चालू घडामोडींचे विश्लेषण
वृक्ष संवर्धना शिवाय. . . . निसर्गाचा समतोल कठीणच. . . . .
©® लेखन. . विजय पिसाळ नातेपुते . . . . . ९४२३६१३४४९/९६६५९३६९४९
आज जिकडे तिकडे प्रचंड उकाडा , तापमान वाढ आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारे पाऊसमान, यामुळे वारंवार पडणारा दुष्काळ या दुष्टचक्रात भारत देशातील ७० %भाग आडकला आहे !
"डोंगर उजाड झाले , पाऊसमान संपून गेले"
ही अवस्था आज जवळ जवळ ७० %भारत देशाची झाली आहे . .
दरवर्षी करोडोंचा खर्च वृक्ष लागवडीसाठी व देशातील विविध भागातील दुष्काळ निवारणासाठी केला जातो . . पण दुष्काळ व तापमानवाढ ही समस्या तशीच राहते आहे . . . देशातील किंवा राज्यातील सरकार कोणतेही असो सुदैवाने वृक्ष लागवड तर केली जाते मात्र दुर्दैवाने लावलेले वृक्ष संवर्धन करण्यासाठी ना सरकारला अस्था असते ना सामाजिक स्थरावरील लोक पुढाकार घेतात. . मुळातच देशातील नागरीकांना प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असे वाटते ! जनसहभाग नसेल तर कोणतीही योजना यशस्वी होत नाही . .
आज अनैसर्गिक पद्धतीने, अशास्त्रीय पद्धतीने ओढे नाले साफसफाई केली जातेय तोच गाळ कडेला टाकला जातोय व तोच गाळ परत ओढ्यात येतोय, जमिनीवर चर खोदून सुपीक जमिनीत पाणी मुरवण्याचा अयशस्वी प्रयोग केला जातोय, मुळात जमिन खोदून माती काढून तिची प्रचंड प्रमाणात धूप केली जातेय व तिच माती ओढे व धरणे यात परत येऊन साचतेय व ओढे आणि धरणे गाळाने भरत आहेत, मुळात नैसर्गिक ओढे व त्यातील वाळूच जर उपसली गेली तर पाणी जमिनीत मुरणार कसे ! वाळू उपसून ओढा खोलीकरण व रुंदीकरण केले गेल्यावर वाळूच नष्ट होणार व यात वाळू नष्ट झाल्यामुळे बंधार्यात फक्त पावसाळ्या मध्ये मुबलक दिसते , छानपैकी फोटो काढले जातात पण ते पाणी मात्र टिकत नाही ! त्याचे प्रचंड बाष्पीभवन होऊन ते पाणी संपुष्टात येते व परत दुष्काळ मात्र पाचवीला आहेच!
या साठी निसर्ग नियमानुसार ओढ्यात व नद्यात वाळू आवश्यक आहे व त्याचा उपसा सुद्धा नियंत्रणात गरजेनुसार व्हायला हवा ! मुळात जलतज्ज्ञ , डॉ राजेंद्रसिंह, समाजसेवक अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांनी जे पॅटर्न राबले ते खूप महत्वाचे होते व आहेत! त्यात
चराई बंदी, कु-हाड बंदी करणे व यातून वृक्ष आणि जंगलाचे संरक्षण आवश्यक आहे .
पडणारे पाणी झाडामुळे तर जमिनीत मुरतेच पण साखळी बंधारे ,,नाला बंडीग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व लघू प्रकल्पच यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब आडवला जाऊन दुष्काळ हटवता येऊ शकतो व डोंगराळ भागात याला भरपूर स्कोप आहे पण मुळात, कोणत्यातरी शासकीय अधिकार्याच्या सुपीक डोक्यातील कल्पना राबवून दुष्काळ हटवण्याचे प्रयोग केले जात आहेत. . त्याचाच एक नमुना म्हणजे अनैसर्गिक पद्धतीने चालू असलेले जलयुक्त शिवार अभियान. . . यात ठेकेदार, ट्रॅक्टर मालक व जेसीबी मालक हे आणि अधिकारी मालामाल झाले पण पाणी पातळी पावसाळा सोडला तर जैसे थे !
मुळात जल संवर्धन हे जंगल संवर्धनावर अवलंबून आहे . जंगल नसेल तर पाऊस पडणार नाही व पाणीच पडले नाही तर वॉटरकप काय? जययुक्त शिवार काय? नुसता उलटा कार्यक्रम होणार हे नक्की !
आज कित्येक ठिकाणी झाडाची अनियंत्रित कत्तल चालू आहे . वनसंरक्षक व वनअधिकारी हे समाजातील गाव गुंड व सरपन आणि झाडांची तस्करी करणारे संबधित लोकामुळे हतबल झालेले आहेत.
काही ठिकाणी तर वनसंरक्षक व वनअधिकारी यांचे आशीर्वादानेच संरक्षित वनांची कत्तल होत आहे.
कागदोपत्री वृक्ष लागवडीचे करोडोंचे आकडे दरवर्षी प्रसिद्ध होतात मात्र लावलेली झाडे किती वाचवली जातात हा खरा मुख्य संशोधनाचा विषय आहे . . .
वाढते शहरीकरण व रस्त्यासाठी , कित्येक डोंगर आणि झाडे भुईसपाट करावी लागत आहेत पण त्याची भरपाई इतर ठिकाणी झाडे लावून व ति मोठी करून केली जात नाही . .
डोंगररांगा जर गच्च झाडांनी वेलींनी वेढल्या व डोंगरांना जाणीव पुर्वक आगी लावायचे बंद झाले नाही तर मात्र सर्व कठीण आहे . .
आज काही नालायक लोक बीडी सिगारेट ओढून पेटती काडी व सिगारेट बीडी रस्त्यावर किंवा डोंगरावर टाकतात व क्षणात ते ठिकाण आगीच्या भक्ष्यस्थानी पडते . . . या बिडी व सिगारेटला पायबंद कोण घालणार!
काही दारूडे जंगलात जाऊन दारू पितात व दारूनंतर तिथेच बीडी सिगारेट व मटणाच्या पार्ट्या करून आग न विझवता तसेच नशेत येतात त्यानेच जंगलांना आगी लागलेल्या दिसून येते !
सांगायचा मुद्दा हाच आहे की,
त्याला पायबंद घातला पाहिजे !
यापुढे सरकारने
शेतकर्यांना सुद्धा उपयुक्त आणि निसर्गासाठी आंबा , चिक्कू, चिंच, आवळा , कळक(बांबू ) ही बांधावर व कंपल्सरी कायदा करून झाडे लावायला लावली पाहिजेत त्याला काही वर्षे अनुदान दिले पाहिजे . वनजमीनीवर झाडांचे संवर्धन करण्यासाठी , तलाठी , ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, कृषी सहाय्यक व सामाजिक संस्था आणि होतकरू तरूणांच्या सहभागातून विविध कार्यक्रम राबवून झाडे लावा व त्याचे संवर्धन करा हा उपक्रम हाती घेतला पाहिजे . .
नुसती दरवर्षी झाडे लावून व ति जळून जाऊन तापमान वाढ, कार्बन उत्सर्जन हे रोखले जाऊ शकत नाही .
त्यासाठी झाडे मर्यादित लावावीत मात्र ति किमान ८०%जगावीत तरच काहीतरी साध्य होईल!
संपुर्ण देशात व राज्यात संपुर्ण वनक्षेत्रात कु-हाड बंदीची अंमलबजावणी १००%व्हायला पाहिजे !
आज रस्त्याच्या कडेचे लिंब, चिंच, वड, आंबे, सुद्धा शेळ्या मेंढ्यांच्या चार्यासाठी तोडले जात आहेत. .
त्यावर कुणाचाही अंकुश दिसून येत नाही .
म्हणून सरकार आणि समाजातील जागृत घटकांनी पुढे आले पाहिजे . . .
प्रत्येक शाळा, कॉलेज आणि प्रत्येक गावाला झाडे जगवण्याचे टार्गेट दिले पाहिजे व त्यावरूनच त्याला अनुदान सुद्धा निश्चित केले गेले पाहिजे !
व त्या झाडांचे अॉडीट केले पाहिजे तरच संपुर्ण भारत व आपले राज्य दुष्काळ मुक्त होईल!
लेखक. . विजय पिसाळ नातेपुते ©®९४२३६१३४४९/९६६५९३६९६९
ही चळवळ वळवळ राहू नये प्रत्येकाने आपापाले गांवा पासून करावी नागरीकांनी स्वतःचे शेतात घर परिसरात या वर्षापासून फळझाडे वृक्ष लागवड करावी आपला गांव हरित करावा व जे नागरिक जळतळ वनातून आणतात त्यांना ग्रामस्थांनी बंदी करावी नातेपुते परिसरात वनात जळतन तोड होवू देऊ नये आपापले गांवाचा वनाबाबत आदर्श इतर गांवा समोर ठेवावा असे मला वाटले
उत्तर द्याहटवा