मानसिकताच इतकी विचित्र आहे की , आजोबा , वडील, नातु , पंतू , अजून, शी सुद्धा धुवायला न येणारी पोरं,  अशांना इथले लोक डोक्यावर घेतात. . आणि मग चालू होते , बॅनरबाजी व पोस्टरबाजीकरून, एखाद्या  इव्हेंट कंपनीच्या मार्फत  उमलते नेतृत्व, भावी नेतृत्व, सक्षम नेतृत्व, भावी आमदार, भावी खासदार, भावी मुख्यमंत्री  अशा उपाध्या देऊन गुणगान गाऊन लोकांवर ही मंडळी लादली जातात व लोकही यांना स्वीकारतात. . . किरकोळ पैसा व तुकड्या साठी पाया पडायला   मोकळेच असतात लोक. . . 
आणि मग 
मिसरूड फुटायच्या आत, रेव्ह पार्ट्या करणारे , पबमध्ये विदेशी ब्रँड रिचवणारे , ललनांसोबत नाचणारे मोठ मोठ्या निवडणूकीला उभे केले जातात, अजोबाच्या व वडीलांच्या पुण्याईवर काही पेंग्गवीन मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहतात व सत्तेसाठी काही दळभद्री लोक त्याच समर्थन करतांना दिसतात. . . 
काही निर्लज्ज तिकिटासाठी चप्पल उचलतात तर काही पाया पडतात. . आणि वरूण स्वाभिमानी नेतृत्व असी बिरूद मिरवतात. . .
नेतृत्व चुकत असेल तरीदेखील ब्र शब्द काढलाच जात नाही काही लोकप्रतीनिधी कडून, केवळ तिकिटासाठी व सत्तेसाठी लाचारी पत्करली जाते इथे ,  पण इथली  जनता 
सत्तेचा माज आणि सत्तेची गणिते  झटपट बदलत असते  जनतेला चिरकाल गृहीत धरून जर कोणी हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करत नाही . . . 
सत्ता ही कधीच एका ठिकाणी चिरकाल राहात नाही . . . 60 वर्ष काँग्रेस सत्तेवर होती , पण काँग्रेसने स्वतःला बदलले नाही , तेच ते चेहरे तिच ति निष्क्रिय   घराणेशाही, जरूर यातील  काही घराणी निश्चितपणे चांगली होती, जनसेवक होती पण कित्येक घराणी ही सत्ता आणि पक्षाची लोकप्रियता व पैसा यावरच पोसली गेली होती , त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवच राहिलेली नव्हती त्यामुळेच तिथल्या स्थानिक  लोकांनी परिवर्तन करून  नव नेतृत्वाच्या हातात सत्तेची चावी  सोपवली, पण काँग्रेसने त्या ठिकाणी त्यावेळी नेतृत्व बदलले नाही . . व ही वेळ आली . . 
आज भाजपाचा उत्कर्षाचा  काळ आहे . . भाजपा सुद्धा काँग्रेसच्या मार्गानेच जाताना दिसतोय. . .  कित्येक घरात असंख्य पदे व नेत्यांच्या मुलांनाच वारसा हक्काने तिकिटे वाटत सुटलाय! 
ठरावीक चांगल्या लोकांना पक्ष  प्रवेश दिले तर ठिक आहे पण  इथे तर सगळ्यांनाच पवित्र करून घेतले जात आहे . . . जणू गंगेत डुबकी मारावी व पवित्र व्हावे तसे !  कशासाठी तर विरोधक संपवण्यासाठी आणि सत्ता चिरकाल राहण्यासाठी ? पण जनतेला थोडेच हे पसंत पडेल! 
आतातर सरकार चालवतानाही . . . 
फुकटच्या सवयी लोकांना लावल्या जात आहेत. . यात, उद्योगपतींनाही खिरापती दिल्या जात आहेत. . . 
अनुदाने खिरापती प्रमाणे वाटली जात आहेत. . . 
जनतेला फुकटचे काहीच नको असते . . . 
फक्त पायाभूत सुविधा आणि साधनांची उपलब्धता  हवी असते . . 
उद्योजकांना , जशी जागा, रस्ते ,  पाणी , बाजारपेठ,व  सुरक्षितता हवी तसेच, युवकांना रोजगार, शेतकर्यांना   शेततळी , योग्य  बाजारभाव व बाजापेठा, व काही पिकांसाठी  हमीभाव आणि  पुर्ण दाबाने विजेचे गरज असते . . ..क्वचित प्रसंगी दुष्काळ, नापिकी , यात विमा आणि सरकारी मदत आवश्यक असते . . . कोरडवाहू शेतकर्यांना मदत केली तर वाईट वाटायचे कारन नाही पण इथे तर करोडोंची कमाई करणार्‍यांनाही अनुदान स्वरूपात  पैसे दिले जात आहेत! 
मजूरांनाही हाताला काम व त्याचा योग्य मोबदला पाहिजे असतो . . . 
शिक्षणासाठी भरघोस तरतूद हवी असते . 
इथे मात्र काँग्रेस सारखेच  विविध अनुदाने , खात्यात पैसे टाकने चालू आहे  ही गोष्ट टॅक्स भरणार्या  सामान्य लोकांना  न पटणारी आहे . . . कारण सामान्य जनताच टॅक्स भरत असते म्हणून देश चालतो . . 
आज भाजपातही घराणेशाहीचा सुळसुळाट आहे . . . कित्येक अशी उदाहरणे आहेत की , वारसा हक्काने पदांचे वाटप चालू आहे . . . 
जनता कोणत्याही नेत्याला व पक्षाला फार काळ सहन करत नसते . . . 
दिल्ली हे त्याचं बोलकं उदाहरण आहे . . लोकांनी दोघांनाही नाकारून तिसरा पर्याय दिला . . . 
आंध्रातही लोकांनी जुन्या पक्षांचे हाल केले . ..व तिसरा पर्याय दिला व जुन्यांना  त्यांनी  बेदखल केले . . . 
आज काँग्रेस विचारसरणीचे लोकांना वाईट वाटत असेल पण काँग्रेसनेही एका घरासाठी , त्या घराला आव्हान देणारे एक एक जनाधार असलेले  नेते  बाजूला केले व आपोआपच  काँग्रेसची अवस्था वाईट झाली , भाजपातही तेच चालू आहे , मोदी शहां व फडणवीस यांचेसाठी जोशी , अडवाणी , सिन्हा , राजनाथ, सुषमाजी  , खडसे, तावडे, मुनगंटीवार,  यातील कुणाला दुय्यम स्थान दिले तर कुणाला  बाजूला केले गेले . . जेंव्हा सत्ता जाते तेंव्हाच कळते  आपण काय चुक केली ति ! 
सत्तेत असतांना  सत्तेचा वापर करून आपल्याच सहकार्यांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न केला तर, सत्ता जाताच सगळे  पत्ते उलटे पडतात व सगळ्या  हिशेबाची परतफेड केली जाते , नुसती परतफेडकेली जाते असे नव्हे तर ति सव्याज केली जाते . . . 
त्याचाच अनुभव अजितदादा आज  घेत असावेत. . . 
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे . . हा सर्वांनाच लागू होतो . . . 
त्यामुळे सत्तेच्या नसेत कुणीच वावरून उपयोग नसतो . . . 
अजून पाच दहा वर्षात पुढे काय होईल हे छातीठोकपणे कुणीच सांगू शकत नाही . . . 
फक्त बदलांना सामोरे जाण्याची व चांगल्या लोकांच्या मागे उभे रहायची तयारी ठेवायला हवी . . . 
तरूणांनी नेतृत्व करण्यासाठी सक्षमपणे पुढे आले पाहिजे . . . राहुल गांधी राजीनामा देण्यासाठी सहजासहजी तयार झाले नाहीत तर लोकांनीच तसा मेसेज दिलाय. .  तुम्ही सुधरा नाहीतर तुम्हाला संधी नाही ! 
तसीच परिस्थिती येणाऱ्या काळात सर्वच पक्षांची असणार आहे . . . 
विजय पिसाळ नातेपुते ! ९४२३६१३४९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा